Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मराठीत अनुवादीत कविता ...

Hitguj » Language and Literature » इतर साहित्य » मराठीत अनुवादीत कविता « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through August 29, 200335 08-30-03  2:42 am
Archive through April 29, 200530 04-29-05  10:41 am
Archive through August 15, 200620 08-16-06  2:02 am

Nvgole
Wednesday, August 16, 2006 - 2:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संसारसे भागे फिरते हो

मूळ हिंदी गीत: साहीर लुधियानवी
संगीत: रोशन
गायीका: लता
चित्रपट: चित्रलेखा
भूमिका: मीनाकुमारी, प्रदीपकुमार, अशोककुमार

संसार से भागे फिरते हो | भगवान को तुम क्या पाओगे ||
इस लोग को भी, अपना ना सके | उस लोग में भी, पछताओगे || धृ ||

ये पाप हैं क्या, ये पुण्य हैं क्या | रीतों पर धर्म की मोहोरे हैं ||
हर युग में बदलते धर्मों को | कैसे आदर्श बनाओगे || १ ||

ये भोग भी एक तपस्या है | तुम त्याग के मारें क्या जानो ||
अपमान रचेता का होगा | रचना को अगर ठुकराओगे || २ ||

हम कहते है, ये जग अपना है | तुम कहते हो झू ठा सपना है ||
हम जनम बिताकर जाएंगे | तुम जनम गवाँकर जाओगे || ३ ||



संसारपराङमुख असशी तू

संसारपराङ्मुख असशी तू | मिळणार तुजसी ईश्वर ऽ काय ऽ ? ||
ह्या लोका न तू आपले म्हणसी | त्या लोकीही तू खंतची करशील || धृ ||

हे काय असे पाप आणि पुण्य | रीतींवर धर्माची मोहोर जणू ||
प्रत्येक युगाच्या धर्माला | आदर्श कसा घडविशील तू || १ ||

हे भोगही एक तपस्या असे | समजे का तुला त्यागापायी ||
होतो अपमान रचयित्याचा | केला अव्हेर रचनेचा जरी || २ ||

मी म्हणते हे जग आपले आहे | तू म्हणसी ते खोटं स्वप्न आहे ||
मी जन्म व्यतीत करून जाईन | तू जन्म गमावून की जाशील || ३ ||

मराठी अनुवाद: नरेंद्र गोळे २००६०८१५


Bhramar_vihar
Monday, October 16, 2006 - 6:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नरेंद्र गोळे हे अनुवादीत नाव नाहि ना? ए.भा.प्र.

Mansmi18
Thursday, July 05, 2007 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नरेन्द्र गोळेसाहेब,

hats off to you

फ़ारच छान!

"पाव छु लेने दो फ़ुलोको इनायत होगी" चा अनुवाद केला काकराल का?

धन्यवाद.


Raviupadhye
Monday, July 09, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता पुरे कराल का सुन्दर गाण्यान्ची चिर फ़ाड?,हिन्दीतील ते अजरामर रचना केलेले शायर आपल्या थडग्यामधे तडपत असतील त्याना सुखाने स्वर्ग उपभोगू द्या ण काका

Bee
Friday, August 31, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अनुवादीत कविता ह्या बीबीची वाट लावली जात आहे इथे म्हणून अनुवादीत कविता म्हणजे काय हे मी इथे समजवून सांगतो. तर ऐका..

मराठी व्यतिरिक्त इतर कुठल्याही भाषेतील प्रतिभावंत कवींनी लिहिलेल्या कवींच्या कविता मराठी भाषेत अनुवादीत झाल्या असतील तर त्या इथे लिहायच्या आहेत. कुठलीही कविता जी तुम्ही अनुवादीत केली ती इथे लिहायची नाही, तर ती गुलमोहोरावर लिहू शकता कारण प्रत्येक अनुवादीत साहित्यकृती लिहायला देखील स्वप्रतिभेची गरज असतेच.

आता परत ह्या बीबीची वाट लावू नका ही विनंती.


Maanus
Friday, August 31, 2007 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला कुणाचीतरी तळपायाची आग मस्तकापर्यंत पोचवु शकलो तर मी परत एकदा

पुर्वी खुप हिंदी ईग्रजी गाणी मराठीत करायचो आणि म्हणुन पन दाखवायचो :-). खुप मार पडायला लागला म्हणुन ते बंद झालेले. आता तुम्ही म्हणताय तर परत सुरवार करेल पन गुलमोहर वर नको. दुसरीकडे कुठेतरी टाकेल.


Maanus
Friday, August 31, 2007 - 1:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे काय माझे post उडवुन पन टाकले लगेच :-( लोकांना गाण guess करायचा तरी मोका द्यायचा होता की.

Jayantshimpi
Friday, September 14, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

translation of hindi songs in Marathi is a good effort, but one thing is to be kept in mind that the original songs, rhythem i.e. "Geyata" should not be disturbed in any case.

Nvgole
Saturday, November 24, 2007 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रशासक महोदय,

काही वर्षांपूर्वी मी अटल बिहारींच्या कवितांचे मराठी अनुवाद मायबोलीवर लिहिण्यासाठी नवा bb उघडून देण्याची विनंती आपल्याला केली होती. त्यावर आपण 'अनुवादित कवितां'च्या, आधीच अस्तित्वात असणार्‍या bb वर ते अनुवाद त्या विनंती पत्रासहित प्रकाशित करून मला तिथेच इतरही अनुवाद लिहिण्यास सांगितले होतेत. तसे मीही अनेक अनुवाद तिथे लिहीले.

आज ते अनुमती मागणारे पत्र वा इतर अनेक अनुवादही तिथे दिसत नाहीत. त्यामुळे माझे लिखाण, गुलमोहोर मध्ये न जाता, तिथे प्रतिष्ठित अनुवादकांच्या bb वर, अस्थानी भासत आहे. श्री. बी ह्यांनी मी तिथे उगीच घाण का करत आहे असा प्रश्नही विचारला आहे.

मला कुठलेही लेखन, अस्थानी, अनुमतीविना, इतरांना रुचणार नाही अशा पद्धतीने करण्याची मुळीच इच्छा नाही. मात्र, माझे लिखाण आता तिथे, तसे ठरत आहे. यास्तव, माझी नम्र विनंती आहे की त्या bb वरील माझे सर्व लिखाण नाहीसे करावे.

मी पूर्वीप्रमाणेच आजही मायबोलीचा सदस्य आहे. मायबोलीबद्दल मला आदर आहे. मायबोलीवर काहीही अस्थानी भासणारे, वावगे, तसे दिसत राहू नये असे मला वाटते. म्हणूनच मी हे लिहीत आहे. मला आशा आहे की आपण माझ्या विनंतीची योग्य दखल घेऊन उचित कारवाई कराल.

आपला स्नेहांकित
नरेंद्र गोळे २००७११२४


Raviupadhye
Sunday, November 25, 2007 - 8:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्री गोळे वाईट वाटून घेण्याचे कारण नाही. तुमच्याकडे भाषेच्या nuances जाणण्याची प्रतिभा नाही.



Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators