|
आतापर्यंत कोणीच कसं काही लिहीलं नाही ज्ञानेश्वरां बद्दल त्यांचे अभंग म्हणजे उत्तम काव्य आहे
|
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले नवल देखिले नभाकार गे माये बापरखुमादेविवरु सहज निटू झाला ह्रदयी न दाविला ब्रह्माकारे
|
पैल तो गे काउ कोकताहे शकुन गे माये सांगताहे उड उड रे काउ तुझे सोनेने मढवीन पाउ पाहुणे पंढरीराऊ घराकै येती दहीभाताची उंडी लावीन तुझे तोंडी सत्य सांगे गोठी, विठू येइल कायी?
|
माझी सर्वात आवडती विराणी घनु वाजे घुण घुणा, वारा वाहे रुणझुणा भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का? चान्दु वो चान्द्णे चापे वो चन्दने देवकीनंदनेवीण नावडे वो चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगी भेटवा का दर्पणी पहात रूप न दिसे वो आपले बापरखुमादेवीवरे मज ऐसे केले
|
आजि सोनियाचा दिनु, वर्षे अमृताचा घनु हरि पाहिला रे हरि पाहिला रे सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी दृढविटेवनमुळी, विराजीत वनमाळी बरवा सन्तसमागमु, प्रगटला आत्मारामु कृपासिंधू करुणाकरू, बाप्रखुमादेवीवरु
|
मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरु कळियासी आल इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलु गेल गगनावेरी मनाचीये गुंफी गुंफियला शेला बापरखुमादेवीवरे विट्ठले अर्पिला किती शांत, सोज्ज्वळ काव्य आहे हे... आद्यकवि ही उपाधी चपखल बसते..
|
Admin
| |
| Wednesday, July 09, 2008 - 3:25 am: |
| 
|
हा विभाग इथे हलवला आहे /node/2579
|
|
|