Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 27, 2006

Hitguj » Health » गर्भारपण आणि स्त्रीयांचे आजार » गर्भारपण.. Pregnancy » Aahar during pregnancy » Archive through November 27, 2006 « Previous Next »

Sayalimi
Wednesday, July 26, 2006 - 6:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी मदत करेल का???? मला लवकरच डाएट चालू करायच आहे.


Chiku
Friday, July 28, 2006 - 7:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi Sayalimi
माझ्या मते तु तुझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच डाएट करावस. माझ्या एका मैत्रिणीला पण Gestational Diabetes झाला होता. दिवसातुन ४-५ वेळा थोडे थोडे खायचे, आपला नेहमीचा स्वयंपाक चालत असावा पण बटाट्यासारखे वातुळ पदार्थ बंद. (डॉक्टरांना विचारुन low carb पोळ्या खाऊ शकलिस तर त्याने शुगर वाढणार नाहि.
Best of Luck


Adtvtk
Tuesday, August 01, 2006 - 2:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगगग सायालिमी तू पण
मला पण २ वर्षा पूर्वी GD झाला होता माझ्या दुसर्‍या खेपेला. पहिल्या वेळी थोडक्यात वाचले.
३ महत्वच्या गोष्टी
-प्रमाणात योग्य आहार
-वेळच्या वेळी आहार
-चालणे... चालणे.... आणि चालणे

तू specialist कडे जाउन आलीस का ते माहिती नाहि म्हणून थोडक्यात background तु जे काहि खाते ते शेवटी glucose मध्ये convert होते. आणि Insulin हे त्या glucose ला use करु शकते. जर insulin चे प्रमाण कमी असेल तर थोडेसे glucose convert होते व रक्तातली sugar level high रहाते. Pregnancy मध्ये आपले शरीर insulin production थोडे कमी करते जेणेकरुन रक्तातली suger level जरा जास्त राहिल. बाळ ते glucose वापरते व त्याची वाढ होते.

GD मध्ये insulin production आणिक कमी होते. त्याचा दुष्परिणाम असा की बाळ फ़ार मोठे होते व त्याचा आईला जन्म देताना त्रास होतो व बाळालापण पुढे त्रास होउ शकतो.
तर....
-ज्युस व इतर गोड पदर्थ एकदम बंद
- white bread अजिबात नको. wheat bread ठिक आहे पण चपाति जास्त बरी
- grocery store मध्ये whole wheat पीठ मिळते त्यात कोंडा जास्त असतो ते व भारतीय दुकानातले पीठ एकत्र करुन चपाति करुन बघ
-एका दिवसाचे खाणे ५ ते ६ वेळ विभागुन खा
- protins मुळे carbohydrates हळुहळु glucose मध्ये रुपांतर होतात म्हणून दुपार व रात्रीच्या जेवणात काहितरी protines असुन दे.
-मांसाहार करत असशील तर रोज एक उकडलेले अंड खा.
-कोंबडी व मासे पण. मासे आठवड्यातुन २ वेळा ठिक.
-खुप भुक लगली असेल तर थोडे nuts खा. काकडी गाजर पण जरा तोंड चलवयला बरे. मला गाजर चालत होते म्हणजे sugar फ़ार वाढायची नाही.
-महत्वाचे sugar check करत रहा. इथे दिवसातुन ४ वेळा सांगतात. मी तर जरा वेडीच झाले होते. काही काही वेळा ५-६ वेळा पण बघायचे पण त्यमुळे जरा आंदाज आला की केव्हा खाउ शकते ते.
-मी सधारणत ८,१० १२,३-४,७ वाजता खायचे.
-आणि हो रात्रि ७-७.३० पर्यंत जेवच.(खरं म्हणजे ६.३० पण येउन जेवण करीपर्यंत ७ वाजायचेच) जर सकाळची sugar जास्त रहात असेल तर insulin ते पण injection घ्ययला लागेल.
-चालयला विसरु नको विषेशत रात्री

तू साधरणत २८ २९ weeks असेल तर फ़क्त १०-१२ आठवडे कळ काढ. माझी व माझ्या मैत्रीणीची ( with GD) delivery व्यवस्थित normal झाली काही pain medication न घेता.


