Meggi
| |
| Saturday, February 11, 2006 - 7:50 am: |
| 
|
मूडी, कुठले शाम्पू सौम्य आहेत? मी Dove शाम्पू आणि conditionar वापरते.
|
Kaviash
| |
| Tuesday, February 14, 2006 - 10:35 am: |
| 
|
Hi मूडी, तु खरच खुप छान माहिती देतेस. माझे केस खुप तेलकट आहेत. त्यामुळे रोज धुवावे लागतात. काहीतरी उपाय सान्ग ना please तु.
|
Moodi
| |
| Tuesday, February 14, 2006 - 1:50 pm: |
| 
|
मेगी त्यापेक्षा टी ट्री नावाचा शांपु मिळाला तर वापर त्याने केस गळणे अन कोंडा होणे थांबते. हा शांपु तसा सगळीकडे मिळतो मात्र आखाती देश अन भारतात मिळेल की नाही हे मला माहित नाही, बघ मिळाल्यास एखाद्या सुपरमार्केटमध्ये. अन कंडिशनर जास्त वापरु नकोस अन तो केसांच्या मुळाशी लावू नकोस त्या ऐवजी केसांच्या टोकाशी लाव. कविश केस रोज धुवायची गरज नाही, आठवड्यातुन २ वेळा ठीक. पण शक्यतो रीठा, संत्रा साल अन शिकेकाई उकळवुन त्याने नहा जर भारतात असलीस तर. शांपू वापरायचा तर पॅन्टिन किंवा clean and clear ठीक.
|
Chandrika
| |
| Tuesday, February 14, 2006 - 7:09 pm: |
| 
|
Jayavi, Tumhi mala exact proportion sangal ka? kiti mendi powder, coffee powder,dahi, lemon juice vagaire. Tumhi kuthala mendi powder vaparatha? Thanks. Me 'natural instinct' cha hair dye 10 varhsa vaparala pan sadhya tyachi allergy hot ahe ka kunas thavuk? Maybe me ekda chukun Vatikacha Henna oil vapralyamule asel pan me atha 'hair dye' stop karayacha vichar karath ahe..
|
Bee
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:46 am: |
| 
|
मूडी आणि समस्त स्त्रियांनो, मी पांढरे केस काळे करण्याच्या मागे लागलो आहे. शिकेकईच्या शेंगा विकत आणल्यात. त्या मी चोवीस तास पाण्यात भिजवितो. नंतर हातानी शेंगा चोळतो नि त्यातला गर बाहेर काढातो, बिया फ़ेकून देतो. मग गाळणीने पाणी झारून घेतो. ते पाणी डोक्यावर घेतो पण नंतर लगेच कोमट पाणीही डोक्यावर घ्यावे लागते. मग शिकेकई डोक्यातून निघून जाणार नाही का? नुसते शिकेकईचे पाणी डोक्यावर घेतले तर ते चेहर्याला लागते, मानेला लागते, डोळ्यातही जाऊ शकते. म्हणून स्वच्छ साधे कोमट पाणी परत डोक्यावर घेणे आलेच. मला कळत नाही मग शिककईचा अर्क डोक्याला किती मिळतो आणि किती वेळ तो टिकतो. शिकेकईला उकळवून घ्यावे लागते का? जर शेंगा छान भिजल्या असतील तर त्या mixer मधून काढल्या तर चालणार नाही का? छान लेप होईल आणि तो डोक्यावर लावता येईल. अशी माझी एक युक्ती आहे बघूया ऐकदा करून.
|
Jayavi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 11:00 am: |
| 
|
चंद्रिका, तुझे केस लहान आहेत की मोठे? माझा blunt cut आहे आणि यासाठी मी ३०० gm मेंदी घेते, त्यात २ चमचे coffee powder घालते, अर्धं लिंबू पिळते, ३ टेबलस्पून दही घालते आणि लोखंडाच्या कढईत रात्रभर भिजवते आणि दुसर्या दिवशी लावायच्या आधी त्यात १ अंडं घालते.
|
Moodi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 11:18 am: |
| 
|
बी तुला उपाय सांगते पण तो तुला शनी अन रवीवारीच करावा लागेल. पततोय का ते बघ. याचा अनुभव बर्याच जणांना चांगला आहे. थोड्या लसुण पाकळया ठेचुन त्या खोबरे अन तीळाचे तेलात मिसळुन एकत्र करुन ते तेल गरम करायला ठेवावे, अन गार झाले की कोरड्या बाटलीत भरावे. त्याने नहायच्या आदल्या रात्री कोमट करुन चांगली मालीश करावी अन दुसर्या दिवशी सकाळी तो लसणाचा वास जाईपर्यंत चांगल्या सौम्य शांपुने केस कोमटसर पाण्याने धुवुन टाकावे. बी जर शिकेकाई घेतलीस तर त्यात थोडे रीठे पण भिजत घालुन ते त्याबरोबर्च कुस्करुन ते उकळवुन गार करुन त्या पाण्याने नहा. जर तुझ्याकडे उन्ह भरपूर असेल तर लिंबु अन संत्राच्या साली चांगल्या वाळवुन ठेवुन त्या पण या शिकेकाई मिश्रणाबरोबर उकळव. किंवा ताज्या पण चालतील. अन भारतात जातोयस ना आता, मग मी लिहुन देईन त्या पावडरी घे मुंबई किंवा पुण्यातुन.
