खरंच.. रॉबिनहूड कुठे आहे हल्ली? बरेच दिवस दिसला नाही...
|
Zakki
| |
| Friday, October 05, 2007 - 3:42 pm: |
| 
|
अरेच्च्या, मायबोलीकरांची विचारपूस बा. फ. ला कुलुप! ते मागे म्हणाले होते, त्यांच्यावर कुणि खटला भरला आहे. तुरुंगात तर नसतील गेले? मला, म्हणजे, सरकारनामा सिनेमा पाहिल्यापासून महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची भीतीच वाटते! चांगल्या माणसाला केंव्हा गोत्यात आणतील, किंवा एकदम त्याचा 'सत्कार' करतील, काही नेम नाही.
|
Dineshvs
| |
| Saturday, October 06, 2007 - 5:00 am: |
| 
|
बरेच दिवसात फोनही नाही आला, रॉबीनचा. झक्कि, तसे असेल तर सुटुन आल्यावर तुमची खैर नाही हो.
|
Zakki
| |
| Saturday, October 06, 2007 - 8:27 pm: |
| 
|
अहो, तो सुटून आला तर जास्त चांगले होईल. माझी कायम खैरियत असते! मी काय त्याला घाबरतो की काय? मी पण इकडे मराठी पुस्तके वाचून 'शस्त्रे परजून' तयार आहे!
|
Hkumar
| |
| Tuesday, October 23, 2007 - 10:02 am: |
| 
|
मध्यंतरी मी ओमानी हलवा आणला. त्याच्या घटक पदार्थांमध्ये nisha असा एक घटक होता. हा शब्द अरेबिक असून त्याचा अर्थ starch आहे. मराठी व अरेबिक मधील वेगवेगळी 'निशा' पाहून गंमत वाटली!
|
Storvi
| |
| Monday, October 29, 2007 - 7:50 pm: |
| 
|
मंडळी, मला prescribe साठी मराठी शब्द हवा आहे...
|
Maanus
| |
| Monday, October 29, 2007 - 11:42 pm: |
| 
|
बोली भाषेत औषधे लिहुन देतो असे म्हणतात. शुद्ध मराठीत काय म्हणतात माहीत नाही.
|
Zakasrao
| |
| Tuesday, October 30, 2007 - 3:58 am: |
| 
|
औषधाच टिपण चालेल काय
|
Slarti
| |
| Tuesday, October 30, 2007 - 12:56 pm: |
| 
|
शिल्पा, Molesworth अनुसार 'अंकित' असा शब्द आहे. 'अधिपत्याखाली असणे' याशिवाय या शब्दाचे marked, circumscribed, defined, prescribed; (whose course or path is) traced or marked out हेही अर्थ आहेत. आता जर औषधांच्या बाबतीत वापरायचे असेल तर 'वैद्यांकित' असे वापरता येईल. दुसरा काही संदर्भ असेल तर तसा बदल करता येईल.
|
Zakki
| |
| Wednesday, October 31, 2007 - 10:55 am: |
| 
|
अरे वा, बरेच दिवसांनी Storvi ! मी दोन वर्षांपूर्वी सहा महिने पुण्यात राहिलो होतो. तिथे मला असे दिसले की प्रिस्क्राईब हा मराठी शब्द च आहे. उदा. तिथल्या मराठीत असे म्हणायचे, 'मला डायाबेटिस साठी एखादे इफेक्टिव मेडिसिन प्रीस्क्राईब करून देता का? शुगर इन्क्रिज झाली आहे.' मराठीत कसे बोलायचे यासाठी दिनेश्दांची गोष्ट वाचा, किंवा खरे तर आजकालची कुठलिही मराठी गोष्ट.

|
Slarti
| |
| Wednesday, October 31, 2007 - 1:04 pm: |
| 
|
झक्की, तुम्ही म्हणता ते १००% खरे आहे.
|
Bee
| |
| Friday, November 02, 2007 - 1:55 am: |
| 
|
सहसा 'सु' पासून सुरू होणारे शब्द हे 'काहीतरी चांगले' अशा अर्थाचेच असतात. मी एक नविन नाव नुकतेच वाचले जे सु पासून सुरू होते परंतू उकार मात्र दीर्घ आहे. ते नाव आहे सूमोध. कुणाला सूमोध ह्या नावाचा अर्थ माहिती आहे का? मला तर ते एखाद्या पर्वताचे नाव वाटते आहे..
|
Bee
| |
| Friday, November 02, 2007 - 2:01 am: |
| 
|
आणखी एक.. १) चहा टाकला आहे २) चहा ठेवला आहे ३) चहा मांडला आहे ४) चहा करत आहे चहा करण्याच्या बाबतीत असे नविन वाक्य कानी पडतात. माझी आई चहा मांडू का? चहा मांडला आहे, असे म्हणते. मी तिला एकदा विचारले की मांडला का शब्द का वापरतेस तर ती म्हणाली पुर्वी चुलीवर स्वैपाक आणि विटोल्यावर चहा करण्याची पद्धत होती. कारण सरपण घालून चुल पेटवली म्हणजे ती वाया जायची. म्हणून छोटे विटोले असतं. दुपारचा चहा विटोल्यावर होत असे. विटोल्याची अशी खास जागा असायचीच असे नव्हते. जसा आपण स्टो कुठेही ठेवतो तसे त्याचे असायचे. मग चहाची वेळ झाली की विटोला मांडला जायचा. पातेले ठेवले जायचे. ती पद्धत मांडणे शब्दाशी सुसंगत होती. म्हणून चहा मांडू का? असे म्हणनेच जास्त बरोबर होते. पण आता विटोले कुणी वापरत नाही. निदान शहरात तरी नाहीच नाही.
|
Slarti
| |
| Friday, November 02, 2007 - 4:53 am: |
| 
|
बी, 'चहा मांडणे' हे छान वाटले ऐकायला. मी पहिल्यांदाच ऐकत आहे. व्युत्पत्ती सांगितलीस ते छान केलेस. मला तर विटोला म्हणजे काय तेही माहित नाही.
|
Hkumar
| |
| Sunday, November 04, 2007 - 7:36 am: |
| 
|
मध्यंतरी एका शब्दकोड्यात 'मठारा' हा शब्द आढळला. त्याचा अर्थ 'ढोंगी साधू' आहे. हा शब्द प्राकृत असून तो तुकारामांच्या गाथेतून घेतला आहे.
|
Hkumar
| |
| Saturday, November 17, 2007 - 10:54 am: |
| 
|
'वारणे' याचा बहुतेकांना माहित असलेला अर्थ 'मरणे' हा आहे. त्याचा अजून एक अर्थ ' हाकणे' असाही आहे. ( उदा. शेळ्या-मेंढ्या वारणे ).
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 20, 2007 - 1:22 pm: |
| 
|
परवाच झक मारणे याचे मुळ वाचायला मिळाले. झक हा शब्द आलाय झष वरुन. झष चा अर्थ मासा, पण मूळ शब्द स्त्रीलिंगी असल्याने. झक मारली, असा शब्दप्रयोग रुढ झाला. झक मारली आणि झुणका केला, असा पुर्ण वाकप्रचार. म्हणजे खटपटीने मासे मारले पण शेवटी झुणकाच खावा लागला, असा अर्थ.
|
Hkumar
| |
| Wednesday, November 21, 2007 - 7:47 am: |
| 
|
हो, वाचले ते. झक मारली... नाटकाच्या दिग्दर्शकांनी ते म.टा. मध्ये लिहीले होते.
|
Maitreyee
| |
| Wednesday, November 21, 2007 - 6:59 pm: |
| 
|
झष! आई ग किती अवघड शब्द! कुठल्या भाषेतला शब्द हा?
|
Hkumar
| |
| Saturday, November 24, 2007 - 6:05 am: |
| 
|
'झक' चा अर्थ कळल्याने आता आपण सर्वांनी झक मारायला हरकत नाही!
|