|
Sas
| |
| Sunday, March 26, 2006 - 5:21 am: |
| 
|
तोंड (Canker Sores) आल्यावर काय ऊपाय करावेत? तोंड येण्याचि कारण काय? Please share your knowlege
|
http://www.pharmweb.net/pwmirror/pwz/conditions/mulcers.html संप्रदा, हे पहा वाचून.. चिंगी
|
Moodi
| |
| Sunday, March 26, 2006 - 2:46 pm: |
| 
|
सास चिंगुताईने छान लिंक दिलीय. नीट वाच. दुसरे गोष्ट हे तुला सारखे होत आहेत का? तु तुझ्या डॉक्टराना दाखवलेस का? हे बरे झाले की जास्त तिखट किंवा मसालेदार खाऊ नकोस. अन जास्त वेळ उपाशी पण राहू नकोस. सकाळी थोड्या दुधाबरोबर काहीतरी खात जा. भरपूर पाणी पी. हे असे सारखे जर होत असतील तर मग तु डॉक्टरांकडे गेलेच पाहिजे.
|
भाताच्या निवळावर तूप घालून पी, बर वाटेल.
|
Bee
| |
| Monday, March 27, 2006 - 7:28 am: |
| 
|
सध्या आंबट, तिखट, मसालेदार अजिबात खाऊ नकोस. तसेच भरपूर झोप घे. रोज सकाळी मिठाच्या पाण्याने गुळवण्या कर. C vitamins च्या गोळ्या घे. दर तिनेक महिन्यांनी mouth ulcer होतो जर तुम्हाच्या शरिरामध्ये पुरेसे vitamins supply होत नसेल तर. आठ दिवसानंतर mouth ulcer आपोआप बसून जातो. पण हा त्रास खूप जास्त असतो. नीट बोलता येत नाही, खाता येत नाही, जिभ तोंड झोंबते.
|
Moodi
| |
| Monday, March 27, 2006 - 8:24 am: |
| 
|
बी अरे c vitamin ठीक आहे, पण मीठाच्या पाण्याच्या गुळण्या का सांगतोस? तिला सर्दी, कफ नाही किंवा घसा पण दुखत नाही, अन मीठाने किती त्रास होईल! सास वर भ्रमर ने सांगीतलेला उपाय चांगला आहे.
|
Chioo
| |
| Monday, March 27, 2006 - 9:36 am: |
| 
|
chimutbhar jire bharadasar chavun patakan mouth ulcer var lavayache. jiryacha ras tithe lagala pahije. ekdam khoop zombata pan barhi lagech hota.
|
Milindaa
| |
| Monday, March 27, 2006 - 12:02 pm: |
| 
|
तोंड येणे यावर उपाय म्हणून बी जीवनसत्व घेतात, सी नव्हे अरारूट मिळाले तर खा... लवकर बरे होईल.
|
canker sores वर Vitamin B गोळ्या तर घ्याव्याच आणि एक म्हणजे या sores मुळे बोलताना, खाताना जो त्रास होतो त्यावर ointments मिळतात ती दिवसातून २-३ वेळा लावयची. त्यामुळे pain relief होतोच पण त्या sores वर एक तात्पुरते आवरण तयार होते आणि खाताना आग होत नाही.
|
Ashwini
| |
| Monday, March 27, 2006 - 5:17 pm: |
| 
|
Sas, या सगळ्या उपायांनी तुला नक्कीच बरे वाटेल. अपवाद मिठाच्या गुळण्या. मूडीने वरती म्हंटल्याप्रमाणे त्याने त्रास आणखी वाढेल. परंतु तुला जर हा त्रास नेहमी होत असेल तर त्याची कारणं शोधली पाहीजेत. लहानपणी गोवर, कांजिण्या असे काही झाले होते का? असेल तर परिपाठादी काढा घे. त्याने ती साठलेली उष्णता कमी व्हायला मदत होते. तातुपरता उपाय म्हणून कावेची पावडर तुपात भाजून ती लावली तर फरक पडतो. तसेच तवकीर पण लावले तरी चालेल. उष्ण प्रकृती असेल तर पोटात गुलकंद, अनंतमूळ चूर्ण, प्रवाळ पिष्टी, कामदुधा इ. घेतल्याने बरे वाटेल.
