|
लिंबु, खं मी प्रथमच ऐकल. सोहम या मंत्राचा मत्र वापर केला जातो हे माहीत आहे. खर तर ज्या शब्दावर आघात केला जातो असे सर्वच शब्द हे नाभि, परा पश्यंति, वैखरी या मार्गाने उच्च्चारले असता जी कंपने निर्माण होतात ती उपयोगी असतात.
|
Bee
| |
| Wednesday, May 31, 2006 - 10:16 am: |
| 
|
मीही खच्या उच्चाराबद्दल ऐकले नाही पण माझ्या शिक्षकांना विचारून बघेन. नाभी, परा, पश्यंति, वैखरी.. भ्रमर बापरे
|
भ्रमरा तुझ बरोबर हे! मला शास्त्रिय भाषेत सान्गता येत नाही पण अनुभुतीतुन जे जाणवते ते म्हणजे "प्राण" शक्ती चेतविण्यासाठी "श्वसन" किर्येच्या विविध मार्गान्चा अवलम्भ केला जातो! माझी त्या विषयात गती नाही! खं चा उपयोग करताना "सन्जय दत्त" ला एका हिन्दी सिनेमात दाखविला हे! (आणि म्हणुन मी इथे लिहिले असे नाही बर का!) मला वाटते की सर्वच एकाक्षरी किन्वा बीजाक्षरी मन्त्रान्मधे तु म्हणतो तशा उत्पन्न होणार्या कम्पनान्चा वापर करुन घेतला जात असावा! ओम ऐं र्हीं क्लीम वगैरे अक्षरे मनातल्या मनात जरी नीटपणे पुनरुच्चारीत केली तर उद्देशाप्रती फरक जाणवतो असा माझा अनुभव हे! मात्र हे मन्त्रोच्चारण योग्य व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय केवळ पुस्तके वाचुन करू नये! मात्र या बाबीस वरील "खं" हा मन्त्र अपवाद हे! आधी सिद्ध करुन ठेवावा व सन्कट समयी हा जरुर वापरावा! बाकी तुमचे चालु द्यात! मी आपला वाचतो!
|
मी वरल्या पोस्ट केवळ येवढ्यासाठीच केल्या की मला कुठे तरी जाणवले की योग आणि मन्त्रशक्तीची जोपासना यात कुठे तरी नातेसम्बन्ध हे! किन्वा त्या बाबी एकमेकान्करिता किन्वा एकमेकान्वर अवलम्बुन हेत! ते हे जे जाणवले ते सान्गण्याचा प्रयत्न केला, अन्यथा वरील पोस्ट करीता वेगळा बीबी उघडावा लागेल! कृपया, "विषयान्तर केल्याच पाप" माझ्या माथी नको म्हणुन हे स्पष्टीकरण!
|
योगाभ्यास किंवा मंत्रोच्चार हे मन सुद्रुढ ठेवण्यासाठि किंवा सक्षम करण्यासाठीच नाही का? त्यामुळे विषयांतर नाही रे लिंबुभौ!
|
Chingutai
| |
| Wednesday, May 31, 2006 - 12:15 pm: |
| 
|
लिंबू तू म्हणतोस ते खरं आहे. हा मेडिटेशन चा येक प्रकार आहे. परवाच येका व्याख्यानाच्या कसेट मधे ऐकले. यामधे, 'ह्रं', 'धं' अशा अनेक उच्चारांचा वापर होतो. उच्च रक्तदाबासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी. अधिक महिती जाणकार सांगतीलच. -चिंगी
|
Mrdmahesh
| |
| Thursday, June 01, 2006 - 10:50 am: |
| 
|
अपघात झाल्यामुळे मला (पद्मासन सोडाच) साधी मांडी घालून ५ मि. सुद्धा बसता येत नाही... मी प्राणायाम कसा करू? कुठली आसने करू? सहकार नगर, धनकवडी भागात चांगले योगशिक्षक माहित आहेत का? जे माझ्यासारख्याला मार्गदर्शन करू शकतील... कृपया सांगावे. धन्यवाद!
