|
Bee
| |
| Saturday, January 28, 2006 - 3:09 pm: |
| 
|
मला माझ्या आईच्या चाचण्या करून घ्यायच्या आहेत. ती सत्तर वर्षाची आहे, अगदी ठणठणीत आहे, दोन्ही वेळेसची कामे एकटीच करते. घरी मोलकरीण हा प्रकारच कधी आम्ही बघितलेला नाही. पण हल्ली असे होते आहे ना, आईशी मी जेंव्हा फोनवर बोलतो तेंव्हा मला तिच्या दहा वाक्यांमधील काही शब्द अगदी आजीबाईसारखे ऐकायला येतात आणि मग वाटायला लागते, आईचे आता वय होते आहे, आपण तिला अधिकच जपायला पाहिजे. माझ्या आजीला मी अगदी जवळून पाहिलेले आहे, ती १०५ वर्षांपर्यत राहीली. तिचा आवाज असाच होता तेंव्हा. आई लेकीचे आवाज अगदी वृद्धपणातही सारखेच बदल घेतात असे वाटले. असो.. कृपया चाचण्यांची नावे ध्या, आणि अगदी जड medical term असली तर स्पष्ट करूनही सांगा. धन्यवाद जनहो!!!!!
|
Moodi
| |
| Saturday, January 28, 2006 - 5:27 pm: |
| 
|
बी प्रश्न एकदम छान आहे. साधारण वयाच्या पन्नाशीनंतर रक्तातील साखर तपासणे, रक्तदाब तपासणे, डोळ्याला चष्मा लावुनही अंधुक दिसत असेल तर मोतीबिंदु किंवा काचबिंदू याची तपासणी करणे. पैकी मोतीबिंदु हा डोळ्याला सहज दिसतो अन तो पिकला फोडासारखा की त्याचे ऑपरेशन करून तो काढुन टाकतात. आजकाल हे ऑपरेशन एका दिवसात होते, लेसर किरणानी पण होते अन लेन्स बसवतात. फक्त एखादा महिना प्रवासाला जाऊ नये अन धक्के बसेल अशा वाहनाने प्रवास करू नये ही काळजी घ्यावी लागते. डायबेटीस, रक्तदाब याकरता रक्तातील साखरेची तपासणी करावी लागते. हृदयाचे काम नीट चालावे याकरता वयाच्या चाळीशीनंतर लिपीड प्रोफाईल ही टेस्ट करून घ्यावीच. थोडे स्पष्ट सांगत आहे याकरता रागवु नकोस पण आजकाल स्त्रीयांना गर्भाशयाच्या अनेक विकाराना तोंड द्यावे लागत आहे. याकरता आपल्याकडे पण smear Test या नावाने टेस्ट केली जाते. स्त्रीयांच्या गर्भाशयाची तपासणी करून रीपोर्ट दिला जातो. ही पण तपासणी खुप महत्वाची आहे, परदेशात तर सरकारी दवाखान्यात ही टेस्ट होतेच आपल्याकडे मात्र सरकारी याच्यात आहे की खाजगीमध्ये याची चौकशी करावी लागेल. तसेच परदेशात मॅमोग्राफी ही टेस्ट पण केली जाते जी आपल्याकडे पण आहे. संधीवात वगैरेकरता पण रक्त तपासणी आहेच. आणी हो कानाची तपासणी आहेच की ऐकु न येणे याकरता. योग्य ते मशीन घेऊन बसवता येते, पण त्या डॉक्टरकडे जाऊनच तपासुन विचारावे. किंवा तशी दुकाने आहेत मुंबई पुण्यात अन जळगावला ही. बाकी मिळेल तशी महिती देतीन. 
|
Bee
| |
| Sunday, January 29, 2006 - 6:05 am: |
| 
|
धन्यवाद मूडी, माझ्या आईला पाठदुखीचा अधूनमधून त्रास होतो बाकी इतर सगळे काही चांगले आहे तिच्याबाबतीत. तिला आता हा त्रास सहन करण्याची सवयही झाली आहे. आम्ही doctor ना दाखविले होते पण पाठदुखीवर खरे तर पाठिचा व्यायाम हाच सगळ्यात चांगला उपाय आहे पण आपण व्यायामाच्या बाबतीत आळशी ना! दुसरे असे विचारायचे होते की उतारवयात दात स्वच्छ करून घ्यायला चालतात का? त्यामुळे दात उशिरा पडतात असे काही आहे का? मला बर्याचदा असे वाटते, दात वारंवार स्वच्छ करून घेतले तर ते लवकर झिजतात.
