Moodi
| |
| Wednesday, January 04, 2006 - 6:51 pm: |
| 
|
बी मी सुर्य नमस्कार तर नाही घातले कधी, पण मी भारतात असताना सकाळी आंघोळ झाली की हे वरील मंत्र म्हणुन सूर्याला अर्ध्य देत असे. अर्ध्य म्हणजे तांब्यात पाणी घेऊन एकेक मंत्र म्हणत तांब्यतील पाणी वरुन खाली सोडत असे. आता घरी ताम्हणात करते असे. सूर्योबा दिसतच नाहीत सहा महिने खिडकी समोर. या मंत्राने खूप स्फुर्ती येते अन उत्साह येऊन काम चटाचट होते. आरोग्यदायी मंत्र आहेत हे.
|
Moodi
| |
| Wednesday, January 04, 2006 - 6:52 pm: |
| 
|
नेमस्तक वरील मंत्रात आपण केलेल्या बदलाबद्दल मनापासुन आभारी आहे.
|
Chinnu
| |
| Thursday, January 05, 2006 - 5:05 pm: |
| 
|
आभार मूडी! मी हे मंत्र विसरुन गेले होते. सुर्यनमस्कार आणी हे मंत्र फ़ार उपयुक्त आहेत. मूडी अर्घ्य देणे फ़ार चांगले, अस ऐकले. ते देत असतांना सुर्याची किरणे त्यात पडली तर फ़ार उत्तम. नंतर त्यातिल थोडेसे पाणी तीर्थ म्हणुन घेतात ना? बी, मंत्र उच्चाराला माझही अनुमोदन!
|
Nirnay
| |
| Thursday, January 05, 2006 - 6:25 pm: |
| 
|
एक शन्का आहे pregnancy मधे कोणती आसन केली तर चालतात ? आणि कधी पसुन केली तर चालतात आणि कितव्या महिन्यापासुन??
|
Meggi
| |
| Thursday, January 05, 2006 - 6:47 pm: |
| 
|
thanks moodi ani bee...
|
Moodi
| |
| Thursday, January 05, 2006 - 8:03 pm: |
| 
|
चिनु हा सूर्य मंत्र असा आहे. आदित्यस नमस्कारम ये कुर्वंती दिने दिने जन्मांतर सहस्त्रेषु दारिद्र्यम न उपजायते अकालमृत्यु हरणम सर्व व्याधी विनाशनम सूर्यपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम : मी सूर्याचे चाक्षुपनिषद स्तोत्र पण म्हणत होते.
|
Chinnu
| |
| Thursday, January 05, 2006 - 8:38 pm: |
| 
|
सही मूडी. आता मला सुर्याष्टक पण पाहिजे! माहित असल्यास जरूर लिही प्लीज.
|
Moodi
| |
| Thursday, January 05, 2006 - 8:40 pm: |
| 
|
उद्या नक्की लिहीन ग चिनु.
|
Bee
| |
| Friday, January 06, 2006 - 3:10 pm: |
| 
|
निर्णय, शतायुषीचा एक दिवाळी अंक आहे त्यात फ़क्त गरोदर बायकांनी स्वताची काळाजी कशी घ्यावी ह्याबद्दल विस्तृत लिहिले आहे. मी तुम्हाला साल कळवितो, जमल्यास हा अंक संग्रही असू द्या. तसे शतायुषीचे सगळेच दिवाळी अंक संग्रही ठेवावे इतके ते छान असतात. तर ह्या अंकात गरोदरपणात कुठले आसन करावे ह्याबद्दल एक वाचनीय लेख मी वाचला आहे. शिवाय मी जी योगावर पुस्तके वाचली त्यातूनही मला गरोदरपणातील आसनांबद्दल माहिती मिळाली आहे. सगळी माहिती एकत्रीत करून इथे लिहिन.
