|
Vamantra
| |
| Thursday, August 31, 2006 - 11:29 am: |
| 
|
Thanks Chioo, मला सगळेच ओरडतात जेवणाबद्द्ल. पण माझे जेवण कमीच आहे. आणि दिवसभर नुसते बसुन काम असते ना त्यमुळे काही व्यायाम होत नाही आणि नुसतेच वजन वाढते आहे म्हणुन मी जरा बेतानेच खाते. बाकी काही कारण नाही. तरी पण आता जरा भूक लागली की काहीतरी खाते.
|
Lajo
| |
| Friday, September 01, 2006 - 4:22 am: |
| 
|
मला ही पित्ता चा आधून मधून त्रास होतो. अती तिखट किंवा मसालेदार खाल्ले की. त्यावर सोपे दोन उपाय: १: पुदीन हरा ची गोळी किंवा २-३ थेब अर्क थंड पाण्यात २-२ तासांनी घेणे २: एक लवंग थोडा वेळ चघळून नंतर चावून खाणे मला या दोन्ही उपायांचा फायदा होतो.
|
Maj
| |
| Monday, September 11, 2006 - 1:45 pm: |
| 
|
sakali zopetoon jaage zale ki bharpur pani pyayche.. it helps...
|
Maudee
| |
| Tuesday, September 12, 2006 - 6:50 am: |
| 
|
मध्ये मी एका पुस्तकात वाचले की hyperacidity वाल्यानी सकाळी गरम गरम मेतकुट भात ख़ावा. आणि नेहमी शक्यतो गरम करुन गार केलेले पाणी प्यावे. don't know whether it works or not पण मेतकुट भाताचा उपाय मलातरी छान वाटला
|
Sms
| |
| Wednesday, September 13, 2006 - 9:00 pm: |
| 
|
Hyper Acidity kami karnyasathi diwasatoon gaar dudh 3 vela pine.Hya dudhaat sakhar ghalu naye.It acts like an antaacid.Duparchya velela plain lassighyavi.Kiwa agadi taze just laglele dahi khave. Kokam sarbat pan ghetale tari upayog hoil.Phakta ambat nasave
|
Fulpakhru
| |
| Wednesday, September 13, 2006 - 9:29 pm: |
| 
|
प्रान्जली तु सकाळी फ़ार लवकर उठतेस म्हनून चहा पिणे बन्द कर काहि दिवस जर पित्ताचा खूप त्रास होत असेल तर. चहाएवजी दूध पीत जा. कोकम सरबत ही दिवसातुन २ दा पी बराच फ़रक जाणवेल. गोड ताकाचाही खूप उपयोग होतो. मला जवळ जवळ ३ वर्शे हायपर असिडिटी चा जीवघेणा त्रास झाला होता. मी ४ वर्शे चहाचा थेम्ब सुद्धा पिउ शकले नवते. मी आयुर्वेदाची treatment ही घेतली होती. आत्ता आत्ता जरा गाडी रुळावर येते आहे. आणि भूक लागली की काहितरी खा. काकडी किवा एखादे फ़ळ वगेरे. उपाशी अजिबात राहू नकोस. या अशा आजारांना आयुर्वेदिक औशधांचा खूप उपयोग होतो.
|
Vamantra
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:01 am: |
| 
|
धन्यवाद सगळ्यान्चे उपाय मी करुन बघीन. फुलपाखरु, मी पण आयुर्वेदिक मेडिसीन घेते आहे. मला एकदा काकडी खाल्यामुळे पण पित्त झाले होते तेव्हपसुन मी काकडी खात नाही. आणि काकडी ने पित्त होते असे मला खुप जननि सान्गितले आहे.
|
Moodi
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:08 am: |
| 
|
ओय ओय आधी तुझा काकडी विषयीचा हा गैरसमज दूर कर, उलट काकडी खाल्ली की सगळे अनावश्यक पदार्थ एकत्र होऊन ते शरीराबाहेर पडुन जातात. काकडी अवश्य खावी, फक्त त्यावर पाणी पिऊ नकोस कारण त्यात आधीच पाणी असते. आणि उपाशीपोटी पण खाऊ नकोस. दूपारी जेवणानंतर खा, डब्यात ने. काकडी आणि टॉमेटोच्या चकत्या असु देत बरोबर. 
|
Moodi
| |
| Thursday, September 21, 2006 - 10:18 am: |
| 
|
आणि हा लेख पण वाच यातला काकडीविषयी. http://www.online-family-doctor.com/fruits/cucumber.html
|
Vamantra
| |
| Thursday, September 21, 2006 - 11:16 am: |
| 
|
ए मूडि तुझी लिन्क चान्गली आहे. अग मी पण डब्यात काकडी, गाजर, टोमटो नेत होते पन त्रास झाल्यावर बन्द केले होते. पण आता परत नेयला सुरवात करीन.
