Devdattag
| |
| Wednesday, September 12, 2007 - 7:44 am: |
| 
|
धन्स श्रीराम.. .. .. ..
|
Bee
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:30 am: |
| 
|
शब्दार्थ विचारतात वर शब्दांची वाट देखील लावतात. 'धन्यवाद' असा पुर्ण शब्द लिहायला असे किती कष्ट पडतात. पण नाही थॅन्क्स इतका प्रिय झाला आहे की धन्यवाद देखील तो न्स नेच पुर्ण व्हायला हवा.
|
Devdattag
| |
| Wednesday, September 12, 2007 - 12:09 pm: |
| 
|
बी, धन्य वाद.. .. .. ..
|
Zakki
| |
| Wednesday, September 12, 2007 - 3:43 pm: |
| 
|
अहो एकदा स्वत:चे पूर्ण नाव न लिहीता फक्त आद्याक्षर लिहायचा पायंडा पडला की मग सगळेच शब्द हळू हळू 'आखूड' होऊ लागतात!
|
अजानुकर्ण असा आयडी वाचला. अजानुकर्नाचा अर्थ बहुतेक गाढव आहे. (लहानपनी वाचलेले आठवते) ते खरे आहे का?
|
Zakki
| |
| Tuesday, September 18, 2007 - 8:41 pm: |
| 
|
आजानु म्हणजे गुढग्यापर्यंत. तर गुढग्यापर्यंत कान म्हणजे खूप लांब कान, म्हणजे? मला वाटते संस्कृतमधे अतिशयोक्ति, रूपक हे अलंकार अति जास्त वापरतात. त्यामुळे जुन्या संस्कृतमधे लिहीलेल्या पुराणातल्या गोष्टी वाचून फार गैरसमज होतात.
|
झक्कींचा अर्थ बरोबर आहे पण केदार म्हणतो तेही बहूतेक खरे आहे. पण गाढवाचे कान खरच इतके लांब असतात का?
|
आजानुबाहू असा एक शब्द आहे जो कोणातरी संत की कृष्ण वगैरे बद्दल वापरतात.
|
Amruta
| |
| Tuesday, September 18, 2007 - 9:37 pm: |
| 
|
होय, संताचे आणि देवांचे हात त्यांच्या गुढग्या पर्यंत लांब असतात अस म्हणतात म्हणजे आजानुबाहु. पण आजानुकर्ण म्हणजे गाढवच असाव. लंबकर्ण पण म्हणतात का गाढवाला? निट काही आठवत नाहीये.
|
Farend
| |
| Tuesday, September 18, 2007 - 10:30 pm: |
| 
|
आजानुबाहु बहुधा रामाबद्दल वापरतात. आम्ही लहानपणी ते ऐकल्यावर सरळ उभे राहून हात ताणून कोठपर्यंत पोहोचतात ते पाहायचो
|
Sanyojak
| |
| Tuesday, September 18, 2007 - 11:27 pm: |
| 
|
बाप्पा: "संयोजक, अहो संयोजक" (मनात: अरे इकडे गणेशोत्सवाच्या मांडवात हितगुजकर तर सोडाच, पण संयोजकही फ़िरकत नाहियेत की काय?) सं: आलो आलो बाप्पा बाप्पा: अहो इथे ही पितळी बादली काय करतेय ? सं: अहो ती होय? अहो तिची जाहिरात करायची आहे! बाप्पा: अजून उत्सवाचे २ दिवस नाही झाले तर बादल्या विकायची वेळ आली? सं: बाप्पा अहो तसे काही नाहीये, अहो हितगुजकर एखाद्या गोष्टीला कशी आणि किती नावे ठेवतात तुम्हाला माहिती आहेच, आता तेच फ़क्त ’अधिकृत’ रित्या करायचे आहे. म्हणजे जाहिरातींची स्पर्धा हो. अहो शिवाय त्यात सेवादात्याच्या बिघाडामुळे मायबोलीही थोडा वेळ बंद होती - ह्या सगळ्याचा परिणाम आहे हा - पण तुम्ही काही काळजी करु नका, दणदणीत पार पडणार गणेशोत्सव बघालच तुम्ही. मंडळी, तुमच्या भरवशावर बाप्पांना आश्वासन देवुन बसलोय, आता गणेशोत्सव दणक्यात पार पाडायची आपली परंपरा ह्या वर्षी सुद्धा पाळणार ना ? काय म्हणालात ? नव्या मायबोलीचे प्रकरण नीटसे कळले नाहिये ? अहो अगदी सोप्पे आहे, फ़क्त वर दिलेली गणेशोत्सवाची लिंक क्लिक करायची, तिथे लॊगईन करायच आणि पोस्टायला सुरुवात - अरे हाय काय नी नाय काय
|
Zakasrao
| |
| Wednesday, September 19, 2007 - 4:15 am: |
| 
|
अजानबाहु हे श्रीकृश्नाच्या बाबतीत वाचलय मी युगंधर मधे. त्या अजानु लाच येवुन अर्थ सांगु दे.
|
Psg
| |
| Wednesday, September 19, 2007 - 7:17 am: |
| 
|
शिवाजी महाराज आणि सुभाषचंद्र बोस हे ही अजानुबाहू होते असे ऐकले आहे. म्हणजेच गुढग्याच्याही खाली हात असलेले.. अर्थात हातात दिव्य शक्ति असलेले.. direction देऊ शकणारे हात.. असे काही असू असेल.. गाढवाला लंबकर्ण म्हणतात. बरोबर. 'अजानु' म्हणजे 'लांब' असं असेल तर अजानुकर्ण म्हणजे 'लांब कान असलेला' म्हणजेच 'गाढव' असे लॉजिक असायला हरकत नाही अजानुकर्ण आयडी दिवे घ्या!
|
Ashwini_k
| |
| Wednesday, September 19, 2007 - 8:19 am: |
| 
|
"आजानुबाहू" या शब्दाचा अर्थ शब्दशः "गुढघ्यापर्यंत लांब हात असलेला" असा असला तरी हा शब्द पूनमने म्हटल्याप्रमाणे दिव्यशक्ती असलेल्या विभुतींसाठी वापरला जातो. मी ऐकल्याप्रमाणे, आपल्या प्राणमय शरीरात अनेक चक्रे असतात. त्यात मांडीच्या भागात एकही चक्र नसते (या भागात गुढघ्यापासुन खालच्या भागातील चक्रे वरच्या भागातील चक्रांपासून separate होतात). तसेच शरीरातील प्रत्येक चक्र स्वतंत्रपणे कार्यरत असते त्यामुळे त्यांची शुध्दी किंवा अशुध्दी ही independent असते. whereas दिव्यशक्ती असलेल्याकडे प्राणमय देहातील प्रत्येक चक्र बाकीच्या चक्रांचेही कार्य करू शकते. म्हणजेच, हातातील चक्र व गुढघ्यापासुनच्या भागातील चक्र हे same कार्य करु शकतात (मांडीच्या भागामुळेसुध्दा connection तुटलेले नसते) अशा अर्थाने "आजानुबाहू". यामुळेच असेही म्हटले जाते की दिव्य शक्ती असलेल्या विभुतींच्या भौतिक देहाला सामान्य मानवाप्रमाणेच अवयव दिसत असले तरी त्यांच्या प्राणमय शरीराला हा भेदभाव नाही. असो, आजानुकर्ण म्हणजे काय?
|
Ajanukarna
| |
| Wednesday, September 19, 2007 - 10:52 am: |
| 
|
'आजानुकर्ण' म्हणजे गाढवच. जी.ए. कुलकर्णी यांच्या विदूषक या कथेमध्ये हा उल्लेख ठळकपणे आला आहे. आता शंकरपाळी या पदार्थात कुठेही शंकर नसल्यामुळे आजानुकर्णाचे कान गुढघ्यापर्यंत असणे कंपल्सरी नाही हे सांगणे नलगे. ;) असो. आमच्या नावात दाखवलेल्या इतक्या स्वारस्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.
|
Badbadi
| |
| Wednesday, October 03, 2007 - 12:15 pm: |
| 
|
'लांगूलचालन' म्हणजे नक्कि काय?? आणि उच्चार करताना फोडायचा कसा?? 'लांगूल चालन' कि 'लांगू लचालन'??
|
Zakki
| |
| Wednesday, October 03, 2007 - 4:51 pm: |
| 
|
लांगूल म्हणजे शेपटी. कुत्रा मालकासमोर शेपटी हलवतो, तसे करणार्यांना किंवा भारतीय नेते मुसलमानांसमोर जे करतात त्याला लांगूल चालन असे म्हणतात!
|
Shyamli
| |
| Wednesday, October 03, 2007 - 5:00 pm: |
| 
|
आजानुकर्ण'>>>>> आपण आर एच आहात अस का वाटतय मला ~D
|
श्यामले मला तरी वि. खे. चा भास झाला
|
Badbadi
| |
| Thursday, October 04, 2007 - 1:18 pm: |
| 
|
धन्यवाद झक्कि!!! श्यामली, तो RH नक्कि नाहिये
|