Imtushar
| |
| Monday, June 18, 2007 - 9:17 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
गेला बाजार हा शब्द 'कमीत कमी' या अर्थानेच वापरला जातो. सशल ने दिलेले explanation लॉजिकल वाटतेय
|
Bee
| |
| Monday, June 18, 2007 - 10:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हा शब्दप्रयोग करणारे दोघेच मी मायबोलिवर पाहिले आहे. एक लिम्बुटिम्बु आणि दुसरा असामी. त्यांनाच नक्की काय ते विचारून बघावे
|
Slarti
| |
| Monday, June 18, 2007 - 3:20 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
गेला बाजार म्हणजे केवळ कमीत कमी नव्हे. तो अर्थ थोडा अपूर्ण आहे. बाजार हा समाजाच्या ताज्या आर्थिक स्थितीचे दर्शन घडवतो (काय विकले जात आहे, कसे विकले जात आहे, कितीला इ.इ.). त्यामुळे गेला बाजार म्हणताना 'समाजाची जी ताजी (आर्थिक) स्थिती आहे त्यानुसार' असा अर्थ. त्यामुळे 'गेला बाजार अशी किंमत मिळेल' यात 'सध्या प्रचलित असलेल्या भावाचा विचार करता' असा अर्थ आहे. तरीही मला असे वाटते की 'कमीत कमी' असाही एक सुप्त भाव असावा. मग 'कमीत कमी'च का म्हणू नये ? तर 'कमीत कमी' हे absolute होऊ शकते. पण काही किंमती कालसापेक्ष असतात. सद्यपरिस्थितीवर अवलंबून असतात. ही सापेक्षता 'गेला बाजार' मधून सुचवायची आहे. शिवाय मला असे वाटते की तो बाजार 'गेला' असल्याने ती अगदी या क्षणाची स्थिती नसावी, तर 'तुमच्या माहितीप्रमाणे जी ताज्यात ताजी स्थिती होती ती' असा सूर असावा. (या कारणामुळे हा वाक्प्रयोग केवळ आर्थिक संदर्भातच करतात असे नाही. तो इतरही बाबतीत करतात.)
|
Ksha
| |
| Monday, June 18, 2007 - 3:24 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
"गेला" "बाजार" हे दोन स्वतंत्र शब्द आहेत. "गेलाबाजार" असा शब्द नाही. त्याचा संदर्भ बाजाराशी आहेच. आपण ज्याला minimum market value म्हणू त्याच अर्थाचा हा वाकप्रचार आहे. सशलने दिलेला अर्थही साधारण याच संदर्भातला आहे. त्यामुळे तो बरोबर
|
Ksha
| |
| Monday, June 18, 2007 - 3:26 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
slarti चे स्पष्टीकरण अजूनच चांगले आहे
|
Svsameer
| |
| Monday, June 18, 2007 - 7:37 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दोन शब्द प्रयोगांचे अर्थ हवे आहेत. १. चर्पट पंजरी.याचा अर्थ माहीत आहे. हा शब्द तयार कसा झाला याची माहिती हवी आहे. २. "तुला काय धाड भरली आहे" या वाक्यातली धाड भरणे म्हणजे नेमकं काय?
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 19, 2007 - 9:27 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
स्लार्टी मस्त स्पष्टीकरण दिलस.
|
Imtushar
| |
| Tuesday, June 19, 2007 - 9:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शंकराचार्याने रचलेले विष्णू स्तुतीचे श्लोक म्हणजे चर्पटपंजरी. महाराष्ट्रात हा शब्द मुर्खासारख्या बडबडीसाठी वापरतात. बोलीभाषेतील चर्पटपंजरी आणि मूळ चर्पटपंजरी यांच्या quality मध्ये काही साम्य असेल का? :-)
|
Slarti
| |
| Tuesday, June 19, 2007 - 1:53 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चर्पट पंजरीचा अर्थ रटाळवाणे बोलत राहणे. त्या श्लोकांना चर्पट पंजरी का म्हणतात ते कोणास ठाऊक आहे का ? नाथ संप्रदायात एक चर्पटनाथ होऊन गेले, त्यांचा काही संबंध ? धाड भरणे म्हणजे नेहमीची शक्ती / आरोग्य नसणे असे काहीतरी आहे. उदा. 'रोज तर उत्साहाने जातो, आज काय धाड भरली आहे ? ' धाड टाकणे, धाड येणे यातील धाड आणि 'ही' धाड सारखी असेल तर कदाचित भितीशी संबंध असावा.