|
Nirnay
| |
| Friday, January 06, 2006 - 4:23 pm: |
| 
|
धन्यवाद बी शतायुषी च्य अन्काचे साल कळवल्यास तो मिळवण्याच नक्कि प्रयत्न करेन वेब लिन्क असलि तर खुप बर होइल अमेरीकेत मासिक मिळवण तस अवघड. निर्णय
|
Bee
| |
| Saturday, January 07, 2006 - 3:27 pm: |
| 
|
निर्णय, सन २००३ पासून २००५ पर्यंतचे शतायुषीचे अंक हे गरोदर स्त्रिया, लहान मुले ह्या theme वरच आधारीत आहेत. फ़ार जुने अंक नाहीत तेंव्हा तुला थोडा प्रयत्न केला तर मिळू शकतील. www.rasik.com ह्यांना विचारून पहा. पण तुला योगाच्या आसनांबद्दल माहिती हवी आहे तेंव्हा जमल्यास मी तेवढी पाने scanned करून तुला मेलनी पाठवीन. पुढल्यावेळी पासून दिवाळी आली की हा अंक जरूर घेत चल कारण आपल्या मराठी भाषेत इतका छान अंक आहे आणि आपले प्रश्न समजून माहिती मिळते, भाषेचा कुठेही अडथडा होत नाही त्यामुळे आकलन लवकर होते आणि खूपच छान माहिती मिळते. तसेच कालनिर्णयच्या मागिल बाजूस आसनांबद्दल वरवर माहिती असते. खूप अभ्यासू वैगरे नसते पण एक सुरवात म्हणून असे लेख वाचायला हरकत नाही. आसनांबद्दल लिहितो लवकर. पण तत्पुर्वी हे सांग तुला योगा येतो का? नक्कीच येत असेल म्हणून आसनांबद्दल तू विचारत असेल पण तरीही मी खात्री करून घेतो आहे.
|
Nandita
| |
| Tuesday, January 10, 2006 - 4:15 am: |
| 
|
tumacyaakDo Aasqaa 2 international tv channel Asaola tr svaamaI ramadovaÊ yaÜga iXakvatat to phaAca iknvaa %yaaMcaI VCD imaLto tI Gyaa AiQak maaihtIsaazI yaa saMkotsqaLalaa BaoT Va.. www.divyayog.com
|
Nirnay
| |
| Friday, January 13, 2006 - 3:34 pm: |
| 
|
Thanks bee aani nandita. mi sahara samay var laganara swami ramdevancha yoga cha program baghate . kharach changala asto .
|
Gautami
| |
| Monday, February 13, 2006 - 6:41 pm: |
| 
|
moodi तु वर नमूद केलेले आरोग्यदायी मन्त्र परत देऊ शकशील का. धन्यवाद.
|
Moodi
| |
| Monday, February 13, 2006 - 6:46 pm: |
| 
|
गौतमी इथे आहेत ते मंत्र. /hitguj/messages/34/94087.html?1136365585 . /hitguj/messages/34/94211.html?1137750447
|
Suniti_in
| |
| Monday, February 13, 2006 - 9:58 pm: |
| 
|
प्राणायाम हा केवळ सकाळी काही खाल्लेले नसताना करणे योग्य कि दिवसा कधीही केलेला चालेल?
|
Bee
| |
| Tuesday, February 14, 2006 - 5:25 am: |
| 
|
योगा हा पहाटे 4am to 6am मधे करावा असे आपले प्राचीन योगी सांगतात. त्या वेळेस केला तर त्याचे फ़ायदे अधिक चांगले जाणवतात. आपल्या शरीरातील प्राणाकर्षण ही क्रिया ह्याच वेळेस जागृत अवस्थेत येते. प्राणायाम हा सकाळीच अनाशापोटी करायला हवा. पोट भरले असताना कुठलाच योगाचा प्रकार करू नये. फ़क्त वज्रासन हे एकच आसन आहे जे जेवल्यानंतर केले तरी चालते.
|
Nalini
| |
| Tuesday, February 14, 2006 - 9:41 am: |
| 
|
अरे बी, तु योगाबद्दल सविस्तर लिहिणार होतास, ते कधी?
|
Ekanath
| |
| Tuesday, February 14, 2006 - 10:52 am: |
| 
|
महोदय, " प्राणाकर्षण " म्हणजे काय? जाणून घेण्याची इच्छा आहे.