|
Bee
| |
| Wednesday, February 15, 2006 - 2:52 pm: |
| 
|
धन्यवाद मूडी. दे पाठवून यादी. पण मी प्रश्न विचारला आहे त्याचेही उत्तर दे. जर कोमट पाणी परत डोक्यावर घेतले तर शिकेकई निघून जाणार नाही का? आणि नाही घेतले तर शिकेकईचे ओघळ जाणार नाहीत.
|
Moodi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 2:56 pm: |
| 
|
बी अरे शिकेकाई तशी केसात मुरतेच, तिचा जो योग्य परीणाम व्हायचा तो होतोच, त्यामुळे ती नंतर धुवुन टाकावी लागतेच. फरक एवढाच आहे की शांपू पेक्षा शिकेकाई अन रीठे केव्हाही चांगले. मात्र रीठ्यांचे प्रमाण जरा कमी ठेवायचे अन उकळले की त्याचा शांपुसारखा फेस होतोच.
|
Chandrika
| |
| Wednesday, February 15, 2006 - 3:25 pm: |
| 
|
Jayavi, Moody, Thanks. 300 gms mhanaje andaje 1 cup ka? Anda nako asel tar thychyaaivaji kay ghalu? Anyway barach khatatopicha kam ahe asa disatha.. Anakhin kahi natural remedies asateel tar jarur suchava (grey hair sathi).
|
Bee
| |
| Wednesday, February 15, 2006 - 3:27 pm: |
| 
|
मूडी माझ्याकडे रिठे पण आहेत. मी तेही गोळा केलेत. पण शांपू लावल्यानंतर जसे केस सुटेसुटे, मोकळे होतात तसे रिठ्यानी होत नाहीत. मी मात्र शांपु सोडायला तयार आहे. मी सलग चार महिने मेंदी वापरून पाहिली. फ़क्त चहा पावडर उकळून मेंदी दोन दिवस लोखंडी कढईत भिजवायचो. दोन तास केसांना ठेवायचो. केस काळे झालेले पाहून बरे वाटायचे. पण दर दोन आठवड्यांनी हा प्रकार करून पाहणे खरच मला कठिण वाटते. एकदा मी सलग एक महिना मेंदी लावली नाही आणि केस कापलेत. मग काही केस रंगलेले आणि काही पांढरे असे केसांचे मिश्रण पाहून मला खूप वाईट वाटले. खूप पांढरे नाहीत पण तरीही मला त्यांचा नायनाट करायचा आहे. new year resolution
|
Anilbhai
| |
| Wednesday, February 15, 2006 - 3:55 pm: |
| 
|
मग काही केस रंगलेले आणि काही पांढरे असे केसांचे मिश्रण पाहून मला खूप वाईट वाटले. खूप पांढरे नाहीत पण तरीही मला त्यांचा नायनाट करायचा आहे. new year resolution >> bee तुझी व्यथा वाचुन खुप वाईट वाटले. कीतीही झाले तरी ते तुझेच केस आहेत. त्यांचा नायनाट करायचा विचार करु नकोस. केस पांढरे झाले म्हणून तु ते कापावेस किंवा त्यांचा नायनाट करावा हे मनास पटत नाही. तु तुझे केस पुन्हा वाढव. देव शास्त्रन्याना यश देवो व त्यानी केस permanent काळे रहातील असे औषध शोधुन काढो. तु तुझे new year resolution बदलावे हिच विंनंती ~D
|
Storvi
| |
| Wednesday, February 15, 2006 - 5:34 pm: |
| 
|
भाई ही त्याची केस त्यालाच हॅन्डल करु देत बरं 
|
Hawa_hawai
| |
| Wednesday, February 15, 2006 - 8:11 pm: |
| 
|
भाई तुम्ही तुमच्या दाढीचे केस कसे काळे करता ते सांगा की त्याला 
|
Manuswini
| |
| Thursday, February 16, 2006 - 12:27 am: |
| 
|
हे करून पहा मी केले आहे स्वःताच्या केसासाठी चमक्दार केस हवे असतील काहे खास occasion ला तर केस साफ़ धूवून झाले की budlight beer or coor beer tin आदल्या रात्री कपात ओतुन ठेवा सकाळी केस धुतल्यावर ही flat beer ओता आणी कोमट पाण्याने just धोवून काढा. २) काळे केसासाठी खात्रिचा उपाय my dad tried तिळाचे तेलात सुकलेली कढीपत्ता पाने टाकोन्न तेल गरम करून रोज रत्री लावयचे. केस चकचकित कळेभोर होतात. for me बीअर जिंदाबाद अगदी ad मधिल नायिकेसारखे दिसतात. क्या आपके बाल ऐसे है वाटिका मधिल नायिका
