ढसाळांच्या काही कविता.... --------------------- काव्यसंगह: गोलपिठा तुही इयत्ता कंची मूर्ख म्हाता-याने डोंगर हलविले खेळ मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे गांडू बगीचा या सत्तेत जीव रमत नाही प्रियदर्शनी तुझे बोट धरून चाललो आहे मी
|
डोळ्यांना लगडलेल्या अंधाराच्या चिमण्या उडून जाताहेत... बेघर पोरांचे पाय कब्रस्तानमध्ये दिसताहेत. आपण गाळू आपल्यातले शिया-सुन्नी दर्गे गुडघे टेकून रडू कबरीकबरीवर... अल्लाहू अकबर... अल्लाहू अकबर... -------(गोलपिठा)-------------
|
वाल्मीकीची कार्बनकाॅपी व्हायचे नव्हते मला प्रपंचाच्या रगाडयाने केले मला पापाचे धनी बायकोला म्हणालो--'घे यातले थोडेसे वाटून' तिने कानांवर हात ठेवले! मुलालाही हीच वाक्ये म्हणून दाखविली त्याने तर अंगाला पान सुद्धा लावुन घेतले नाही वाल्मीकीने पापाचे ओझे वाहत वाहत अजरामर आर्षकाव्य तरी लिहिले. आणि मी? मी जगण्याचे ओझे येथपर्यंत वाहत आणले. हे जगण्याच्या वास्तवा आता तुच सांग मी काय लिहू? (मी मारले सूर्याचे रथाचे सात घोडे)
|
Zaad
| |
| Monday, March 12, 2007 - 9:42 am: |
| 
|
व्वा!! हे काम तूच करशील अशी खात्री होतीच. जमल्यास ढसाळांची मुलाखत इथे टाकता आली तर पहा.
|
हो अवश्य! येत्या काही दिवसात व्यवस्थित संकलन करून पोस्ट करतो.
|