|
Surahi
| |
| Tuesday, March 08, 2005 - 11:50 am: |
| 
|
सगले पु.शि.प्रेमि २००४ नन्तर कुथे गेले? 'त्रिधा राधा' कविता कुणी वाचलि नाही का? masterpiece by पु.शि.
|
Bee
| |
| Thursday, December 15, 2005 - 4:08 am: |
| 
|
त्रिधा राधा आभाळ निळे तो हरि, ती एक चांदणी राधा, बावरी, युगानुयुगीची मनबाधा विस्तीर्ण भुई गोविंद, क्षेत्र साळीचे राधा, संसिद्ध, युगानुयुगीची प्रियंवदा जलवाहिनी निश्चल कृष्ण, वन झुकले काठी राधा, विप्रश्न, युगानुयुगीची चिरतंद्रा पुशिंची ही गाजलेली कविता. प्रत्येक कडव्याच्या सुरवातीच्या दोन ओळी लक्षात येतात पण अंतिम दोन ओळी नि त्या कडव्याच्या पहिल्या दोन ओळी ह्यांचा अन्वय मला पूर्णपणे लावता आला नाही. सुरवातीला मला त्रिधा म्हणजे काय हेच कळत नव्हते. मी आपले त्रेधा तिरपट ह्या शब्दांशी त्याचा अन्वय लावला. मग कविता बर्याचदा वाचली तेंव्हा कळले कदाचित मनबाधा, प्रियंवदा, चिरतंद्रा ह्या शंब्दांवरून पुशिंनी ह्या कवितेचे नाव त्रिधा राधा असे ठेवले असेल. प्रत्येक कडव्यात कृष्ण राधाची व्याख्या बदलली जात आहे. वर सुरहीने म्हंटलेच आहे, सुशिंची ही कविता Masterpiece आहे. मीही तेच म्हणतो, ही कविता किंवा अशा कविता प्रतिभावंतांनाच जमू जाणे. कवितेतील शब्द सौंदर्यही तितकेच केवळ आहे. पहिल्या कडव्यात, निळे आभाळ हरि आणि त्यातील एक चांदणी राधा दुसर्या कडव्यात, विस्तीर्ण भुई गोविंद आणि क्ष्रेत्र साळीचे राधा अंतिम कडवे एकदम वेगळे आहे, इथे जलवाहीनी निच्शल कृष्ण तर त्यात वन होऊन झुकलेली राधा आहे. कवितेचा अर्थ असा शब्द शब्दांचा अर्थ लावत घ्यायचा नसतो हे माहिती आहे. पण सुरवतीला आपण एखादी कविता वाचतो तेंव्हा शब्दांचा अर्थ लक्षात घेऊनच कवितेच्या गर्भित अर्था पर्यंत पोचावे लागते. कधीकधी हा प्रवास न संपणारा असतो. जसे की ग्रेसच्या कविता. ह्या कवितेतील न समजलेले शब्द सांगतो, जर त्यांचा अर्थ कळला तर मला काही मदत होऊ शकेल. विप्रश्न? साळीचे? मला तांदूळाच्या साळी माहिती आहे.. चिरतंद्रा? मला चिर आणि तंद्री हे दोन शब्द माहिती आहे. इथे प्रश्नांच्या गर्तेत बुडणे असा अर्थ अपेक्षित आहे का? संसिद्ध? मला संदीग्ध म्हणजे धूसर माहिती आहे. Thx in advance to all those who read my post and help me out.. ही कविता वाचून मला बेटीच्या एका तिरळ्याची आठवण झाली. त्या तिरळ्यात राधेचे असेच छान वर्णण केले होते. ती कविता आणि पुशिंची कविता दोन्ही आपल्या परिने महान आहेत... पराग, अज्जुके आहे का बेटीची ती कविता तुमच्याकडे? तिरळे आहेत ते राधेवरचे...
|
Nitu_teen
| |
| Sunday, January 15, 2006 - 7:03 am: |
| 
|
पक्षी जे झाडावर गाणे गातो आहे झाडच दुसरे पुन्हा त्या गाण्यात पक्षी जे झाडावर गातो आहे पक्षी दुसरा गाण्यांतच त्या पुन्हा झाडावर जे पक्षी गातो..
|
Bee
| |
| Sunday, January 15, 2006 - 7:16 am: |
| 
|
नितू, मस्त आहे ही कविता..
|
निःशब्द वादळ नदी किनारीं वारा भरारा. चंचल अंचल. सावळी चाहूल. उरी थरारे नवी नव्हाळी. जुळलीं, भुललीं ह्रदये दोन. नदी किनारीं वारा भरारा. गवती पातीं लपती कांठी. तरंग सारंग पाण्यावरती. उसळे, कोसळे निःशब्द वादळ
|
सोना सोनफुलांची राकट हातीं जरि सांगड साजेना, ओंजळ घाली ठकवुनि जवळी नउ नवसाची सोना.
|
लिलीची फ़ुले लिलीची फ़ुले तिने एकदा चुंबिता, डोळां पाणी मीं पाहिलें. लिलीची फ़ुले आतां कधींही पाहतां, डोळां पाणी हें सांकळे.
|
|
|