|
Sakhi_d
| |
| Saturday, December 16, 2006 - 5:31 am: |
| 
|
मनकवडा, आता ह नवीन thread चालू करते. आता इथे सांग. अरे मी lunch ला २-३ पोळ्या आणते तरी मला लगेच भुक लागते.
|
Jagu
| |
| Saturday, December 16, 2006 - 5:46 am: |
| 
|
ज्यांना गस, ऍसीडीटी चा त्रास, आहे, बी.पी. चा त्रास आहे त्यांचा रोजचा आहार कसा असावा
|
सखि s.ndt त असतांना तुझे subject कोणते होते? कारण माझी बहिण तीथे आहे तीला nutrition हा पण विषय आहे. मला वाटले तु आहाराबद्दल माहिती देत आहे
|
हं बरे झाले नवा thread start केला पण मी मगेच लिहले होते... तु breakfast नीट करतेस का? आणि योग्य वेळि करते का? हे संग आधी... i meant scheduele दे जरा, मग कळेल कि कुठे काय add / change करता येइल.. जगु, gases साठी /hitguj/messages/103387/106474.html?1165937515 हे चेक कर
|
Sakhi_d
| |
| Monday, December 18, 2006 - 7:12 am: |
| 
|
अरे मी सकाळी १ / २ पोळ्या चहाबरोबर खाते साधारण ६.३० - ७ वाजता. मग office मधे १० ला चहा बरोबर biscuit वैगरे खाते. १ वाजता २ / ३ पोळ्या ख़ाते मग direct ७ वाजता काहि खाल्ले तर नाहितर ९ - ९.३० ला पुन्हा २ / ३ पोळ्या. रात्री भात असेल तर पोळि नाहि खात. सकाळी नाहितर संध्याकाळि १ glass दुध + २ चमचे शतावरी घेते. आता सांग.
|
हं गुड... तो जो १० ला चहा घेते ना, त्यच वेळि थोड खवुन पण घे.. जसे कहि fruits or snacks आणि मग चहा घे... आणि १ ला जेवण झाले कि ४-५ ला जर भूक लागलि तर juice or fruitplate try करुन पहा.. हो शतावरि खुप चांगले असते.. रोज घे दुधातून...
|
सापाडला ना खरा प्रकार... .. चालु द्या...
|
Sakhi_d
| |
| Monday, December 18, 2006 - 8:43 am: |
| 
|
आज गाजर घेवून आलेय. असच काहितरी घेवुन आले पाहिजे.
|
हा प्रश्ण कुठे ताकायचा ते कळले नाहि म्हणुन इथे टाकतेय. मी रोज breakfast ला उकडलेले अंडे खाते. एकाने मला असे सान्गित्ले कि शक्य तोवर अंड खाताना त्यातिल पिवळा भाग ( egg yolk ) काधुन टाकत जा कारण त्यात अनावश्यक cholesterols असतात. म्ला अस विचारायच आहे कि Vit A पण या पिवळ्या भागातच असते का? ( as its a fat soluble vitamine? ) तस असेल तर एग्ग योल्क खाणे योग्य वाटते.
|
Mrinmayee
| |
| Saturday, February 03, 2007 - 7:33 pm: |
| 
|
रश्मी, साधारण एका अंड्याचा पिवळा भाग हा आपल्या दिवसभराच्या आहारातल्या कोलेस्टेरॉलचा ६०% वाटा असतो. आणि वर दुध, दही ताक, तुप यातून; तर मांसाहार करणार्यांच्या पोटात आणखी कोलेस्टेरॉल जातंच. तेव्हा आपला उरलेल्या दिवसाचा आहार काय असतो यावर 'अंड्याचा योक खायचा की नाही' हे ठरवावं!
|
Marhatmoli
| |
| Saturday, February 03, 2007 - 11:13 pm: |
| 
|
Thanks Mrinmayee , अग मी अंड्याव्यतिरिक्त non-veg खात नाहि. दुध रोज एकदा कपभर ( 8 fl. ounce ) घेते बाकि दहिताक आणि तळलेले occasionaly .
|
मी रोज सकाळी चार अंडी खातो. त्याचा पिवळा बलक चक्क बेसीनमध्ये टाकून देतो. शुद्ध पांढरा बलक. हे पाहून पहाणारा फार हळहळतो.काय करणार. पिवळ्यातले carbohydrates मला टाळायचे असतात.. as per my diet plan..
|
Mrinmayee
| |
| Sunday, February 04, 2007 - 5:15 pm: |
| 
|
http://www.carbs-information.com/eggs/carbs-in-egg-yolk.htm , हुडा, इथे जाऊन बघ! पिवळा भाग काढून टाकतोस! लई बेस! पण पिवळा बलक इतका सिग्निफ़िकंट सोर्स असतो कार्बोहायड्रेट्स्चा?
|
mru. it is to reduce insulin drain and of course to reduce CH. pure protiens dont invite insulin secretion and prevents hunger...and cosequently less food intake..
|
अरे मी lunch ला २-३ पोळ्या आणते तरी मला लगेच भुक लागते.>>>> sakhi try to understand Insulin secretion cycle..
