Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 17, 2007

Hitguj » Health » गर्भारपण आणि स्त्रीयांचे आजार » गर्भारपण.. Pregnancy » Aahar during pregnancy » Archive through October 17, 2007 « Previous Next »

Swa_26
Thursday, May 17, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, झकासराव...

तुमच्या त्या पोस्ट्चे printout काढुन ठेवलीच आहे मी घरी. डॉक्टरीणच आहे तिची, त्यामुळे तसा काही problem नाहीय. पण आणखी काही माहीती मिळाली तर.. म्हणुन इथे लिहिले.
'वंशवेल' घ्यायला आजच जाते दादरला


Zakasrao
Monday, May 21, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती डॉ. रत्नावली दातार यांच "सुखद मातृत्व" अस एक पुस्तक आहे. त्यामधे आहाराविषयी माहिती आहेच पण इतर माहिती छान आहे. जसे की गर्भ धारणा कशी होते पासुन ते बाळाच्या जन्माच्या वेळी काय होते? नंतर काय काळजी घ्यावी? काय व्यायाम करावे?
तुला वंशवेल मधे आहाराची जास्त छान माहिती मिळेल तर इतर माहिती ह्या पुस्तकात मिळेल. हे पुस्तक घेतली तर अजुन छान होइल. पण जे काही पुस्तकातले सल्ले आचरणात आणायचे ते डॉ. च्या सांगण्यावरुन.


Kaviash
Monday, May 21, 2007 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, झकासराव...
मी पण हे पुस्तक मिळत का ते बघते.

पण हे ११ किलो वजन पुर्ण प्रेग्न्नसी मधे वाढायला पाहिजे ना? माझ तर आत्ताच १० किलो वाढलय...


Shmt
Monday, May 21, 2007 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्ण pregnancy मध्ये ३० ते ३२ pound वजन वाढते.

Disha013
Monday, May 21, 2007 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कवि, डॉ. ला काही हरकत नसेल तर चालु शकते.
माझ्या एका मैत्रीणीचे तर तब्बल २६ किलो वजन वाढले होते! पण problem काही नसल्याने चालले ते आणि delivery देखील normal होती. रोजचे फ़िरणे नियमित होते.


Ankulkarni
Tuesday, May 22, 2007 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी
आहारात बीटाची कोशिम्बीर सालेड यान्चा समावेश करावा. रोज अर्धी वाटी
जर बीट आवडत नसेल तर मिक्सर मधे घलुन ज्युस करावा त्यात मिठ,जिरे पावडर घाल रुचकर होतो.
१ वीक मधे फ़रक जाणवेल

अस्मिता



Ankulkarni
Tuesday, May 22, 2007 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kavish

कविश
वजन बेतान वाढलेल बर असत शेवटच्या ३ महिन्यात कमि जडपणा येतो. आणि सुसह्य होत
अस्मिता


Swa_26
Wednesday, May 23, 2007 - 7:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद अस्मिता.. बीट तर आईने लगेचच सुरु केले.. पण बाई आवडीने खात नाही :-) जबरदस्ती खा गं.. खा गं करावे लागते.

Bhramar_vihar
Thursday, May 24, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, Hb करता खजुरही चांगला. तसेच पालक सूप देखिल. मासे खायला हरकत नाही, मात्र चिकन मटण वर्ज्य! अर्थात डॉक्टरी सल्ला घ्यायचाच.
आणि आवडीने खाण्याचा प्रश्न नसतो ग, ते खाववत नाही. nausia किंवा खाल्लेले उलटुन पडेल या भितिने देखिल! :-)


Swa_26
Thursday, May 24, 2007 - 5:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, इथे छान माहिती मिळतेय. हो रे मिलिंद, तिल उलट्यांचाच जास्त त्रास होतोय. मासे, चिकन, मटण याचा मात्र वास पण घेत नाहीय.
खजुर आणि पालक सुपन्चे सानंगेन मी तिला. पण खजुर तसा उष्ण असे म्हणतात ना? प्रमाण कमी ठेवावे लागेल मग त्याचे..


