|
Slarti
| |
| Thursday, May 15, 2008 - 3:24 am: |
| 
|
विचित्र या शब्दाचा एक अर्थ विस्मयकारक, आश्चर्यकारक असा आहे. म्हणजे या शब्दाचा strange हा अर्थ केवळ नकारात्मक नव्हे. एखादी strange गोष्ट विस्मय निर्माण करतेच की. शिवाय वैविध्यपूर्ण असाही अर्थ आहे. बघा, चित्रविचित्र हा शब्द. आता वीर्य हा शब्द वीर या विशेषणाचे भाववाचक नाम आहे जसे की शौर्य, धैर्य. त्यामुळे, 'अंगी विस्मयकारक आणि / किंवा बहुढंगी वीरता असलेला तो विचित्रवीर्य' असा अर्थ ध्यानात घ्यावा. नावांची चर्चा सुरू आहे म्हणून... अनय या शब्दाचे काय काय अर्थ होतात ? माझ्या माहितीप्रमाणे संधिविग्रहानुसार असे अर्थ आहेत - अन् + अय = दुर्दैव. अ + नय = दुर्वर्तन. सध्या अनय, अनया अशी नावे ठेवली जातात मुलामुलींना. या शब्दाचा अर्थ "जो (निमूट मेंढरासारखा) कुठे 'नेला' जाऊ शकत नाही तो" असा काही आहे असा एक समज असतो. पण हा अर्थ अपेक्षित असेल तर योग्य शब्द अनेय, अनेया असा आहे. जाता जाता, राधेचा नवरा एका अर्थी दुर्दैवीच. बायको दुसर्या कोणावर तरी, अगदी अवैषयिक असले तरी, असे राधेसारखे आसुसून प्रेम करत असेल तर एका अर्थी दुर्दैव नाही का ? असो.
|
Bee
| |
| Thursday, May 15, 2008 - 4:25 am: |
| 
|
स्लार्टी, वर उल्लेख केला आहे ती राधा कोण? कारण कृष्णाची राधा हिने लग्न केलेच नाही. खूप खूप पुर्वीच्या काळी म्हणजे ह्या विचित्रविर्याच्या काळी, बालकांच्या विर्यातील शुक्रानुंची संख्या मोजता येत नव्हती असे छातीठोकपणे कशावरून सांगता येते? त्यावेळी आजच्या पेक्षा अधिक चांगल्या शस्त्रक्रिया असू शकतात हे नाकारता येत नाही. उदाहरण घ्यायचे झाले तर मन आणि शरिर ह्या दोघांची सांगड घालता यावी म्हणून योगशास्त्र हे किती पुरातण शास्त्र आहे. अनेक प्रकारची आसनं, त्यामागिल फ़ायदे, आसनं करायची पद्धत, ती कुणी करावीत, ते केल्यानी दूर होणारे रोग, किंवा रोग उत्तप्प्न होऊच नये म्हणून आधीपासून करावी अशी आसनं, श्वसनक्रिया, पुढे मग राजयोग वगैरे हे सर्व इतकं विस्त्रुत आणि विस्मयकारक आहे की त्याकाळची जनता, त्याकाळचे विज्ञान आजच्यापेक्षा शतपटीने पुढे होते असे वाटायला लागते.
|
Akhi
| |
| Thursday, May 15, 2008 - 4:54 am: |
| 
|
नाही बी, राधेच लग्न झाल होते. तिच्या नव-याच नाव 'अनय'. पण युगन्धर मधे राधा ह्या शब्दाची छान फ़ोड सांगितली आहे. त्याचा अर्थ असा की मुक्ती साठी तळमळणारी....
|
Slarti
| |
| Thursday, May 15, 2008 - 5:01 am: |
| 
|
माझ्या माहितीप्रमाणे राधेचे लग्न झाले होते. युगंधरमध्येही तसा उल्लेख आहे ना ? मुळात इतक्या लहान वयात वीर्यनिर्मिती होते का ? हा प्रश्न आहे. Hkumar हे सांगू शकतील. ते काढून त्याचे विश्लेषण करणे तर पुढची गोष्ट झाली.
|
Chinoox
| |
| Thursday, May 15, 2008 - 1:23 pm: |
| 
|
बी, वीर्यनिर्मिती पौगंडावस्थेत सुरू होते.. तसंच वीर्य या शब्दाचा शौर्य, पौरुषाशी संबंध आहे..त्यावरुनच इंग्रजीत virility हा शब्द आला..'व्ही' आकाराची बैलाची शिंगं, 'व्हिक्टरी' या अर्थी दोन बोटांची खूण ही सगळी V शी संबंधित आहेत.. शुक्राणू हा शब्द आपण व्हीनस या शब्दाचा आधार घेऊन तयार केला..व्हीनस ही प्रेमाची, पुनरुत्पादनाची देवता. आणि या शब्दाचं मूळ संस्कृतमधील 'वनस' म्हणजे 'इच्छिणे' या रुपात आहे..
