|
Chinoox
| |
| Friday, May 16, 2008 - 11:06 am: |
| 
|
बी, तेच म्हणतोय मी, स्लार्टीच्या पोस्टनंतर या पोस्ट का आल्या ते मला कळलं नाही. असो. कन्नडमध्ये 'खासगी' असाच शब्द आहे.
|
खासगीवाले असे आडणाव ही असते.
|
Divya
| |
| Friday, May 16, 2008 - 11:47 pm: |
| 
|
chinoox यांनी लिहीलेले बरोबर आहे. राधा कृष्ण, वृंदावन हे जयदेवाचच क्रियेशन. तशी राधा अस्तित्वात नव्हतीच. त्यामुळे अनय हि अस्तित्वात नसणारच. हे सगळ नंतर घुसडलेले आहे. पण राधा कृष्ण हे मोक्षाची अपेक्षा करणारा भक्त म्हणजे राधा आणी स्वयंभु परमात्मा म्हणजे कृष्णाच प्रतिक आहेत. अवैषयीक, वैषयीक कुठल्याही जिवंत व्यक्तीवरच प्रेम हे ती लेवल गाठुच शकणार नाही. त्या शुद्ध, पवित्र भक्तीयुक्त प्रेमाला एवढ्या खाली आणुन उगाच काय अनयला गरीब म्हणायची गरज नाही. आपल्यातच असलेला अंतरात्म्याचा शोध हा वाटतो तितका सोपा नाही. ज्याला रंग नाही, रुप नाही, आकार नाही, जो पंचेद्रियांनी अनुभवता येत नाही, जो बुद्धी ने अनुभवता येत नाही, जो मनाने कल्पना करता येत नाही अशा पर्मेश्वरास्वरुप होण म्हणजे मोक्ष. हे देहात राहुन शक्य आहे. जे संत होउन गेले ते विदेही होते यामागे ते त्या स्वरुपाला कधीच जाउन मिळाले होते तरी फ़क्त देहाने नाममात्र उरले होते. दुसरे खुद्द कृष्ण आणि राम हे पर्मात्मस्वरुपच होते. भक्ताच्या भक्तीमधल्या पायर्या आहेत. आपण आपल प्रतिबिंब आरशात बघतो. त्या क्शणाला आपल्याला माहीत असत कि आरशात उमटल आहे ते खरे आपण नाही आहोत. आपण त्या पेक्षा वेगळे आहोत. तसच परमेश्वर आणि भक्त हे आपणच आपल प्रतिबिंब बघीतल्या सारख बघतो. खरतर दोन्ही एकच असत पण तरी कुठेतरी द्वैत शिल्लक असतेच. त्या क्षणाला भक्ता मधे आणि परमेश्वरामधे एक अतुट साम्य तरीही किंचीत उरलेल्या देहबुद्धीमुळे ते वेगळे असतात. अशी जी स्टेज आहे तिथे भगवतगीतेत बाराव्या अध्यायात कृष्णाने म्हणलय कि मी म्हणजे पती आणि तो भक्त म्हणजे माझी पत्नी अस आमच नात असत. ते परमेश्वर स्वरुप होण्याच्या आधीच्या स्टेज ला असलेल्या भक्तीच प्रतिक हे राधा कृष्ण आहेत. सतत चिंतनाने आणि मननानेच भगवंताची प्राप्ती होते. हा मनुष्य जन्म हा एकच असा जन्म आहे जिथे बुद्धी ची देणगी आहे जी वापरुन परमेश्वराचा शोध घेता येतो. किती सुक्ष्म, एकाग्र बुद्धी कराल तेवढा तो उलगडत जातो. अविषयीक प्रेम हे सुद्धा देहबुद्धीतुनच होणार, त्याला तो दर्जा कधीच प्राप्त होउ शकणार नाही. फ़ारफ़ार तर काय अशा प्रेमात अगदी मृत्युला जवळ करायची तयारी असली