|
Sas
| |
| Monday, March 27, 2006 - 5:19 pm: |
| 
|
सगळ्यांना Thanks a lot मला Mouth Ulcer तसा वांवार होतो ह्यावेळि तर एक महिना काहि दिवसातच परत झालाय अश्क्तपणा, बोलतांना त्रास, अगदि तोंड बंद करयलाहि त्रास होतो/होतोय once again Thanks to All
|
Arch
| |
| Monday, March 27, 2006 - 5:26 pm: |
| 
|
संप्रदा, सध्या तात्पुरता उपाय म्हणजे मैत्रेयीने सांगितल्याप्रमाणे लहान मुलांना दात येताना लावतात ते ओराजेल वगैरे लाव. म्हणजे खाताना बोलताना वगैरे त्रास होणार नाही. लगेच आराम वाटेल.
|
Sas
| |
| Monday, March 27, 2006 - 5:38 pm: |
| 
|
Ashwini मला खूप उष्णता आहे. मुळ्व्याधिचा त्रास हि आहे. इथे आल्यापासुन भारतात व्हायचा तितका भयंकर मात्र होत नाहि कारण JOB नसल्याने सिटिंग होत नाहि व घरिच असते म्हणुन मि ज्युस इ. पण करते व नियमित पिते ह्यामुळे कदाचित. पोटात जळ्जळ हा त्रास मला अनेक वर्षांपासुन आहे. भारतात मि गुलकंद, शतावरि, कामदुधा घ्यायचे रोज इथे घेत नाहि पण जळजळिच प्रमाण कमि आहे. एकदा कांजण्या झाल्या होत्या लहानपणी पित्त्त पण उठायच बर्याचदा , आताहि उठ्त तळण, तुर दाळ खाल्ल कि Anyway Thanks Thanks to All
|
Moodi
| |
| Monday, March 27, 2006 - 5:45 pm: |
| 
|
सास आश्विनी बाकी उपाय तर सांगेलच यावर. पण तूर डाळी पेक्षा मुग डाळ वापर. मेथीची भाजी जास्त खाऊ नकोस. अन रात्री जीरे किंवा मनुका sultana पाण्यात भिजवुन सकाळी ते पाणी गाळुन पी, पोटातील जळजळ थांबेल. आमसुलाचे सार किंवा सरबत करुन पी. मधुन मधुन गार दुध पीत जा. मलाही हे जास्त सहन होत नाही. पण आता वेगवेगळ्या डाळी वापरते त्यामुळे त्रास कमी आहे. जमल्यास ताक पीत जा मूळव्याधीवर.
|
तोंड येण्यावर हमखास उपाय म्हणजे तवकील का अरारुटची पावडर लावणे. दुसरा उपाय जो मला मंडई मधल्या एका भाजीवाल्याने सांगीतला होता आणि भलताच उपायकारक आहे तो म्हणजे ४, ५ कच्ची तोंडली खाणे. मला चांगला अनुभव आहे. 
|
Ashwini
| |
| Tuesday, March 28, 2006 - 3:07 am: |
| 
|
sas, पित्तावर वरती सांगितलेले उपचार सुरू कर. मूळव्याधीविषयी खालील उपचार पाहा. दारुहळद + ज्येष्टमध + धमासा powder दोन्ही जेवणामध्ये चिमुटभर घ्यावी. हिरडा चूर्ण रात्री झोपतना 1/2 tsp + गरम पाणी. Drink a lot of taak(buttermilk) every day. You can add hing, jire to taak. Eat Suran at least twice a week. सकाळी मुळ्याचा रस घेत जा. शतधौत घृताचा बोळा मुळव्याधीच्या जागेवर ठेवत जा.