|
Manuswini
| |
| Thursday, February 16, 2006 - 12:31 am: |
| 
|
काळे केस हवे असतील तर मेहेंदी भिजवतान काथ टाकयचा आणी चहपानी एवजी कॉफी पाणी घाला केस लाल न होता dark brown होतात. I do this naturally dark brown hari for change, due to "kath" color stays for long time too
|
Bee
| |
| Thursday, February 16, 2006 - 7:34 am: |
| 
|
भाई, तुम्ही तुमचे तोंड काळे करा बघा इथून नाहीतर मी तुमच्यावर केस करेन आणि तुम्ही सू sue व्हाल मनु, शेवटी तो रंगच ना पण. मेंदी उत्तम natural hair dye plus conditioner आहे असे म्हणतात. मानतो पण अखेर रंग उडतो. कितीवर्ष हे नियमीत करायचे. निदान साठीपर्यंत तरी केस काळे राहायला हवे असे मला वाटते. नंतर एका दिवसात पिकून आले तरी चलतील पण विशीतिशी हे काय वय झाल.
|
मुडी शिककाई किती जुनी चालते? माझ्याकडे मी पहिल्यांदा इथे आले होते म्हणजे 3.5 वर्षापुर्वी तेंव्हाची आहे शिकेकाई.. टाकून देऊ?
|
Moodi
| |
| Thursday, February 16, 2006 - 6:39 pm: |
| 
|
रचना ती शिकेकाई आधी दमट वगैरे होवुन तिला काही बुरा / बुरशी सारखे पांढरे दिसतय का ते बघ, बहुतेक जर कोरड्या डब्यात ठेवली असेल तर नाही लागायचे तसे काही. मग वापरु शकतेस, मात्र चांगली उकळवुन घे. नाहीतर या रविवारी घरी फोन करुन विचारेन आईला नाहीतर सासुबाईना. त्यांना त्यातले माहीत आहेच. अन जर बुरा लागला असेल तर मात्र फेकावी लागेल नाहीतर डोक्याला खाज येऊ शकते.
|
Ldhule
| |
| Thursday, February 16, 2006 - 8:05 pm: |
| 
|
ए. भा. प्र. ... मेहंदी बिअर मधे भिजवली तरी चालेल का ?
|
Manuswini
| |
| Thursday, February 16, 2006 - 9:20 pm: |
| 
|
केस पिकणे हे heridatory असु शकते. माझी आजी चक्क काळे केस होते वयाच्या ८० वर्शी खोटे नाही. no color ,complete natural black hair तिचे दुसरे म्हणजे less stress ना पुर्वीच्या काळी compare what we go through in todays times, plus diet, weather, how much hair care we take depends on it
|
Manuswini
| |
| Thursday, February 16, 2006 - 9:23 pm: |
| 
|
छे छे मेहेंदी आणि beer काहितरिच काय नाही चालु शकत, ना beer ला पाय आहेत ना मेहेंदीला
|
thanks ग मुडी. तशी मला ती अजूनही कोरडी आहे असेच वाटतेय.. पण पांढरे कण कण आहेत त्यात ते काय असते? रिठा किंवा काहीतरी असेल ना?
|
Moodi
| |
| Thursday, February 16, 2006 - 11:32 pm: |
| 
|
रचना ती विकतची शिकेकाई आहे का? की घरी दळलेली? काही वेळा तशा विकतच्या शिकेकाईत रीठा अन दुसर्या संत्र्याच्या सालीच्या वगैरे पावडरी असु शकतात. पण पाहिजे तर टेस्ट करु शकतेस. ती शिकेकाई पाण्यात चमचाभर उकळवुन मनगटावर लावुन बघ गार झाली की. सध्या थंडीने खाजेल पण जर त्वचा लालसर झाली किंवा जास्त खाजली तर मात्र फेकावी लागेल, रिस्क घेऊ नकोस.
|
अग घरी म्हणजे आमच्या शेजारच्या काकू दळतात. विकतची नाही आहे. रिठा आहे पण त्यात. फ़ेस होतो उकळली की. तु म्हणतेस तस करुन बघते.. thanks
|