|
संगणकाच्या अयोग्य आणि अतिवापराचे आपल्या आरोग्यावर अतिशय गंभीर आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात. ते आज जरी आपल्याला जाणवत नसले तरी पुढे ते त्रासदायक ठरतात. डोळे चुरचुरणे / रुक्ष होणे, मान, खांदे, मनगट, पाठ, टाच यांतून वेदना येणे अशा समस्या उद्भवू शकतात. (इतकेच काय मांडीवर ठेऊन लॅपटॉप वापरल्यामुळे एका व्यक्तिच्या प्रजनन संस्थेवर विपरीत परिणाम झाला होता अशाही आशयाची एक बातमी मागे वाचनात आली होती. त्यात किती तथ्य होते काय माहित...) तर संगणक वापरताना त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कसे टाळता येतील, अशा दुष्परिणामांपासून सुटका मिळावी यासाठीच्या उपाययोजना इ. सबंधी येथे माहिती दिली जावी अशी अपेक्षा आहे. मला इ-मेल मधून मिळालेली काही माहिती इथे देत आहे.
|

|
|
....
....
|
Admin, moderators, I have tried my best to keep the image size minimum (and readable). Still if you think they put much load on the server, please remove these images.
|
Moodi
| |
| Friday, May 12, 2006 - 10:51 am: |
| 
|
गजानन धन्यवाद धन्यवाद अन परत एकदा खूप धन्यवाद, मस्त माहिती दिलीस चित्ररुपाने. 
|
गजाजन... बर, झाल... खुप काही समजले... thank you !!!
|
Mrdmahesh
| |
| Thursday, June 01, 2006 - 11:09 am: |
| 
|
अजून थोडे सांगावेसे वाटते: १. संगणक वापरताना सर्वप्रथम ताण येतो तो डोळ्यांवर... तेव्हा दर १५ / २० मिनिटांनी मॉनिटरवरून नजर हटवून दुसरीकडे पहावे.. २. डोळ्यांच्या पापण्यांची व्यवस्थित (नेहमीप्रमाणेच) उघड्-झाप होते की नाही याकडे लक्ष द्यावे (बरीच मंडळी मॉनिटर कडे एकटक बघत असलेली मी पाहिली आहेत.) ३. मॉनिटरवरून नजर हटवल्या नंतर डोळे हलकेच चोळावेत. जर कोरडे पणा जाणवत असेल तर डोळ्यात पाणी (तेल नाही ) घालावे व थोडावेळ संगणकावर काम करू नये. विश्रांती घ्यावी.. ४. ८ / ८ तास काम करणार्यांनी दर १ / २ तासांनी उठून फिरून यावे. पाय मोकळे करावे. ५. सर्वात महत्वाचे म्हणजे मनावर ताण येत असल्यामुळे चक्क शक्य तितक्या लवकर झोपी जावे किंवा ते शक्य नसेल तर अशा गोष्टी कराव्यात की जेणेकरून मनाला विरंगुळा मिळेल... मन शांत राहील.. उदा. बाहेरची वाहतूक पहाणे, निसर्ग पहाणे, एखादे सुंदर चित्र पहणे, fish tank मधील मासे पहाणे. ६. बर्याच लोकांना असे वाटते की games खेळल्याने मनाला विरंगुळा मिळतो. तो थोडा बहुत बरोबर असला तरी त्याने डोळ्यांवर ताण येतो. मान, बोटे, पाठ यावर ताण येतो कारण तुमच्या reflexes चीच तिथे स्पर्धा असते.. मानसिक games उदा. english word games सारखे games थोडावेळ खेळल्यास हरकत नाही तरी पण त्यात तुम्ही मॉनिटर समोर बसून रहाताच. जे काहि माहित होते ते सांगितले आहे (चू. भू. द्या. घ्या.)
|
Aaspaas
| |
| Saturday, March 03, 2007 - 5:43 pm: |
| 
|
गजानन, हि उपयुक्त माहिती कुठे मिळेल? माहिती उपलब्ध केल्याबद्द्ल आभारी आहे.
|
Thanks Gajanan, Is there any side effects, due to continue operate of the system.
|
Alpana
| |
| Tuesday, July 10, 2007 - 8:51 am: |
| 
|
नुसते पाय मोकळे करण्यपेक्शा स्ट्रेचिन्ग करणे फायद्याचे आहे. मला मझ्या डॉक्टरने सन्गितले कि ज्यावेळी आपण सन्गणकासमोर काम करत असतो त्यावेळी आपले मसल्स एकाच दिशेने स्ट्रेच होतात....त्यामुळे अश्या स्ट्रेचिन्ग दर २-३ तासनि करणे आवश्यक असते... माझ्याकडे कही चित्रे आहेत स्ट्रेचेस कसे करवे याची.. पोष्ट करेन
|
Maanus
| |
| Monday, January 28, 2008 - 5:38 pm: |
| 
|
हे संकणकाशी निगडीत नाहीय, पण कुठे टाकावे कळत नव्हते. तुम्ही खुर्चीवर बसले असताना, उजवा पाय हवेत उचला, व उजव्या पायाने हवेत वर्तुळ काढा. आता उजव्या हाताने हवेत इंग्रजी सहा काढा. तुमचा पाय अपोआप उलटा फिरायला लागेल. http://www.jeffbridges.com/images/somethingtodo1.gif
|
Prasadp77
| |
| Monday, January 28, 2008 - 9:49 pm: |
| 
|
I have to disagree on this. You can train your brain that foot makes right circle and hand makes 6. Its difficult for sure. Default motor functions are not designed in that fashion.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|