|
Zakki
| |
| Saturday, April 12, 2008 - 12:24 am: |
| 
|
"भद्र" या शब्दाचा नक्की अर्थ काय? भद्र याचे दोन अर्थ होतात. भद्र म्हणजे सद्गृहस्थ नि भद्र म्हणजे शुभ. संस्कृत नाटकांत भद्र हा शब्द सद्गृहस्थ या अर्थी बरेचदा वापरला आहे. मंत्रात किंवा श्लोकात भद्र म्हणजे शुभ या अर्थी वापरला आहे. जसे 'भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:' संदर्भ: अमरकोष, प्रथम कांड श्लोक २६५. 'श्व:श्रेयसं शिवं, भद्रं कल्याणं मंगलं शुभं' य शब्दाचा आणखी एक अर्थ आहे. तो म्हणजे 'बैल'. संदर्भ: अमरकोष, द्वितीय कांड, श्लोक १८२५: 'उक्षा भद्रो बलीवर्द ऋषभो वृषभो वृष:' हसू नका, बैल म्हणजे आपल्याला बैलोबा एव्हढेच माहित आहे, पण बैल म्हणजे अत्यंत ताकदवान या अर्थी शूर वीरांना नरपुंगव, म्हणजे बैलासारखा शक्तिशाली माणूस असेहि म्हणत.
|
Tonaga
| |
| Saturday, April 12, 2008 - 11:00 am: |
| 
|
पण बैल म्हणजे अत्यंत ताकदवान या अर्थी शूर वीरांना नरपुंगव, म्हणजे बैलासारखा >>>>>>> म्हणजे टोणगा त्यात आलाच, नाही का?
|
Dineshvs
| |
| Saturday, April 12, 2008 - 11:24 am: |
| 
|
भद्र लोक, असा उल्लेख बंगाली उच्चभ्रू लोकांसाठी पण करतात ना ? ते भद्र चा उच्चार कसा करतात, कोण जाणे ?
|
Bee
| |
| Friday, April 18, 2008 - 4:26 am: |
| 
|
आरती प्रभुंच्या एका कवितेचे नावे 'खूपच मजा आला' असे आहे. ही कविता खालील लिंक वर वाचता येईल. /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=662377#POST662377 आपण 'मजा आली' असे मराठीत म्हणतो, 'मजा आया' असे हिन्दीत म्हणतो. पण या कवितेचे शीर्षक मराठी असूनही त्यात 'मजा आला' असे हिन्दीसारखे शब्द लिहिले आहेत. असेही म्हंटलेले चालते का?
|
दोन उत्तरे संभवतात.. एक शक्यता: यमक जुळवण्यासाठी.. त्याचा प्राण म्हणाला... .............. खुपच मजा आला.... दुसरी शक्यता मालवण, तळकोकणात कदाचित मजा आला असे म्हणत असतील.. कुणी मालवणी आहे का खातरजमा करायला?
|
Bee
| |
| Friday, April 18, 2008 - 8:03 am: |
| 
|
नाही रे शांतनू, फ़क्त यमक जुळविण्याआठी निदान आरती प्रभू तरी असे करू शकणार नाही. दुसरी शक्यता मात्र असू शकते..
|
Chinoox
| |
| Friday, April 18, 2008 - 1:19 pm: |
| 
|
मजा आला असं इंदोरी मराठीत म्हणतात.. पुलंच्या पार्ल्याच्या घरी मी 'व्वा, मजा आला' खूपदा ऐकलय..
|
Bee
| |
| Friday, April 18, 2008 - 2:59 pm: |
| 
|
पुलंचा नि तुमचा घरोबा होता का.. व्वा, मजा आला असेल मग धन्यवाद चिनूक्ष.
|
एका ठिकाणी बसवलेले देव हलवून त्याच वास्तूत पण दुसर्या जागी बसवायचे ह्याला एक मराठी शब्द आहे. कोणाला माहित आहे का>>>>>>>. प्रतिष्ठापणा. वॉटरमेलन म्हणजे टरबुज (कंलींगड)
|
Bee
| |
| Saturday, April 19, 2008 - 6:03 am: |
| 
|
माझ्या मनात देखील तोच शब्द होता. पण पहिल्यांदा जरी देव बसवायचे असतील तेंव्हा देखील आपण प्रतिष्ठापणा हाच शब्द वापरतो. 'प्राणप्रतिष्ठा' हा एक शब्द आहे त्याचा नेमका अर्थ काय होतो? मला वाटतं प्राणप्रतिष्ठा ही मंदीरात होते. घरात गणपती जेंव्हा बसतात त्याला प्रतिष्ठापणा हा शब्द वापरतात. प्राणप्रतिष्ठा असा नाही.
