शहानिशा हा शब्द कसा आला याची कोणाला माहिती आहे का?
|
Pancha
| |
| Friday, June 29, 2007 - 11:01 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शहा + अनिशा, अनिशा म्हणजे continue . एखादी चर्चा (भांड्ण वगेरे) शहा (राजा) कडे नेवुन निर्णय मिळविण्यासाठी continue करणे
|
पण म्हणजे पन्चा हा "शहानिशा" शब्द ऊर्दू आहे का? आणि जर असेल तर हिन्दीत त्याला काय प्रतिशब्दय? सहज उत्सुकता म्हणून विचारतेय
|
धन्यवाद, पंच.
|
Bee
| |
| Thursday, July 05, 2007 - 6:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
'बूर्ज्वा' हा शब्द मराठी आहे का, त्याचा अर्थ काय? उदाहणार्थ, मध्यमवर्गीय रोमंटिक बूर्ज्वासारखा प्रेम आणि लग्न यात काय संबंध लावायचा?
|
नाही, बूर्झ्वा हा शब्द इंग्रजी आहे. अर्थात तो इन्ग्रजीत फ्रेंचमधून आला. त्याचे स्पेलिन्ग आहे Bourgeois. खरं तर तो त्या खेड्याच्या, burgeis नावावरून 'गाववाला' अशा अर्थाने आला आहे. जसे पुण्याला 'पौडाचा पावणा', कोल्हापुरात 'वडिणग्याहून आलास का?' अथवा मुम्बईत 'अलीबागसे आयेला' असे शब्द ज्या हेटाळणीने वापरतात तशा अर्थाने. त्याचा अर्थ खरा of social middle class असा आहे. हा खरा शब्द लाडका आहे कम्युनिस्टांचा. तो आता त्यांचा 'टेकनिकल' शब्द झालाय. म्हणजे भांडवलदारांचा हितसंबंध असणारा अशा अंगाने ते तो वापरतात. खरे तर ती एक "लाल" शिवी आहे. कॅपिटॅलिस्टिक अथवा मध्यमवर्गीय मानसिकता अशा अर्थानेच तो परिचित आहे.....
|
वा हूड मस्त! छान माहिती दिलीत पण मला वाटायचे तो शब्द "बूर्झ्वा" आहे म्हणून.. पन्चा माझा प्रश्न तस्साचे अजून उत्तर द्या की
|
Bee
| |
| Thursday, July 05, 2007 - 11:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ऋतु, उच्चार काय बूर्ज्वा किंवा बूर्झ्वा दोन्हीप्रकारे करू शकतो. जसे काही जण please चा उच्चार प्लीझ करतात तर काही प्लीज. रॉबीन, खरचं खूप छान माहिती सांगितली. त्याबद्दल तुझे आभार. शहानिशाला जवळचा प्रतिशब्द तपास होऊ शकतो. हिंदीमधेही तोच शब्द, तपास.
|
शहानिशाला जवळचा शब्द मला वाटते "खातरजमा". अथवा "पडताळणी". तपासला वेगळाच अर्थ आहे. (हम यहाँ तहकीकात करने आये हैं...)
|
Zakki
| |
| Thursday, July 05, 2007 - 2:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे क्या कमालकी बात है!! मी दोन तीन दिवस अगदी हेच लिहीण्याचा विचार करत होतो. 'खातरजमा'च लिहीणार होतो. म्हणजे गोष्ट खरी आहे की खोटी हे तपासून पहाणे. म्हणजे कुणि शहा च्या नावाने कर मागायला आल्यावर प्रथम 'शहानिशा' करणे की तो माणूस शहाचा नोकर आहे, नि शहाची त्याला संमति आहे. 'तहकीकात' म्हणजे काय हो?
|
Slarti
| |
| Thursday, July 05, 2007 - 3:20 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हूडांना अनुमोदन. खातरजमा / पडताळणी बरोबर आहेत. मला वाटते की खातरजमासुद्धा उर्दू / फारसी मधून आला आहे. तहकीकातचा अर्थ तपास.
|
Aschig
| |
| Thursday, July 05, 2007 - 4:53 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
The discreet charm of the burgeoisie is an interesting French movie. It brings out the meaning of the word quiet well (without acyually stating it). RobinHood has stated it quiet well. See my review at: http://aschig-moviereviews.blogspot.com/2006/09/le-charme-discret-de-la-bourgeoisie.html
|
Bee
| |
| Tuesday, July 10, 2007 - 8:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
'संभार' हा शब्द वापरून काही उदाहरणं मिळतील का.. मला २च माहिती आहेत केससंभार, मित्रमैत्रीणीसंभार?
|
पर्णसंभार.
|
Shonoo
| |
| Tuesday, July 10, 2007 - 12:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मित्र मैत्रिणी संभार? मी पहिल्यांदाच ऐकला. इंग्रजी पत्रकारितेमधे नवे शब्द, नव्या phrases कोणी पहिल्यांदा वापरल्या यावर चिकार संशोधन माहिती उपलबध असते. मराठीत तसं काही माझ्या लक्षात आलेलं नाही अजून. पण कोणी जर असा उपक्रम केलाच तर बी च्या नावाखाली बर्याच एंट्र्या दिसतील :-) पर्णसंभार, पुष्पसंभार हे शब्द ऐकलेवाचले आहेत
|
Anilbhai
| |
| Tuesday, July 10, 2007 - 2:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ईडलीसंभार .. .. .. ..
|
Milindaa
| |
| Tuesday, July 10, 2007 - 3:56 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रश्नसंभार? वाक्यात उपयोगः प्रश्नसंभा(संहा)रामुळे वाकणे
|
बी ने विचारलेल्या विवीध प्रश्नसांभारामुळे त्यांचा मित्रमैत्रीनीसांभार मायबोली वर वाढला आहे. मायबोलीवरील केशसांभार असनार्या ललनांच स्वागत समिती मध्ये सहभाग असतो. त्या पुश्पसंभार देऊन ईथे येनार्या मित्रांना सांभारा मध्ये सहभागी करतात.
|
Bee
| |
| Wednesday, July 11, 2007 - 1:50 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शोनू, गौरी देशपांडेंनी 'मित्रमैत्रीणीसंभार' हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे. संभारचा अर्थ जर लक्षात घेतला तर मित्रमैत्रीणीसंभार हा शब्द काही चुकीचा वाटत नाही. प्रश्नसंभार आवडला.
|
Psg
| |
| Monday, July 23, 2007 - 10:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
'मनस्वी' चा अर्थ काय आहे नक्की? तो किंवा ती मनस्वी आहे स्वभावानी म्हणजे काय आहे? कौतुकानी म्हणतात का असं, की 'तो ना फ़ार तुसडाच आहे' या टोनमधे वापरतात हा शब्द? मनस्वी म्हणजे 'मनाप्रमाणे करणारा/ री' का?
|