Badbadi
| |
| Wednesday, November 28, 2007 - 10:18 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विजिगीषु म्हणजे काय? ..... ....
|
Zakasrao
| |
| Wednesday, November 28, 2007 - 11:51 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अगदी नेमका अर्थ नाहि मला सांगता येणार पण हार न पत्करणे किंवा खुप जिद्दिने एखादी गोष्ट मिळवण्यासाठी धडपडणे ह्याला विजिगीषु वृत्ती म्हणतात. कोणी अजुन नेमकेपणाने सांगेल तर बर होइल. माझ्याही ज्ञानार भर पडेल
|
Anilbhai
| |
| Wednesday, November 28, 2007 - 12:26 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विजिगीषा म्हणजे विजयाची इच्छा.
|
Vishee
| |
| Wednesday, November 28, 2007 - 3:05 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हल्लीच पुलंच्या पुस्तकात एक भन्नाट शब्द वाचला. "मुत्र-शर्करा योग" ( for diabetes ).... अर्थात हा काही खरा मराठी शब्द नव्हे, असच गमतीत. पण नाहीतरी हल्ली सोप्या english शब्दांचे उगाचच मोठे मोठे आणि कठिण मराठीकरण करतातच, मुख्यत: शास्त्रीय शब्दांचे.
|
Maanus
| |
| Wednesday, November 28, 2007 - 5:17 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आज नव्याने कळालेला शब्द sabbatical leave: A leave usually taken every seventh year एकाने गुडबाय मेल टाकले त्यात लिहीले की तो sabbatical leave वर जातोय.
|
Farend
| |
| Wednesday, November 28, 2007 - 7:59 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माणूस तो कदाचित शब्दश: अर्थ असेल पण येथे त्याचा उपयोग 'सद्ध्या नोकरी करणार नाही (किंवा केली तर येथे कोणाला सांगणार नाही )' असा होतो.
|
फ़ारेंड, तू म्हणतोस तसं असेलही पण, इथल्या बर्याच स्कूल्स मधे हा शब्द त्याच्या खर्या अर्थासाठीच वापरला जातो.
|
Badbadi
| |
| Thursday, November 29, 2007 - 3:51 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो.. माझ्या आधीच्या कंपनीत पण sabbatical leave चा अर्थ 'सद्ध्या नोकरी करणार नाही' असाच असायचा... बायका नवर्याबरोबर मस्त २ वर्ष बाहेर राहून परत जॉईन होउ शकायच्या
|
Dineshvs
| |
| Thursday, November 29, 2007 - 6:45 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सूर्याचे एक नाव मार्तंड चा अर्थ आहे. मृत अंडे. आर्यांच्या धृवीय प्रदेशातील भटकंतीमधे, ज्यावेळी त्याना दिर्घ कालावधीच्या रात्रीनंतर सूर्य दिसत असे त्यावेळी तो निस्तेज असे व तो उकडलेल्या अंड्यातील बलकाप्रमाणे दिसत असे म्हणुन हे नाव. आमच्या ऑफ़िसमधे एक मुलगा आहे त्याचे नाव पिंकेश. सरकारी मराठीमधल्या एक्टान्वये किंवा डिटेलवार या शब्दांसारखी फ़ोड केली तर ठिक. ( तरी पिंक सिटीसारखा गुलाबी देव कुठला, हा प्रश्न उरतोच !) जर पिंकचा मराठी अर्थ घेतला तर ? आणि त्याचा देव !!!????
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 6:56 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जर पिंकचा मराठी अर्थ घेतला तर ? आणि त्याचा देव !!!???? ह ह पु वा
|
दिनेश, एक्टान्वये, डिटेलवार हे शब्द खरेच सरकारी मराठीत ( कागदोपत्री ) वापरले जातात, की तुम्ही तसे गमतीने म्हणताय?
|
Dineshvs
| |
| Thursday, November 29, 2007 - 8:49 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
गजानन, पुर्वी असे शब्द खरच असायचे. आता मराठीकरण झाल्याने प्रपत्र आणि विवक्षित असे भयानक शब्द आलेत.
|
Shonoo
| |
| Thursday, November 29, 2007 - 2:11 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
sabaath हा Day of rest मानला जातो. प्राध्यापकांना शिकवणाच्या कामापासुन रेस्ट अन पर्यायाने स्वत:च्या संशोधनाला वेळ मिळावा या दृष्टीने अशी रजा देतात. अधून मधून एक सेमिस्टर काहीही न शिकवता आपल्या संशोधना वर लक्ष केंद्रित करता येतं. काही Tech कम्पन्या पण अशी सुट्टी देतात्- सहा वर्षे नोकरी झाल्यावर सहा ते आठ आठवडे पगारी रजा मिळते. Netcape, Cisco मधे अशी सुट्टी मिळत असे.
|
Hkumar
| |
| Saturday, December 22, 2007 - 6:57 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
काही शब्दार्थ काळानुसार कसे बदलतात बघा: 'भंगार' चा ज्ञानेश्वरकालीन अर्थ होता 'सोने'!
|
Maitreyee
| |
| Wednesday, December 26, 2007 - 4:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझ्या माहितीप्रमाने बंगारु हा कन्नड शब्द आहे कन्नड मधे त्याचा अर्थ सोने.( अजूनही तोच अर्थ आहे ) मला वाटत नाही की मराठीमधे पूर्वी त्याचा अर्थ सोने हा असेल..
|
Lalu
| |
| Wednesday, December 26, 2007 - 4:47 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
'बंगारु' हा शब्द तेलुगु मध्ये आहे. अर्थ तोच आहे. cbdg
|
Hkumar
| |
| Friday, December 28, 2007 - 3:27 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मैत्रेयी, तो अर्थ मला डाॅ. मृणालिनी गडकरी ( प्रख्यात अनुवादकार ) यांच्या लेखात मिळाला.
|
Gsumit
| |
| Friday, December 28, 2007 - 6:24 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सूर्याचे एक नाव मार्तंड चा अर्थ आहे. मृत अंडे. >>> दिनेशजी, तुमच्या या पोस्ट्वरुन एक कुतुहुल म्हणुन प्रश्न विचारावासा वाटतो... आपल्या जेजुरीच्या खंडोबाला 'मार्तंड' का म्हणतात... देवाच्या नावाचा इतका विचित्र अर्थ???
|
सुषृप्ती ह्या शब्दाचा अर्थ काय आहे?
|
मिळाला अर्थ. सुषृप्ती म्हणजे deep sleep . जागणे, स्वप्न आणि सुषृप्ती अशा मेंदूच्या अवस्था असतात, त्यातली एक. आणि हा शब्द सू - सुप्ती ह्या शब्दांनी तयार झालाय.
|