तरी ते प्रेम तितक शुद्ध आणि निर्मळ नाही, लैला मजनु, रोमिओ ज्युलियेट स्टैल होईल. कितीतरी जन्मांच्या साधने नंतर मोक्ष प्राप्तीच्या दाराशी भक्त पोचतो. हे असल अवैषयीक प्रेम तरी काय परत वासना घेउन पुन्हा जन्म मृत्युच्या चक्रात अडकवणार असल्यान पवित्र होउ शकत नाही. देह मन बुद्धी यांच्या पलिकडे असलेल्या भगवंअतावर केलेल सच्च प्रेम पुन्हा त्याच्याकडेच घेउन जाते. मरतेसमई काय वासना इच्छा मनात आहेत याला त्यामुळे खुप महत्व आहे. आयुष्यभर ज्यासाठी अट्टाहास केला ते शेवटच्या क्षणाला मनात येते. म्हणुन भगवंताची भक्ती करायची. मीराबाई हि खरी अस्तित्वात होती. तिने तर राजाची राणी असुनही कृष्णाला पती मानले होते पण तो देहस्वरुप तेंव्हा नव्हता, परमात्मास्वरुपच होता. आता इथे मीराबाईच्या नवर्याला तुम्ही दुर्दैवी (ज्याची बायको असुनही दुसर्यावर अससुन प्रेम करणारी) म्हणत असाल तर. संत तुकारामांची बायको दुर्दैवी आहे कारण त्यांनी फ़क्त तेवढच केल. रामाची सीताही दुर्दैवी आहे. सगळ्याच संत म्हणा मोक्ष मिळवणारे म्हणा या लोकांचे संसार कधीच फ़ारसे सर्वसामान्यांसारखे नव्हते. म्हणुन तर संन्यासाश्रम आहे, ज्यात या संसाराच्या जबाबदार्यांपासुन पुर्ण मुक्त होउन फ़क्त पर्मेश्वराला आयुष्य वाहुन घेता येत. त्यामुळे जे संसारी होते तरी मोक्षप्रत जाउ शकले अशांच्या संसारात त्यांच्या जोडीदारालाच कदाचीत पुर्ण संसाराच गाड ओढाव लागल असेल पण म्हणुन ते दुर्दैवी???? योगक्षेमम वहाम्यहम, भक्तांचा पुर्णपणे संभाळ करण्याची जबाबदारी ज्याच्या शिरावर आहे तो त्यांच्या जोडीदारांना दुर्दैवी कसा होउ देईल. जाता जाता, राधा कृष्ण या प्रेमाच प्रतिक खुप पवित्र आणि जीवा शीवाची गाठ पडुन समाधी लागण्या आधीच्या अव्स्थेच प्रतिक आहे. रास खेळणार्या कृष्ण राधा हे कल्पना आहेत नंतर तयार केलेल्या.
|
Hkumar
| |
| Saturday, May 17, 2008 - 5:09 am: |
| 
|
स्लार्ती, मी २ दिवस internet कडे फिरकलोही नव्हतो, गायबलो नाही! विचित्रवीर्य हा खूप अशक्त होता व लवकर वारला व नंतर त्याच्या दोन्ही विधवा दुसर्या कोणालातरी देण्यात आल्याचा उल्लेख महाभारतात आहे. त्या नावाचा व विर्याचा संबंध असल्याचे मला माझ्या एका अभ्यासू pathology च्या प्राध्यापकांनी सांगितले होते( ते महाभारत वगैरेचेही अभ्यासक आहेत). अर्थात ते नाव 'पाळण्यात ठेवले' वगैरे मानण्यात अर्थ नाही. आपण मा.बो.कर नाही का इथे चित्रविचित्र नावांनी वावरत! तेव्हा ते नाव ही मोठेपणी दिलेली हेटाळणीची पदवी असावी असे वाटते.
|
Slarti
| |
| Monday, May 19, 2008 - 1:38 pm: |
| 
|
दिव्या, अनय या शब्दाचा अर्थ मला पाहिजे. तेव्हा साहजिकच अर्थ समजून घेण्यासाठी मी शब्दाची व्युत्पत्ती व त्या शब्दाचे ज्ञात संदर्भ लक्षात घेतो. आता मला माहित असलेली व्युत्पत्ती व राधेचा नवरा यांची सांगड बसत नव्हती. तेव्हा मी ती सांगड घातली. राधा महान असेल, पण अनय तितकाच असेल का ? राधेला समजून घेण्याची ताकद जर नसेल तर पुरुषसुलभ मत्सर आला, लग्न दोघांचे असले तरी संसार एकट्याचा असल्याची भावना आली. थोडक्यात, स्वतःच्या कुवतीबाहेरचा जोडीदार मिळणे हे दुर्दैवच नाही का ? इथे तो शब्दार्थ आणि व्यक्तीरेखा माझ्या दृष्टीने जुळतात. गंमत अशी की मी जे विचित्रवीर्याबद्दल लिहीले तेच अनयबद्दल मांडून माझा मुद्दा खोडून काढता आला असता. अनयच्या आईवडीलांना काय माहिती ना की तो दुर्वर्तनी / दुर्दैवी असेल ?!! पण तो मुळातच काल्पनिक असेल तर जयदेवने मुद्दाम त्या व्यक्तीरेखेसाठी हे नाव घेतले असेल अशी एक शक्यता राहतेच. तसे असेल तर थोर, लोकोत्तर लोकांच्या सांसारिक जोडीदारांवर केलेले हे एक तरल भाष्य आहे असे मी मानतो. आता या सगळ्यात राधेच्या प्रेमाला 'खाली' आणणे कसे आणि कुठे होते हे मला कळत नाही. काहीच नाही, तर असं समजा की अनयबद्दलचे ते माझे खाजगी / खासगी मत आहे.
|
Chinoox
| |
| Tuesday, May 20, 2008 - 4:20 am: |
| 
|
Humar, विचित्रवीर्य अशक्त होता, असा महाभारतात मुळीच उल्लेख नाही. उलट त्याने ७ वर्षं 'तारुण्याचा उपभोग' घेतला, असं आदिपर्वात म्हटलंय. त्याचं शौर्य, अंबिका व अंबालिकेबरोबरचा शृंगार, हे सारं आदिपर्वात विस्तारानं आलं आहे.
|
"नको देवराया अंत आता पाहू" या गाण्यात एक कडवे असे आहे. मोकलूनी आस जाहले उदास घेई कान्होपात्रेस हृदयात! या कडव्यातील "मोकलूनी" या शब्दाचा अर्थ काय? हा शब्द या गाण्याव्यतिरिक्त कुठेही वाचलेला नाही.
|
Slarti
| |
| Wednesday, May 21, 2008 - 9:59 am: |
| 
|
सतीश, धाय मोकलून रडणे आहे ना. हे वाचा - blast from the past
|
सतीश जी, आई गेल्यावर धाय मोकलून(कदाचीत मोकळा होवून चे लघु स्वरूप) तो रडला.म्हणजे हमसून हमसून,अगतिक होव्वोन,ओक्साबोक्शी असा अर्थ होतो.
|
Hkumar
| |
| Saturday, May 24, 2008 - 4:49 am: |
| 
|
अलिकडे एक इंग्राठी शब्दप्रयोग भाषेत रुढ होउ पहात आहे. 'गुगलून काढणे'. म्हणजे google search करून एखादी गोष्ट शोधणे!
|
Zakki
| |
| Saturday, May 24, 2008 - 4:49 pm: |
| 
|
मग बुकलून काढणे म्हणजे पुस्तकात वाचून काढणे का?

|
वा !! "गुगलून काढणे" याचा अर्थ इतर संवादपटलावर लोकांनी "याहून काढणे" अथवा "मसून काढणे" असा घ्यायला हवा. तरीसुध्दा "काढणे" हा शब्द फार सोपा आहे. "दळणे" किंवा "पिंजणे" किंवा "पिसणे" हे जास्त बोधक शब्द आहेत. उदाहरणार्थ : "मी क्रिकेटच्या लिंक्स शोधून दमलो, बरे झाले याहून पिंजल्यावर एक दोन लिंक्स सापडल्या", किंवा, "अमरावतीमध्ये सॉफ्टवेअरच्या नोकऱ्या शोधण्यासाठी मी मसून दळले, मग कुठे मला एक नोकरी सापडली", किंवा, "याहून पिसले, मसून दळले आणि गुगलून पिंजले तरीही मुंबईमध्ये कुठेही राहण्याची जागा सापडली नाही", वगैरे.
|
Bee
| |
| Monday, May 26, 2008 - 10:03 am: |
| 
|
सामान्य, सर्वसामान्य, अतिसामान्य आणि असामान्य ह्यांच्यामधील फ़रक सांगता येईल का इथे कुणाला? उदाहरण देता आले तर आणखीच छान होइल. मला तसा ह्या चारी शब्दांचा अर्थ माहिती आहे पण व्यक्त करून सुस्पष्ट लिहिता येणार नाही. आभार!
|
खरे सांगायचे झाले तर, सर्वसामान्यरित्या पाहता या शब्दांचे अर्थ, हे एखाद्या अगदी अतिसामान्य आणि दुसर्या असामान्य अशा दोन व्यक्तींच्या सामान्य संभाषणातूनही सहज लक्षात येतील.
|
Bee
| |
| Monday, May 26, 2008 - 3:49 pm: |
| 
|
तुझे निकष काय आहेत अशा व्यक्तिंना ओळखण्याचे? आपल्यापेक्षा हुषार आणि आपल्यापेक्षा मुर्ख असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. मग जी व्यक्ती मला असामान्य वाटू लागते ती व्यक्ती एखाद्याला सर्वसामान्य वाटू शकेल कारण त्याच्यानुसार त्या व्यक्तीत खास काही असामान्य म्हणता येईल असे गुण नाहीत.
|
Bee
| |
| Tuesday, May 27, 2008 - 4:16 am: |
| 
|
मायबोलिवर खूप जण 'या', 'यांचा', 'यांची' असे लिहितात, हेच शब्द मी 'ह्या', 'ह्यांचा', 'ह्यांची' असे लिहितो. तर ह्या शब्दांचे शुद्ध रुप कोणते? खूप खूप आभारी आहे.
|
Arch
| |
| Tuesday, May 27, 2008 - 4:57 pm: |
| 
|
सुरमई शाम, ह्या सुरमई शब्दाचा अर्थ काय?
|
Slarti
| |
| Tuesday, May 27, 2008 - 5:41 pm: |
| 
|
माझ्या अंदाजे 'डोळे जसे सुरम्याने वेढलेले / रेखलेले असतात तशी (काळोखरुपी) सुरम्याने वेढलेली / रेखलेली'. बघा 'सुरमई अँखियों में नन्हा मुन्ना एक सपना दे जा रे...'. कदाचित 'सूरमयी' असंही असेल, म्हणजे सुरांनी भरलेली अशी. पण ते आख्खं गाणं जर वाचलं तर पहिला अर्थ जास्त जवळचा वाटतो मलातरी. चू.भू.द्या.घ्या. काय सर्वांगकातिल गाणं आहे... छे ! आता ते ऐकावंच लागेल.
|
Lalu
| |
| Tuesday, May 27, 2008 - 6:12 pm: |
| 
|
पहिलाच अर्थ बरोबर आहे. सुरमई म्हणजे काळा, करडा रंग. हे अजून एक्- शाम रंगीन हुई है तेरे आंचल की तरह सुरमई रंग सजा है तेरे काजल की तरह
|
Maanus
| |
| Tuesday, May 27, 2008 - 6:19 pm: |
| 
|
क्षितीज ला ईंग्रजी मधे काय म्हणतात?
|
|
|