Adtvtk
Tuesday, August 01, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही खायचे पदार्थ
-दिवसातुन दुध(२%),दही, किंवा cheese(fat free) यातले ३ वेळा तरी पोटात जाउंदे
-अंड, मासे,कोंबडी वर सांगितलेच आहे
-मोड आलेली कडधान्ये,डाळी राजमा (मझी specialist उत्तर भारतीय होती ती नेहमी राजमा वरच अडकायची)
-पालेभाज्या भरपुर खा
-शक्यतो salads म्हणजे आपल्या कोशिम्बिरी नाही पण बाहेर मिळणारी salads खाउ नकोस. घरी कोशिम्बिर मात्र खा. पोट भरायला मदत होते.
- tofu काहीच चव नसते पण कांदा टोमटो थोडी काळीमिरी फोडनी करुन बरी लागते पण खूप protines
-शक्यतो दिवसातून १-२ फ़ळं खायचा प्रयत्न कर. मी सकळी केळं व ३-४ वाजता काहितरी फ़ळं खायचे. द्राक्ष, आंबा नको.
-नेहमीचे जेवणच जेवत जा पण एका वेळी कमी खा. पिष्टमय पदार्थ टाळच जरा.
- nuts मध्ये बदाम(२-३) ,अक्रोड,एखादे खारिक किंव जर्दाळु असे एकवेळी खा. काजू नको. माझे २-३ वेळा असे nuts खाल्ले जायचे.
-प्रत्येकाची sysem वेगळी असते म्हणून खायचे प्रमाण suger test वरुन ठरव.
- junk food म्हणजे chips वैगरे अजिबात नको.म्हणजे जे काही तोंडात टाकशिल त्याचा तुला व बाळाला फ़ायदा होइल असेच खा.
-भात शक्यतो टाळच. मी फ़क्त रात्री एकच घास भात खायची कारण त्याच्याशिवाय जेवल्यासारखे वाटायचे नाही पण खरच फ़क्त १ घास.
-एका दिवसातुन सधारणत ६-७ चपात्या खायचे (माझी उंची ५" ८" आहे).

चल बाकी तुला All The Best
on positive side आयुष्यभराच्या योग्य खायच्या सवयी तुला व घरच्यांना पडतील


Sayalimi
Tuesday, August 01, 2006 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अदिती, चिकू धन्यवाद.
मी डाएटिशियन कडे जाऊन आले. मी ३२ वीक्स प्रेग्नंट आहे आणि आता शुगर डिटेक्ट झाली आहे. पण जास्त नाहीये, १५१-१६१ आहे. मी डॉ. ने दिल्याप्रमाणे डाएट केलं २ दिवस पण मला फारसं नाही जमलं कारण मला चीझ, तोफू चा नॉशिया आहे. मी सध्या भरपूर भाज्या खाते २ वेळा आणि त्यातच सोया चंक्स घालते.
प्रत्येक जेवणा नंतर १५-२० मि. चालते.
आता ४ दिवस झाले शुगर चेक करते आहे. ज़ेवताना २ पोळ्या भाजी आमटी आणि १ कप भात खाते. शुगर १३० च्या वर जात नाही.
आणि फास्टिग शुगर पण ९० च्या वर नाही.
आता परत डॉ. कडे जायचं आहे.
गोड काही खाल्लं बाहेर जेवले तर जास्त चालते. सध्या तरी उपयोग होतो आहे.
साबूदाणा चालतो का?
गुळाचे गोड प्रकार चालतात का?



Adtvtk
Tuesday, August 01, 2006 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा तुझी sugar बर्‍यापैकी control मध्ये आहे.
बाईग साबुदाणा मात्र नको. फ़क्त १ कप किंवा कमी साबुदाना खाउन माझी sugar २०० आली होती नंतर त्याला हात नाही लावला. मी पण sugar १४० च्या खाली(माझा वेळी ते limit होते) ठेवली होते. भाजीत घालतो तेव्हडा गुळ सोडुन त्याच्या पण वाटेला मी फ़ारशी गेले नाही.

एक सुचना अधिक जसे weeks वाढत जातील तसे sugar maintain करयला जरा जास्त प्रयत्न लागतात. सांगायचे करण sugar checking मध्ये फ़ार relax होउ नकोस. मला तसा धक्का बसला होता. sugar १७० पर्यंत पोचली होती. fasting पण १०२ पर्यंत जाउन आली.

डॉ. बोलली एक दोनदा ठिक आहे पण असा trend नको.
good Luck and keep it up


Maudee
Wednesday, August 23, 2006 - 5:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Is constipation normal during pregnancy? साधारन किती महिने होतो हा त्रास?

Nayana
Tuesday, November 07, 2006 - 4:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका friends ला GD झाला आहे.ती north India आहे.तिला मध्यन्तरि blooding झाले असल्याने ती bed rest वर आहे.ती चालण्याचा देखील exercise करु शकत नाही कारण पोटात pain होते..... तिचि due date January 8 th ला आहे. अशावेळेला तिने कसा diet ठरववा. ती मेथि (पाले भाजी) , कारली टाळते करण ते गरम आहे. अंकुरित मेथी थंड आही असे मी ऐकले आहे की जेणेकरुन तिचि sugar level कमी होइल आनी insulin injection घेण्याचे टाळेल. अंकुरित मेथी गरम का थंड? क्रुपया please मार्गदर्शन करा.

Avv
Friday, November 10, 2006 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयुर्वेदाचे म्हणणे काय गरोदरपणातील मधूमेहाबद्दल? पहिल्यावेळी निघाला असेल तर दुसरा चान्स घ्याव की नाही? अश्विनी प्लिज जरा लिहाल का या बद्द्ल?

धन्यवाद


Rakhma
Sunday, November 26, 2006 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mala attach kala ki m pregnant ahe....seven weeks now...pan mala morning sickness nahi ahe...ofcourse bakiche symtoms ahet...pan mala konte hi padarthache aversions, kiwa ultya, jiv ghabrne waigre hot nahi ahe...Does that mean ki kahi gadbad ahe? Mazhi gynech shi opp. pudhcya week madhe ahe....toparaynt koni sangu shakel ka? Konala asa anubhav asel tar please madat kara......thanks in advance...