|
अगदी बरोबर. कारण तसाच दुसरा शब्द हा हतविर्य आहे. याचा अर्थ त्याचे शोर्य वा धैर्य त्या काळा पुरते गमावने वा हतबल होने म्हणौन विर्य हा शब्दाचे अनेक अर्थ तयार होतात. विचीत्रविर्यासाठी तेव्हा मला असे वाटले होते की ज्याचा अंगी शोर्य वा धैर्याचे सातत्य नाही जसे आपल्या श्रिकांत ची बैटींग ज्यात अनिश्चितता होती.
|
Bee
| |
| Thursday, May 15, 2008 - 3:04 pm: |
| 
|
माझ्या मते पुरुष हा जम्नजातच विर्यवत असतो. पौगांडावस्थेत मादी काय हे कळायला लागते म्हणून त्याच वयात विर्यनिर्मिती होते असा आपला समज आहे. उलट वाढत्या वयानुसार विर्याचे स्खलन होऊन मनुष्य निष्प्रभ होतो. एका वर्तमानपत्रात मी असे वाचले की नुकतीच जन्माला आलेली एक कन्या रजस्वल झाली. नंतर मी हा प्रश्न मी माझ्या pediatrician मित्राला विचाराला तर तो म्हणाला हो असे होऊ शकते. पण अशा केसेस दुर्मिळ असतात. त्यानी ह्याला काहीतरी शास्त्रीय नाव पण सांगितलं होत पण ते फ़ार किचकट होतं म्हणून मी विसरून गेलो. नेमस्तक, वरील पोष्ट इथे उचित वाटतं नसल्यास काढून टाका.
|
वनस आणि वासना ह्यांचे मूळ एकच आहे का? """""माझ्या मते पुरुष हा जम्नजातच विर्यवत असतो. पौगांडावस्थेत मादी काय हे कळायला लागते म्हणून त्याच वयात विर्यनिर्मिती होते असा आपला समज आहे. उलट वाढत्या वयानुसार विर्याचे स्खलन होऊन मनुष्य निष्प्रभ होतो. """"" बी, वीर्याचे स्खलन झाले की माणुस निष्प्रभ होतो? हे वाक्य बाबा लोकांच्या "त्या" पुस्तकात शोभून दिसते. """""एका वर्तमानपत्रात मी असे वाचले की नुकतीच जन्माला आलेली एक कन्या रजस्वल झाली. नंतर मी हा प्रश्न मी माझ्या pedestrian मित्राला विचाराला तर तो म्हणाला हो असे होऊ शकते. पण अशा केसेस दुर्मिळ असतात. त्यानी ह्याला काहीतरी शास्त्रीय नाव पण सांगितलं होत पण ते फ़ार किचकट होतं म्हणून मी विसरून गेलो. """"" pedestrian नाही pediatrician
|
Chinoox
| |
| Thursday, May 15, 2008 - 3:27 pm: |
| 
|
१. वीर्यनिर्मिती पौगंडावस्थेतच सुरू होते. २. विचित्रवीर्य या शब्दाचा प्रजननक्षमतेतील दोषाशी अजिबात संबंध नाही. विचित्रवीर्य म्हणजे अतिशय शक्तिमान, वीर्य (म्हणजेच शक्ती) धारण करणारा.. the bull among men..
|
Shonoo
| |
| Thursday, May 15, 2008 - 3:44 pm: |
| 
|
बी तू सरसकट विधानं करायच्या अगोदर जरा विचार करत जा रे. आयुर्वेद अन योगासने श्रेष्ठ अन बाकी सर्व waste असं म्हणायचंय का तुला? आधुनिक ( पाश्चिमात्य म्हण पाहिजे तर ) वैद्यक शास्त्रात तरी वीर्य निर्मिती पौगंडावस्थेतच चालू होते असं मानतात. याला सर्जरी, histo-pathology, embryology या सर्वामधून पुरावा आहे. वेब एम डी किंवा तत्सम साइटवर तुला भरपूर माहिती मिळेल.
|
Chinoox
| |
| Thursday, May 15, 2008 - 3:51 pm: |
| 
|
स्लार्टी, माझ्या माहितीप्रमाणे 'अनय' म्हणजे 'ईश्वराचा उत्तम भक्त'.. आणि हे गणपतीचं एक नाव आहे.
