|
Bee
| |
| Tuesday, November 14, 2006 - 5:59 am: |
| 
|
ज्यांना high blood pressure आहे त्यांनी सर्वांगासन आणि शीर्षासन करताना सतर्क रहावे. ही आसने केली तर फ़क्त २० सेकंद आसनस्थ रहावे. ह्यापेक्षा जास्त नाही. जर normal असाल तर रोज कमीतकमी १ मिनिट तरी हे आसन करावे आणि आपला श्वासोश्वास normal ठेवावा. साधारणतः एका श्वासाला ३ सेकंद लागतात. त्यानुसार सेकंदाची मोजणी करावी. केस पांढरे होणे थांबत असतील पण जे आधीच पांढरे आहेत ते काळे होतात का हे नक्की माहिती नाही. मेंदूला भरपूर रक्तपुरवठा झाल्यामुळे तुमची स्मृती, काम करण्याची शक्ती चांगली राहते हा ह्या आसनांचा खास फ़ायदा आहे. ह्यानी मधुमेह होत नाही, आधीच झाला असेल तर निदान तो फ़ोफ़ावत नाही. प्राणायम करुन झाल्यानंतर लगेच ह्या दोन आसनांपैकी एक करावे. हठयोगामधे ह्याला 'विपरीत कर्णी' म्हणतात. केसांच्या आरोग्यासाठी माझ्या अनुभवानुसार शिकेकई, आवळाकंठी, कर्पूरकचूरा, नागरमोथा आणि रिठा ह्याची पुड जास्त चांगली आहे. अधुनमधुन मेंदी लावावी. शाम्पू वापरत असाल तर आधी ते वापरणे थांबवा. केसांचे पोत मऊसुत राहते.
|
धन्यवाद बी, पण मग जे केस आधीच पान्ढरे झालेत (अकाली), ते काळे होऊ शकतात का? काही उपाय आहे का यावर?
|
Bee
| |
| Tuesday, November 14, 2006 - 11:13 am: |
| 
|
होऊ शकतात पण त्याला खूप कालावधी लागतो आणि तुमचा विश्वास, मेहनत, नियमितपणा, पथ्य हे सर्व काही लागतं. कित्येक ८० वर्षांचे वृद्ध लोक तरुणांसारखे दिसतात ते उगाच नाही. आयुर्वेद आणि योगा ह्यामधे केवढीतरी शक्ती सामावलेली आहे. त्याचा अवलंब केला तर फ़ायदेच फ़ायदे आहेत.
|
मेन्दि शिवाय अजुन काहि हर्बल उपाय आहे का पान्ढरे केस कलर करण्याकरता. मि कुणाकडुन तरि ऐकला कि मन्डुर वापरल्याने पण केस काहि काळाकरता काळे होतात. हे खरा आहे का? मेन्दि च माझा अनुभव आहे कि केस थोडे रुक्ष होतात. आणि १५-२० दिवस होत नाहि तर लगेच परत लावायचि वेळ येते. थोडा लौंन्ग लास्टिन्ग उपाय आहे का काहि?
|
Avv
| |
| Friday, November 17, 2006 - 5:58 am: |
| 
|
मेंदीचा अनुभव तसा येतो. खरे आहे. १५ दिवसातून एकदा लावावीच लागते. पण त्यामुळे पांढरे होण्याचा वेग कमी होतो. मेंदीमध्ये आवळा पावडर, मंडूर, चहाचे पाणी घालवे. जरा गडद रंग येतो. कल्शियम कमी असेल तरी केस लवकर पिकतात. असो. मी पण सध्या उपाय शोधतेच आहे.
|
Swa_26
| |
| Friday, November 17, 2006 - 9:38 am: |
| 
|
बी, माझा एक प्रश्न आहे... तु म्हटल्याप्रमाणे मि आवळा, रिठा, शिकेकाई आणून त्याने केस धुण्यास सुरुवात केली, पण केसांना लावलेले तेल त्याने निघत नाही आणि मग परत शाम्पू लावावाच लागतो. तर त्यावर काही उपाय आहे का? (मी शिकेकाईच्या शेंगा, रिठा पावडर आणि ताजा आवळा मिक्स करून लावते.)