|
Suniti_in
| |
| Sunday, January 29, 2006 - 6:54 am: |
| 
|
Bee सकाळ मधेही सांध्यांविषयी उतारवयात घ्यायची काळजी यावर लेख आलाय. http://www.esakal.com/20060121/sakalvis52.html
|
Moodi
| |
| Sunday, January 29, 2006 - 10:20 am: |
| 
|
बी हा गैरसमज आहे की दात साफ केल्याने झिजतात. त्याने दातातील प्लाक जाऊन ते साफ झाल्याने हलके वाटते म्हणुन लोकाना लवकर कळत नाही. तरी ते साफ करून घ्यावेत. दातात फटीत अन्नकण साठुन ते साफ नाही झाले तर जंतुंचा प्रादुर्भाव होतो. अन हिरड्याना पण त्याचा त्रास होतो. ते साठलेले अन्नकण हळु हळु कठिण बनुन त्याचा प्लाक तयार होतो, तोच काढला जातो या प्रक्रीयेत. हिरड्यांमध्ये जर हे जंतू शिरले की ते वाढत जाऊन दात ढिले पडायला सुरुवात होते अन तोंडाला दुर्गंधी येणे. हिरड्यात झालेल्या जंतु संसर्गामुळे पू होऊन पायोरीया होतो म्हणुन वेळच्या वेळी दात २ दा घासणे अन वर्षातुन एकदा तरी साफ करून घ्यावेत.
|
Bee
| |
| Sunday, January 29, 2006 - 3:05 pm: |
| 
|
मूडी, धन्यवाद! परवाच दातांविषयी आमचा विषय निघाला होता. इथली लोक choclates, ice cream ह्यांचे सेवन खूप करतात त्यामुळे त्यांचे दात आपल्या भारतीय लोकांसारखे सरळ स्वच्छ नसतात. मला त्यांनी विचारले तू किती वेळा दात स्वच्छत केलेस? मी म्हंटले शून्यवेळा आणि सगळे जण चकीत नजरेने माझ्याकडे बघायला लागलेत. मग मी Cheese smile करून आणि नंतर आ आ करून त्यांना माझी शुभ्र बत्तिशी दाखविली पण तरीही ते म्हणालेत, की वर्षातून एकदा तरी दात स्वच्छ करून घ्यायलाच हवेत. मग मी परत वाद घातला, जर मी शाकाहारी असेल, चहा पित नसेल, दोन वेळेस ब्रश करत असेल, अधुनमधुन कडूनिंबाची काडी वापरत असेल, cholcate, ice cream असे पदार्थ खात नसेल. किंवा काहीही खाऊन शेवटी दाताची निघा घेत असेल तर मला दात स्वच्छ करून घ्यायची गरज काय. पण शेवटी इतके ओरडून काहीही उपयोग झाला नाही. दात स्वच्छ करायालाच पाहिजे असे सगळ्यांचे असा सगळ्यांनी सल्ला दिला
|
Bee
| |
| Sunday, January 29, 2006 - 3:06 pm: |
| 
|
सुनिती, धन्यवाद लिंक दिल्याबद्दल. खूप छान आहे तो लेख.
|
Bee
| |
| Sunday, January 29, 2006 - 3:09 pm: |
| 
|
मला एक विचारायचे होते, उतारवयात calcium कमी होऊन आपली हाडे ठिसूळ होतात. ह्यासाठी काही नैसर्गिक उपाय आहे का? मला इथल्या एका doctor नी सांगितले की 500 mg calcium capsule म्हणजे ८ संत्र्यांचा रस. इतकी संत्री रोज खाणे कठीणच.
|
Moodi
| |
| Sunday, January 29, 2006 - 3:21 pm: |
| 
|
बी अरे नाचणी, राजगीरा, दुध, अंडी अन डॉक्टरने दिलेल्या / सुचवलेल्या गोळ्यांमधुन कॅल्शीयम मिळतेच. उतारवयात मैद्याचे अतीरीक्त खाणे कमी केले तर पोट नियमीत साफ होवुन इतर पदार्थ अंगी लागु शकतात. कारण पोट साफ नसले की खाण्याची ईच्छा रहात नाही, भुक कमी होते. अन साखरे ऐवजी गुळाचा चहा, काकवी असे वापरावे. लोहाचाही पुरवठा होतो. मात्र काकवी अती खाऊ नये.
|
Dineshvs
| |
| Sunday, January 29, 2006 - 5:10 pm: |
| 
|
जर हाडांची झीज झाली असेल तर ती चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. त्या व्याधीला बहुदा अस्टियोपोरायसीस असा शब्द आहे, त्याची खास ट्रिटमेंट घ्यावी लागते. वयाच्या बारा चौदा वर्षापर्यंतच कॅल्शियमचा साठा होवु शकतो. म्हणुन गरोदरपणात आणि वाढत्या वयात काळजी घ्यायची असते.
