ही एक हिंदी गझल आहे. सच ये है बेकार हमें गम होता है जो चाहा था दुनिया में कम होता है ह्या मधे पुढे एक शेर आहे ज्याच्या पहिल्या ओळीचा अर्थ काहीच लागत नाही. जहन की शाखोंपर अशार आ जाते है जब तेरी यादोंका मौसम होता है जितका अंदाज लागतो तेवढ्यावरून "अंगावरती शहारे येतात" किंवा त्याच्या आसपास असा अर्थ आहे असं वाटतं.
|
तुझ्या आठवनीने माझ सर्वागं (शरीर) रोमांचीत होत असा त्याचा अर्थ आहे.
|
Maitreyee
| |
| Saturday, December 23, 2006 - 12:59 am: |
| 
|
मला तो अर्थ चूक वाटत आहे. इतकं सोपं नसावं ते. जहन चा अर्थ मन, विचार असा कहीसा आहे..
|
जहन म्हणजे शरीर. अशार म्हणजे एकतर फुल किंवा काटे ( पुर्ण शेर जसा आहे तसा अर्थ घ्यावा लागेल). जर आधीचे शेर प्रेम भावनेतील असतील तर रोमांचीत करनार्या आठवनी ( फुल) नाहीतर काटे. जसे शहारे येने वैगरे.
|
जहन म्हणजे मेंदू बुद्धी. आणि अशार हे शेर चे अनेकवचन आहे. या शेराचा अर्थ तुझ्या आठवणींच्या काळात खूप शेर सुचतात (मेंदूंच्या फांद्यांवर खूप शेर फुलतात) असा होतोय.
|
Shonoo
| |
| Tuesday, February 13, 2007 - 3:48 pm: |
| 
|
शेवटी काल उर्दू शब्दकोष उघडून पाहिला ज़ेहन असा शब्द आहे. ज़हन असा नाहीये, त्याचा अर्थ बुद्धी, मेंदू, स्मरणशक्ती असा दिलाय.
|
अरे ईकडे लक्ष न्हवत. सॉरी गाईज मी भलताच अर्थ लिहिला. संघमित्रा नी शोनू धन्यवाद.
|
Zakki
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:40 pm: |
| 
|
लक्षिकाति या मराठी शब्दाचा अर्थ इथे कळेल का? का हा BB फक्त परकीय शब्दांच्या मराठी अर्थासाठी आहे? घन:श्याम सुंदरा या प्रसिद्ध गाण्यात तो शब्द येतो. पण त्याचा अर्थ माहित नाही. धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 14, 2007 - 4:43 pm: |
| 
|
झक्कि, मला वाटते त्याचा अर्थ अपेक्षेने बघणे असा होत असावा. लक्षिताति वासुरे, हरि धेनु स्तनपानाला अशी ओळ आहे ना ती ?
|
Zakki
| |
| Wednesday, February 14, 2007 - 5:10 pm: |
| 
|
हाच अर्थ बरोबर वाटतो. धन्यवाद.
|
Mrinmayee
| |
| Wednesday, February 14, 2007 - 5:16 pm: |
| 
|
लक्षिणे (विरुध्दार्थी : दुर्लक्षिणे) ह्यात अपेक्षेचा भाग येतो का? की लक्ष ह्या शब्दापासून तयार झाल्यामुळे त्यात फक्त 'बघणे (एका ठराविक ठिकाणी)' हाच भाग गृहीत असतो?
|
कुणी मला 'सांध्यपर्वातील वैष्णवी' याचा अर्थ सांगेल काय?
|
Mrunmayi
| |
| Friday, February 23, 2007 - 12:15 pm: |
| 
|
मला चीनंशुक या शब्दाचा अर्थ हवा आहे कोणी सांगेल काय
|
एकाच पानावर दोन मृण्मया? परमेश्वरा तुझी लीला अपरम्पार आहे...
|
हुडा, माताजींचे काय? त्या दाखवतील त्या लीला आपण बघायच्या...
|
Pooh
| |
| Friday, February 23, 2007 - 3:54 pm: |
| 
|
मृण्मयी, तो शब्द चीनांशुक असा आहे. त्याचा अर्थ "रेशमी वस्त्र" असा आहे. ९५% खात्री आहे. १००% नाही
|
Dineshvs
| |
| Friday, February 23, 2007 - 4:08 pm: |
| 
|
चीनशुंक चा अर्थ मला नाही माहित, पण मला वाटते पळसाच्या झाडाला किम्शुक असे नाव आहे. याचा अर्थ किम शुक, म्हणजे राघुच कि काय, असा आहे. पळसाची कोवळी पालवी, हिरव्या पोपटांप्रमाणे दिसते म्हणुन, बहिणाबाईच्या एका ओवीत, पण असा उल्लेख आहे.
|
Karadkar
| |
| Friday, February 23, 2007 - 6:23 pm: |
| 
|
अंशुक म्हणजे वस्त्र ना?
|
Pooh
| |
| Friday, February 23, 2007 - 7:06 pm: |
| 
|
कराडकर, बरोबर, अंशुक म्हणजे वस्त्र. मीन प्रभू यांच्या "चिनी माती" पुस्तकामधे रेशमाच्या इतिहासाची माहिती दिली आहे. त्यात रेशमाला संस्कृत मधे "चीन" म्हणतात असे लिहिल्याचे अंधुकसे आठवते आहे. नक्की खात्री नव्हती म्हणून ९५% लिहिले होते.
|
Pooh
| |
| Friday, February 23, 2007 - 8:25 pm: |
| 
|
आत्ताच घरी आल्यावर "चिनी माती" पुस्तक काढून बघितले. चीनांशुक म्हनजे चीन हून आलेले वस्त्र म्हणजे रेशीम. असा अर्थ दिला आहे.
|