Mbhure
| |
| Monday, August 20, 2007 - 3:33 pm: |
| 
|
आभार बी. मला " द " म्हणजे देणारा हे लक्षात आले होते; पण काय देणारा ते कळत नव्हते.
|
Slarti
| |
| Monday, August 20, 2007 - 4:08 pm: |
| 
|
शोनू, बरोबर आहे तुझे. double meaning म्हणजे द्वयर्थ. व्याख्येनुसार double meaning किंवा द्वयर्थ यातील दुसरा अर्थ हा कसाही असू शकतो, तरी प्रत्यक्ष वापरात साधारणपणे दुसरा अर्थ हा असभ्यपणाकडे झुकणारा असतो.
|
Bee
| |
| Tuesday, August 21, 2007 - 1:45 am: |
| 
|
शोनू, स्लर्टी धन्यवाद, लिहिताना मला देखील नक्की शब्द आठवत नव्हता. तेंव्हा वाटलेच होते कुणीनाकुणी बरोबर करेल म्हणून. असो.. 'मातिचे पाय' ही phrase (ही phrase च आहे ना?) नक्की कशा अर्थी वापरतात? माझ्या मते सर्वसाधारण व्यक्ती म्हणजे मातिचे पाय असणारी व्यक्ती जिच्यात बरे वाईट दोन्ही गुण असतात किंवा प्रतिभेचे देणे नसणारी व्यक्ती. ह्याच्या विरुद्धार्थी phrase आहे का?
|
Shonoo
| |
| Friday, August 24, 2007 - 11:58 am: |
| 
|
ज़ी एंच्या 'माणसं अर्भाट आणि चिल्लर' पुस्तकात शेवटच्या स्वगतात काक भुशुंडी असा उल्लेख वाचला होता. तेंव्हा पासून या संदर्भात माहिती हवी असं वाटलं होतं. पण ते राहिलंच. काल रामचरितमानस मधे ' ठुमक चलत रामचंद्र' सापडतं का ते बघत होते. तर त्यात एक दोहा असा वाचला ' हे सती मी तुला एक सीक्रेट सांगतो, त्या वेळी मी आणि काक भुशुंडी सुद्धा तिथे होतो. पण आम्ही साध्या माणसाच्या वेषात होतो म्हणून कोणीही आम्हाला ओळखलं नाही.' बाल कांड मधे राम जन्माच्या वेळचे वर्णन आहे त्यात हा दोहा आहे. तर हा काकभुषुंडी कोण? राम जन्माच्या वेळी तो गुप्त वेषात का गेला होता? आणि मी सर्व बालाकांड शोधून पाहिलं तरी 'ठुमक चलत रामचंद्र' मला तरी सापडलं नाही. ते गाणं तुलसी दासांचं आहे हे नक्की कारण एका कडव्यात ' तुलसी दास अती आनंद देखिके मुखारविंद' अशी ओळ आहे. त्या गाण्याचे पूर्ण शब्द कुठे मिळतील रॉबीन हूड? लिम्बू टिम्बू? स्वाती आम्बोळे? इतर जाणकार?
|
Chandya
| |
| Friday, August 24, 2007 - 1:54 pm: |
| 
|
काक भुशुंडी http://urday.com/kakbhushundi.html ठुमक चलत... Thumak chalat raamacha.ndra Thumak chalat raamacha.ndr baajat pai.njaniyaa.n .. kilaki kilaki uThat dhaay girat bhuumi laTapaTaay . dhaay maat god let dasharath kii raniyaa.n .. a.nchal raj a.ng jhaari vividh bhaa.nti so dulaari . tan man dhan vaari vaari kahat mR^idu bachaniyaa.n .. vidrum se aruN adhar bolat mukh madhur madhur . subhag naasikaa me.n chaaru laTakat laTakaniyaa.n .. tulasiidaas ati aana.nd dekh ke mukhaaravi.nd . raghuvar chhabi ke samaan raghuvar chhabi baniyaa.n .. Source: http://www.archaka.com/puja/bhajans/hindi_english2.htm
|
Bee
| |
| Friday, August 24, 2007 - 3:25 pm: |
| 
|
ग्रंथपाल ह्या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप ग्रंथपालिका असेच होईल ना.. मला हा शब्द एके ठिकाणी वापरायचा आहे म्हणून इथे खात्री करून घेत आहे. चंदूदादा कित्ती दिवसांनी रे बाबा...