|
स्वाती रीठ्याचे प्रमाण जास्त असले त्याने तेल पुर्ण निघते अगदी शंपु सारखा फ़ेस होइपर्यन्त लावयए रीठा पाणी..!!!.. आणि तरिही नाही निघाले.. तर त्या पाण्यात अगदी थोडा शांपु टाकायचा.. नेहमी जितका वापर्तो त्याच्याअ निम्म्यापेक्षा कमी.. आणि त्या शिकेकाई शॅंपु मिश्रीत पाण्याने केस धुवायचे यामुळे. सगळीकडे पाणी व्यवस्थीत लागुन केस अगदी स्वच्Cःअ होतात.. इतर वेळीही केस धुताना शॅंपु direct केसांना लावु नये आपल्याला जेव्हढा शॅंपु लावायचाय त्यापेक्षा निम्मा घेउन तो अर्धा मग पाण्यात mix करुन लावायचा.. त्याने दाट केसही जस्त स्वच्छ निघतात. नाहितर दाट केसात आतल्या लेयरला.. तेल तसेच राहते.
|
Swa_26
| |
| Saturday, November 18, 2006 - 4:58 am: |
| 
|
धन्यवाद वैशाली, मी हे करून बघेन. अग रिठ्यामुळे केस ड्राय होतात असे मी ऐकले होते त्यामुळे मी तो शिकेकाईपेक्षा कमी प्रमाणात घ्यायची. पण आता थोडा जास्त घेऊन बघेन. आज मी थोडा शाम्पू मिक्स करुन पाहीला, तर त्याने बरे निघाले तेल.
|
Honey
| |
| Tuesday, November 21, 2006 - 2:24 am: |
| 
|
Hi moodi, mi tuze nirogi kesansathiche sagale upay vachale.kharach khoop chan ahet.maze case purvi khoop soft ani oily hote.ani ata geli 3 varsha mi us madhe ahe ,so shampoo mule agadi dry ani nirjeev zale ahet ga.pan mala ethe kuthalehi herbal pawders lavane shakya nahi.Mala koni sangate dahi lav tar koni limboo ,beer.Tu pls mala sang hyatala nakki changala kay ahe .
|
स्वाती मी फ़क्त रीठा पावडर वापरते.. भारतातुन येतांना घेउन येते.., फ़क्त रीठा वापरला तर त्यात शॅपु वापरायची सुध्दा गरज पडत नाही.. इतका फ़ेस होतो. थोडे कोरडे वाटतात केस.... त्यासाठी कोमट तेलात कापुर टाकुन मालिश करायची टर्किश टोवेल ने वाफ़ घ्यायची आणि केस धुण्याआधी दही अंडे mix करुन लाव.. हा उपाय तु जर एक महिना जरी regular केला ना तरी तुला खुप फ़र्क जाणवेल. खुप मऊ आणि चमक येते यामुळे...
|
Nir14
| |
| Tuesday, November 21, 2006 - 9:14 am: |
| 
|
Hi to all, Maza swatacha anubhav asa aahe ki, jar kesansathi "Chandrika" Soap waparla tar tyacha khup phyayda hoto, tel lagech nighte, jar kesanchya eter samasya astil tyahi dur hotat(uwa,kiha hot nahit) me swatha geli 5-6 varshanpassun ha saban vaprat aahe.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 22, 2006 - 11:37 am: |
| 
|
हा सुध्दा तोच duplicate id .. !!!... ... ... ... ... मारुतीचे शेपुट इथेही..
|
Swa_26
| |
| Thursday, November 23, 2006 - 5:23 am: |
| 
|
लोपा, हा काय प्रकार आहे डुप्लिकेट id चा? बरं... मी तु सांगितल्याप्रमाणे अंड + दही सध्या ट्राय करतेय. आणि मला वाटतंय की, हि पावडरच बरोबर नसावी कारण आज फक्त रिठा पावडर लावली तरीपण फ़ेस येत नाहीय. दुसरी आणून बघावी लागेल.