|
Baby girls may have a clear, white, or slightly bloody discharge after the birth. All this is normal in the first few weeks as a result of exposure to hormones during pregnancy. This is definitely not being रजस्वला
|
Bee
| |
| Thursday, May 15, 2008 - 4:02 pm: |
| 
|
शोनू, वर मी कुठे कुठल्या शास्त्राची तुलना केलेली नाही आणि त्यापैकी कुणाला कमी लेखलेलं नाही. मी फ़क्त इतकच सांगितलं की पुर्वीच्या काळी अस एखाद विर्यचाचणीच शास्त्र अवगत असेल हे नाकारता येत नाही आणि त्या अनुषंगाने मी योगशाश्त्राचे एक उदाहरण दिले आहे. सिन्ड्रेला तुझे बरोबर आहे.
|
Chinoox
| |
| Thursday, May 15, 2008 - 5:09 pm: |
| 
|
स्लार्टी, गंमत म्हणजे महाभारतात राधेचा अजिबात उल्लेख नाही. जयदेवाच्या 'गीतगोविंद'मध्ये राधा आणि अनय सर्वप्रथम भेटतात. आणि त्यातील वृंदावनदेखील काल्पनिक. जयदेवाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने ब्रह्मवैवर्त पुराणाचा आधार घेतला असला तरी राधा आणि वृंदावन हे जयदेवाचच क्रिएशन. त्यामुळे बर्याच ठिकाणी अनयचा उल्लेख अय्यन असा होतो. महाभारतात एक राधा मात्र आहे, कर्णाची आई, अधिरथाची बायको.
|
हेहेहे.. चिनूक्ष, तो चिन्या येईल आता.. राधा कृष्ण त्याचा आवडता विषय आहे तू तर पार त्याच्या मूळावरच हल्ला केलास.. झालेच तर आठ स्वर्ग आणि आठ नरक वगैरे वगैरे.. अतिशय रोमांचकारी पुराणकथांसाठी (मायथॉलॉजी) तयार रहा.
|
Slarti
| |
| Friday, May 16, 2008 - 4:38 am: |
| 
|
टण्या, तुलाही राहवत नाही... चिनूक्ष, हे राधेबद्दल माहिती नव्हते. मी वर दिलेले अर्थ आणि गणपती हा अर्थ म्हणजे विरुद्ध अर्थ आहेत. माझ्या माहितीत हा तसा पहिलाच शब्द आहे. हे फारच रोचक आहे. या अर्थासाठी काही संदर्भ किंवा तो अर्थ कसा होतो यावर काही सविस्तर वाचायला आवडेल. असा एखादा श्लोक आहे का ज्यात हे गणपतीचे नाव वापरले आहे ? झक्की कुठे आहेत ? ता.क. Hkumar सुद्धा गायबले इथून. एक डॉक्टर म्हणून त्यांचं मत वगैरे ?
|
मलापण स्लार्टींनी लिहिलेलं पटलं. (वीर्य: शौर्य, धैर्य) मुळात इतक्या लहान वयात वीर्यनिर्मिती होते का ? हा प्रश्न आहे. Hkumar हे सांगू शकतील. ते काढून त्याचे विश्लेषण करणे तर पुढची गोष्ट झाली. <<<<< स्लार्टी, मध्ये एक लेख माझ्या वाचनात आला होता. त्यात असं वाचल्याचं आठवतंय की, कोणत्याही सजीवाचे शारीरिक, शारीरिकक्रियाविषयक, तसेच स्वभावाचे गुणधर्म हे त्या सजीवाच्या पेशीकेंद्रकात आढळणार्या आणि डीएनए-रेणूंपासून बनलेल्या जनुकांत सांकेतिक भाषेत लिहिलेले असतात. (कुणी सांगावं, महाभारताच्या कालखंडात ही सांकेतिक भाषा वाचायचं ज्ञान अवगत असेलही!)
|
Chinoox
| |
| Friday, May 16, 2008 - 7:53 am: |
| 
|
मला एक कळत नाही, इथे वीर्यनिर्मितीवर चर्चा का सुरू आहे? तिचा आणि विचित्रवीर्याचा काय संबंध? वीर्य म्हणजे शौर्य, पौरुषत्व.. semen आणि महाभारतातील राजा, अर्थ एकच..
|
Bee
| |
| Friday, May 16, 2008 - 9:12 am: |
| 
|
चिनू, तुम्ही जर ह्या प्रश्नाचा उगम कुठून सुरु झाला हे वाचले तर इथे इतके सर्व पोष्ट का निर्माण झालेत हे सहज लक्षात येईल :-) खूप दिवसांपासून माझ्या डोक्यात एक प्रश्न आहे. तो असा की - खाजगी आणि खासगी ह्या दोन शब्दांमधे नक्की फ़रक काय आहे?
|
खाजगी वा खासगी हा मूळ फारसी शब्द आहे का?
|
|
|