|
काही प्रश्न आहेत का?
|
Dineshvs
| |
| Sunday, August 20, 2006 - 1:12 pm: |
| 
|
सोनु, मी शाळेत असताना, म्हणजे १९७६ साली आम्हाला शाळेत काहि आयात केलेल्या गोळ्या दिल्या होत्या. त्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहेत असे सांगण्यात आले होते. त्यावेळच्या माझ्या अनेक सहकार्याना अजुनहि चष्मे लागलेले नाहीत. माझे आई वडील, मोठा भाऊ व बहिण या सगळ्याना चष्मा असुन, मला मात्र अजुनहि लागलेला नाही. मी अखंडवेळ कॉम्प्युटरवर असतो. भरपुर वाचन करतो, व पुर्ण शाकाहारी आहे. त्या गोळ्या कसल्या असाव्यात याची मात्र मला उत्सुकता आहे.
|
दिनेश, त्या गोळ्या कदाचित Vitamin A च्या असतील.पण त्याच गोळ्यांमुळे तुमच्या सहकार्यांना चष्मे लागले नाहीत असे म्हणणे योग्य ठरणार नाही. तुमच्या घरात सर्वांना चष्मा आहे पण त्याचा नंबर किती हे सांगितले नाही. वयाच्या ४० वर्षानंतर सगळ्यांनाच जवळचा चष्मा लागतो.तसेच,'मायोपीया' या प्रकारचा नंबर म्हणजेच जास्त असणारा मायनस नंबर(-५ च्या पुढे)जर आई-वडीलांना असेल तरच तुम्हाला तशी थोडीफ़ार शक्यता आहे. कॉम्प्युटरचा जास्त वेळ वापर करणार्यांनी दर १५ २० मिनिटांनंतर आपली द्रुष्टी स्क्रीन वरुन हटवून दूर एखाद्या वस्तुवर (जसे खिडकीबाहेर झाडांकडे) २-३ सेकंदासाठी केंद्रित करावी.याने डोळ्यांना आराम मिळेल. तसेच आपण कामाच्या नादात एकटक स्क्रीन कडे पहात असतो, पापण्यां ची उघडझाप कमी वेळा होते.याने डोळे कोरडे पडतात आणि लाल होणे,कचकच करणे या तक्रारी सुरु होतात. यालाच computer vision syndrome म्हणतात. हे टाळणे अगदी सोपे आहे.वर सांगितल्याप्रमाणे जर थोडा वेळ,अगदी २-३ सेकंद डोळ्यांना आराम मिळाला,पापण्यांची उघडझाप केली की काहीच त्रास होणार नाही. वाचन करताना नेहमी प्रकाश आपल्या मागुन डाव्या बाजुने यायला हवा.
|
Moodi
| |
| Sunday, August 20, 2006 - 2:46 pm: |
| 
|
सोनु धन्यवाद मदतीबद्दल. A vitamin असलेल्या पदार्थांमुळे डोळ्यांच्या बर्याच तक्रारी कमी होतात असे वाचलय. अजून काय बदल? कारण डोळ्यांकरता एकीकडे पनीर, चीज वगैरे जास्त खावेत असे वाचलय तर दुसरीकडे ह्या वस्तु जास्त खाऊ नयेत असे म्हटलय, यात समतोल कसा साधायचा? तसेच मोतीबिंदू झाला की चटकन कळु शकतो( म्हणजे तुम्हा डॉक्टर लोकांना तसेच रुग्णांना सुद्धा कळतो) पण काचबिंदू कशामुळे होतो अन तो टाळता येतो का? तो झाल्याचे कसे कळते? कारण तो चटकन ओळखणे अवघड आहे असे वाचलय.
|
Sia
| |
| Sunday, August 20, 2006 - 5:09 pm: |
| 
|
Sonu, Laser treatment ghyachi asel tar dolyanchi power 4 chya var pahije asa aaikala aahe te barobar aahe ka ?
|
Dineshvs
| |
| Sunday, August 20, 2006 - 5:16 pm: |
| 
|
आभार डॉ. सोनु. वर सांगितल्याप्रमाणे काळजी मी घेतोच. ( माझी चाळीशी केंव्हाच उलटली. ) खरेतर अशी काळजी सगळ्यानीच घ्यायला हवी. त्या गोळ्या तेलकट होत्या. कदाचित कॉड लिव्हर ऑईलच्या पण असतील. एरवी माझ्या खाण्यात हे आलेच नसते. अलिकडे मात्र अगदी लहान मुलाना चष्मा लागलेला दिसतो. कॉम्प्युटरपेक्षा टिव्हीकडे जास्त टक लावत बघत असतात ना ?
|
Kiran
| |
| Monday, August 21, 2006 - 3:07 am: |
| 
|
मी आत्ता US च्या अगोदर येताना डोळे तपासले असता उजव्या दोळ्याला अगदि कमी म्हणजे -0.5 नंबर असल्याचे कळले. मला तिथल्या dr ने कदाचीत infection मुळे असेल असे सांगून एक drops दिले. त्यानन्तर मी पुन्हा जायचा आळशीपणा केला पण अजुनही माझ्या उजव्या डोळ्याने लाम्बची छोटी अक्षरे blur दिसतात. (डाव्या डोळ्याने clear दिसतात.) हा number चस्मा लेन्स शिवाय घालवता येइल का? हे डोकेदुखी (मला migrain चा त्रास आहे) चे कारण असु शकते का? धन्यवाद.
|
मूडी,व्हीटमिन 'अ' असलेल्या पदार्थांमुळे नक्कीच डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. दूध,मासा,अंडी,हिरव्या पालेभाज्या..आणि सर्वात सोपे म्हणजे गाजर....यात हे व्हिटामिन भरपूर असते. आपल्या डोळ्यातील जे लेन्स आहे ते अगदी काचेसारखे पारदर्शक असते.त्याची पारदर्शकता कमी झाली की काचबिंदू होतो.. डोळ्याला मार लागला असेल तर आणि पन्नाशी उलटल्यानंतर मोतीबिंदू होतो,तसेच अगदी लहान मुलांनाही तो होउ शकतो ज्याला congenital or developemental cataractअसे म्हणतात. काचबिंदू म्हणजे डोळ्यातील ताण वाढणे.आपल्या डोळ्यामध्ये aqueous humor नावाचा पाण्यासारखा पदार्थ सतत तयार होत असतो आणि तो सतत filter होत असतो. कोणत्याही कारणामुळे त्याला अडथळा आला की तो डोळ्यातच साठत जाउन डोळा अगदी दगडासारखा टणक होतो.त्यामुळे retina and optic nerve यावर दाब पडुन द्रुष्टी कमी होउ शकते.काचबिंदू चे अनेक प्रकार आहेत. सामान्यपणे डोळा दुखणे,तीव्र डोकेदुखी,उलट्या,डोळ्यातुन सतत पाणी येणे,डोळा लाल होणे.. अशा तक्रारी असतात.मुख्य म्हणजे कमी होत जाणारी द्रुष्टी.. काही जणांना असा त्रास अजीबात होत नाही. अगदी अचानकच नेहमीची तपासणी करताना वाढलेला ताण कळुन येतो. काचबिंदू टाळण्यासाठी डोळ्यांची दर वर्षी आणि चाळीशी उलटल्यावर दर सहा महिन्यांनी (त्रास असो वा नसो) नियमीत तपासणी केलेली उत्तम.
|
Moodi
| |
| Monday, August 21, 2006 - 2:12 pm: |
| 
|
सोनु धन्यवाद. सखोल माहिती दिलीस. तुझ्या करीअरमध्ये तुझ्या यशाचा चढता आलेख राहु दे. 
|
सिया,डोळ्यांसाठी लेझर ट्रिटमेंट भरपूर आहेत तुम्ही बहुतेक डोळ्याचा नंबर कमी करण्यासाठी असणार्या LASIK (LASER ASSISTED IN SITU KERATOMILEUSIS) बद्दल विचारत आहात असे ग्रुहीत धरुन सांगते, त्यासाठी वयाची २१ वर्षे पुर्ण झालेली असावी लागतात.कारण साधारणपणे या वयापर्यंत नंबर वाढायचा थांबतो, त्या व्यक्तीला cornea चा कोणताही आजार नसावा लागतो. -२ ते १२ नंबर असणार्यांना ही ट्रिटमेंट करता येते. किरण, सर्वप्रथम तर कोणत्याही इन्फ़ेक्शन मुळे चष्म्याचा नंबर कायमचा लागत नाही. कोणत्याही drop मुळे नंबर जात नाही. एकदा लागलेला चष्मा सतत वापरत राहणे कधीही योग्य आहे. तुम्हाला ०.५० ह नंबर आहे; तो कमी जरी असला तरी तो आहेच ना!!!तुम्ही जर तो वापरला नाही तर त्या डोळ्यावर ताण पडतच जाणार.. आणि तो डोळा नंतर 'पहायचे' काम करण्यात आळशीपणा करणार.. याला amblyopia म्हणतात. migrain अनेक कारणांपैकी लागलेला चष्मा न वापरणे, किंवा नंबर बदललेला असणे ही कारणे असु शकतात
|
धन्यवाद मूडी दिनेश, डोळे खूप नाजुक असतात.त्यांच्यावर गरजेपेक्शा अधिक ताण पडला की तेही थकतात, योग्य विश्रांती, पूरक आहार, योग्य आचरण असेल तर कशाला हव्यात चष्म्याच्या कुबड्या त्यांना?हो ना?
|
Kiran
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:43 am: |
| 
|
सोनु धन्यवाद. म्हणजे आता मला लवकरात लवकर जाऊन चष्मा घ्यायला हवा तर! असो. मीही तो विचार केलाच होता. पण ईथे walgreens मध्ये वगैरे रेडीमेड चष्मे मोठ्या आणि पाॅझिटिव्ह नंबरचे मिळतात. आता भारतात गेल्यावरच व्यवस्थीत चष्मा करेन! पण चष्माचा नम्बर घालवण्याचा काही उपाय आहे का? मी असे ऐकले आहे की जर नम्बर कमी असेल तर चष्मा वापरून तो कमी होउ शकतो, हे खरे आहे का? आणि प्लीज अहो वगैरे म्हणू नको. ईथला अलिखीत नियम आहे की ६० वर्षान्च्या वयोवृद्धानंआही अरेच म्हणायचे!! (कोण रे तो झक्कींकडे बोट दाखवतोय) कारण मायबोलीवर येणारे सगळे चिरतरुणच असतात!! मित्रहो, ही site पहा http://www.enetrajyoti.com अतिशय सुन्दर साईट आहे
|
सोनु, तुम्ही इथे देत असलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. Please, इथे तुम्ही ज्या आजारांबद्दल लिहाल त्याचे प्रचलीत इंग्रजी नाव पण लिहा. काचबिंदूमध्ये, आपले निरोगी डोळे जेवढे क्षेत्र एकावेळी बघू शकतात त्यापेक्षा कमी क्षेत्र दिसते. आणि हा विकार जसा वाढत जाईल तसे हे क्षेत्र कमी कमी होत जाते. पुढे तर एखाद्या चिंचोळ्या नळकांड्यातून जग बघावे तसे होते. यावर जेवढ्या लवकर उपचार केला जाईल तेवढे चांगले. बरोबर ना? माझे एक निरीक्षण असे की, काही व्यक्तींचे डोळे आधी अगदी नॉर्मल असतात आणि अचानक त्यांच्या डोळ्यांतली सुसूत्रता बिघडते. (ते तिरळे दिसू लागतात.) असे कशाने होते? / कसे टाळता येते? हे तात्पुरते असते की कायमस्वरूपी? यावर उपाय काय? Thank you.
|
किरण (अरे!), चष्मा वापरायचा निर्णय वाचून बरे वाटले.
|
गजानन, काचबिंदू म्हणजे glaucoma याचे मी म्हटल्याप्रमाणे अनेक प्रकार आहेत, डोळ्यातील ताण वाढणे, optic nerve damage होणे आणि तुम्ही अगदी बरोबर सांगीतल्याप्रमाणे नजरेचे क्शेत्र म्हणजेच visual field loss होणे या त्रयींना एकत्रपणे काचबिंदू म्हणतात लवकर तपासणी करुन लवकर उपचार सुरु केले नाहीत तर optic nerve हळू हळू कमजोर होत जाते आणि त्यानुसार नजरेचे क्शेत्र कमी होत जाते. तिरळेपणा -Squint or strabismus याचीही अनेक कारणे तसेच प्रकार आहेत To tell in brief generally it can be present since birth.it can also be due to paralysis of one or more ocular muscles,trauma,head injury,defective vision in one eye,high refractive error in one eye,opacities in the cornea,also various diseases and tumours can cause the squint.Treatment depends upon the cause of squint
|
Swati_p
| |
| Sunday, September 10, 2006 - 8:48 am: |
| 
|
Sonu, Thanks for the information provided by you so far. I wanted to know if there was good treatment available in India for glaucoma. Also wanted to know if eyedrops like 'xalatan' and 'timoptol', that help reduce the IOP, are easily available at the pharmacy. I assume it will be only available in big cities like Bombay. I tried typing in marathi but couldn't get all the words right. Will try when I have more time on hand. Thanks and would really appreciate a reply from you.
|
Sonu_aboli
| |
| Wednesday, September 13, 2006 - 2:18 pm: |
| 
|
Dear Swati, Glaucoma is second to cataract which affects the vision.It is very common and hence its treatment is available all over India at every level. Glaucoma has several types which require medical and surgical treatment.Medical treatment is available easily provided the facility of investigations which would diagnose Glaucoma is available at that place. Basic surgical treatments if required are also available ; only the recent advances and very newer surgical techniques are carried out at Metrocity levels. Let me explain about the drugs.Not every patient of Glaucoma gets benifited by drugs.He or she SHOULD get herself properly checked and make clear the TYPE OF GLAUCOMA he or she is having before starting any treatment. Lastly,no self diagnosing and treating please.
|
Rahul16
| |
| Friday, September 15, 2006 - 4:46 pm: |
| 
|
mala sarkhya manjolya (stye) hotat...kahi permanent upay aahe ka.... kinwa jar manjoli hot aahe ase watale tar ti hou naye mhanun kay karawe?
|
Avikumar
| |
| Friday, September 15, 2006 - 5:53 pm: |
| 
|
सोनू, LASIK हि शस्त्रक्रिया वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत उपयोगी ठरु शकते? माझ्या वडिलांचे वय ४९ आहे सध्या. त्यांना उपयोगी पडेल का LASIK?
|
Sonu_aboli
| |
| Saturday, September 16, 2006 - 2:45 pm: |
| 
|
राहूल, 'स्टाय' हे एक प्रकारचे infection आहे ज्यामध्ये पापणीवर गाठ येते जी दुखते लाल होते,जास्त वाढल्यास पस पॉइंट तयार होउन तो फ़ुटू शकतो. याचे सर्वात साधे कारण म्हणजे चष्म्याचा नंबर लागलेला असणे,कारण जर असा नंबर असेल आणि चष्मा नाही वापरला तर स्पष्ट दिसत नसल्यामुळे काहीजण सतत डोळे चोळत राहतात ज्यामुळे इंफ़ेक्शन होउन स्टाय होतो. दुसरी कारणे अस्वच्छता, कुपोषण आणि डायबेटीस. एकीकडचे इंफ़ेक्शन दुसरीकडे पसरत जाउन ते वाढत जाते. उपाय- स्टाय येत आहे असे वाटू लागल्यास गरम शेक द्यावा.दिवसातून ५-६ वेळा शेकल्याने पुर्ण फ़ायदा होतो. antibiotics and if necessary some painkillers can also be taken
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|