|
Lalu
| |
| Thursday, May 08, 2008 - 8:48 pm: |
| 
|
lol शोनू.. मग क्रम तरी उलटा ठेवायचा ना. ते हीरक, सुवर्ण वगैरे अलिकडे आणायचे.
|
Bee
| |
| Friday, May 09, 2008 - 2:19 am: |
| 
|
माझी मैत्रीण एकदम खूष झाली तिला इतकी सर्व माहिती सांगून. तिच्या तर्फ़े आणि माझ्याही तर्फ़े तुमचे आभार.
|
>>> माझ्या एका मित्राच्या लग्नाचा १० वा वाढदिवस आहे आणि त्यानी मला १० व्या वर्षाला मराठी, हिंदी आणि ईंग्रजी नाव काय आहेत हे विचारले. १० व्या वर्षपूर्तीला दशाब्दी म्हणायला हरकत नसावी. >>> जसे २५ सावे वर्ष असले की आपण रौप्य महोत्सव, ५० सावे वर्ष असेल तर सुवर्ण महोत्सव, ७५ वे असेल तर अमृत महोत्सव म्हणतो, ६० पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव, ७५ पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव आणि १०० पूर्ण झाल्यावर शताब्दी म्हणतात. चांदी, सोने, हीरे यांच्या चढत्या किंमतीप्रमाणे २५, ५० आणि पंचाहत्तरीच्या महोत्सवांची नावे आहेत.
|
६० पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव, ७५ पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव आणि १०० पूर्ण झाल्यावर शताब्दी म्हणतात. <<< माढेकर, अमृतापेक्षा हीरा महाग कसा असेल?
|
Bee
| |
| Friday, May 09, 2008 - 10:20 am: |
| 
|
अमृत मिळतं का पण आजच्या युगात कुठे? विष मात्र हमखास मिळेल. (प्राणायम केल्यानंतर भुवयांच्या मधे अमृताचे कण तयार होतात. ते कंठात उतरू नयेत म्हणून विपरीत कर्णी अर्थात खाली डोके वर पाय असे आसन करावे लागते म्हणजे ते कण भुवयांच्या मधे जिरतात. म्हणून प्राणायम करणारी व्यक्ती नेहमी तेजस्वी दिसते.)
|
>>> माढेकर, अमृतापेक्षा हीरा महाग कसा असेल? माझ्या मते ही महोत्सवांची नावे आपल्याकडे पाश्चात्यांकडून आली आहेत. त्यांच्या Silver Jubilee , Golden Jubilee , Diamond Jubilee इ. चे आपण अनुक्रमे रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव इ. रूपांतर केले. परदेशात ६० वर्षे पूर्ण होण्याला महत्व नसते, परंतु आपल्याकडे असते. म्हणून आपल्याकडे एकसष्टी साजरी करतात. आपल्या पंचांगात सुद्धा ६० वर्षांचे एक चक्र आहे. पंचांगात "दुर्मुख नाम संवत्सर" किंवा "अमुकतमुक नाम संवत्सर" असे नवीन वर्षाचे नाव लिहिलेले असते. अशी एकून साठ वर्षांची साठ नावे आहेत. मराठीत "साठी बुद्धी नाठी" (वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यावर काहींचा बुद्धीभ्रंश होऊ लागतो) अशी एक म्हण सुद्धा आहे. परंतु षष्ट्यब्दीपूर्तीला (हा शब्द बरोबर लिहिला की नाही याची खात्री नाही) काही खास इंग्लिश नाव नसल्यामुळे कुणीतरी त्याचे अमृत महोत्सव असे नामकरण केले असावे. १०० वर्षे पूर्ण केल्यावर Platinum Jubilee असा सुद्धा एक शब्द आहे. प्लॅटिनम हिर्यांपेक्षा महाग असल्यामुळे Platinum Jubilee ही Diamond Jubilee नंतर येते. परंतु हा शब्द जास्तकरून एखाद्या चित्रपटाने एकाच चित्रपटगृहात सतत १०० आठवडे (खरे तर १०४ आठवडे, म्हणजे सलग २ वर्षे) चालण्याचा विक्रम केला तर वापरला जातो.
|
तुमच्या या आधीच्या पोस्ट मध्ये तुम्ही हीरक महोत्सव आणि अमृत महोत्सवाची अदलाबदल केली आहे म्हणून तसे लिहिले होते. माझ्या माहितीप्रमाणे आधी हीरक महोत्सव येतो (६० वर्षे) व नंतर अमृत महोत्सव येतो.
|
Asami
| |
| Friday, May 09, 2008 - 3:19 pm: |
| 
|
माझ्या माहितीप्रमाणे माढेकरांचा क्रम योग्य आहे
|
Dineshvs
| |
| Saturday, May 10, 2008 - 3:17 am: |
| 
|
मलाही सतीष माढेकरांचेच पटते. आपल्याकडे साठी, पंच्याहत्तरी याच साजर्या करतात. मला वाटते साठ वर्षाच्या काळाला संवत्सर म्हणतात. आणि साठ वर्षानी ग्रहांची स्थिती जवळपास तशीच असते. ऐशी वर्षानंतर सहस्त्रचंद्रदर्शनाचा सोहळा असतो. यात सर्व पोर्णिमा आणि चंद्रग्रहणे धरलेली असतात.
|
Hkumar
| |
| Sunday, May 11, 2008 - 4:44 am: |
| 
|
'उक्तानुक्त सहकार्य' असा शब्दप्रयोग वाचला. 'उक्तानुक्त' या काहीशा अपरिचीत शब्दावर कोणी प्रकाश टाकेल का?
|
Slarti
| |
| Sunday, May 11, 2008 - 1:29 pm: |
| 
|
उक्तानुक्त = उक्त + अनुक्त. उक्त म्हणजे बोलले गेलेले, म्हटले गेलेले. अनुक्त म्हणजे न बोलले गेलेले. इथल्या संदर्भात उघड व छुपे सहकार्य असा अर्थ असावा. चू.भू.द्या.घ्या.
|
Pooh
| |
| Sunday, May 11, 2008 - 5:49 pm: |
| 
|
हीरक ६० वर्ष अमृत ७५ वर्ष http://www.baps.org/festivals/1995india/index.htm
|
Hkumar
| |
| Monday, May 12, 2008 - 5:20 am: |
| 
|
स्लार्ती. माहिती बद्दल आभारी आहे.
|
Asami
| |
| Monday, May 12, 2008 - 3:09 pm: |
| 
|
हिरक बद्दल अजून माहिती गमतीची गोष्ट अशी कि google search मधल्य links वेगवेगळी माहिती दाखवतात
|
Upas
| |
| Monday, May 12, 2008 - 7:25 pm: |
| 
|
माझा माहितीप्रमाणे देखील.. हीरक ६० वर्ष अमृत ७५ वर्ष म्हणजे रौप्य, सुवर्ण, हीरक, अमृत, शताब्दी.. गणपती उत्सवाच्या पाट्या तरी अशाच बघितल्या आहेत..
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 13, 2008 - 3:28 pm: |
| 
|
महाभारतातील नावं कशी अर्थपुर्ण असतात बघा. जरासंध, हा दोन सवतीना झालेला एकच मुलगा. तो दोघीना प्रत्येकी करवतीने उभा कापल्याप्रमाणे अर्धा अर्धा झाला. मग जरा नावाच्या यक्षिणीने ते दोन तुकडे एकत्र सांधले, म्हणुन तो जरासंध. घटोत्कचाचे, उत्कच म्हणजे डोके घटाप्रमाणे गोल होते म्हणुन तो घटोत्कच.
|
Hkumar
| |
| Wednesday, May 14, 2008 - 7:01 am: |
| 
|
दिनेश, बरोबर. याच प्रकारचे एक नाव 'विचित्रवीर्य'. त्याचा अर्थ 'वीर्यात शुक्राणू कमी असलेला'. वैद्यकशास्त्रात याला oligospermic म्हणतात.
|
Slarti
| |
| Wednesday, May 14, 2008 - 8:16 am: |
| 
|
ह्म्म्म... interesting. हे नाव लहानपणीच ठेवले असेल ना ? वैद्यकशास्त्रीयदृष्ट्या इतक्या लहान बाळाच्या वीर्यात शुक्राणु कमी आहेत / असतील हे सांगता येणे शक्य असते का ?
|
मलाही पहिल्यांदा हे नाव वाचल्यावर विर्याशी संबध असेल असे वाटले पण मग विचित्र आधी लावल्यावर ते विर्याशी संबधीत नसेल असे वाटले कारण स्लार्टीने वर सांगीतलेच आहे. नाव ठेवताना त्याच्या शुक्रांनुची गणना कशी करनार कारण तेव्हा कदाचीत ते नसनारच. शिवाय मोठेपणी जर हा दोष निर्मान झाला तर कदाचीत हेटाळनीमुळे ही " पदवी " त्याला मिळू शकेल पण लहानपणी जरा अशक्य वाटले. ( ऑफकोर्स ऐचकुमारच आपल्यापेक्षा जास्त जाणकार आहेत कारण ते स्वतच डॉ आहेत.) त्याचा दुसरा काही अर्थ असु शकेल का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 14, 2008 - 5:08 pm: |
| 
|
पाणी हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग, म्हण्ण्न ते जीवन. आपल्याला ते अनेक रुपात अनेक ठिकाणी दिसते, म्हणजे असंख्य लीला दाखवते, म्हणून ते सलील, आणि अश्याच लीला दाखवणार्या कृष्णालाहि तेच नाव.
|
|
|