ते गर्ग नसून गार्ग्य असावे. कारण गार्ग्य हे एक गोत्र आहे. गार्गी गार्ग्यची कन्या असू शकते.
|
सापडले!! गार्गी ही वचकनू vachaknu नावाच्या ऋषींची कन्या होती पण गार्ग्य गोत्रात जन्माला आल्याने गार्गी या नावाने प्रसिद्ध झाली. आमचे गोत्र गार्ग्य असल्याने शोध घ्यावा असे वाटले. तिचे खरे नाव वाचकन्वी होते
|
गर्गरायला लागलं आहे वाचून बाकी भोपळ्याचे घार्गे मस्त लागतात
|
बाकी भोपळ्याचे घार्गे मस्त लागतात >>> तसे घागरा चोळी मधले घागरे पण व नेसणार्या ललनासुद्धा मस्त असतात. 
|
काल ई-सकाळमध्ये ’आत्मभान’ नावाचा शब्द वाचला. मला त्याचा अर्थ माहिती नाही ! कोणाला माहिती आहे का ? सांगू शकेल का ?
|
Zelam
| |
| Wednesday, June 13, 2007 - 12:34 am: |
| 
|
आत्मभान चा अर्थ बहुतेक अंतरात्म्याशी संबंधित असावा. म्हणजे भौतिक सुखांचा विचार न करता खरोखरच आपल्या अंतरात्म्याला काय वाटतं हे जाणण्याची process म्हणजे आत्मभान असं आपलं मला वाटतं. CBDG . concept शी जुळतोय का अर्थ?
|
काल ई-सकाळमध्ये ’आत्मभान’ नावाचा शब्द वाचला>>>> आत्मभान म्हणजे स्वत:बद्दल, स्वत्:बद्दलच्या जाणिवा, प्रतिष्ठा,क्षमता,भावना यांची जाणीव होणे. हल्ली स्त्रियांच्या चळवळी, उपेक्षितांच्या चळवळीत हा शब्द नेहमी ऐकू येतो. हा आध्यात्मिक शब्द नसून सामाजिक आहे
|
झेलम, रॉब, "स्वत:ची प्रतिष्ठा" हा अर्थ बरोबर असावा, कारण ज्या संदर्भात तो वापरला आहे, त्या संदर्भात प्रतिष्ठा फक्कड बसतोय. धन्यवाद !
|
Ksha
| |
| Thursday, June 14, 2007 - 1:40 am: |
| 
|
रॉबिनहूड, सकाळने ज्या संदर्भामध्ये हा शब्द वापरलाय त्यात त्याचा अर्थ स्वप्रतिष्ठा असा होतो. पण मूळ शब्द हा आध्यात्मिक साहित्यातूनच आला आहे.
|
Bee
| |
| Thursday, June 14, 2007 - 3:06 am: |
| 
|
Empathy ला मराठी शब्द माहिती आहे का?
|
मला वाटते empathy म्हणजे सहानुभूती ?
|
Bee
| |
| Thursday, June 14, 2007 - 3:42 am: |
| 
|
ती sympathy झाली, छत्रपती. मला empathy मधील भाव कळतो पण त्यासाठी नक्की मराठी शब्द माहिती नाही. सहानूभुती (sympathy) म्हणजे एक प्रकारची किव करणे, दया दाखविणे, त्या व्यक्तीबद्दल हळहळ वाटणे. पण empathy मधे तुम्ही असा विचार करता की ज्या परिस्थितीमधे ती व्यक्ती आहे त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आहात. त्या व्यक्तीसोबत जे काही घडते आहे ते सर्व तुम्ही तुमच्यासोबत घडत आहे असे अनुभवू शकता. sympathy ही व्यक्तीला दुबळी करू शकते. पण empathy नाही.
|
सहानुकंपन पण हा मराठी शब्द नाही, संस्कृत आहे. 1. empathy denotes a deep emotional understanding of another's feelings or problems, while sympathy is more general and can apply to small annoyances or setbacks 2. sympathy means the stimulation in a person of feelings that are similar in kind to those that affect another person; empathy means a mental or affective projection into the feelings or state of mind of another person http://thesaurus.reference.com/browse/empathy
|
Zakasrao
| |
| Thursday, June 14, 2007 - 4:39 am: |
| 
|
Understanding and entering into another's feelingsहा वर्ड वेब ने दिलेला अर्थ. त्यात स्पष्ट होतोय. पण नेमका शब्द नाही आठवत. पण आपण म्हणतो ना कि दुसर्याच्या चप्पल मधे पाय घाअणे हे त्यातीलच आहे.
|
मला वाटतेय GRE मध्ये हा शब्द कायम असायचा, कारण sympathy आणि empathy मध्ये बारीक फरक आहे. आता पुसट आठवतंय ... मी google आणि Wikipedia वर बराच फाईट मारला, पण मराठी प्रतिशब्द नाही सापडला. संस्कृत शब्द मात्र आहे, जो वर लिहिलाय.
|
Bee
| |
| Thursday, June 14, 2007 - 5:23 am: |
| 
|
इतके प्रयत्न केल्याबद्दल तुझे आभार.. ... अनुकंपा हा मराठी शब्द आहे, छत्रपती. सहानुकंपन त्याचेच एक रुप आहे असे वाटते..
|
Imtushar
| |
| Thursday, June 14, 2007 - 9:45 am: |
| 
|
छत्रपतींनी empathy आणि sympathy मधील फरक सांगितलाच आहे, पण 'सहानुकंपन' हा empathy ला प्रतिशब्द होईल असे नाही वाटत ('अनुकंपा' म्हणजे sympathy , किंवा सहानुभूती). empathy ला माझ्या मते 'कणव' म्हणता येईल, कारण या भावनेचा माणूस समोरच्याचे दु:ख ऐकून, समजून घेतो, पण त्या दु:खाची अनुभूती घेत नाही
|
बी, अरे अनुकंपा हा संस्कृतमधूनच मराठीमध्ये आलेला 'परभाषिय़' शब्द असणार. 'कंप' हाच शब्द मूळ संस्कृत नाही का ? इम्तुषार, 'कणव' हा शब्द empathy बरोबर बरीच जवळीक साधतोय, असे मला वाटते. बी, तुला काय वाटते ? मी काल English - मराठी शब्दकोशातदेखील empathy चा अर्थ शोधला, पण empathy शब्द सापडला नाही. देशात विचारले पाहिजे.
|
Slarti
| |
| Thursday, June 14, 2007 - 7:13 pm: |
| 
|
सहवेदना हा शब्द असू शकतो किंवा कदाचित सहानुभव...
|
Zelam
| |
| Thursday, June 14, 2007 - 8:11 pm: |
| 
|
स्लार्टी मलाही ते सह-अनुभव असेच वाटले होते किंवा सहसंवेदना. पण सह-अनुभव काय आणि सह + अनुभव = सहानुभव किंवा सह + अनुभूती = सहानुभूती सारखंच वाटतं ना? तसच Sympathy म्हणजे "feeling with" आणि empathy म्हणजे "feeling into" मग सह ( with ) हा शब्द आला तर ते sympathy ला जास्त जवळचं नाही का? Imtushar - कणव दया अनुकंपा दुसर्याबद्दल वाटते आपल्याला. पण त्यात दुसर्याचे दुःख अनुभवणे कुठे अभिप्रेत आहे? कुठेतरी वाचल्याप्रमाणे empathy gives one a sense of participating . मग कणव / दया दाखवताना आपण फक्त सहानुभूतीच दाखवतो की. एवढं सगळं लिहिलं पण empathy ला मराठी प्रतिशब्द सुचतच नाहीये.
|