|
Dineshvs
| |
| Tuesday, April 22, 2008 - 3:04 am: |
| 
|
डॉक्टर, खिचडी बहुदा डाळ तांदळाची असते. खिचडा, बाजरी, हुरड्याचा वगैरे करतात. जिथे बाजरी जास्त पिकते, खाल्ली जाते, तिथे हा प्रकार करतात. मी हा पदार्थ पहिल्यांदा, शांता शेळके, यानी लिहिलेला वाचला, त्या मंचरच्या.
|
Akhi
| |
| Tuesday, April 22, 2008 - 4:20 am: |
| 
|
विदर्भा मधे भोगी च्या वेळेला बाजरी ची खिचडी करतात.
|
Hkumar
| |
| Tuesday, April 22, 2008 - 4:21 am: |
| 
|
बी व दिनेश, धन्यवाद. नेहेमिच्या खायच्या खिचडिव्यतिरिक्त अनेक 'खिचड्या' आपण अनुभवत असतोच!
|
पण पहिल्यांदा जरी देव बसवायचे असतील तेंव्हा देखील आपण प्रतिष्ठापणा हाच शब्द वापरतो. >>>>> पहिल्यान्दा बसवतात त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात>>>>>>>>>> प्राणप्रतिष्ठा सर्व चल मुर्तींची केली जाते. त्या मुर्ती नंतर विसर्जीत करतात. जसे गणपती वा गौरी, दुर्गा देवी. प्राणप्रतिष्ठा करताना त्या मुर्तीत प्राण टाकले जातात व विसर्जीत करताना ते काढुन देखील घेतले जतात. त्याची वेगळी पुजा असते. पण जी मूर्ती नेहमी वापरायची आहे, जसे देव्हार्यातील देव त्यांची प्रतिष्ठापणाच करतात.
|
बाईने केली तर खिचडी आणि पुरुषाने केल्यास खिचडा असा अर्थ असावा. 
|
Bee
| |
| Wednesday, April 23, 2008 - 2:30 am: |
| 
|
मग भाकरीला भाकरा, पोळीला पोळा, भाजी ला भाजा असे शब्द बोलावे लागतील मला एक नविनच काहीतरी विचारायचे आहे. इथे चालेल का माहिती नाही. तुकारांच्या ओव्या वाचताना कुठेही असे वाटत नाही की या ओव्यांची मराठी भाषा सोळाव्या शतकातील आहे. इतकी ती आधुनिक वाटते. मात्र, शिवाजी महाराजांची पत्रे, त्या वेळेसची मर्हाटी भाषा वेगळी वाटते. दोन्ही सत्पुरुष एकाच काळात जन्मलेले तरी भाषा इतकी वेगळी कशी?
|
बी, एक-दोन उदाहरणे देता येतील का? (श्री तुकाराम महाराजांच्या ओव्यांची आणि श्री शिवाजी महाराजांच्या पत्रांची)
|
Bee
| |
| Wednesday, April 23, 2008 - 6:06 am: |
| 
|
Madhekar, I will be right back :-)
|
बी, अरे राजकिय पत्रव्यवहाराची भाषा ही फारसी मिश्रीत मराठी होती त्यामुळे तसे वाटनारच. हि अडचन काढन्यासाठीच राज्याभिषेकानंतर महाराजांनी मराठी शब्दकोष करन्याचे काम रघुनाथ्पंताना दिले होते. बोलीभाषा मात्र मर्हाठीच असल्यामुळे ओव्या, अभंग रचना मर्हाठीत आहेत.
|
Farend
| |
| Wednesday, April 23, 2008 - 4:48 pm: |
| 
|
मला यावरून मराठा, मराठी शब्दांबद्दल ही कुतूहल आहे, या शब्दांचे गेल्या १०० वर्षांत अपभ्रंश झाले आहेत का? टिळकांच्या 'केसरी व मराठा ट्रस्ट' मधे हा शब्द Mahratta असा लिहीला आहे (जरी देवनागरीत कधी 'मह्राटा' असे लिहिलेले बघितले नाही), इतर ठिकाणी मर्हाटी वगैरे रूपे ही दिसली आहेत.