Bhramar_vihar
Friday, May 25, 2007 - 4:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिवसातुन एखादा खजुर आणि दूध घ्यायच!

Swa_26
Friday, May 25, 2007 - 7:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद, मिलिंद... तुझा सल्ला पोहोचवेन वहिनीला :-)

Saj81
Friday, June 01, 2007 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'आयुर्वेदिय गर्भ सन्स्कार ' हे पुस्तक कसे आहे हे कोनि सन्गु शकेल क?

Shikha
Sunday, October 07, 2007 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,
ग़र्भारपणात काय आहार असावा ह्या बद्दाल छान माहिती मिळाली. ग़र्भारपणापूर्वि काय आहार असावा हे कोणी सांगु शकेल का?
हिमालयास च्या शतावरि कल्प कप्सुल घेणे फ़ायद्याचे आहे का? मी असे ऐकले कि अस्पारगास बाळाच्या जन्माआधी आणि नंतर उपयोगि असते,काहि माहीती मिळाली तर बरे होइल.

धन्यवाद,
शिखा


Sayuri
Monday, October 15, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I have entered 2nd trimester(चौथा महिना). पहिले तीन महिने उलट्यांचा त्रास खूपच झाला. (अजूनसुद्धा पूर्ण थांबला नाहिये:-() मला सकाळी उठल्यावर bile vomittingचा खूप त्रास होतोय. त्यासाठी काही उपाय आहे का? कोणी सांगू शकेल का?

Vishee
Monday, October 15, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, मी डॉ. शहा यांच्या "सुप्रजेसाठी गर्भसंस्कार" पुस्तकात वाचलय की सकाळी उठल्यावर लगेचच एक दोन मारी (किंवा तत्सम कोणतीतरी कमी गोड) बिस्किट्स खायची. रात्री झोपेत जास्तीच acid, bile, पित्त पोटात साठल्याने सकाळी मळमळतं. त्यामुळे काही liquid घेण्याआधी अस काही solid खाउन बघ. (मला उलट्यांचा त्रास झाला नाही त्यामुळे हा उपाय लागु पडतो का नाही ते माहित नाही. तुच सांग बरं.)

Sayuri
Monday, October 15, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vishee,
धन्यवाद गं. हा उपाय ट्राय करुन पहाते. मळमळ, bile,डचमळण्याने अगदी हैराण झालेय.

Sayuri
Wednesday, October 17, 2007 - 4:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vishee,मी ट्राय करुन पाहिलं पण मला नाही हा उपाय लागू पडला. :-( जाऊ दे आता हा त्रास बंद कधी होईल त्याची वाट पहाते झालं!
पण सांगितल्याबद्दल परत एकदा धन्यवाद.


Disha013
Wednesday, October 17, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायुरी, मला पहिल्या वेळी उलट्यांचा त्रास ७ महिने झालेला आणि दुस-या वेळी ५ महिने!
हे आपल्या हातात नाही असं मला वाटते.
शिवाय, पहिल्यावेळी दुध पोटात राहयचेच नाही आणि दुस-या वेळी दुध प्रचंड आवडत होते! :-)
पण एक सांगु का,तु कॅडबरी ( dairy milk ) खावुन बघ, मळमळ जाणवली की. पण सकाळी काही खाल्यावर. त्याने बाळ पण हसरे होते असे म्हणतात. :-)
मला त्याने खुप आराम पडायचा.


Sayuri
Wednesday, October 17, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिशा,
हा उलट्यांचा त्रास मलाही पुरेपूर होणार आहे असं दिसतंय. चॉकलेट खाण्याची आयडिया मला चालेल नव्हे तर पळेल पण त्याने जास्त शुगर पोटात जाईल ना..
आणि दुसरं म्हणजे या उलट्या, मळमळण्यामुळे पहिल्या तीन महिन्यान माझं वजन तर अजिबात वाढलं नाहिये (डॉ. म्हणाली असं होणारच) पण या उलट्या आता अश्याच ५ किंवा ७ महिने वगैरे चालू राहिल्या तर वजन कसं वाढेल याची मला चिंता वाटतेय (आणि वजन तर वाढायला हवं ना?)


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators