|
माझी मुलगी १० दिवसाची आहे. कानाला व कपाळावर लव आहे. तर कोणते पीठ वापरावे. नाळ अजून पडली नाही म्हाणून सध्या स्पंज बाथ देत आहे. मसाज साठी बाला तेल आहे थोडे तेच वापरत आहे. डायपर रश साठी कोणते क्रिम वापरावे?
|
Chiku
| |
| Tuesday, May 16, 2006 - 7:08 pm: |
| 
|
बोली, तुझा मेसेज आज पाहिला. तू मुलीसाठी फ़्लीसची ब्लान्केट्स वापरतेस का? किंवा स्टफ़ टॉइज तिच्या जवळ असतात का? त्याने पण बाळांच्या नाजुक त्वचेला त्रास होतो. ते वापरणे बंद करुन बघ. माझ्याहि मुलाला असाच त्रास व्हायचा. मग लक्षात आले कि हा तेलाचा नाही तर ब्लन्केट्स आणि टॉइजचा त्रास आहे. (त्याला सकाळ्-संध्याकाळ तेलाचा मसाज करत होते.) दुसरे म्हणजे, अविनोचे ओटमिल मॉश्चरायजर खुप उपयोगी पडते.
|
Moodi
| |
| Tuesday, May 16, 2006 - 9:21 pm: |
| 
|
सुनिती अग तुझ्याकडे गर्भसंस्कारचे पुस्तक आहे त्यात माहिती आहे. बर बेसन म्हणजे हरबरा डाळीचे पीठ दुधात(होल मिल्क असले तरी चालेल) कालवुन लाव अन जर इंडीयन स्टोअर्स मध्ये वेखंडाची पावडर मिळाली तर ती पण कालवुन लाव. मात्र डोळे, भुवई इथे लागु देऊ नकोस. मसाजसाठी तिथे इंडीयन स्टोअर्स मध्ये डाबरचे लाल तेल मिळतय का ते बघ. बाकी मेलमधुन कळवते.
|
Bee
| |
| Wednesday, May 17, 2006 - 6:01 am: |
| 
|
आणि आणखी म्हणजे बाळाचे अंग रगडू नकोस. पण लव आपोआप जातात असे बरेच म्हणतात. सुरवातीला आईचा स्पर्शच बाळाला हवासा असतो. बाजारात फ़िगारो म्हणून एक तेल मिळते ते वापर मसाजींग साठी किंवा आपले पॅराशूट पण चालेल. मात्र हे तुच करत जा.
|
हो ग मुडी एका मैत्रिणीला दिले आहे पुस्तक. वाचते परत. मेल कर. पॅराशूट तेल गरम पडेल का बी?
|
Moodi
| |
| Saturday, May 20, 2006 - 10:46 pm: |
| 
|
सुनिती मेल नंतर करते ग. जोजोबा ऑइल मिळते ग फार्मसीत. आधी मात्र ते चमचाभर खोबरेल तेलात २ थेंब मिक्स करुन बाळाच्या मनगटावर किंचीत लावुन बघ. जर त्वचेवर काही रॅश किंवा पुरळ उठले नाही अन त्वचा लाल झाली नाही तर तीळाच्या तेलात ते २ ते ४ थेंब टाकुन नीट हलवुन त्याने मसाज कर. बाळाच्या अंगाला जोजोबा तेल नुसते अजीबात लावु नकोस. ते तुला तीळ + खोबरेतेल असे एकत्र करुन त्यात मिक्स करावे लागेल. किंचीत कोमट करुन मालीश कर. काही तेलांनी बाळांना त्रास होऊ शकतो त्यामुळे डॉ. ना विचारलेस तरी हरकत नाही. पण जॉन्सनचे पण फार चांगले आहे. त्याचा पुर्ण पॅक मिळेल बघ तुला. अगदी बाथ ऑइल, मसाज ऑइल, पावडर, शांपू अन सोप असा पॅक आहे तो. तो मिळाला की फार छान.
|
User74
| |
| Thursday, April 12, 2007 - 9:58 am: |
| 
|
mazi mulagi pach varshanchi ahe. Tila sat - aath mahinyachi asalyapasun angavar pural uthatat ani khaj sutate. Yacha tras jasti karun hivalyat hote. Skin DR. mhanatat, tichi tvacha koradi ahe. Saban lavun chalat nahi. Yavar kay upay karava? Tila yacha farach tras hoto. Konatya telane malish karave? Aharat kay dyave? Shivay madhe madhe hatachya botanjaval panyache phod uthatat. Yavarahi upay sanga?
|
Saket
| |
| Friday, December 07, 2007 - 3:58 pm: |
| 
|
बोली, तुझ्या मुलीला जसा त्रास आहे तसाच माझ्या ४ १ / २ महिन्याच्या मुलीलाही आहे. तू लाल तेल पुन्हा लावल्याने स्कीन रॅश कमी झाले का?
|
Arch
| |
| Friday, December 07, 2007 - 4:40 pm: |
| 
|
Corn Husker's cream लाऊन पाहिल का? हे खूप स्वस्त आणि मस्त cream आहे dry skin साठी. मला फ़क्त Wal-Mart मध्ये मिळत इथे.
|
Saket
| |
| Tuesday, January 22, 2008 - 5:28 am: |
| 
|
थॅंक्स आर्च, मी Corn Husker's लावुन बघीतले आणि त्याने तिचे रॅश आणि लालपणा कमी झाला, पण स्कीन ड्राय झाली. पण ईन जनरल फ़ायदाच झाला. पण त्यात fragrance, boric acid and alcohol असल्यामुळे तिची Dr. नाही म्हणाली. तु तुझ्या मुलांसाठी वापरले तेव्हा त्यांचे वय काय होते? त्याचा तीला फ़ायदा होत असल्यामुळे मला ते continue करावेसे वाटते आहे पण ती लहान (५ - ५ १ / २ महीन्याची) असल्यामुळे Dr. नी नाही म्हटल्यावर वापरायचे की नाही हा प्रश्न पण पडला आहे.
|
Bee
| |
| Tuesday, January 22, 2008 - 9:58 am: |
| 
|
प्राणायम आणि वमन केल्यानी त्वचेचे विकार नष्ट होतात. माझा स्वानुभव आहे म्हणून सांगतो आहे.
|
Boli
| |
| Tuesday, January 22, 2008 - 6:11 pm: |
| 
|
Sorry Saket, मी मेसेज उशीरा बघितला. I have not used any oil on her after that. (she is 3+ yrs now) Still using Cetaphil cream which is Hypoallergic. Dabur baby olive oil is good.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|