|
Asami
| |
| Saturday, April 19, 2008 - 11:31 am: |
| 
|
ते प्रतिष्ठापणा नसून प्रतिस्थापना आहे. CBDG
|
Tonaga
| |
| Saturday, April 19, 2008 - 4:06 pm: |
| 
|
पण पहिल्यांदा जरी देव बसवायचे असतील तेंव्हा देखील आपण प्रतिष्ठापणा हाच शब्द वापरतो. >>>>> पहिल्यान्दा बसवतात त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतात...
|
धन्यवाद झक्कीआजोबा! आपण दशग्रंथी संस्कृत विद्वान सुद्धा आहात याची कल्पना नव्हती!
|
Zakki
| |
| Sunday, April 20, 2008 - 1:15 pm: |
| 
|
'डोंबल' हा एकशब्दी वाक्प्रचार कसा वापरात आला? मी बरेचदा वापरतो. जसे आत्ता श्री. माढेकरांसारख्या विद्वानांनी मला 'दशग्रंथी संस्कृत विद्वान' म्हंटल्यावर पुन: असे म्हणावेसे वाटले. धन्यवाद माढेकर. अहो, असे तुम्ही लिहिले नाहीत तर लोकांना पत्ता सुद्धा लागणार नाही!
|
Bee
| |
| Sunday, April 20, 2008 - 4:02 pm: |
| 
|
हाताच्या पाची बोटांची नावं क्रमवार अशी आहेत का? अंगठा, अनामिका, मध्यमा, तर्जणी, करंगळी. मला वाटतं... अंगठा आणि करंगळीला आणखी नावं आहेत. पायाच्या बोटांना पण नावे आहेत का?
|
Slarti
| |
| Sunday, April 20, 2008 - 7:22 pm: |
| 
|
अनामिका आणि तर्जनी ('णी' नव्हे) यांची अदलाबदल कर. बाकी बरोबर आहे मी अनामिकेला मरंगळी असाही शब्द ऐकला आहे. करंगळी व अंगठ्याला संस्कृतात अनुक्रमे करांगुली व अंगुष्ठ असे शब्द आहेत चू.भू.द्या.घ्या.
|
अनामिकेला अनामिका असे नाव का पडले याची मजेदार ( खरी खोटी देव( असल्यास) जाणे) कथा ऐकली होती. कुण्या एकाने सन्स्क्रुत मधल्या श्रेष्ठ कवीन्ची नावे बोटावर मोजण्याचा प्रयत्न केला. कालिदासाला करन्गळी वर मोजल्यावर दुसरे त्याबरोबरीचे नावच मिळाले नाही. म्हणून ती अनामिका.
|
Bee
| |
| Monday, April 21, 2008 - 3:22 am: |
| 
|
छान माहिती मिळाली. दोघांचे आभार! आमच्याकडे, म्हणजे विदर्भात, सकाळी झोपेतुन उठले असता, आई म्हणायची, चल सातर्या काढ. 'सातर्या' म्हणजे अंथरून. त्यामधे मग, काही गोधड्या, काही सतरंज्या, काही गाद्या, चादरी, दुलया, शाल्-- अशी सर्वच प्रकारची अंथरूनं आणि पांघरूनं यायची. त्यांना एक सामायिक शब्द म्हणून तर आई 'सातर्या' हा शब्द म्हणत नसावी, असे मला आता ह्या वयात वाटते. तेंव्हा इतका विचार नव्हता केला. तर विचारायचे हे आहे की, पुणे-मुंबई आणि आसपासच्या भागात देखील हा 'सातर्या' शब्द आहे का? मदतीपुर्व आभार!
|
Hkumar
| |
| Monday, April 21, 2008 - 10:59 am: |
| 
|
'खिचडी'(डाळ्-तांदळाची) हा शब्द सर्वपरीचीत आहे. शब्दकोशात त्याला समानार्थी 'खिचडा' असाही दिलेला आहे. हा शब्द कोणत्या भागात वापरतात?
|
Bee
| |
| Monday, April 21, 2008 - 3:06 pm: |
| 
|
बहुदा खानदेशी भाषेतील आहे हा शब्द.
|
|
|