|
Karadkar
| |
| Friday, August 24, 2007 - 3:40 pm: |
| 
|
ग्रंथपालीका असा शब्द महाराष्ट्राततरी कुठे वापरलेला पाहीला नाहीये. माझी मैत्रीण ग्रंथपाल आहे आणि तिला ग्रंथपाल असेच म्हणतात ग्रंथपलीका असे नाही.
|
Slarti
| |
| Friday, August 24, 2007 - 4:24 pm: |
| 
|
ग्रंथपाल की पालिका हे आकारावर अवलंबून असेल काय ? मातीचे पाय म्हणजे छुपा अवगुण.
|
Karadkar
| |
| Friday, August 24, 2007 - 4:42 pm: |
| 
|
चन्द्या ने दिलेलेच भजन पण देवनागरीमधुन. http://www.indif.com/nri/bhajan/ram/rambhajan6.asp
|
पदनामे लिंगाप्रमाणे बदलण्यात येत नाहीत... त्यामुळे ग्रन्थपालच बरोबर आहे. राष्ट्रपतीच्या बाबतीतही हीच भूमिका आहे. शिक्षिका हे सर्वनाम असल्याने शिक्षिका होते...
|
Bee
| |
| Friday, August 24, 2007 - 6:25 pm: |
| 
|
पण मग लिपिक चे लिपिका, दिग्दर्शक चे दिग्दर्शिका, नायक चे नायिका, शिक्षक चे शिक्षिका कसे काय होते? काहि नियम असतील तर लिही ना रॉबीनहूड. ही देखील पदनामेच नाही झालीत का? सगळ्याच पदनामांचे नसतील होत पण काहींचे तसे होते असे तुला म्हणायचे का?
|
Maanus
| |
| Friday, August 24, 2007 - 6:30 pm: |
| 
|
प्रकाश राव वयाने मोठे आहेत रे... (नुकत्याच झालेल्या GTG कळालेली माहीती) प्रकाश सान आनातावा निहोन्ग देस का? (निट येत नाही, तोडके मोडके लिहीले आहे)
|
Psg
| |
| Saturday, August 25, 2007 - 6:14 am: |
| 
|
ती 'काकभुषुंडी' ची लिंक वाचली, आणि मला काहीच कळले नाही मला सोप्या मराठीत कोणी त्याचा अर्थ समजावून सांगेल का??
|
Shonoo
| |
| Saturday, August 25, 2007 - 7:27 pm: |
| 
|
पूनम मी पण हेच म्हणणार होते. आज दुसयांदा ती लिन्क वाचली तरी काही फारसा प्रकाश पडला नाही. कोणी तरी लवकर निरूपण करा पाहू सुरेखपैकी! ठुमक चलत रामचंद्र मधल्या कडव्यांचा अर्थ आणि ते दोहे रामचरितमानस मधे कुठे आहेत तेही कोणी सांगेल काय?