|
>>>> प्राणाकर्षण " म्हणजे काय? जाणून घेण्याची इच्छा आहे बी, नको ते जड शब्द वापरतोस ना? म. भो. आ. आ. क. ची. फ. DDD एकनाथजी, बी अथवा कोणना कोण तरी यावर लिहिलच! तोवर थोडी वाट बघावी लागेल! मग कन्टाळा येवु नये म्हणुन मधेच थोडी आपली गम्मत हो! 
|
Ekanath
| |
| Tuesday, February 14, 2006 - 11:07 am: |
| 
|
हरकत नाही हो. इतर विषयावर मतभेद असले तर आपण एकमेकाची मस्करी करू शकत नाही, असे काही नाही. निखळ चेष्टा मला समजेत त्यामुळे हरकत नाही. मला खरेच प्रामाणिकपणे जाणून घ्यायचे आहे. मी तसा फार अभ्यासक नाही. पण गेली काही वर्षे मी सूर्यनमस्कार आणि प्राणायम नियमित करीत आहे. " प्राणाकर्षण " ही क्रिया कुठे वाचनात आली नाही. शिवाय, शब्दावरून त्याचा फारसा अर्थही लागत नाहीये. " प्राणाचे आकर्षण " अशीच फोड होते काय? म्हणून उत्सुकता चाळवली गेली. बाकी या ठिकाणी फारच उपयुक्त माहिती मिळत आहे, हे खरेच.
|
एकनाथजी, मला दोन प्रकारचे अर्थ लागताहेत, बरोबर की चूक ते कोणी सान्गेलच, पण तोवर तर्क करायला काय हरकत हे? लक्षात घ्या की प्राणायाम काय किन्वा सदेह समाधी साठीची पद्मासनातील बैठक काय, सर्व वेळेस सर्व प्रथम गुदद्वाराजवळची जागा आकुन्चन करुन घ्यावयाची असते, तेव्हा सर्वात खालील नाडी जाग्रुत होवु शकते असे म्हणतात, ते एक प्रकारचे प्राणाकर्षण मानले जात असावे! याचाच अर्थ असा की देहातील यच्च्यावत चेतना किन्वा प्राणशक्ती म्हणा हवे तर, या एका बिन्दुभोवती आकर्षित करुन बान्धुन ठेवली जाते, शारिरिक दृष्ट्या व मनानेही! यानन्तर पुढिल पायरी म्हणजे भ्रुकुटी मध्यात नजर केन्द्रित करुन इष्ट देवता किन्वा ज्योत किन्वा जे काय त्राटकाचा अभ्यास करुन किन्वा चिन्तनातुन दृष्य रूप दिसत असेल त्यावर चित्त एकाग्र करणे! प्राणाकर्षण, घातल्या बैठकीच्या वेळेस तर चित्ताकर्षण नजरेस व चित्तास भ्रुकुटी मध्यात बान्धुन धरुन, त्या पुढे मस्तकाशी सम्बन्धीत बाबी हेत, पण हा खुपच पुढील विषय झाला! व मला पुरता माहीत नाही! आता तुम्हाला प्राणाकर्षण या शब्दाने काय वाटले ते जरुर लिहा! चु. भु. द्या. घ्या.! 
|
Ekanath
| |
| Tuesday, February 14, 2006 - 12:10 pm: |
| 
|
खरे म्हणजे मला काहीच बोध झाला नाही. हा प्रकार फारच गहन दिसतोय.
