|
चोचीने लिहितात नभावर.... चोचीने लिहितात नभावर पक्षी ऋतूंची गाणी सोडुन देई सागरामधे गगन मोकळे कोणी... अधांतरी ही ज्योत उन्हाची दिवा दिसेना कैसा कुठल्या वातीवरी तेवतो सूर्य दिसाचा ऐसा रोज फुलांच्या मनी पहाटे आनंदाची गाणी... वार झुळझुळ गातो गाणी पाणीही झुळझुळते पहा निळाई पाण्यासंगे हर्षभरे खळखळते तळी जरी भासती तरी त्या निळ्या नभांच्या खाणी... झाडांवरती पाने धरती ओले छत मायेचे मंद उन्हाला झाड लाविते अस्तर पडछायेचे वनराईच्या ओठांवरती वसे झर्याची वाणी.... हिरव्या दरबारातुन घुमते कुहूकुहू ललकारी फांदीफांदीवर झुलणारे वासंतिक दरबारी यांत कुठे शोधू फुलराजा आणिक त्याची राणी...
|
तळी जरी भासती त्या निळ्या नभांच्या खाणी... वाह!!!
|
नलेश पाटलांच्या कविता नक्षत्रांचे देणे मधे ऐकल्या आणि खुप आवडल्या. पुन्हा पुन्हा ऐकल्या तरी त्यांचे साधे शब्द पण अतिशय सुंदर कल्पना याचं कौतुक वाटत राहतं. अशीच एक आवडलेली कविता... येता पाऊस पाहुणा आलं हिरवं उधाण डोंगरतुन फुटलं हिरवळीचं धरण रान हिरव्या लोंढ्यात जाता अवघं वाहून पानं पाउस पिऊन गेली नवीन होऊन ऊन पकडाया सर आली धावत दारात कशी रमली दोघंही पाठशिवीच्या खेळात पाणी वाहते लावुनी अंगी मातीचं उटणं तरी नभाने राखलं कसं त्याचं निळेपण रेषा आखुनि पानात थेंब डाव मांडतात छेड काढता झुळूक आपसांत भांडतात उतरवून लकेरी निळ्या कागदाच्या वर तळं पसरत गेलं काठ सोडुन बाहेर टाळ्या वाजवत गेली फुलपाखरं मजेत जणू फुलंच निघाली देठावरूनी उडत सारी पाखरे उतारु करतात किलबिल दिला झाडाने ऋतुला गर्द हिरवा कंदील!
|
Milindaa
| |
| Monday, March 26, 2007 - 5:21 pm: |
|
|
मूळ पोस्ट - इरावती /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=460599#POST460599
|
Milindaa
| |
| Monday, March 26, 2007 - 5:25 pm: |
|
|
मूळ पोस्ट - इरावती /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=460599#POST460599
|
|
|