Bee
| |
| Thursday, June 14, 2007 - 8:18 am: |
| 
|
कवी मनमोहन हे विनायक दामोदर सावरकर ह्यांच्या काळातील कवी. ही त्यांची एक कविता मी इथे लिहितो आहे. कुणाकडे जर ह्या कवीच्या आणखी काही कविता असतील तर इथे त्या लिहा. काही संदर्भ असतील तर तेही लिहा. मला आणखी कविता मिळवायच्या आहेत. ह्या कवितेत काही चुका असण्याची शक्यता आहे. एखादे अक्षर, काना मात्रा विलांटी, शब्द चुकीचे असण्याची मला शक्यता वाटते. जर कुणी ती चुक शोधून काढली तर बरे होईल. मी कागद झाले मी मुलतानमधले मुक्त, तू कैद्यांमधला कैदी, तुझे नि माझे व्हावे ते सूर कसे संवादी? माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी, जड लंगर तुझीया पायी तू पीस कसा होणार माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, विनायकाने मग त्यांची आळवणी केली नाही, पापण्यान्त जळली लंका, लाह्यांपरी आसू झाले, उच्चारून होण्याधीच, उच्चाटन शब्द आले, दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली, मी कागद झाले आहे, चल लिही; असे ती वदली!
|