|
Ishu
| |
| Friday, November 03, 2006 - 8:55 pm: |
| 
|
प्रांजली, मला पण बरीच वर्षं Acidity च त्रास होतोय. My Doctor has advised not to eat tomatoes and citrus fruits. Have you asked your doctor? I got the H.Pylori test done. It came out positive. I was taking antibiotics for two weeks. They are awful. पण बरं वाटेल ह्या आशेने ते घेतले कसेबसे. त्या नंतर Protonix नावाच्या गोळ्या सध्या सुरु आहेत. पण अजुन काही पूर्ण बरं वाटत नाही. चहा पूर्ण बंद केला आहे. :-( पण अजिबात spicy खायचे नाही म्हणजे कठीण काम आहे. ते जमत नाहीये अजून.
|
इशु, acidity वर सुवर्णसुतशेखर म्हणुन आयुर्वेदिक औषध आहे ते घेऊन पहा.. आणि गुलकन्द, अविपित्तकर चुर्ण, थन्ड दूध हे नियमित घेत चल.. त्याच्बरोबर घरचे ताजे लोणि मिळाले तर खा.. रात्रिचे जेवण हलके घे.. मुगाचि खिचडि, सळिच्या लह्य etc घे... याने पित्त नक्कि कमी होते... आणि एकदा त्रास कमी झाल कि मग तु परत बेताने spicy खौ शकशिल
|
तसेच वसन्त ऋतुत पित्तप्रकोप होत असतो... वमन, विरेचन हे उपाय जर जमत असतिल तर करुन पहा... अजुन १ उपाय आहे... जलौदर म्हणुन... १ ltr कोमत पण्यात थोडे मीठ शेन्देलोण टकावे नन्तर हळु हळु ते पाणि पीउन टाकावे..खूप पेउन टाकावे... घशपर्य्नत आल्यवर तर्जनी आणि मध्यमा (first 2 fingers..index n middle) use करुन सगळे पाणि बाहेर काढुन ताकावे (उलटि)... हा कर्यक्रम सकळि सकळि कराव... य नन्तर १ तास काहि खौ नये.. १ तसनन्तर एकदम हलका आहर घेणे.. e.g. मुगाचि पतळ खिचडि..साजुक तुप घलुन... याने पित्ताच त्रास नक्कि कमि होतो... मी स्वतहा करुन पाहिले आहे.. तसेच पित्तच्य रुग्नाने, सकाळि ४-५ तुळशिचि पाने खावि.. हा पण छान उपाय आहे..आणि सोपा
|
Vamantra
| |
| Monday, November 06, 2006 - 10:06 am: |
| 
|
माझा पित्ताचा त्रास सध्या खुप कमी झाला आहे. पण अता मझ्या चेहरयावर खुप बारिक बारिक पुरळ उठले आहे. डॉक्टर म्हनतात उश्णता खुप वाढली आहे. आणि ह्याच्या आधी पन एकदा असेच झाले होते तेव्हापण औषधे घेतल्यावर बरे वाटले होते पण आत चेहरयाची स्किन पन खुप कोरडी झाली आहे. चहा कॉफ़ी पन मी दिवसातुन दोन वेळाच पिते. थन्ड दूध घेतले तर घसा खराब होतो. कय करावे तेच कळत नाही. वर्षा
|
Ishu
| |
| Monday, November 06, 2006 - 1:57 pm: |
| 
|
Manakawada, Thanks!! मी तू सांगितलेले उपाय करुन पाहीन.
|
वर्षा, तु पित्तासठि काहि tablet घेतल्या होत्या क... e.g. acilok, zentac,hestak,rantac,gelucil,digine etc किन्वा मध्ये तुला काहि त्रास झाला होता क, ज्यासठि तु antibiotics घेतल्या असशिल कदाचित... या किन्वा अशा सर्व औशधन्मुळे अन्गातिल उष्णता वाढु शकते... म्हणुन अशा गोळ्या दुधाबरोबर घ्याव्या... आता यावर (बरिक पुरळ) पण docTor tablets देतिल.. may b कोणि dermatologist आणि त्यामुळे परत acidity वाढु शकते... जर काहि गोळ्या दिल्या तर त्या दुधाबरोबरच घे... चेहरा दिवसातुन ४-५ वेळा धुत जा... दिवसभरात जास्तित जास्त पाणी पीत जा.. रोज पोट साफ़ होतय ना याकडे लक्श दे... जर नसेल तर त्रिफ़ळा चुर्ण घेउन बघ आदल्या रात्रि झोपायच्या आधी... चेहर्याल गुलाबजल लावुन पहा..पण हे शुद्ध असावे... अन्गातलि उष्णता कमी होण्यासाठि... तळ पायाला अभ्यन्ग करुन पहा.. म्हणजे तळ पायाला रत्रि तेलाने मालिश करुन पहा.. किन्वा अजुन fast उपाय म्हणजे, तळ पायाला मेहन्दि लावुन पहा... दुध घेतले तर घसा घरब होतोय..???? मग एकदम थन्ड नको घेउ... गरम करुन normal गार केलेले घेउन बघ... रत्रि झोपताना...