|
Bee
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:18 am: |
| 
|
अपघात झाला म्हणजे नेमके काय झाले? कुठे लागले? अपघात गंभीर होता का? तुमचे तज्ञ वैद्य काय म्हणतात? त्यांनी काही सल्ला दिला आहे का तुम्हाला? अपघात होऊन किती काळ लोटला आहे? एकूणच तुमच्या शरीराची लवचिकता कशी आहे? मांडी घालताना कुठे दुखते का? हे सर्व काही सांगितले तर काही सुचविता येईल. मी नाही तर अजून कुणी सांगू शकेल.
|
Mrdmahesh
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:53 am: |
| 
|
अपघात १ वर्षापूर्वी उजव्या गुडघ्याला झाला होता. लिगामेंट तुटले होते. छोटे fractures ही होते. operation करून आतमध्ये छोटा rod घातला आहे. पाय plaster मध्ये होता. शरीराची लवचिकता कमी आहे. डॉक्टरांनी लांब उडी, उंच उडी, पळणे या गोष्टी करण्यास मनाई केली आहे. या महिन्यात दाखवायचे आहे. त्यांच्या सल्ल्यानेच कुठल्याप्रकारची आसने करावीत हे ठरवणार आहे. परंतु पद्मासन घालता येत नाही. मांडी पण घालता येत नाही. तेव्हा खुर्चीवर बसून प्राणायाम करता येतो का? मुख्य म्हणजे अशा केसेस handle करू शकतील असे योगशिक्षक मिळणे माझ्यासाठी अधिक महत्वाचे आहे.
|
महेश, चान्गलाच प्रॉब्लेम हे की रे! टेक केअर! मी विचारुन बघतो माझ्या माहीतीतल्यान्ना ते भेटले की!
|
Mrdmahesh
| |
| Thursday, June 01, 2006 - 12:32 pm: |
| 
|
लिंबूभाव, मी चारचौघांसारखा बाहेरून दिसत असलो तरी मला त्यांच्या सारख्या सगळ्याच गोष्टी करता येत नाहीत (ज्या मी पूर्वी करू शकत होतो..). आपल्यात थोडी का होईना काही कमतरता कायमची आली आहे ही जाणीव कधी कधी (हो कधी कधीच... नेहमी नाही) अस्वस्थ करते लिंबूभाव.. धन्यवाद... देव तुमच्या प्रयत्नांना यश देवो... असो...
|
महेश, प्राणायाम हा खुर्चीवर बसून देखिल करु शकतोस, त्यात काही वावगे नाही. फक्त पाय जमिनिला लावू नकोस व हवेत देखिल ठेवु नकोस. एखाद्या लाकडी टेबल्वर पावले ठेव व कर. प्राणायाम हे अष्टांग योगातील आसनानंतरचे अंग आहे. आसनांनी नाडी शुद्धी होते त्याचा फायदा प्राणायामास होतो. पुण्यात अंबिका योग कुटिरचा फोन नं २५४२१३२५ किवा २४४८९२०४
|
Mrdmahesh
| |
| Thursday, June 01, 2006 - 12:55 pm: |
| 
|
धन्यवाद भ्रमरा... मी चौकशी करतो तिथे
|
मी च प्रश्न विचारला आणि या bb. ल विसरले... आजच पाहिले फ़ारच उपौक्त माहिति मिळालि...भ्रमर,अजुन सांगत रहा... लिम्बु तुझी माहिती ही पण सगळ्या विशयांइअतकिच उपयुकत आहे...महेश काळजी घेरे
|
Bee
| |
| Tuesday, June 06, 2006 - 2:56 am: |
| 
|