|
ठुमक चलत मध्ये काही छुपा अर्थ आहे असे वाटत नाही. रामाचा बाललिला त्या कवितेत व्यक्त केल्या आहेत एवढेच. ते कुठल्या खंडात लिहीले आहे ते मला माहीती नाही. त्या लिंक मध्ये लिहील आहे त्यात थोडी गडबड आहे. काक भुषूंडी हा रामाच्या खुप आधीचा आहे. तो शिवभक्त होता पण त्याला ईतर देव म्हणजे विष्णू (नारायण) बद्दल आदर न्हवता. (थोडक्यात एक देवेश्वर). ब्रम्हा, विष्नू नी महेश हे एकच रुप आहेत हे मानायला तो तयार न्हवता. एके दिवशी जेव्हा प्रत्यक्ष शंकर तिथे आले तेव्हा त्याने त्याचा देवाला अभिवादन केले नाही हे पाहुन शकंर चिडले व त्यांनी त्यास १००० योनी मध्ये जन्म घेशील असा शाप दिला. ब्रम्हांनी (ज्यांना तो मानत न्हवता) शिवाला उशाःप द्यायला सांगीतले. पुढे तो लोकेश ऋषींकडे जेव्हा ब्रम्ह्ज्ञान प्राप्त करायला गेला तेव्हा त्याचा तिल अहंकार त्याला आडवा आला लोकेश ऋषी देव हा एकाच वेळी साकार व निराकार आहे त्याला अस्तीत्व आहेही व नाहीही हे सांगत असताना काक मात्र तो फक्त अस्तित्वाह आहे व त्यामुळे तो देव आहे हा वाद घालु लागला. चिडुन लोकेश ऋषींनी त्याला तु काक होशील हा शाप दिला व तो काक झाला. नंतर त्याला यथाव्कह ज्ञान प्राप्त झाले व भगवान सगुन साकार निर्गुन निराकार आहेत हे कळले. पण त्याचा स्वतचा कल हा साकारा कडे( tangibale form ) असल्यामुळे जेव्ह जेव्हा भगवान अवतार घेत तेव्हा तेव्हा त्यांचा बालपनी साकार स्वरुपात दर्शन घेन्यासाठी भुषुंडी काक स्वरुपात त्यांचा जवळ राहातात.
|
Psg
| |
| Monday, August 27, 2007 - 7:07 am: |
| 
|
ओह! ती लिंक आणि केदारचं निरूपण्- दोन्हीची सांगड घालून थोडा थोडा अर्थ लागत आहे आता! केदार, तुला इतकी सगळी माहिती कशी काय असते?
|
Shonoo
| |
| Monday, August 27, 2007 - 2:16 pm: |
| 
|
केदार छुपा अर्थ नसणार ठुमक चलत ला. पण काही शब्दांचा अर्थ कळला तर जास्त मजा येईल. किलकि किलकि उठत धाय महणजे नक्की काय? धाय मात गोद लेत मधे धाय परत आहे तर या शब्दाचे दोन अर्थ आहेत का? अन्चल रज अंग झारि म्हणजे काय अंचल म्हणजे पदर, शेला, उपरणं असं असू शकेल, पण अंग झारि म्हणजे मला अर्थ लागत नाही म्हणून खटाटोप. अर्थात नेमका अर्थ नाही कळला तरी गाणं ऐकायला, गुणगुणायल काही अडचण नाहीच म्हणा. काक भुशुंडी च्या निरुपणाबद्दल धन्यवाद.
|
Shonoo
| |
| Monday, August 27, 2007 - 2:28 pm: |
| 
|
अशोक बँकर यांनी लिहिलेलं Prince of Ayodhya वाचतेय सध्या. पुस्तक खिळवून ठेवणारं आहे. भाषा ओघवती आहे. पण तरी बर्याच गोष्टी खटकतात अमावास्ये चा उल्लेख सतत awamas असा येतो. हिंदीत तरी amavas असा वापर मी ऐकलाय. awamas खटकतो. त्यात एका ठिकाणी कोणीतरी उपदेश केलाय "देवांनीच सांगितलंय 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु'" हा गीतेतला श्लोक आहे ना? महाभारतातल्या युद्धाच्या वेळचा? मग त्याच्या उल्लेख रामायणात कसा? Margaret Wise Brown च्या Good night moon मधे Run away bunny पुस्तकातलं चित्र आहे आणि Run away Bunny मधे Good Night Moon मधलं तसा प्रकार आहे का?
|
शोनु त्याचा अर्थ मलाही माहीती नाही. शोध घेतो.
|
Hkumar
| |
| Wednesday, August 29, 2007 - 10:14 am: |
| 
|
खूप भारतीय 'प्रिपोन' हा अस्तित्वात नसलेला इंग्रजी शब्द वापरतात. ( इंग्रजीत फ़क्त पोस्टपोन हा शब्द आहे). प्रिपोन या अर्थी 'अँडव्हान्स' हा योग्य शब्द आहे.
|