Mrinmayee
Sunday, November 26, 2006 - 9:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रख्मा, अभिनंदन!
डॉक्टर सगळं सांगतीलच, पण स्वानुभवावरून सांगते, काही गडबड नसावी! मला नऊ महीन्यात एकदाही उलटी, मळमळ, नॉशीया वगैरे झालं नाही. काही स्पेसिफिक पदार्थ खायची तीव्र इच्छा देखील झाली नाही. सगळं खात पीत होते. अगदी हट्टीकट्टी! त्याचा एकच दुष्परीणाम.. फारसे लाड पुरवल्या जात नाहीत! :-) कारण आपण प्रेग्नंट आहोत हे इतरांनाच काय स्वत:ला सुध्दा विसरायला होतं. :-)
काळजी घे!जमल्यास 'वंशवेल' हे पुस्तक आण. खूप उपयोगी पडेल!


Rakhma
Monday, November 27, 2006 - 2:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks ga mrinmayee lagech uttar dilya baddal...khoopach dhir ala... hopefully sarva thik asawa...mi aiklay ki jya mulina morning sickness hot nahi tyacha baby healthy nasto mhanun...tu kahi wishesh kalji ghetlis ka ga?? Ani ho US madhe wanshwel kutun anlas???

Rakhma
Monday, November 27, 2006 - 2:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Also mala ankhin sp prashna hote;
1.koni niyamit excercise kela hota ka preg madhe...
2. Mi aiklay ki roj khadi sakhar kesar, badam khallach khoop fayda hoto balala...
3. Mala gases cha khoop tras hoto ahe...kahi khalla ki pot khoopach fugta ani uncomfortable feeling hota..kunala anubhav ahe kaa?
4.Ankhin kahi tips anubahv sangal kaaa please....

Avv
Monday, November 27, 2006 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rakhma,
1. regular medium paced walking is best till the due date. some deep breating exercies with `aum' chanting will keep you calm and energetic.
2. if you have access to balaji tambes notes on garbhsanskar read and follow those. he mentions specific things to eat in specific months.
3. gas hot asel tar potbhar ekdum na khata divide the food in small portions and eat them. also aavalyachi supari thodi chaghalayachi jevanantar. obviously avoid food that r known to give you gas.
4. drink low fat milk with shatavri kalpa. 2 glasses in a day
5. eat 3/4 fruits and 1 coconut water (shahalyache pani)

congratulations and good luck.


Mrinmayee
Monday, November 27, 2006 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रख्मा, इथे डॉक्टरला विचारूनच व्यायाम कर. यु एसमधे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते आणि ते म्हणजे इथल्या अमेरिकन डॉक्टरला आपल्या देशी पध्दती माहीती नसतात. तेव्हा त्यांच्या कलानी गेलेलं बरं. कुठलिही विटॅमिन्स, इतर काही गोळ्या, टॉनिक्स वगरे न विचारता घ्यायला नकोत.
वंशवेल भारतातुनच आणलं होतं. पण रसिक. कॉम वर बहुतेक मिळेल. त्यांची सर्विस चांगली आहे.
गॅसेस होत असतील तर Avv नी सांगीतल्याप्रमाणे अन्न जरा कमी प्रमाणात आणि विभागुन खावं. भात, बटाटा, कोबी टाळली तर बरं. पाणी भरपूर प्यावं.
मुख्य म्हणजे 'ज्यांना मॉर्निंग सिकनेस होत नाही त्यांची बाळं हेल्दी नसतात' हे अगदी चुक.


Rakhma
Monday, November 27, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrinmayee AVV, Thanks a lot for the help. Actually internet war wachle ki morning sickness nasel tar miscarraige che chances jast astat mhanun.
Any ways try karun pahate AVV ne sangitlele upay Gases sathi.
Excercise baddal hya sathi wichar la ki mi pregant honya adhi cardio and wts karat hote roj ek tas...te continue karu ki nako he wicharayche hote...
Rasik.com war jaun pahte...
Mi sadhya tari kontya hi multivitamins ghet nahi ahe...ata wicharte dr. na...
Thanks ga tumhi khoopach madat kelit.....

Mrinmayee
Monday, November 27, 2006 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्डिओ आणि वेट्स तर डॉक्टरला विचारल्याशिवाय मुळीच करु नकोस!!!!! आणि इंटरनेटवरच्या सगळ्या माहीतीवर विश्वास ठेवण्यात पण अर्थ नाही.

Rakhma
Monday, November 27, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mrinmayee me attach Vanshvel order kela...thanks ha mahiti sathi/....yes ani mi cario ani wts thambawte ata....thanks again....ankhin kahi tipa asteel tar jaroor sanga......abhari ahe....

Rakhma
Monday, November 27, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ha balant shepa kuthe milel???

Disha013
Monday, November 27, 2006 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रखमा, माझ्या माहितीप्रमाणे बाळंतशेपा ' dill seads' या नावाने indian store मधे मिळतात.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators