|
Iravati
| |
| Monday, December 17, 2007 - 12:21 pm: |
| 
|
शब्द बेभरवशाचे शब्द, कधीकधी वेगळेच रंग लेवून येतात अचपळ होतात नको इतके सांगायच असतं एक, तिसरंच सुचवून देतात बघता बघता अशा सहजपणे, की बोलणा-यालाही वाटून जावं, ' हो, हेच म्हणायचंय मला नेमकं ' किंवा असंही कि, ' छे: हे नव्हतं मनात माझ्या ' आणि शब्द, काडी लावू शकतात विश्वासाला कधी असा रंग भिनवून येतात स्वत्:त जसा आभाळ रंग चढावा निखळ पाण्याला म्हणूनच भय वाटतं शब्दांचं, खूप आतलं काही सांगताना
|
Iravati
| |
| Monday, December 17, 2007 - 12:35 pm: |
| 
|
नेमकं काय असतं? दु:ख दु:ख म्हणतात ते नेमकं काय असतं? कसं असतं? कसं जाणवतं? येईल का घेता धांडोळा दु:खाच्या नेमकेपणाचा? मला वाटते, ते नुकतंच भेटून गेलं मला कडकडून क्षणार्धात जाणवलं आत राख होत जाताना त्यातूनच लसलसून आला एक हिरवागार अंकूर जणू प्रेत गाडल्याजागी झाड.... कळ्याफुलांनी बहरून यावं.... आता, मी सहसा दु:खी होत नसावे अमूर्ताच्या पाठलागाचं त्राणच उरलेलं नसणार मात्र, रानात पाचोळा साठत जावा झाडांच्या बुंध्याशी आणि सरसरत राहावं काही पाचोळ्यातून तसं काहीसं वाजत असतं मनाच्या तळाशी अधुनमधुन
|
Iravati
| |
| Monday, December 17, 2007 - 12:41 pm: |
| 
|
इथंच तर आहेस सारखं सारखं हरवायचो आपण एकमेकांना मग शोधत राहायचो, हरवलेला चष्मा शोधावा तसे कधीकधी, सोपं नसायचं शोधणं दिसेनासाच व्हायचास दिगंतराला गेलेल्या पक्ष्यासारखा आणि कधी तर पूर्ण नाहीसा, अस्ताचलीचा सूर्य होऊन शोधेस्तोवर पहाट झालेली असायची आत हुरहूर संपली भयच मिटलं तू हरवून जाण्याचं इथंच तर आहेस तू....
|
Iravati
| |
| Monday, December 17, 2007 - 12:49 pm: |
| 
|
नकाशा रेखत असशील आसमंतात सुरम्य शांतता उंच उंच डोंगररांगा आपणही चढत असतो, उंच उंच आभाळाच्या दिशेने पांढरेशुभ्र फुलारलेले ढग भोवती निळ्या आभाळातून खाली उतरलेले आभाळात घेऊन जाण्यासाठी हिरवी गार कुरणे डोंगरपठारावरची आपल्याच सावल्या तुडवत गाई शांतपणे चरत असतात मध्येच, माना उचलतात आणि गळ्यातल्या घंटा एकदम किणकिणू लागतात ओर्केस्ट्रावर धून सूरू झाल्यासरख्या मग निनादतच राहतात काही काळ तूही असशील इथेच रेंगाळत? असशील तर नकाशा रेखत असशील माझ्या प्राक्तनाचा
|
|
|