|
Nanya
| |
| Friday, April 20, 2007 - 12:57 am: |
| 
|
शिकवा = तक्रार असावे.. ...
|
Sunilt
| |
| Friday, April 20, 2007 - 1:17 am: |
| 
|
अरेच्चा !! "शिकवा" शिकवायचे राहूनच गेले !! बरोबर. शिकवा = तक्रार
|
Disha013
| |
| Friday, April 20, 2007 - 4:06 am: |
| 
|
मला वाटते,फ़ना म्हणजे कुर्बान असावे....
|
Bee
| |
| Friday, April 20, 2007 - 4:43 am: |
| 
|
नागाचा पण फ़ना असतो ना..
|
Nanya
| |
| Friday, April 20, 2007 - 5:21 am: |
| 
|
नागाचा फ़णा असतो. "फ़ना होना" म्हणजे "नष्ट होणे" असे कुठे तरी वाचले आहे.
|
Swa_26
| |
| Friday, April 20, 2007 - 5:28 am: |
| 
|
फना चा अर्थ उध्वस्त होणे... C.B.D.G.
|
Psg
| |
| Friday, April 20, 2007 - 5:31 am: |
| 
|
बरोबर, फ़ना म्हणजे नष्ट होणेच, पण प्रेमात! म्हणजे एखादा खाद्यपदार्थ खराब झाला, तर तो 'फ़ना' झाला असं म्हणणे बरोबर नाही फ़ना म्हणजे प्रेमात, प्रेमासाठी संपून जाणे. तो सिनेमा आला होता तेव्हा स्पष्टीकरण होते.. फ़ना.. destroyed in love .
|
Farend
| |
| Friday, April 20, 2007 - 6:20 am: |
| 
|
पूनम, कोठेही संपून जाणे असावे, फक्त प्रेमातच असेल असे वाटत नाही, कारण साहिरनेच म्हंटले आहे 'घटा मे छुपके सितारे फ़ना नही होते...'
|
Mahesh
| |
| Friday, April 20, 2007 - 7:56 am: |
| 
|
फनावरून एक शेर आठवला. ईश्रत ए कतरा है दरियामे फना हो जाना दर्द का हद से गुजरना है दवा हो जाना इश्रत म्हणजे मुक्ती , कतरा म्हणजे थेंब , ईश्रत ए कतरा म्हणजे थेंबाची मुक्ती , दरियामे फना हो जाना म्हणजे समुद्रात मिसळून जाणे. पुढचा अर्थ सांगायची गरज नसावी. 
|
Bee
| |
| Friday, April 20, 2007 - 10:53 am: |
| 
|
खूप दूर, फ़नाचा अर्थ बरबाद होणे असा होतो पण तो संदर्भानुसार घ्यायचा असतो. केवळ प्रेमात पडून बरबाद होणे हा एकच अर्थ निघत नाही त्यातून..
|
Bee
| |
| Friday, April 20, 2007 - 11:02 am: |
| 
|
पूनम, मराठीत देखील आपण एखादा पदार्थ खराब झाला तर तो पदार्थ नष्ट झाला असे म्हणत नाही..
|
Zakki
| |
| Friday, April 20, 2007 - 12:24 pm: |
| 
|
सुनिल नि इतर, अनेक धन्यवाद. आता आपण ही चर्चा इथेच थांबवू का? नाहीतर 'मराठी पोलिस' (कोण असावेत बरे हे? पहिले अक्षर झ व शेवटचे की. ओळखा.) इथे येऊन ओरडतील, 'मायबोलीवर फक्त मराठी' म्हणून.
|
Shonoo
| |
| Friday, April 20, 2007 - 12:25 pm: |
| 
|
पण ' रुसवाइयां है मेरे माझी की' या पूर्ण ओळीचा अर्थ काय? मला कधीच कळला नव्हता.
|
Bee
| |
| Monday, April 23, 2007 - 9:39 am: |
| 
|
'पांधान वाजणे' ह्याचा अर्थ मला सांगू शकेल का कुणी इथे? मी कायद्याचे बोला ह्या मराठी चित्रपटात हा शब्द ऐकला.. पांधान म्हणजे बडीशेप, सुपारी, काथ, चुना ठेवायचा ट्रे.. बरोबर ना मी? मग त्याचा मी अर्थ असा लावला की पांधान वाजून हे सर्व व्यंजन एकत्रीत झाले. अर्थात एखादी गोष्ट बिघडणे.. पण नक्की अर्थ कळला तर बरे होइल.
|
कायद्याचं बोला मधे? पांधान? मी नाही बॉ असं काही ऐकलं 
|
शोनू, रुसवाई म्हणजे बदनामी. मेरे हमराज़भी रुसवाईयाँ हैं मेरे माज़ी की.. माझ्यासोबत आता माझी ( भूतकाळात झालेली) अपकीर्तीच काय ती आहे.
|
Parop
| |
| Thursday, April 26, 2007 - 12:08 pm: |
| 
|
पांधान? माझ्यामते शब्द पानदान असावा... 'पानदान वाजणे' चा अर्थ बेरंग होणे किंवा बोजवारा उडणे असा आहे...मात्र त्याची व्युत्पत्ती माहित नाही!
|
Bee
| |
| Friday, April 27, 2007 - 2:08 am: |
| 
|
परोप, तुझे बरोबर आहे तो शब्द पानदान असाच आहे पण म्हणताना त्याचा उच्चार सहज पांधान असा होतो.. जसे लवकर म्हणताना लौकर होतो तसा. मैत्रेयी, आहे हा वाक्प्रचार त्या सिनेमात. मी परत परत ऐकला...
|
Parop
| |
| Thursday, May 10, 2007 - 7:36 am: |
| 
|
पूर्वी एखाद्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पानाचा विडा देण्या-घेण्याची पद्धत होती.. . चर्चा फ़िस्कटली या अर्थी 'पानदान' वाजले असा शब्दप्रयोग आला असेल का?....
|
मंडळी, माफ करा, पण या मुद्द्यावर माझा अलिकडेच एके ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाद झाला. आपल्या मायबोलीतला सर्वांचा लाडका शब्द ’च्या आईला’ ही सर्वश्रुत शिवी आहे. परंतु ही शिवी कशी झाली हे मला उमजत नाही. खरे पाहता या दोन शब्दात काहीही वाईट नाही. कदाचित यापुढे एखादा अश्लील शब्द अध्याह्रुत असावा आणि तो जर त्यापुढे आला, तर खरोखर ती शिवी होवू शकेल. नुसत्या या दोन शब्दांनी फक्त वाक्य पूर्ण होते. मी असेही ऐकले की देऊन देऊन ही शिवी आता ’शिवी’ वाटत नाही, पण खरेतर ती शिवी आहे. बेसिकली, वाईट अर्थाचा शब्द म्हणजे शिवी, पण या दोन शब्दात वाईट काही नाही. हे तर मराठी अव्यय वाटते. कृपया मदत करा. आपले विचार महत्त्वाचे आहेत. धन्यवाद -- छत्रपती.
|
|
|