|
अरे मी सकाळी १ / २ पोळ्या चहाबरोबर खाते साधारण ६.३० - ७ वाजता. मग office मधे १० ला चहा बरोबर biscuit वैगरे खाते. १ वाजता २ / ३ पोळ्या ख़ाते मग direct ७ वाजता काहि खाल्ले तर नाहितर ९ - ९.३० ला पुन्हा २ / ३ पोळ्या. रात्री भात असेल तर पोळि नाहि खात. सकाळी नाहितर संध्याकाळि १ glass दुध + २ चमचे शतावरी घेते. >>>मग भूक लागून वजन वाढणारच. यात एक तास व्यायाम नाही लिहिले.? कसे लिहिशील?नसणारच व्यायाम. मग काय होणार हे सांगायला का आता ज्योतिषी पाहिजे?
|
सखी तुझे वजन किती? तू तुझ्या body weight च्या इतके ग्रॅम प्रोटीन्स रोज डाएटमध्ये घेतेस का?
|
Thanks Mrinmayee , फ़ारच सहि site आहे तु दिलेलि. एकन्दर वरच्य सगळ्या posts आणि site वचुन अस वाटतय कि egg yolk should be discarded . Robinhood , तुम्हि तुमच्या diet चा उल्लेख केलय त्य diet बद्दल थोडि अजुन माहिति द्याल का? तुम्हि म्हंटलय कि body Weight च्य equivalant grams of proteins diet मध्ये असायला हवेत, हे body weight Pounds मध्ये कि Kg मध्ये?
|
इथे मला जरा सल्ला द्याल का? मी एकटीच राहते त्यामुळे स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो. हा माझा रोजचा आहार्: सकाळी एक मोठा कप चहा. (नऊ वाजता) एक मेगी नूडल्स किंवा बिस्किट्स किंवा egg omlette (साडेदहा वाजता) दाल राइस किंवा दोन पोळ्या आणि भाजी (दीड वाजता) फ़्रूट्स किंवा snacks (पाच वाजता) दाल राईस आणि दही (आठनंतर ) एक ग्लास दूध (झोपायच्या आधी) यामधे मी अजून काय Add करू शकते?
|
Bee
| |
| Monday, February 05, 2007 - 10:01 am: |
| 
|
नंदीनी, आहार असा असावी की न्याहरी पोट भरुन असावी जी आपल्याकडे बरेच जण करत देखील नाहीत. दुपारचे जेवन अर्धपोटी असावे. रात्रीचे जेवन हलके असावे आणि दुपारच्या जेवनापेक्षाही कमी असावे. आपल्या पोटाची जी काही जागा असते ती फ़क्त एकट्या अन्नाला देऊ नये. हठयोगामधे असे सांगितले आहे की, पोटाच्या जागेचे विभाजन हे अन्न, पानी आणि वायू ह्या ३ साठी असावे. असे करुनही पोट डच्च भरलेले जाणवू नये. श्वास घेताना जर नाभीपर्यंत O2 पोचत असेल तर समजावे पोटात जागा आहे. कित्येकांना नाभीपर्यंत O2 कसा पोचतो हे माहिती देखील नसते. ते फ़क्त हृदयापर्यंतचे श्वसन अनुभवु शकतात. खायच्या प्रत्येक पदार्थांमधे रज, तम, सत असे तीन गुण असतात. म्हणून काही पदार्थ हे खुपसे खाऊ नयेत, काही पदार्थ खाताना वेळेचे बंधन बाळगावे. जसे की दुध हे रात्र घेऊ नये. दुध हे सात्विक असल्यामुळे त्याला सकाळ अधिक मानते. म्हणून दुध रात्री न घेता पहाटे घ्यावे. दुध रात्री घेण्याने बद्धकोष्टतेचा परिणाम होऊ शकतो. जेवनात भरपुर कोंडा fibre असलेले पदार्थ असावेत. जसे की बटाट्याची सालं ही वरवर खराब जरी दिसत असलीत तरी ती स्वच्छ करुन खावीत. आपले पोट त्या सालीतून काय घावे हे ठरवायला समर्थ आहे. तसेच चुक्कु, पेरु, बिया आणि साल असलेली सगळी फ़ळफ़ळावल ह्यांच्याबाबत करावे. भात आणि दही रात्रीच्या जेवनाला ठेवू नये. भात दही दुपारी खाल्ले तर त्यातले गुण शरिराला मिळतात. मिरची जरी चवदार आणि भुक वाढवणारी असली तरी मिरची खाण्यामुळे बरेच विकार होऊ शकतात. तेल.. तेलापासून शक्यतो दुरच रहावे. तेल जितके कमी केले तितके छान. शरिराला आधी, भाजीपाला, मग फ़ळ, मग कडधान्य, मग मासा क्रम देऊन अन्नाचा पुरवठा द्यावा. पाणी, हे उकळून पिले तर उत्तमच. ठंडीच्या दिवसात पाणी पिणे कमी करु नये. रोज १५ ग्लास पाणी पोटात जायलाच पाहिजे. ह्या खेरीज, कितीही खाल्ले तरी आपण ते कसे जिरवतो ह्याला खुप महत्त्व आहे. जसे की एखाद्या s/w engineer ला खुप आहार लागत नाही. पण एखाद्या मजदुराला भरपुर आहार लागतो. आपण शारिरिक श्रम किती करतो त्यावर आहार ठरवला पाहिजे. शरिर रोड वाटत असून जर तुम्ही उत्साही असाल तर तुमचा आहर योग्य आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|