Dineshvs
| |
| Saturday, February 24, 2007 - 1:07 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि चुंग वा फ़ा नि ठु चा अर्थ काय दिलाय ?
|
Pooh
| |
| Saturday, February 24, 2007 - 1:43 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, ते शब्द "चुंग वा ता नी ठू" असे आहेत. अर्थ तुम्हाला महिती आहेच. "चिनी माती".
|
Bee
| |
| Monday, February 26, 2007 - 2:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अंशुक म्हणजे नुसते वस्त्र नसून 'रेशमी वस्त्र' असा त्याचा अर्थ आहे.
|
Bee
| |
| Tuesday, February 27, 2007 - 4:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अन्योन्याने किती झोकले गेले ते दीन गेले.. वरील ओळीत 'अन्योन्याने' ह्या शब्दाचा अर्थ कुणाला माहिती असेल तर मलाही ज्ञात करुन द्या
|
Bee
| |
| Tuesday, February 27, 2007 - 6:49 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
समरप्रसंग, समरनाट्य असे समर शब्दाशी निगडीत शब्द मला माहिती आहेत. एका कुठल्या तरी राष्ट्रगीतात 'समर धुरंदर लाटालहरी' अशी एक ओळ आहे. बहुतेक 'हिमालयाची शिखरे गाती..' मधेच ही ओळ आहे. तर समर म्हणजे नक्की काय?
|
Raadhika
| |
| Tuesday, February 27, 2007 - 8:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
समर म्हणजे उन्हाळा समरप्रसंग: खूप कडक उन्हाळ्याची वेळ समरनाट्य: उन्हाळ्यात सादर करण्याचे नाटक
|
Bee
| |
| Tuesday, February 27, 2007 - 8:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
राधिका मस्करी करतेस का मी summer नाही विचारत आहे. समर विचारत आहे. उच्चार जरी सारखे असले तरी दोन वेगळ्या भाषेतील एकाच उच्चारांचे भिन्न शब्द आहेत ते
|
Mrunmayi
| |
| Tuesday, February 27, 2007 - 8:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
समर प्रसंग म्हणजे युध्दाचा प्रसंग., समर धुरंधर म्हणजे युध्दामधे निष्णात असा असावा.
|
Bee
| |
| Tuesday, February 27, 2007 - 9:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पण ह्यावरुनही नक्की अर्थ लक्षात येत नाही Mrinmayi...
|
Zakki
| |
| Tuesday, February 27, 2007 - 2:13 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मागच्या पुढच्या दोन तीन ओळी वाचल्यावर कदाचित् लक्षात येईल. बाकी आजकाल काय, सा रे ग म प वर महायुद्धे चालू असतात. अमेरिकेत कुणि साधे आजारी पडतच नाहीत, ते सर्दीशी किंवा जखमेशी युद्ध करत असतात! तेंव्हा ह्या शब्दाचा अर्थ जरा संदर्भावरून ठरवायला पाहिजे.
|
कुणीतरी माझ्या प्रशाचं उत्तर पण द्या की.
|
Bee
| |
| Wednesday, February 28, 2007 - 7:28 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे युवराज सध्या ती मैत्रेयी आणि रॉबीनहूड नाहीयेत इथे. अन्यथा धडाधड उत्तरे मिळाली असती त्यांच्याकडून
|
Vinayak
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:46 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Genetics या साठी मराठीत काय शब्द आहे?
|
वंशशास्त्र, बहुतेक. genes ला जनुक असा शब्द पण वापरला जातो.
|
Bee
| |
| Wednesday, March 14, 2007 - 2:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मलाही वंशशास्त्र असेच वाटते आहे.
|
जनुक विज्ञान अथवा जनुक शास्त्र म्हणतात.
|
मैत्रेयी आणि रॉबिनहूड मला सांगा ना जरा की 'सांध्यपर्वातील वैष्णवी' चा अर्थ काय होतो?
|
Bee
| |
| Monday, March 19, 2007 - 8:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
युवराज, मला वाटतं हे दोन्ही नाम आहेत. म्हणजे सांध्यपर्वत आणि वैष्णवी. त्यांचा संदर्भ तिथे आला असेल. तुम्ही जिथे हे दोन नाम वाचलेत त्या ओळी इथे लिहू शकलात तर त्यावरून काही अंदाज बांधता येईल.
|
Milindaa
| |
| Monday, March 19, 2007 - 11:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सांध्यपर्वातील <<< म्हणजे सांध्यपर्वत <<< बी, पर्वातील आणि पर्वत यात काय काय साम्य आहे हे उदाहरणे देऊन स्पष्ट कर पाहू
|
Shonoo
| |
| Monday, March 19, 2007 - 12:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे सांध्य पर्वातील वैष्णवी हे ग्रेस यांच्या पुस्तकाचं नाव आहे. पर्व म्हणजे कालाचं एक Unit of Measurement जसे युग, तप, वगैरे. माझ्या मते युगा पेक्षा लहान आणि वर्षा पेक्षा मोठं. सांध्य मला वाटतं संध्याकाळ शी सम्बंधित असणार. वैष्णवी नावाच्या तीन मुलींच्या आयांना मी अर्थ विचारला तिघींनी दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी असा अर्थ सांगितला. आता हे literal अर्थ झाले. ग्रेस च्या कुठल्याही शब्दसमूहाचे figurative अर्थ सांगायला जर मला जमलं असतं तर मी कोड्-कारकूनगिरी का केली असती पोटापाण्यासाठी :-)
|