हठयोगाचे शरीर शुद्धीकरणाचे प्रकार मला खूप आवडलेत. डाॅक्टर म्हणतात अहो तुमच्या शरीरात पित्त साचले आहे, अमुक गोळ्या खा. मग ह्या गोळ्यांचे साईड इफ़ेक्ट कमी करण्यासाठी अजून काहीतरी ईलाज करावा लागतो. एकूणच काय हे चक्र चालूच राहतं. पित्त साचलेल्या शरिराला एक प्रकारचा जडपणा येतो. पोट सैल राहत नाही, त्यावर चरबी साचत जाते, पोटाच्या वळकट्या घट्ट होत जातात आणि आपण ह्याला वयोमानापरत्वे हे असे होणारच असे समजून हुलकावणी देतो. चांगले नीटनेटके कपडे घातले की पुन्हा आपण तरुण आणि आकृतीबंध दिसायला लागतो. आपले मन प्रसन्न होते. खाल्लेलं पचतच अस नाही. हळुहळु आपल्याला ह्याची इतकी सवय होऊन जाते की आपल्या पोटाचे काहीच बिघडले नाही असे वाटते. ..पण एकदा तरी जलदौती करुन पहा. तुम्हाला कळेलं तुम्ही तुमच्या हा पोटाच्या गुहेत काय साचवून ठेवलं आहे. सुरवातीला त्रास होईल. जमणार नाही, हा प्रकार आवडणार नाही. पण नियमितपणे जर हा प्रकार करून पाहिला तर शरीरातील पित्त बाहेर पडेल. तुम्हाला तुमचे शरीर हलके हलके वाटेल. नाभीपासून कंठापर्यंतचा आतील भाग धुवून स्वच्छ होईल. रक्तातील विषारी पदार्थ बाहेर पडतील. श्वसन क्रिया सुधारेल. पाठिचे आजार दूर पळतील. पथ्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. आज जे तुम्ही खाऊ पिऊ शकता ते अगदी १०० वर्षापर्यंत देखील खाऊ शकाल. वजन आटोक्यात राहील. वजनात घट करणासाठी ह्या सारखा दुसरा प्रकार नाही. काल रात्री घरी उशिरा आलो. मग उशिराच स्वैपाक. उशिराच जेवन झालं. नंतर घरच्यांशी बोललो, त्याचा झोपेवर परिणाम. मग अपचन आणि सकाळी उठल्यानंतरचा त्रास. ह्यावर त्वरीत उपाय म्हणून जलधौती करून पाहिली. दात आमतील इतके आंबट फ़ेसाळ पाणी पडले. जर ते तसेच पोटात राहिले असते तर काय झाले असते कुणास ठावूक. अगदी एका मिनिटात मला पूर्ववत हलके हलके वाटायला लागले. जडपणा निघून गेला. पोट रिकामे झाले. सांगा बघू तुमच्या medical technique मधे इतक्या त्वरीत इलाज करणारी अशी कुठली गोळी आहे ह्यावर? नाहीच.. म्हणून मग जलधौती!
|
बी, खर हे तुझ म्हणणे! अनुमोदन!
|
Bee
| |
| Tuesday, June 06, 2006 - 5:19 am: |
| 
|
लिंबुटिंबु, नुसते अनुमोदन म्हणून चालणार.. ह्याबाबतीत अनुकरणही लागेल
|
बी, आधी मी हा बीबी पुर्ण वाचिन, अभ्यास करीन आणि नक्कीच अनुकरणही!
|
जलधौती कशी करतात ते सांगाल का? विषेशत: नवीन लोकांनी कशी करावी ते सांगा.. मी असेच काही लहान असताना केले होते. खूप खूप गरम पाणी प्यायलो.. नंतर तोंडात बोट घालून ओकार्या काढल्या.. भरपूर काही पडले पण ते पित्तच होते हे कळाले नाही.. असो.
|
Bee
| |
| Tuesday, June 06, 2006 - 6:10 am: |
| 
|
महेश, तू हा बीबी सुरवातीपासून वाच. कुठेतरी लिहिले आहे जलदौतीबद्दल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|