निश्पादन / निष्पादन या सरकारी मराठी शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल काय? हुडा? आहेस का रे?
|
बहुधा काढणे असावे. काढणे म्हनजे खनिज काढणे अशा अर्थाने... सरकारात ’बाष्पके व धूम्र उपद्र्व " नावाचे एक खाते आहे हे माहीत आहे का? 
|
कुणीतरी एका मुलाला दत्तक घेत आहे.. त्याच्याशी संबंधित कागदपत्रावर हा शब्द आहे 'निष्पादनाची तारीख'.. त्याचे भाषांतर हवे आहे..
|
संपादन करणे = मिळवणे, घेणे,एकत्र करणे.. त्या चालीवर सरकारी भाषान्तर निष्पादन = देणे deliver करणे अशा अर्थाने केले असावे! असं आपलं मला वाटतंय
|
Slarti
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:37 pm: |
| 
|
विनय, Cologne digital sanskrit lexicon प्रमाणे निष्पादन : effecting , causing , producing
|
Bee
| |
| Thursday, May 24, 2007 - 6:07 am: |
| 
|
निष्पादन करणे म्हणजे घडवून आणणे. निष्पादनाची तारीख म्हणजे ज्या दिवशी अमूक अमूक घटना कधी घडली त्याची तारीख..
|
Aj_onnet
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:00 pm: |
| 
|
माझ्या एका मित्रासाठी खालील माहिती हवी आहे! Hello All, Can you tell me meaning of following words? I’ve indicated the use in front of them, as I encountered it: असिधाराव्रत : मीच माझं ते असिधाराव्रत स्वीकारायला भाग पाडणारं अस्तित्व अमान्य केल्यावर मी बागेश्री इनामदार कशी असणार? आत्मरती/पररती : पररतीमागे पळणारा कधी स्थिरावलाय? निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्ट आत्मरतीचं उदाहरण आहे. Thanks in advance! Cheers, -Sachin
|
शाळेत संस्कृतच्या तासाला हा एक शब्द ऐकला होता : Railway Traffic Signal : अग्निरथगमनागमनसूचकताम्रलोहपट्टिका पेढा : दुग्धशर्करायुक्तघनगोलगट्टु
|
You suck = तू पिपासू आहेस.
|
Disha013
| |
| Friday, June 01, 2007 - 8:42 pm: |
| 
|
छत्रपती,ट्रॅफ़ीक सिग्नल भारीच. पाककलेत तो 'पेढा बिघडला' बीबी आहे ना, त्याचे नाव बदलुन 'दुग्धशर्करायुक्तघन्गोलगट्टू' बिघडला' असे ठेवायला हवे.
|
असिधारा म्हणजे तलवारीची धार.. तलवारीच्या धारेवरून चालण्याचे व्रत. फारच कठीण व्रत किंवा कसोटी,तप ई.
|
Abhis87
| |
| Sunday, June 03, 2007 - 2:52 am: |
| 
|
hey!!mala pan sangana,marathit kasa lhiwaycha...mala pan marathit lhiwaycha aahe..hey kiti changla ahe na...amhi sagle marathit conversation karu shakto
|
Gurudasb
| |
| Sunday, June 03, 2007 - 4:52 am: |
| 
|
मोका आणि संधी यातील सूक्ष्म भेद कोणता ?
|
Slarti
| |
| Sunday, June 03, 2007 - 3:07 pm: |
| 
|
पहिला उर्दू / फारसी ( CBDG ) आणि दुसरा संस्कृत आहे हा... ( sorry , पण अगदीच राहवले नाही...) तुम्ही म्हणता तसा फरक सूक्ष्म असावा कारण काही वाक्यांमध्ये दोन्ही शब्द वापरून बघितले, काही फरक जाणवला नाही. उर्दूमध्ये 'मौका-ए-वारदात' असा काहीतरी शब्दप्रयोग आहे ना ? तो हाच मोका का ? म्हणजे उर्दूमध्ये मोका या शब्दाला दुसरेही काही अर्थ दिसतात. आपण मराठीत हा शब्द त्या इतर अर्थासाठी वापरतो का ?
|
Bee
| |
| Monday, June 04, 2007 - 1:54 am: |
| 
|
'मोक्यावरची जागा' अशा एका वेगळ्या अर्थानी आपण मोका हा शब्द वापरतो मराठीत. इथे 'मोक्या' ऐवजी 'संधी' हा शब्द वापरला तर ती शब्दरचना चुकीची दिसेल. त्यामुळे मोका आणि संधी ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ जरी एकच होत असला तरी संदर्भानुसार ह्या शब्दांची निवड करणे जास्त योग्य होईल. उर्दू किंवा हिंदीमधे 'मौका' आणि मराठीत 'मोका'. म्हणजे मराठीत एक मात्रा कमी, हा एक फ़रक मला जाणवतो आहे.
|
Imtushar
| |
| Monday, June 04, 2007 - 11:07 am: |
| 
|
संधीसाधू (मराठी) = मौकापरस्त (उर्दू) यात फरक हा की मौका म्हणजे (कधी कधी योग्य) वेळ आणि संधी म्हणजे (जेव्हा या संदर्भात वापरतो तेव्हा) (नेहमीच) योग्य वेळ मौका-ए-वारदाद पे = घटनेच्या वेळी. हाच उर्दूचा मौका मराठीत मोका बनून येतो त्यावेळेस तो थोड्या वेगळ्या अर्थानेही वापरला जातो (उदा. (बी ने सांगितल्या प्रमाणे) मोक्याची जागा)
|
Bee
| |
| Friday, June 08, 2007 - 4:11 am: |
| 
|
मला 'lime-light' ह्या शब्दाचा मराठी अनुवाद कुणी देऊ शकेल का?
|
Zakasrao
| |
| Friday, June 08, 2007 - 7:57 am: |
| 
|
बी प्रकाश झोतात राहणे. प्रसिद्धीत राहणे असा अर्थ होइल त्याचा.
|
Bee
| |
| Friday, June 08, 2007 - 8:23 am: |
| 
|
अगदी बरोबर झक्कास.. धन्यवाद...
|
Mandard
| |
| Friday, June 08, 2007 - 8:29 am: |
| 
|
अगदी बरोबर झक्कास.. धन्यवाद... ------------- बी तु काय झकासरावांची परिक्षा घेत होतास का? असो त्याचा अर्थ आहे lime लिंबु light प्रकाश लिंबु प्रकाश किंवा प्रकाशातील लिंबु :-)
|