|
Fulpakhru
| |
| Wednesday, November 08, 2006 - 3:07 am: |
| 
|
प्रांजली हा जो पित्ताचा त्रास होतो हा फ़ार जीवघेणा असतो, शिवाय खूप दिवस पुरतो हे त्रास लवकर बरे होत नाहीत. शक्य असेल तर चहाकॉफ़ी पुर्ण बन्द कर दूध रूम टेम्प्रेचर चे पी शहाळ्याचे पाणी पी टोमाटो, सन्त्र सारखी आम्बट फ़ळे अजिबात खाउ नकोस. दर २ तासान्नी कही तरी खाशील तर जास्त बरे एकदम जेवण्यापेक्शा. मला हा त्रास झाला तेव्हा मि फ़ायनल इयर ला होते. आणि एन परीक्शेच्या वेळेला मला हा त्रास होत होता. मी पेपर चालू असताना पण काही तरी खात असे. कारण पेपर ३ तसान्चा असतो आणि मला दर २ तासान्नी काहि तरी खावेच लागे. नाहीतर खूप त्रास होत असे. तुझ्या आयुर्वेदाच्या डॉक्टरान्नी जे काहि सान्गितले असेल त्याप्रमाणे न चुकता कर. मी तरी खूप दिवस वरण भात, केळे, काकडी आणि दुध दही या शिवाय काहीही खाल्ले नवते आणि चहाकॉफ़ी जवळ जवळ ४ वर्शे अजिबात पीत नवते. तरीही अजुनही मला कधी कधी हा त्रास होतोच. थोडा जरी त्रास झाला तरी आताही मी घाबरून चहा लगेच बन्द करते थोडे दिवस आणि जेवणाकडे लक्श देते. ALL THE BEST
|
Vamantra
| |
| Wednesday, November 08, 2006 - 4:47 am: |
| 
|
Thank you Manakawada & Manali. सध्या घाईत आहे. नंतर परत येइनच. तोपर्यंत बाय वर्षा
|
Vamantra
| |
| Wednesday, November 08, 2006 - 11:07 am: |
| 
|
आज संकष्टी चतुर्थी आहे. माझा उपास आहे त्यामुळे खिचडी खाल्ली आता पित्त खवळले आहे आणि डोक पण दुखते आहे. ऑफ़िस मध्ये थोडे गार दूध घेतले पण काही उपयोग नाही. मला सांगा ना कोणीतरी (मनकवडा फुलपाखरु) की मी काय खावे रोजच्या जेवणात? धन्यवाद वर्षा
|
Manakawada
| |
| Thursday, November 09, 2006 - 10:53 am: |
| 
|
वर्षा, गार दुधाचा काहीही उपयोग झाला नाहि???? अग मला स्वतहला फ़ार पित्त hote/aahe पण आत बरेच कमी झाले आहे... कारण, वेळच्या वेळी योग्य खाणे, जागरण टाळने, लवकर झोपुन लवकर उठणे इत्यादी.. तु जास्त जगरण करतेस क? रात्रिचे जेवण खूप heavy घेतेस का? सरखे पन्जाबी जेवण करतेस का? रत्रिच्या जेवणात आणि झोपेत किती अन्तर असते? जेवण जमत असेल तर थोडे लवकर करुन पहा... हलके जेवण घे.. जास्त तिखट पदार्थ खातेस का? असेल तर कमी कर... तुरडाल वापरता क?आमटी / वरण मध्ये त्यापेक्षा मूग डाल वापरुन बघ.. मी खूप महीने झाले, मूगडालिचे वरण आमटि खतो... उपवास कमी कर... म्हणजे, सलग उपवास होत असतिल तर थोडे बन्द कर... e.g. wed la chaturthi n lagech weekly thursday chaa upwas or thursday cha upwas ani lagun aaleli fri chi chaturthi etc आणि उपवास करत असशिल तर पापड वगैरे तेलकट पदार्ठ, तळलेले शबुवडा वगैरे पदार्थ खौ नकोस... त्यापेख़्शा, उपवासाल juice, fruits नारळ पाणि जास्त घे... आणि २-२ तासान्च्य अन्तराने घे..
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|