Bee
| |
| Thursday, March 20, 2008 - 4:38 am: |
| 
|
अनिता, पुर्ण अर्थ लिही ना.. मला खूप नाही कळला म्हणून विनंती करतो आहे..
|
वृक्षवल्ली आम्हा सोयरे ह्या तुकारामाच्या अभंगातील ह्या ओळींचा अर्थ काय? कंथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरु हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेवु रुची (शेवटचे कडवे छान आहे तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाशी)
|
Chioo
| |
| Saturday, March 22, 2008 - 10:11 am: |
| 
|
सतिश, झेलम आणि बी, धन्यवाद. जोगव्याला वारी म्हणतात हे लक्षातच आलं नाही.
|
Bee
| |
| Sunday, March 23, 2008 - 9:29 am: |
| 
|
चिऊ, नाही वारी आणि जोगवा दोन्ही वेगळे शब्द आहेत. जोगवा म्हणजे एक प्रकारची माधुकरी पण जी रोज रोज मागितली जात नाही. तिला एक स्थान आहे संस्कृतीमधे. माधुकरी ही पोटासाठी मागितली जाते, पण जोगवा हा देवासाठी मागितला जातो. खास करून नवरात्रात. वारी म्हणजे दर्शनासाठी केलेली यात्रा. आपण म्हणत नाही का मी वार्या केल्यात. देव पावण्यासाठी भाविक वार्या करतात. त्याचेच एकवचनी रूप वारी आहे. चुक भुल द्यावी घ्यावी.
|
D_ani
| |
| Sunday, March 23, 2008 - 3:21 pm: |
| 
|
बी, तुमच्या २० मार्च १२:३८ च्या पोस्ट्चे उत्तर म्हणून हे पोस्ट लिहित आहे. हरिपाठाचे अभंग नामस्मरणाचा महिमा सांगतात. प्रापंचिकाला सहजसाध्य जे आहे ते नामस्मरण. प्रत्येक प्रापंचिक कर्तव्याला नामस्मरणाची जोड असणे आवश्यक आहे. माऊली म्हणतात, त्रिवेणी संगम आणि विविध ठिकाणी तीर्थयात्रा केली पण नामस्मरण नाही केले तर त्या तीर्थयात्रेचे साफ़ल्य होणार नाही. सर्वसामान्यांच्या समजुतीप्रमाणे तीर्थयात्रेनंतर पापे धुतली जातात. ’नामासी विन्मुख’ म्हणजे जो नाम विसरला तो. असा मनुष्य तीर्थयात्रा करूनही पापीच राहील. धावा केल्यावर पावणारा असा एक फक्त हरीच आहे. त्याचे नामस्मरण केल्याने केवळ तुमचेच नाही तर तुमच्या कुळातील, म्हणजे तुमच्या परिवारातील सगळ्यांचे आचरण शुद्ध होईल. पूर्ण हरिपाठ अवश्य वाचावा. सरळ सोपे आणि सहज आचरणात येण्यासारखे तत्व सांगितले आहे. -अनिता
|
Bee
| |
| Monday, March 24, 2008 - 9:05 am: |
| 
|
अनिता, उत्तर दिले त्याबद्दल तुमचे आभार.
|
D_ani
| |
| Monday, March 24, 2008 - 11:06 am: |
| 
|
बी, तुमचे शंका समाधान झाले का? पूर्ण अर्थ कळला का?
|
Bee
| |
| Monday, March 24, 2008 - 2:21 pm: |
| 
|
हो अनिता बर्यापैकी माहिती दिलीस तू..
|
Shonoo
| |
| Tuesday, March 25, 2008 - 5:23 pm: |
| 
|
नतद्रष्ट अन कपाळकरंटा या शब्दांचे नेमके अर्थ कोणाला माहित आहेत का?
