|
Shirishk
| |
| Wednesday, February 21, 2007 - 10:01 am: |
|
|
Can somebody complete/correct the following? गवताचं पातं वार्यावर डोलतं डोलताना म्हणतं खेळायला चला खेळायला चला! झिम्माड पावसात गारांची बरसात बरसात म्हणते वेचायला चला वेचायला चला! झर्याचं पाणी खुदुखुदु हसतं हसताना म्हणतं ला ला ला ल ला ला ला ला ल ला
|
ही आणखी एक सुंदर कविता. ------------------------------ क्षितीजाचे तट फोडून धावे अश्व सनातन मार्गावरती. पायतळी चुरल्या काळाचा चुरा पथावर उडतो भवती. रवी-शशीचे परजीत पलिते स्वार तयावर बसला आहे. अश्व न जाणे स्वार न जाणे प्रवास कुठला कसला आहे. -----------------------------
|
Niwedita
| |
| Tuesday, May 29, 2007 - 8:29 am: |
|
|
धर्मा ला देव लागतो देवाला धर्म लागत नाही म्हणून धर्म देवाच्या अलीकडे आणि देव धर्माच्या पलीकडे कुसुमाग्रज
|
Niwedita
| |
| Tuesday, May 29, 2007 - 8:56 am: |
|
|
एक छान कविता आहे कुसुमाग्रजांची इथे आठवतेय तशी लिहिलीय चू.भू.दे.घे. परवाच्या पावसात झोपडपट्टीतील एक मूल वाहून गेले बुडून मेले बूडाले तर बुडू द्या मूल बुडाले म्हणजे काही सात तारयाचे ताजमहाल किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम बुडाले नाही आणि झोपडपट्टीतील त्या उघड्या नागड्या मूलाचे असे मूल्य तरी किती? साधे गणित येत असेल तर करता ये ईल हिशेब उत्तर अर्थात पैशातच हे मत तुमचे माझेच अहे असे नव्हे त्याच्या आईचेही तेच असावे कारन मूलाचे कलेवर मांडीवर घेऊन ती फोडीत बसली असता एक कर्कश हंबरडा वस्तीवर एक वार्ता येऊन कोसळली यावेळी मात्र करुणामय मेघासारखी वार्ता: नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी कुजलेल्या धान्याची पोती ओतीत सुटला आहे उकिरड्यावर बाईने आपला हंबरडा आवरला घशात अर्ध्यावरच अन मांडीवरचे कलेवर खाली टाकून घरातल्या उरल्या सुरल्या पिशव्या गोळा करुन ती बेफाम धावत सुटली उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी कुसुमाग्रज
|
निवेदीता Great Poem Taking Printout of this Versatile MP
|
मला "हासरा नाचरा जरासा लाजरा, सुन्दर साजिरा श्रावण आला" ह गाणे हवे आहे.. असेल तर मेल कराल का? ash.t05@gmail.com
|
कुसुमाग्रजांची वाचण्यात आलेली अर्धवट कविता खाली देत आहे. कोणितरी पुर्ण करील काय? नवतेजाची एक पताका सान्ध्यघनांच्या जंगलामध्ये जळते आहे त्या तेजाची गहन एकता ईथे किनार्यावरती मजला कळते आहे ईथे जळाच्या खोल तळशी इन्द्रधनुचे गाव असावे दर्यावर मग मोरपिसांचे विशाल पंखे का न दिसावे? चु.भु.दे.घे.
|
कुसुमाग्रजांची पानिपत युद्धावरची कविता कोणी पोस्ट करेल का?
|
|
|