|
Bee
| |
| Wednesday, February 15, 2006 - 4:17 am: |
| 
|
प्राणाकर्षण म्हणजे प्राण आकर्षण. मानवी शरिरात nerves चे जे जाळे आहे त्यात 72000 महत्त्वाच्या nerves असतात. बहुतेक nerves म्हणजे नाडी. ह्या ७२००० मधून फ़क्त ३ अति महत्त्वाच्या nerves असतात. योगामधे ह्या तीन nerves ला सुसुक्ष्म, इडा, पिंगला असे म्हणतात. आपण जेंव्हा श्वसन करतो तेंव्हा कुठली तरी एक नाकपुडी कार्यरत असते, दुसरी मंद असते. प्रातःकाली दोन्ही नाकपुड्या कार्यरत असतात. जेंव्हा डावी नाकपुडी कार्यरत असते तेंव्हा श्वसनाची क्रिया नागमोडीसारखे खालून वर वळण घेते किंवा झाडाला वेल जशी गुंफ़ली जाते त्या प्रमाणे breathing wave not waves असते. फ़क्त एकच वेढा one wave going from bottom to top from the left side . त्याला इडा म्हणतात. आकृतीशिवाय हे लक्षात घेणे कठिण आहे थोडेसे. जेंव्हा दोन्ही नाकपुड्या कार्यरत असतात त्यावेळी breathing pattern हे दोन नागमोड्या एकत्र गुंफलेल्या two sine waves सारखे असते. तिसरी सुसुक्ष्म श्वसन जे आहे ते backbone च्या पोकळीतून होत असते. सुसुक्ष्मचे breathing pattern हे सरळ असते. मुलबंध च्या दोन बोटे वर पासून तर मेंदूपर्यंत सरळ. सकाळचे ४ ते ६ ह्याच वेळेत सुसुक्ष्म नाडी कार्यरत असते. जर प्राणाकर्षण नियमीत केले तर दिवसभर ही क्रिया चालू राहते. सर्व सामान्य माणसाच्या शरीरात ती फ़क्त 4 am to 6 am ह्याच काळात काही seconds करता घडते. जगण्यासाठी जो प्राण हवा असतो त्याचा प्रवाह सुसुक्ष्म नाडीतून जात असतो. काही seconds मुळे जर आपण सचेतन जगू शकतो तर दिवसभर किंवा दीर्घकाळ केल्यानी काय होत असेल हे त्या योगीनांच ठावूक. तर हे प्राण आकर्षण कसे करायचे असते? वज्रासनामधे बसा. आधी छातीत भरलेला श्वास बाहेर काढून टाका. नंतर परत शांत चित्ताने श्वास घ्या. श्वास घेताना तो मेंदूपासून नाभी पर्यंत जाणवला पाहिजे. ही सवय हळूहळू होते. तर श्वास घेताना पाठीचा मणका वर वर चढत न्या. श्वास घेऊन पूर्ण झाले की थोडे थांबा. आता श्वास बाहेर टाकायचा आहे तर अतिशय मंद गतीने श्वास सोडा आणि सोडता सोडता पाठीचा ताठ कणा खाली आणा. अर्थात वाका असे नाही. पण आपल्याला हे आपोआपाच कळते की कणा ताठ झालाय, आणि खाली आणला की हेही कळते की आपण वाकलो नाही तरीही कणा खाली आणल्या गेला. हे असे कणा वर नेताना आणि परत खाली आणताना जो श्वास आपण घेतो सोडतो त्यामुळे पाठिच्या कण्याची पोकळी उघडते आणि आपण दीर्घकाळ प्राण आकर्षण करतो. मुलबंधापासून मेंदूपर्यंत जे सहा चक्र सरळ रेषेत आहेत त्यांचे स्थान ह्या सरळ रेषेत प्रवास करणार्या सुसुक्ष्म नाडीत आहे. योगा मुद्रा करण्या अगोदर प्राणाकर्षण करायला हवे. योगा हा science च्या पूर्वी. मी असे वाचले आहे की योगामधे जे सांगितले आहे मानवी शरिराबद्दल ते science मधे हळूहळू सिद्ध होत आहे.
|
नमस्कार. सुसुक्ष्म नाडी की सुषुम्ना नाडी? असे म्हणतात की ईडा व पिंगळा दोन्ही जेव्हा active असतात तेव्हा सुषुम्ना नाडी अधिक जोमाने कार्यरत होते. तसेच प्राणाकर्षण याला प्राणधारणा असेही म्हणतात... त्याचेही २-३ प्रकार आहेत.
|