सहज साध्य योगा(SSY) या शिबिराला आम्हाला एक प्र्योग करायला सांगितला होता... मिठाचे कोमट पाणि खुप प्यायचे अक्षरशा: २०..२५ glass आणि मग सगळे शरीर त्याने साफ़ होते... वजनही कमी होते.. त्यालाच म्हणतात का जल्धौती...!!
|
Bee
| |
| Tuesday, June 06, 2006 - 8:11 am: |
| 
|
२० २५ ग्लास पाणी आई गं लोपमुद्रा, २० २५ ग्लास पाणी खूप खूप झाले. जास्तित जास्त ६ ग्लासेस. खर्या अर्थाने जेवढे जाईल तेवढे पाणी प्यायचे. पाणी घाशापर्यंत आले की मग लगेच उठून ओकून टाकावे. पण ते कसे ओकावे त्याची एक पद्धत आहे. शिवाय पाणी पिताना कसे बसावे त्याचीही एक पद्धत योग - शात्रात दिली आहे. ह्यालाच वमन किंवा जलधौती किंवा जलदौती म्हणतात.
|
या ला आपण आता वाहता ठेवुया बर...इकडचे लोक...योगाचा ऽबर्यापैकी वापर करतात रोजच्या जीवनात,आपल्याला आयुर्वेदाची योगाची इतकी चांगली परंपरा आहे पण आपण त्याचा उपयोग करत नाही.शिवाय व्यायम तर... भयानक आपल्याकडे त्याच्या मानाने कोणी फ़ारसा करत नाही...मागच्या आठवड्यात इथे charity running होते, त्यात ३००० बायकांनि भाग घेतला होता.. त्यात ३ वर्शाच्या मुलीपासुन ७० वर्शाच्या आजि पर्यंत सगळे पळाले आणि charity ला कितितरी कोटी रुपये मिळवुन दिले... ते पळणे बघुन मी माझा रोजचा व्यायम दुपाटीने वाधवला... इथला सर्वसाम्न्या माणुस खुप व्यायम करतो.. रात्री १० वाजता सुध्दा बायका माणसे पळत असतात... आपण आपल्या लाखमोलाच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो... तरीबर आपल्याला... शरीर स्वस्थ्याकरता एक पुर्ण वर्ष देणार्या टीळा.कांची परंपरा अहे..!!
|
बी, अरे त्या लोकांनी अनुभवाने केलेई पधत आहे ती आणि त्यात पाणि ओकायचे नसते... उलटी झाली तर कारयची, आणि यामुळे पुर्ण digestive system रिकामी होते...
|
सकाळि उठून कोमट पाण्यात थोडेसे मीठ घालून ५-६ ग्लास प्यावे. नंतर गुडघे ताठ ठेवून कमरेत ओणवे व्हावे. हाताच्या तीन बोटानी जीभेच्या आतील टोकावर दाब द्यावा. जेव्हढे पाणि प्यायले असेल तितके सर्व बाहे पडते.. सोबत पित्त तसेच न पचलेले अन्न देखिल. ही cycle २-३ वेळा करावी. नंतर मुखमार्जन करुन दिवसाला सुरुवात करावी. सहा प्रकारच्या शुद्धीक्रिया आहेत. नेती,धौती,बस्ती,कपालभाती,नौली व त्राटक. षटक्रिया आरोग्याचा पाया!
|
मिलिंद, हे करताना दोन्ही पायांत साधारण अडीच फुट की काय अंतर ठेवायचे असते ना?
|
बरोबर गजानन. अर्थात त्यामुळे काही साध्य होत असही नाही
|
मला हा प्रकार माझ्या आतेभावाने शिकवला(कृतीसह :-) ). तेव्हा त्याने हे पायांत अंतर ठेवण्याचे सांगितले होते. आणि आणखी भलतेच काही होऊन बसले तर काय घ्या! म्हणून मी तसे निमूटपणे केले कदाचित हे असे अंतर ठेवण्यामुळे पोटातल्या इतर अवयवांवर अतिरिक्त जोर न पडण्यास मदत होत असेल किंवा पाणी बाहेर पडण्यास सोपे पडत असावे असा माझा अंदाज होता. BTW बी, मी वरच्या अर्काईव्हज् मधून नजर टाकली त्यात कुठे या प्रकाराबद्दल सविस्तर लिहिलेले दिसले नाही. मिलिंद आणखी एक- जलधौती रोज-रोज / वारंवार करणे योग्य आहे का?
|
Bee
| |
| Wednesday, June 07, 2006 - 7:45 am: |
| 
|
नाही का... मला वाटले असेल कारण मागे ह्यावर आम्ही बोललो होतो हे आठवते. वर दिलेली आहे भ्रमरनी जलधौतीची पद्धत पण हे वाचने, ऐकणे आणि कुणाकडून शिकून घेणे ह्यात खूप फ़रक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने कुणाकडून शिकून घ्यावे आणि जर तुम्ही खंबीर असाल तर वाचून केले तरी हरकत नाही. साध्या मिठा ऐवजी जर sea-salt वापरले तर चांगला अनुभव येतो. जलधौती जेंव्हा सुरू करतो त्यावेळी ती १५ दिवस रोज करावी. नंतर दर १५ दिवसांनाही लगत ३ दिवस करावी. पण स्वतचा एक instinct असतो तो वापरूनही जलधौती करता येते. जसे की मी जलधौतीसाठी कॅलेंडर समोर ठेवत नाही. माझा आपला एक natural instinct आहे तो मला सांगतो की हो आता आज कर जलधौती तर खरेच त्याचा मला फ़ायदा होतो शिवाय नियमात बांधून रहावे लागत नाही. नाहीतर नियम पाळून केली तरी हरकत नाही.
|
आठवड्यातून एकदा करायला हरकत नाही. किंवा अपचन, पित्त झाले असता करावी. वर बी ने म्हटल्याप्रमाणे क्रीया (खर तर योगाभ्यास) हा अनुभवी गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करावा.
|
भ्रमर मेडिटशन बद्दलही विस्ताराने सांग बर... आणि मेडिटशन्ची फ़्रिक्येन्सि कशी असावि? शिवाय फ़ायदे कशामुळे होतील आणि मेडिटशन करतांना काय करावेच आणि काय टाळावे... याबद्दलही please सांग. आणि जलधौती मि जे केले ते ssy च्या शिबिरात...तीथे... त्यानन्तर बिन मिठाचि मुगाचि खिचडी वरुन भरपुर तुपात खायला देतात यावर आणि नंअतर दोन दिवस असेच हलके खायचे असते.
|
भ्रमर इतक्या लवकर लवकर केले तर याची शरीराला सवय नाही का लागनार... माझ्या मैत्र्र्निला असे मिथाचे पानि पिउन उलटी करायचीसवय आहे तर कधी खोकला येतो म्हणुन मिठाचे पाण्याची गुळण्या जरी करायच्या म्हटले आणि जेवण झाल्यावर रात्री ब्रुश काराYआचा म्हटले की ती ला उलट्या व्हायला लाग्तातत
|
वा भ्रमर, बी, लोपा, चान्गली चर्चा चालली हे! अन ते लाम्बलचक चिन्धी गिळत जातात त्या प्रकाराचे नाव काय?
|
ती वस्त्र धौती रे भौ. सवय कशाची लोप्स? खिचडि तूप घालून याकरता की ते वंगणासारख काम करत, आतड्याना. पण खर तर हा आहार जलप्रक्षालन क्रिये नंतर सांगतात. मेडीटेशन च्या आधी धारणा करावी म्हानजे एकाच गोष्टिवर ध्यान केंद्रीत करायच. मेडीटेशन बद्दल बोलु आपण
|
Mrdmahesh
| |
| Wednesday, June 07, 2006 - 12:55 pm: |
| 
|
भ्रमर, तू दिलेला अंबिका योग कुटिरचा दुसरा नंबर कोणी उचलत नाहिये अन् पहिला नंबर wrong आहे... माझा शोध चालू आहे..
|
Moodi
| |
| Thursday, June 08, 2006 - 7:51 am: |
| 
|
मिलिंद इथे पुढारीत लेख आलाय बघ वमनक्रिया अन नस्यावर, तसेच त्याचे उपयोग पण. http://www.pudhari.com/Archives/may06/25/Link/P-arogyaI.htm
|
भ्रमर मी जे केले ते बहुदा जल प्रक्षालन क्रियाच होति... मला नाव आठवत नव्हते...!! आणि योगाबद्दल मला बरेच विच्रायचेय... तुला मैल केली detail प्रश्न लिहुन तर चालेल..का?
|
चालेल ना लोप्स. मला जे माहीत अहे ते मी share करीन
|
Nalini
| |
| Tuesday, June 20, 2006 - 4:24 pm: |
| 
|
महेश, पुण्यात महर्षीनगर, गुलटेकडी येथे क्रीसेंट हायस्कुलच्या समोर एक आश्रम आहे. तिथे योगाभ्यास तसेच निसर्गोपचार शिकवले तसेच करवुन घेतले जातात. तुम्ही तिथे एकदा भेट देऊन चौकशी करु शकता.
|
Shyamli
| |
| Tuesday, June 20, 2006 - 4:29 pm: |
| 
|
जल प्रक्षालन क्रियाच होति... मला नाव आठवत नव्हते...!!>> ( SSY )सिद्ध समाधि योग च्या शीबिरात करुन घेतात तेच ना..........शंखप्रक्षालन आहे ग ते 
|