|
Prasadp77
| |
| Sunday, January 29, 2006 - 5:44 pm: |
| 
|
Dinesh, you were close or may be this is typographical mistake, its Osteoporosis. This test is usually neglected in India but actually first of this test should be done within 3-5 years of menopause. The reason behind is just not loss of calcium but hormone imbalance (and loss of calcium is result of same) If not taken into consideration in time, can lead to disaster. One of my relative had slip disc (a disc between the vertebra - back bone to say, which slipped), dignosis was severe osteoporosis. She used to take at least 30 mins to get up from the bed and nobody could really help her as her 'bones' would pain. It was miserable. So don't forget to include this one as well. Mumbaikars are lucky in this way. Wockhardt hospital in Mulund has packed all/many of these tests in a package and it used to cost INR 8000, which I suppose is pretty decent deal, worth checking out. If somebody checked latest package, please post here
|
Milindaa
| |
| Sunday, January 29, 2006 - 6:30 pm: |
| 
|
माझ्या मते उतारवयात काय काय तपासण्या करुन घ्याव्यात हे पूर्णपणे सापेक्ष आहे. आणि तज्ञ माणसे सोडून कोणीही सल्ले देणं आणि घेणं धोकादायक असू शकतं. तेव्हा दक्षता घ्या.
|
Moodi
| |
| Sunday, January 29, 2006 - 6:58 pm: |
| 
|
बरोबर आहे मिलिंदा तुझे. पण या तपासण्या इतक्या महागड्या नाहीत अन कॉमन आहेत. मी वर जी smear टेस्ट सांगीतली आहे, ती मला येथील नर्सने पण सगळ्या स्त्रीयांसाठी जरूरी आहे असे सांगीतले. उलट इथे uk मध्ये तर ही टेस्ट दर २ ते ३ वर्षानी होते. मला लेटर आलेले आहे या संदर्भात. दुसरी लिपीड प्रोफाईल टेस्ट हिचे वर्णन पण आलेय आरोग्य संदर्भात. माझ्या सासर्यानी पण केली. यात रक्तातील कोलेस्टेरॉल चेक केले जाते अन यात काहीच वावगे नाही. ही एकदम नॉर्मल टेस्ट आहे. हृदयविकार फक्त पुरूषानांच होतात असे नाही तर स्त्रीयांनाही होतात. म्हणुन असे चेक अप करावे. ह्या वरील टेस्ट्स एकदम नॉर्मल आहेत. अन कठिण असेल तर मी पण सांगणार नाहीच. मोतीबिंदु हा लवकर जाणवतो पण काचबिंदु दिसत नाही म्हणुन उतारवयात डोळे तपासणे जरूरी आहेच.
|
Veenah
| |
| Monday, January 30, 2006 - 10:03 am: |
| 
|
हल्ली प्रत्येक शहरातल्या मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये Health Check-up Packages असतातच. काहीहि त्रास होत नसला तरीही पुढील काळाची तरतूद म्हणून पस्तीशी पुढील प्रत्येक स्त्री पुरुषांनी ह्या टेस्ट्स करून घेणे आवश्यक आहेत. एखादा विकार झाल्यानंतर होणार्या खर्चापेक्षा ह्या टेस्ट्स वर होणारा खर्च खूप कमी व नन्तरचा त्रास आणि मनस्ताप वाचवणारा आहे. मध्यमवर्गीय सामान्य माणसाला परवडेल असाच खर्च येऊ शकतो. पुण्यातल्या दिनानाथ मंगेश्कर हॉस्पिटल च्या health packages वरुन हा अंदाज येईल. आपले आरोग्य दक्षतेने सांभाळण्यासाठी ह्या टेस्ट्स करणे पुरेशा आहेत. http://www.dmhospital.org/package.htm वयाच्या पस्तीशी नंतरच तब्येतीची घसरण सुरु होते. असे न व्हावे म्हणून, मधुमेह, रक्तदाब, ह्रुदयविकार, यांना प्रतिबंध जर करायचा असेल तर प्रत्येकाने आहार्-व्यायामाबरोबरच ह्या चाचण्या निदान दोन वर्षातुन एकदा तरी घेऊन आपल्या पुढील आयुष्याचे प्लॅनिंग केले पाहिजे.
|
Bee
| |
| Monday, January 30, 2006 - 4:26 pm: |
| 
|
वीना धन्यवाद! पण वयाच्या अगदी पस्तीशीनंतर म्हणजे फ़ारच लवकर नाही म्हणत आहेस का तू? चाळीशी पर्यंत मी ऐकले आहे पण पस्तीशी नाही..
|
Nalini
| |
| Tuesday, February 07, 2006 - 5:13 pm: |
| 
|
गरज पडल्याशिवाय डॉक्टरकडे जाऊन दात स्वच्छ करु नये. http://www.ghchealth.com/soft-drinks-america.html ह्या लिंक मधील Phosphoric Acid and Tooth Rot हा पॉईंट वाचा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|