|
Pancha
| |
| Tuesday, June 19, 2007 - 8:52 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बुगडी माझी सांडली गं- बुगडी म्हणजे काय?
|
Sashal
| |
| Tuesday, June 19, 2007 - 9:22 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कानांत घालायच्या दागिन्याचा एक प्रकार आहे बहुतेक ..
|
Pancha
| |
| Tuesday, June 19, 2007 - 11:43 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दागिणा सांडेल कसा?
|
Bee
| |
| Wednesday, June 20, 2007 - 1:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सशलचे बरोबर आहे. बुगडी हे एक कर्णभुषण आहे. इथे सांडली म्हणजे कानातून खाली पडली. लहान मुल खाली पडले की आपण नाही का म्हणत गमतीने अरेरे तू सांडलास का...
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 20, 2007 - 4:30 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बुगडी हा कानात घालण्याचा एक दागिना. सांडणे म्हणजे हरवणे इथे. एरवी आपण सांडणे म्हणजे पाणि सांडले ह्या अर्थाने म्हणतो पण ह्या गाण्यातील अर्थ हरवणे असा आहे.
|
Imtushar
| |
| Wednesday, June 20, 2007 - 9:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
इथे सांडणे चा अर्थ पडणे असा आहे... हरवणे असा नाही.
|
Pancha
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:18 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद, मला हे गाणे लुगडी माझी सांडली असे ऐकु यायचे.
|
Slarti
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:38 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद, मला हे गाणे लुगडी माझी सांडली असे ऐकु यायचे.
![](/hitguj/clipart/rofl.gif) पिंजरा चित्रपटातील 'दिसला ग बाई दिसला' या गाण्याच्या सुरुवातीला 'ज्वानीच्या आगीची मशाल हाती...' वगैरे बोल आहेत. माझा एक मित्र ते गाताना '...काजवा उडं, किरकिर किडं...' याऐवजी '...लांडगा उडं...' असे गायचा त्याची आठवण झाली. ('लांडगा उडेल कसा हा प्रश्न तुला कधी पडला नाही का?' या प्रश्नाला त्याने 'पडायचा, पण काहीतरी लोककथेचा संदर्भ असेल किंवा अलंकारिक भाषा असे वाटायचे' असे उत्तर दिले होते.)
|
Mansmi18
| |
| Wednesday, June 20, 2007 - 5:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुषार, तुझे बरोबर आहे. "पडली" या अर्थाने "सांडली" ह शब्द वापरला आहे. त्यातही हि लावणी "ग. दि. माडगूळकर" नावाच्या काहीशा लोकप्रिय कवीने लिहिली आहे चपखल शब्द वापरण्यात त्यान्चा हात(लेखणी) धरणारे कोणी आतापर्यंत तरी झाले नाही!
|
ग. दि. माडगूळकर" नावाच्या काहीशा लोकप्रिय कवीने लिहिली आहे>>>>> खर तर हे गाणं एका लोकप्रिय गाण्याचा अनुवाद आहे. झुमका गिरा रे चा. पण झुमका हा शब्द मराठी नाही म्हणुन त्यांनी खा बुगडी हा शब्द तिथे आणला. ( त्यांचा आठवनीत लिहीले आहे)
|
Sunilt
| |
| Wednesday, June 20, 2007 - 8:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
केदार, "बुगडी माझी ..." हे गाणे १९५९ साली बनविलेल्या "सांगत्ये ऐका" ह्या चित्रपटातील असून. "झुमका गिरा रे ..." हे गाणे १९६६ साली बनविलेल्या "मेरा साया" ह्या चित्रपटातील आहे. तेव्हा कोणी कोणाचा अनुवाद केला? अजून एक - "सांगते ऐका" वरून हिंदीत "भूमिका" हा चित्रपट बनला. तर, "पाठलाग" ह्या मराठी चित्रपटावरून हिंदीत "मेरा साया" बनविला गेला.
|