|
Lopamudraa
| |
| Thursday, November 23, 2006 - 10:05 am: |
| 
|
अग.. जाउदे.. तो id येतच राहणार.. आता परत एक आलाय.. ... तु कशी केली होती रीठा पावडर...,मी रीठ्याच्या बी काढुन उन्हात वाळवुन गिरणी वर दळुण आणते..!!! दोन मोठे चमचे रीठा पावडर.. पाण्यात उकळवुन.. त्या पाण्याने एकदा धुतल्यावर जर फ़ेस नाही झाला तर लगेच पुन्हा दोनदा.. ते पाणी वापराय्चे.. जसे आपण शॅपु दोनदा लावतो तसे..
|
Limbutimbu
| |
| Thursday, November 23, 2006 - 11:24 am: |
| 
|
रीठा पावडर जुनी असेल तर फेस येणार नाही अस होत असेल का? की पाणि जास्त होत असेल? आमच्यात सिल्केशाईनची तयार पावडर वापरतात! दर रविवारी आमच्या धाकट्या लिम्बोणीचे केस मलाच धुवावे लागतात त्यामुळे माहीत! (तिच म्हणण की आई खसाखसा रगडते, बाब्बुली तू कित्ती चान्गल करतोस, अन त्यामुळे डोक्यावरुन आन्घोळ असली की स्वारी माझ्या साठी वाट बघत बसते!) 
|
Swa_26
| |
| Friday, November 24, 2006 - 4:59 am: |
| 
|
वैशाली, मी काही ती पावडर घरी वगैरे बनवली नाही गं.... बाहेरुन विकत आणलीय. म्हणून वाटतेय की ती जुनी असावी. पण लिंबू म्हणतात त्याप्रमाणे कदाचित पाणी जास्त होत असेल का? तु २ चमचे पावडरला साधारण किती पाणी घेतेस? ... एक आपला अंदाज सांग गं.. पण तुझा तो अंड + दही चा फ़ॉर्म्युला चांगला आहे बरं का... स्वानुभव!!
|
Nir14
| |
| Friday, November 24, 2006 - 10:07 am: |
| 
|
Sorry lopamudraa, mi phakta maza anubhav sangitla tya sathi evdhi visheshna lawayla nakot, Moderators please delete my above mail....... again sorry to lopamudrra.
|
शक्य आहे.. ग.., जरी.. आख्खे रीठे मिळाले ना.. तरी चालते..पुडच पाहिजे अस नाही त्यातल्या बी काढुन.. ते पाण्यात उकळले तरी चालते, पाणी तु किति घेते..दोन मोटए चमचे पुड.. चार कप पाणी खुप झाले.., अर्थात तुझे केस किती दाट आणि लांब आहेत यावरही आहे.. पण तरी एव्हढेच घ्यावे. माझ्या घरी पण सुट्टीच्या दिवशी मुलाला मि जोरात मालिश करते म्हणुन मी नको पप्पाच पाहिजे.. असतात,दोघांना त्या दिवशी आता अर्ध्या तासाच्या आत तुमचे शाही स्नान आवरुन tablevar या नाहितर breakfast मिळनार नाही असे सांगावे लागते. ..
|
Swa_26
| |
| Saturday, November 25, 2006 - 8:59 am: |
| 
|
लोपा, अगं ही हल्लीची मुले म्हणजे पपांकडेच जास्त चिकटलेली असतात (बघ न लिंबु यांचे वरील पोस्ट !!) मी आता अख्खे रिठेच घेऊन येते. पण त्यात शिकेकाई पण टाकली तरी चालेल नाही का? जास्त चांगले नाही का?? OK done !!
|
chaalel aapalyaa.. aapalyaa avaDee pramaane karaave... ....
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|