|
टिळक रस्त्यावरील "मराठा चेंबर ऑफ कॉमर्स" चे स्पेलिंग "Maharatta Chamber of Commerce" असे लिहिले आहे.
|
Hkumar
| |
| Saturday, April 26, 2008 - 4:34 am: |
| 
|
'खेडं' याचा एक अर्थ 'उसळ' असाही आहे. श्री. ना. पेंडसेंच्या लिखाणात 'आठळ्यांची खेडं' असा उल्लेख आहे. 'आठळे' म्हणजे गर्यातील बी.
|
Bee
| |
| Thursday, May 08, 2008 - 10:33 am: |
| 
|
जसे २५ सावे वर्ष असले की आपण रौप्य महोत्सव, ५० सावे वर्ष असेल तर सुवर्ण महोत्सव, ७५ वे असेल तर अमृत महोत्सव म्हणतो, तसे जर १० वे वर्ष असेल तर त्याला काही खास नाव आहे का? माझ्या एका मित्राच्या लग्नाचा १० वा वाढदिवस आहे आणि त्यानी मला १० व्या वर्षाला मराठी, हिंदी आणि ईंग्रजी नाव काय आहेत हे विचारले. मदतीबद्दल आभारी आहे.
|
Bee
| |
| Thursday, May 08, 2008 - 10:35 am: |
| 
|
माढेकर, क्षमा असावी, मला महाराजांची पत्रं नाही गवसू शकली. पुर्वी इथे नेटवरती मी पाहिली होती पण आता ती काढून टाकली असावी. तरी केदार ह्यांनी दिलेले उत्तर मला थोडेतरी बरोबर वाटते.
|
Suyog
| |
| Thursday, May 08, 2008 - 3:43 pm: |
| 
|
श्री दिनेश यान्चि गोश्ट पुरणपोळी छान आहे मावळन म्हणजे आत्या का
|
Chinoox
| |
| Thursday, May 08, 2008 - 5:25 pm: |
| 
|
बी, दहावा वाढदिवस म्हणजे टीन...
|
Lalu
| |
| Thursday, May 08, 2008 - 5:33 pm: |
| 
|
टीन म्हणजे १३(थर्टीन ) ते १९( nineteen ) 'दशकपूर्ती' म्हणावं आपलं...
|
Chinoox
| |
| Thursday, May 08, 2008 - 7:10 pm: |
| 
|
लालू, टीन म्हणजे धातू असे अभिप्रेत आहे, आणि तेच बरोबर आहे..पेपर, कापूस,ग्लास, सिल्व्हर, गोल्ड, डायमंड, प्लाटीनम हे इतर काही महत्त्वाचे टप्पे..
|
Lalu
| |
| Thursday, May 08, 2008 - 7:27 pm: |
| 
|
'टिन' असं होय. हे ऐकले नव्हते कधी. पेपर, कापूस( LOL ), ग्लास पण नाही. सुवर्ण, रौप्य, हीरक एवढेच माहिती. * काही लोकांची समजूत असते कोणी १० पूर्ण केले की 'टीन एजर' झाले. मला तसे काहीतरी वाटले. मराठीत काय म्हणणार याला?
|
Shonoo
| |
| Thursday, May 08, 2008 - 8:37 pm: |
| 
|
हे खरं तर पाश्च्यात्य संस्क्रूती मधे लग्नाच्या वाढदिवसाला एक मेकांनी काय भेटी द्यायच्या घ्यायच्या याचे संकेत आहेत. पहिल्या वाढदिवसाला कागद द्यायचा अस्तो म्हणुन अनेक नवरे बायकोला प्रिन्टर पेपरचा बॉक्स देतात. खरं तर चांगली लेटरहेड, मोनोग्रॅम केलेली स्टेशनरी द्यावी असा हेतू असतो. आजकाल आवडत्या नाटकाचे, शो चे, किंवा खेळाचे तिकिट द्यायचा पण प्रघात आहे. ग्लास, टिन, लेदर वगैरे त्याच पठडितल्या गोष्टी. माझ्या नवर्याने पहिल्या पाडव्याला चार मोठी भांडी दिली होती ( पंधरा अन वीस लिटर ची दोन दोन ). त्यानंतर मी त्याला काहीही सांगत नाही :-)
|
|
|