|
Shyamli
| |
| Wednesday, March 26, 2008 - 4:24 pm: |
| 
|
नतद्रष्ट>>>खाष्ट आणि कपाळकरंटा>>दुर्दैवी असा शब्दश: अर्थ आहे
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 26, 2008 - 6:07 pm: |
| 
|
कपाळकरंटा>>दुर्दैवी असा शब्दश: अर्थ आहे>>>>>>> सटवाई बाळजन्मापासुन पाचव्या दिवशीच्या रात्री येवुन आपल नशीब कपाळावर लिहुन जाते अशी समजुत आहे. (बाळाची पाचवी पुजन हा त्या संदर्भातच एक विधी असतो.) त्यामुळे कपाळ करंटा हा शब्द आला असेल. नतद्रष्ट हा शब्द मला कोल्हापुरात वापरल्या जाणार्या "किर्यानष्ट" शी साम्य दाखवणारा वाटतो. नेमका अर्थ शामलीने सांगितलेला बरोबर असेल. ( खाष्ट ची पुढची पायरी अस आपल मला वाटत )
|
Bee
| |
| Thursday, April 03, 2008 - 5:16 pm: |
| 
|
सैंधव ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? मथणी म्हणजेच रवी का जी वरण ढवळायला आपण वापरतो? पण पद्मा गोळेच्या 'मी घरात आले' ह्या कवितेत एक ओळ आहे, 'मथणीत नाचत राहिले' जर मथणी म्हणजेच रवी असेल तर मथणीत नाचत राहणे कसे होईल हे कळले नाही.
|
सिंधु नदीच्या किनार्यावर (सध्याच्या पाकिस्तानमध्ये) मिठाच्या खाणी आहेत. खाणीत सापडलेल्या मिठाला सैंधव किंवा सिंधलवण (लवण म्हणजे मीठ) किंवा शेंदेलोण (सिंधलवणचा अपभ्रंश) म्हटले जाते. खाणीतले मीठ समुद्राच्या पाण्यापासून तयार केलेल्या मिठापेक्षा औषधी समजले जाते.).
|
Bee
| |
| Friday, April 04, 2008 - 4:08 pm: |
| 
|
सतिश, सहीच अर्थ सांगिताला. धन्यवाद. कृपया मथणीचा अर्थ कुणी सांगू शकेल का?
|
मंथणी हे सोनाराचे मणी घडवायचे एक उपकरण असते. पण हा शब्द मंथणी आहे ('म' वर अनुस्वार). बोलीभाषेत काही वेळा अक्षरांवरचे अनुस्वार उच्चारले जात नाहीत. त्याप्रकारे हा शब्द वापरला आहे का?
|
डच भाषेमध्ये अननसाला अननस असेच म्हटले जाते. अगदी आपण जसा अननस उच्चार करतो अगदी तसेच. तुंबाडचे खोत ह्या पुस्तकामध्ये अननस हा कॅरेबियन बेटांवरुन भारतात आला असा उल्लेख आहे (अर्थात तुंबाडचे खोत हे फिक्शन आहे व ते काही पुरावा म्हणुन वापरता नाही येणार). परंतु मुळात अननस हा कोणत्या भाषेतील शब्द असावा?
|
Bee
| |
| Wednesday, April 09, 2008 - 2:03 am: |
| 
|
फ़्रेन्च भाषेत अननस असेच म्हणतात. कित्येक भाषेत हाच शब्द वापरतात.
|
Hkumar
| |
| Wednesday, April 09, 2008 - 5:53 am: |
| 
|
पूर्वी अननसाबरोबर 'पपनस' या फळाचा उल्लेख होत असे. खरेच असते काय ते फळ?
|
Swa_26
| |
| Wednesday, April 09, 2008 - 8:10 am: |
| 
|
पपनस हे मोसंबीच्या जातीचे फळ आहे. आकाराने थोडे मोठे असते नि आतल्या पाकळ्या गुलाबी रंगाच्या!
|
Hkumar
| |
| Wednesday, April 09, 2008 - 10:18 am: |
| 
|
ध न्य वा द, स्वाती
|