Zakasrao
| |
| Wednesday, March 12, 2008 - 1:24 pm: |
| 
|
फ़िशपॉंड ला मराठीत शेलापागोटे म्हणत असत. आता हे का ते नाही माहीत.
|
Tonaga
| |
| Wednesday, March 12, 2008 - 5:54 pm: |
| 
|
आपल्याकडे फिशपॉन्ड ज्या अर्थाने वापरला जातो तसा शब्दकोषार्थ कुठे आढळत नाही. slang मध्येही नाही. पण आर्मी ट्रेनिंग ईन्स्टीट्यूट्स मध्ये व काही टेक्निकल इन्स्टीट्यूट्समध्ये त्यांनी स्वताचे काही protocols अथवा traditions निर्मान केल्या आहेत विशेषत: 'तिकडे'., त्यात प्रथम वर्षाच्या फ़्रेशर्सना 'फिश' असे सम्बोधले जाते.या 'फिशेस'नी सिनीअर्सशी व सिनीअर्सनी फ़िशेसशी कसे वागायचे बोलायचे याचे काही संकेत ठरवले गेले. त्यानी कोणत्या टोप्या घालायच्या इत्यादी.त्याना सामावून घेताना संस्थेच्या अलिखित परम्परा शिकवताना काही गमतीही असत. त्यात ह्या 'फ़िशेस' ना टोमणे मारून सुसंस्कृत, हेल्दी इन्सल्ट करण्याची पद्धती होती.(ह्याचेच पुढे विकृत रॅगिंग मध्ये रूपान्तर झाले, ते बाहेर. ह्या संस्थात नाही.)ह्या फ़्रेशर्सच्या समूहाला फिश पॉन्ड म्हणत असावेत. आपल्या फिशपॉन्डमध्ये सरसकट सगळ्याना 'हाणले' जाते... हे फ़िशेस पुढच्या वर्षी सीनीअर्स होऊन ही परम्परा पुढे न्यायचे.
|
Tonaga
| |
| Wednesday, March 12, 2008 - 6:02 pm: |
| 
|
साखर फुटाण्यात आनखी एक प्रकार असे तो म्हनजे आख्खा शेंगदाणा मध्यभागी व साखरेत घोळलेला. त्याला आम्ही काजू म्हणत असू. तो तर खूप मोठा दिसे. तो शेंगदाण्यामुळे नुसत्या साखर फुटाण्या पेक्षा अथवा काटेरी हलव्या पेक्षा अधिक चविष्ट लागे.....
|
Tonaga
| |
| Wednesday, March 12, 2008 - 6:04 pm: |
| 
|
'शहाजणे' चा अर्थ?>>>>>>>>>>>>>>> शहाजने हे तुतारी सारखे युध्धभूमीवर वाजवायचे वाध्य आहे....
|
Bee
| |
| Thursday, March 13, 2008 - 6:02 am: |
| 
|
टोणगा, छान अर्थ सांगितला फ़िश पॉन्डचा. असू शकेल असे..
|
Bee
| |
| Thursday, March 13, 2008 - 8:28 am: |
| 
|
साग्रसंगीत ह्या शब्दामधे फ़क्त साग्र ह्या शब्दाचा काही अर्थ होतो का? होत असेल तर त्यापासून उत्पन्न होणारे अन्य शब्द आहेत का? जसे मागे पर्णसंभार, केससंभार, पुष्पसंभार, प्रश्नसंभार असे शब्द आपण लिहिले होते जे संभार शब्दाशी निगडीत होते.
|
साग्र हे समग्र ह्या शब्दाचे अपभ्रष्ट रुप आहे का? की समग्र शब्द साग्र ह्या शब्दापासुन आला आहे का? झक्की सांगु शकतील मुळ संस्कृत शब्द..
|
समग्र, साग्र, संपूर्ण इ. शब्दांसाठी ही लिंक पहा.
|
Bee
| |
| Thursday, March 13, 2008 - 3:04 pm: |
| 
|
मला हा साग्रसंगीत शब्द खूप आवडतो पण नेहमी बुचकळ्यात टाकतो. कारण साग्र म्हणजे संपूर्ण, पण पुढे संगीत असा शब्द आल्यामुळे कळत नाही की साग्रसंगीत आणि जेवणाचा संबंध तरी काय? संपूर्ण संगीतमय जेवन असा अर्थ लावायचा का :-) खरा अर्थ वरण भात भाजी पोळी कोशिम्बीर असे पुर्ण जेवन म्हणजे साग्रसंगीत जेवन. त्या साठी 'साग्र' आणि 'संगीत' असे दोन शब्द एकत्रीत केले.. ते का केले असावे असा प्रश्न पडतो. नक्की आपल्याला काहीतरी अज्ञात आहे ह्या शब्दाबद्दल. कुणाला जर पुर्ण माहिती असेल तर लिहा..
