|
Sashal
| |
| Sunday, December 07, 2003 - 4:17 pm: |
| 
|
अश्विनी, आयुर्वेदाचा BB चालू करून तू खूपच छान माहिती देत आहेस त्याबद्दल धन्यवाद मीही pregnant आहे सध्या माझे second trimester चालू आहे गेल्या एक दोन आठवड्यापासून मला gases चा खूप त्रास होतो आहे especially सन्ध्याकाळी त्रास वाढतो रोज पोट व्यवस्थित साफ़ होण्यासाठी आणी constipation व gases चा त्रास कमी करण्यासाठी काय करता येईल?
|
Ashwini
| |
| Sunday, December 07, 2003 - 8:56 pm: |
| 
|
सशल, pregnancy मध्ये कुठलीही औषधे घेताना विशेष काळजीपूर्वक घ्यावीत, कारण अर्थातच पोटातल्या बाळावर त्याचा परिणाम होउ नये म्हणून. शक्यतो आहार विहारात बदल करून उपयोग होतो का ते पहावे. नाहीतर थोडी कमी strong असलेली पण safe औषधे घ्यावीत. Having said that , जेवणात दूध, तुप इ. स्निग्ध पदार्थांचा वापर जास्त कर. शक्यतो गरम व ताजे पदार्थ खात जा. फ्रिजमधले, थंड, शिळे अन्ना खाउ नकोस. वातुळ पदार्थ व पचायला जड अन्न खाउ नकोस. fermented food like, इडली, ढोकळा, डोसा इ. कमी कर. Gases साठी, ताकाला हिंग, जिरे लावून पिणे. औषधे - gases साठी हिंगाष्टक ऊर्ण, भास्करलवण ऊर्ण यातली बरीचशी चूर्णे Inidan Store मधे मिळतात.
|
Kaviash
| |
| Monday, June 12, 2006 - 10:04 am: |
| 
|
आश्विनी, मला जेवायच्या आधी आणि नन्तर सुध्दा gases चा खुप त्रास होतो. पोटात आणि छातीत दुखत. काही उपाय सान्ग ना please.
|
Kaviash
| |
| Wednesday, August 16, 2006 - 9:08 am: |
| 
|
यावर आश्विनी किन्वा मुडी कोणीही उपाय सान्गेल का मला?
|
Moodi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 9:30 am: |
| 
|
कविता तू डॉक्टरना दाखवले आहेस का? नक्की गॅसमुळेच दुखते का? कारण मला पण दुखायचे पण ते गॅसेसमुळे नाही. आश्विनीने वर हिंगाष्टक चूर्ण घ्यायला सांगीतलेय ते घेऊन बघ. हे चूर्ण जेवतांना पहिल्या भातात थोडे तूपाबरोबर घालायचे अन खायचे. नाहीतर कोमट पाण्याबरोबर घे. आणि आश्विनीने जे ताक सांगीतलेय तसे घे जेवणानंतर. सध्या वातूळ पदार्थ म्हणजे छोले, चणे( हरभरा), पावटे खाऊ नकोस, भरपूर पाणी पिऊन पोट साफ ठेवत जा. फळांनी तर पोट साफ होईलच पण रात्री सफरचंद नको खाऊस बाकी द्राक्षे वगैरे खा. पोट साफ नसले की वात म्हणजे गॅस वर चढुन छातीत दुखते. तरीही एकदा डॉक्टरना जरुर दाखव. जेवणाच्या आधी चिमुटभर किसलेले ताजे आले किंचीत मीठ घालुन खा नंतर जेव. सध्या मैदा अन बेसनाचे पदार्थ कमी कर. हे हिंगाष्टक चूर्ण आणि लवणभास्कर चूर्ण दोन्ही खूप गुणकारी आहेत. दोन्हीपैकी कोणतेही घे. आणि सकाळी नाश्ता जरुर करत जा, रीकामे पोट ठेऊन दुपारी जेवणाला उशिर करु नकोस. आश्विनीने सांगीतलेली पथ्ये जरुर पाळ.
|
Kaviash
| |
| Wednesday, August 16, 2006 - 10:10 am: |
| 
|
Thanks मुडी. हे gase आणि acidity मुळे होते असे डॉक्टरानी सान्गीतले. मी तु सान्गीतलेले उपाय करुन बघते. मला रात्री भात नाही खाल्ला तर थोडा कमी त्रास होतो. मी कुठेतरी वाचले की सकाळी आणि रात्री १ कप गरम पाण्यात १ चमचा मध आणि १ चिमूट्भर दालचिनी ची पावडर घेतल्यानी गस चा त्रास कमी होतो. यामुळे माझा गस च त्रास थोडा कमी झालाय. पण यामुळे बाकी काही त्रास तर होणार नाही ना?
|
Moodi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 10:15 am: |
| 
|
कविता तू भारतातच आहेस ना? मग सध्या पावसाळ्यात जपा. सुंठेचा / आल्याचा चहा घे, पचनाला हलक्या अश्या भाज्या खा. पावसाळ्यात जास्त त्रास होतो गॅसेसचा. मध अन दालचिनीचे नाही माहीत. पण जमले तर ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी खात जा, ती पोळीपेक्षा हलकी असते पचनाला. मला पण त्रास झाला तेव्हा दुपारच्या वेळेत मी भाकरी खात होते. सध्या बंद केलेय कारण आता बरे आहे.
|
Kaviash
| |
| Wednesday, August 16, 2006 - 11:23 am: |
| 
|
Thanks. मी हे उपाय नक्की करुन बघेन. मला अजुन १ शन्का आहे. Gas चा आणि चहा चा काही सम्बध आहे का? मी ३ कप चहा पीते दिवसभरात.
|
Moodi
| |
| Wednesday, August 16, 2006 - 11:26 am: |
| 
|
चहाने नाही काही होत, पण सकाळी पहिला चहा घेतल्यानंतर दुसरा काहीही न खाता घेतलास तर acidity चा त्रास खूप होतो. चहा कॉफी नुसतीच रीकाम्यापोटी घेऊ नये आणि भूक मारण्यासाठी तर अजीबात घेऊ नये.
|
Jagu
| |
| Friday, December 01, 2006 - 8:49 am: |
| 
|
वजन कमी करण्यासाठी सकाळी गरम पाण्यातून लिंबू प्यायल्यामुळे गस किंवा ऍसिडीटी होउ शकते का
|
Ashwini
| |
| Tuesday, December 12, 2006 - 3:31 pm: |
| 
|
पायात गोळा आला तर सहन होईल इतक्या गरम तेलाने पायाला मसाज करणे. त्याच्या जोडीला एखादा गुग्गूळ e.g. त्रिफळा, योगराज इ. घेतल्यास आणखी फायदा होईल. तेलाने (तिळाचे उत्तम) मसाज केल्यावर थोडावेळ कापडाने शेकले तर जास्त फायदा होईल.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|