Kshipra
| |
| Tuesday, February 07, 2006 - 6:01 am: |
|
|
इरा, ' ज्यात असतं निखळ मन मनालाच शोधणारं, पुजणारं ' एकदम मस्त. धन्यवाद
|
Iravati
| |
| Friday, February 10, 2006 - 2:43 pm: |
|
|
|
Iravati
| |
| Friday, February 10, 2006 - 2:44 pm: |
|
|
|
Iravati
| |
| Friday, February 10, 2006 - 2:47 pm: |
|
|
|
Bee
| |
| Friday, February 10, 2006 - 3:40 pm: |
|
|
इरावती, एक एक कविता हृदयात शिरली ग!!! तुझे आभार कसे मानावे मज कळेना. तू कृपया मला चाफ़्याच्या झाडा ही कविता रविवारच्या दुपारपर्यंत देऊ शकलील का? मला एका काव्यवाचनाला जायचे आहे तिथे वाचून दाखवीन कारण आमचा विषय आहे झाड.
|
Supriyaj
| |
| Monday, April 17, 2006 - 5:47 pm: |
|
|
मला पद्मा गोळेंची 'चाफ्याच्या झाडा' ही कविता कुणी देईल का?
|
Iravati
| |
| Friday, May 26, 2006 - 1:53 pm: |
|
|
आषाढातला सूर्यसुद्धा आषाढातला सूर्यसुद्धा हसतो कधी कधी ढगातून बाहेर येऊन आणि अस्ताला जाताना असे काही रन्गलाघव उधळतो झाडावर की त्याचे ते सोनसळी हिरवेपण मनात शिरते खोल खोल आणि अंधाराचे पडदे बाजूला करीत करीत व्यापून टाकते मनाचा अथान्ग गाभारा पूर्ण पण हळूहळू त्यातली सोनसळ हरवत जाते हिरवेपण अंधारात मिसळून जाते आणि मग आषाढ.... अंधार...... ओली तगमग एकटेपणाची हक्काची मिरास अथान्ग गाभा-यातली
|
Iravati
| |
| Monday, May 29, 2006 - 2:07 pm: |
|
|
|
Iravati
| |
| Monday, May 29, 2006 - 2:08 pm: |
|
|
|
Iravati
| |
| Monday, May 29, 2006 - 2:15 pm: |
|
|
|
Iravati
| |
| Monday, May 29, 2006 - 2:50 pm: |
|
|
चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा.... का बरे आलास आज स्वप्नात? तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले? दु:ख नाही उरलं आता मनात फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा.... नको ना रे पाणी डोळ्यात आणू ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात हादग्याची गाणी नको म्हणू तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा.... पानात, मनात खुपतंय ना काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय.... कळतंय ना.... चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा हसून सजवायचं ठरलय ना कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं फुलांनी ओंजळ भरलीये ना
|
Amolt, तु तुझ्या स्वतःच्या कविता खालिल ठिकाणी पोष्ट करु शकतोस. /hitguj/messages/75/118433.html?1163411086
|
Bee
| |
| Tuesday, February 19, 2008 - 10:01 am: |
|
|
शोनू / असामी, पद्माताईंची 'उत्तर' इथे लिहा.
|
Bee
| |
| Tuesday, February 19, 2008 - 10:03 am: |
|
|
नेट वर मला पद्मा गोळेंची ही एक सुंदर कविता मिळाली. ती कुणाला पुर्ण करता येईल का? मी घरात आले आता सोंगं पुरे झाली सारी ओझी जड झाली, उतरून ठेवून आता तरी माझी मला शोधू दे तुकडे तुकडे जमवू दे विशाल काही पुजू दे
|
आता ढोंगं चालू झाली सारी ओझी हलकी झाली जबान माझी बोलकी झाली. जन हो, मला जमवू दे बंडलेच्या बंडले नोटांची नि तिजोरी माझी पुजू दे!
|
Anandi
| |
| Tuesday, August 04, 2009 - 6:26 am: |
|
|
"एक सामान्य माणूस" ह्यांची वरची छोटी विडंबन कविता आचार्य अत्रेंच्या "झेंडूची फुले"मधल्या विडंबन कवितांसारखी झकास आहे!
|