|
Hkumar
| |
| Thursday, March 13, 2008 - 3:14 pm: |
| 
|
टोणगा, माहिती बद्दल धन्स.
|
"व्यवच्छेदक लक्षण" या संज्ञेतील "व्यवच्छेदक" या शब्दाचा व संपूर्ण संज्ञेचा अर्थ काय? ही संज्ञा वापरलेले एखादे उदाहरण देता येईल का?
|
Tonaga
| |
| Wednesday, March 19, 2008 - 5:08 am: |
| 
|
व्यवच्छेदक म्हणजे distinguishing character म्हणजे ते लक्षण फक्त त्या बाबीलाच लागू असते.दुसर्या कोणत्याही नाही. केवळ त्या लक्षणावरून फक्त तीच गोष्ट निर्देशित होते, ओळखता येते. उदा दाढी हे काही मुसलमानांचे व्यवच्छेदक लक्षण नाही. बर्याच मुसलमानाना दाढी असते. दाढीवाल्याला मुसलमान समजण्याची पद्धतही आहे पण दाढीधारी मुसलमान असू शकतात पण ते त्यांचे व्यवछेदक लक्षण नाही. या उलट वसन्ततिलका या अक्षर वृत्तचे 'य,य,य,य,' हे गण असणे हे व्यवच्छेदक लक्षण आहे.....
|
टोणगा, माहिती बद्दल धन्यवाद!
|
Chioo
| |
| Wednesday, March 19, 2008 - 11:08 am: |
| 
|
अगंबाई अरेच्चामधल्या, "मल्हार वारी मोतियानं द्यावी भरून न्हायतर द्येवा, द्येवा मी जातो दुरून" या ओळींचा अर्थ काय?
|
नवरात्रात (देवीच्या आणि खंडोबाच्या) पाच घरी जाऊन वारी (कोरडे धान्य) मागायची परंपरा आहे. या गाण्यात गायक खंडोबाला वारी म्हणून मोती द्यावेत अशी मागणी करत असावा.
|
Bee
| |
| Wednesday, March 19, 2008 - 3:13 pm: |
| 
|
मलाही तसाच अर्थ वाटतो ह्या ओळींचा. माझ्या माहितीप्रमाणे, नऊरात्रात नऊ घरी जाऊन जोगवा मागायची परंपरा आहे. नऊरात्रात नऊ ह्या क्रमाकांला खूप महत्त्व आहे. माझ्या घरी, नऊ धान्य मातीत पेरले जाते, नऊ घरचा जोगावा मागितला जातो, नऊ फ़ुलांचे हार कळसाला अपर्ण केले जातात, नऊ दिवस दिवा सतत तेवत ठेवला जातो, आणि नऊ दिवस उपवास ठेवला जातो.
|
Zelam
| |
| Wednesday, March 19, 2008 - 3:35 pm: |
| 
|
या ओळींचा भावार्थ म्हणजे मल्हारी देवा माझं सगळं नीट होऊ दे. भरभरून सगळं मिळूदे. नाहीतर पुढल्या खेपेस तुम्हाला दुरुनच नमस्कार. मध्यंतरी देवदत्त साबळ्यांचा ( CBDG ) लेख आला होता लोकसत्ता की लोकप्रभा मध्ये त्यात हा उल्लेख होता.
|
D_ani
| |
| Wednesday, March 19, 2008 - 4:08 pm: |
| 
|
त्रिवेणीसंगमीं नाना तीर्थे भ्रमी। चित्त नाही नामीं तरी ते व्यर्थ॥१॥ नामासी विन्मुख तो नर पापिया।हरिविण धांवेया न पवे कोणी॥२॥ हरिपाठाच्या अभंगातील हे श्लोक आहेत. यातील पवे या शब्दाचा अर्थ काय? कोणी सांगू शकेल का? धन्यवाद. -अनिता
|
पावे चा पाठभेद असावा. धावा केल्यावर दुसरे कोणी पावत नाही असा अर्थ असावा असं वाटतं.
|
D_ani
| |
| Wednesday, March 19, 2008 - 5:36 pm: |
| 
|
धन्यवाद स्वाती. संदर्भावरून तसेच वाटते.
|