|
Bee
| |
| Tuesday, March 28, 2006 - 3:18 am: |
| 
|
हो बी जीवनसत्व बरोबर आहे. Basically folic acid = B complex . मूडी, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या जरी त्रासदायक असतात पण त्यानी लवकर आराम पडतो. मी तरी करतो आणि मला आराम पडतो. पण मला ह्या एकमेव आजारापासून खरच कायमची सुटका हवी आहे. मी तिखट खात नाही, मसालेदार जेवण जेवत नाही, बाहेरचे खात नाही, हलके जेवन घेतो तरीही हा आजार दर तीन महिन्यांनी उद्भवतो. आणि आठ आठ दिवस mouth ulcer राहतो. मी आता योगाच्या cooling execises सुरू करणार आहे. बघुया त्यानी काही फ़रक पडेल का. मला फ़क्त एक दोनच छोटे फ़ोड येतात कधी ते ओठाच्या आत असतात कधी कडेला असतात. पण भयंकर जळजळ करतात. आणि तर तीन महिन्यांनी doctor कडे जायलाही कंटाळा येतो. त्यांच्या औषधी घेऊनची आठ दिवस लागतात बरे व्हायला आणि औषध न घेऊनही आठ दिवसच लागतात. मग का बरे doctor कडे जावे. मी सोडून दिले जाणे. उबग आलाय. पण एक बरे वाटते आहे की इथे mouth ulcer चा अनुभव बर्याच जणांना आलेला आहे. मला आजवर असे वाटत होते की हा त्रास फ़क्त काहीच जणांना होतो. माझ्या घरी कुणालाच हा त्रास होत नाही. बहुतेक खायची प्यायची हेळसांड होत असावी माझी म्हणून असे काहीसे असेल.
|
ईथे भारतात smyle gel मिळते त्याने मात्र चांगलाच आराम पडतो असा अनुभव आहे
|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:01 am: |
| 
|
बी माझे त्या मीठाबद्दलचे मत सोड. आश्विनी तर डॉक्टर आहे. तिने काय उपाय दिलेत ते बघ. अन प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते, जे तुला सूट होईल ते इतराना होईलच असे नाही.
|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:19 am: |
| 
|
आश्विनी मी जे लिहीतेय त्याला म्हणजे या पोस्टला तू ते विचित्र वाटले तर जरूर विरोध कर कारण तू डॉक्टर आहेस. आता वर ही बी ची पोस्ट बघ. तो म्हणतो की हे सारखे होत असल्याने त्याला डॉक्टरकडे जायचा कंटाळा येतो. मला २ वर्षापूर्वी असाच त्रास सुरु झाला. इथे घरी मी एकटी असल्याने सकाळी नाश्ता झाला की दुपारी जेवणाचा जरा कंटाळा करीत होते, थोडक्यात म्हणजे उपाशी रहात होते. आधी ते जाणवले नाही पण त्याने वर्षभरात माझे पोट खुप दुखले, इतके की काही खाल्ले तरी उलट्या व्हायच्या. इथे वर्षभर आधी मी गरम मसाला वापरला, जो मी माझ्या माहेरी कधीच खाल्ला नाही अन माझ्या वडिलाना पण पोट दुखीचा त्रास असल्याने घरात हिरवी मिर्ची, मसाले, तिखट हे एक छोटा चमचा या प्रमाणात होते. इथे मात्र त्याचा अतीरेक झाला. डॉक्टरनी ब्रेथ टेस्ट केली अल्सरसाठी, अन ती सुरुवात आहे असे कळले. बरे पण झाले, पण माझी पित्त प्रकृती असल्याने आता हे पथ्यकारकच झालेय. डॉक्टर बालाजी तांबे यांनी सकाळच्या Family Doctor मध्ये अल्सरवर लेख लिहीलाय अन इतर डॉक्टरांच्या मते सुद्धा जर हे असे फोड, किंवा व्रण तोंडात वारंवार व्हायला लागले तर ती अल्सरची सुरुवात असु शकते तेव्हा आधी डॉक्टरकडुन तपासणी करावी, स्वतच्या मनाने औषध घेऊ नये असे लिहीले होते. अन त्याला आमच्या येथील डॉक्टरानी सुद्धा दुजोरा दिला. माझे म्हणणे हेच आहे की हे जर असे सारखे होत असेल तर डॉक्टरला दाखवावेच. हयगय करु नये. कारण नंतर त्याचे दुष्परीणाम होतात. Prevention is always better than cure . मा. नेमस्तक मला इथे कुणाला घाबरवुन टाकायचे नाहीये. पण आश्विनी एक उत्तम डॉक्टर असल्याने मला तिचे यावर मत हवेय. त्यानंतर ही पोस्ट उडवुन टाकावी. कारण मला जे झालेय ते इतराना होईलच असे नाही पण उपाशी रहाणे, तिखट मसालेदार सारखे खाणे याच्या अतीरेक जर झाला तर काय होते हे मी मांडलय. आगाऊ धन्यवाद.
|
Bee
| |
| Tuesday, March 28, 2006 - 9:44 am: |
| 
|
मूडी, तुझे पोष्ट बरोबर आहे. मी हयगय नाही करत. मी अगदी अमरावतीला असल्यापासून मला हा त्रास होतो. वर्षातून तीन चार वेळा तर हमखास मला अल्सरला सामोरे जावे लागते. मी कित्येक Doctor कडे जाऊ औषधी घेतल्या आहेत. पण कायमचा नायनाट करता आला नाही. मी इतका diet concious असूनही मला त्रास अल्सर होतो. आता इथले घरघुती उपाय करून पाहीन. आणि मी मुळीच घाबरलेलो नाही. मला फ़क्त इतकेच म्हणावयाचे होते की जर वैद्य लोकही हा त्रास आठ दिवसात बरे करतात आणि तो परत परत उमळतो मग वैद्यांकडे जाण्यात काय अर्थ आहे. इथल्या super markets मध्ये गुळवनी करायला एक औषध मिळते. जेवणापूर्वी त्यानी जर एक चुळ भरली तर निदान नीट चावता येते. मग परत एक दोन तासांनी त्रास सुरू. परवाच माझा ह्या वर्षातला अल्सर बसला. इथले सिंगापूरमधले Doctor खूप काही चांगले नाही. एकतर त्यांच्या औषधी ह्या computer वरून औषधी शोधून काढलेल्या असतात. म्हणजे आपण लक्षण सांगायचे आणि त्यांनी drop down वरुन यादी शोधायची. काहीतरीच. परत gastric pain पण खूप होतो इथल्या औषधी घेतल्यानंतर. पहिल्यांदा मला अल्सरसाठी इथे जेंव्हा औषधी दिल्या गेल्यात तेंव्हा एकीकडे पोटात इतके दुखणे चालले होते वर अल्सरचा जळजळीत त्रास. मला कळेना माझे पोट का दुखते आहे. नंतर मला एकाने सांगितले अरे ते ह्या औषधींमुळे होत आहे. मी अगदी पोटाला हात लावून चालायचो त्यावेळी इतका त्रास झाला होता. आता मी मिरची, मसाले, तिखट इतके कमी केले आहे की मला वाटते आहे ते सामान एक तप पुरेल. मूडी, धन्यवाद.
|
Moodi
| |
| Tuesday, March 28, 2006 - 11:28 am: |
| 
|
बी मी पोटातल्या अल्सरबद्दल बोलतेय, तोंडातील नव्हे. असे व्रण जर तोंडात सारखे व्हायला लागले तर ती पोटातल्या अल्सरची पण सुचना असु शकते हे मला इथे दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर पण लिहीलेले होते.
|
Ashwini
| |
| Thursday, March 30, 2006 - 4:08 am: |
| 
|
मूडी, तू लिहीलेले 100% बरोबर आहे. बेसिकली, तोंड ही अन्नमार्गाची सुरूवात असते आणि खोल पोटाच्या आतल्या भागात काय चाललय हे दाखवणारा आरसाच म्हंटला पाहीजे. म्हणून तर पोट साफ आहे की नाही याची परिक्षा जीभ पाहून करतात. जीभ पांढरट, चिकटा आलेली असेल तर याचा अर्थ जठराची पण अशीच अवस्था आहे आणी पोटात अपक्व अन्न पडून आहे असे समजावे. उष्ण, तिखट, आंबट, पित्तकर आहार विहाराने अन्नमार्गाला असे फोड येतात. ती अल्सरची सुरूवात असू शकते. यासाठी परिपाठादी काढा हे सर्वात सुंदर औषध आहे. तू वरती यासाठी काय काळजी घ्यायची ती चांगली माहिती दिली आहेस त्यामुळे माझे बरेच शब्द वाचले. बाकी औषधे वरती सांगितली आहेतच. खूपच त्रास होत असेल तर, चंद्रकला रस, चंद्रपुटी प्रवाळ भस्म याचा वापर करावा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|