|
Purogami
| |
| Saturday, February 03, 2007 - 9:54 pm: |
| 
|
अप्रतिम युवराजशेखर खरंच फार उत्तम गझला आहेत सुरेश भटांनंतरही मराठीत इतक्या चांगल्या गझला कुणी लिहीतो हे माहितंच नव्हतं सानेकरांची किती पुस्तकं आली आहेत? कृपया मला तू त्यांच्या पुस्तकांची नावं सांगशील का? आणि अजून अशाचप्रकारे गझला पोस्ट करत जा.
|
पुरोगामी, सानेकरांचं आतापर्यंत एकच पुस्तक आलंय ते म्हणजे 'एका ऊन्हाची कैफियत' दुसरं पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे येईल तेव्हा नक्की कळवेन
|
अप्रतिम गझल आहेत युवराज . सानेकरांना अभिप्राय जरूर कळवा. आणि इथे पोस्ट केल्याबद्दल आभारी आहे . पुस्तक कुठे मिळेल कळलं तर फार बरं होईल . माझ्या पाहण्यात नाही . तसेच सानेकर कुठे असतात ? " तुझ्या डोळ्यांमध्ये गहिर्या असा मी हिंडतो आहे जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे " लिहीणार्या कवीला एकदा भेटायची इच्छा आहे . मेल केलीत तरीही चालेल .
|
Neelu_n
| |
| Monday, March 12, 2007 - 1:06 pm: |
| 
|
वैभव, सानेकर मुलुंडला रहतात. युवराज एका ऊन्हाची कैफियत नावची ऑडीओ कॅसेट पण आलीअय.. पदमजा फेणाणीने गायली आहेत सर्व गाणी. तीही सुंदर आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये गहिर्या असा मी हिंडतो आहे जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे तुझ्या सोडुन जाण्याची मला चंता आता नाही तुझा आभास सोनेरी मला सांभाळतो आहे तिथे बोलायला जाउ जिथे ना एकटे राहु ईथे एकांत एकाकी नको ते मागतो आहे तुझ्या कैफात मी आता तुलाही लागलो विसरु असे समजु नको तु की तुल मी टाळतो आहे
|
हो नीलू पण माझ्याकडे ती कॅसेट नाहीये,या व्यतिरीक्त सानेकरांनी लिहीलेल्या गझलांची 'हा गंध तुझा' ही कॅसेटदेखील आहे,सुरेश वाडकरने गायली आहेत बहुतेक गाणी
|
Neelu_n
| |
| Tuesday, March 13, 2007 - 10:13 am: |
| 
|
चाहुलिंचा या तुझ्या मग का जिवाला त्रास होतो भोवती नाहिस तु जर का तुझा आभास होतो? जोवरी दुनिया सभोती तोवरी असतो सुखी मी आठवण येता तुझी माझा सुरु वनवास होता जाणवे मजला कितिदा तु जवळ आहेस माझ्या बोलते आहेस माझ्याशी असाही भास होतो एकदा केव्हातरी माझ्या समोरी मुर्त होना आणि हा वैराण मौसम बघ कसा मधुमास होतो
|
vaaha mastach... kAy ekso ek gajhala ahet
|
Shyamli
| |
| Friday, March 28, 2008 - 6:40 am: |
| 
|
क्या बात है!!!!! निलु, यांच्या गज़लसंग्रहाच नाव सांग ना
|
Bee
| |
| Friday, March 28, 2008 - 2:49 pm: |
| 
|
सगळ्याच गझल सुरेख आहेत. लिहून काढल्याबद्दल धन्यवाद.
|
आपला मी हात हाती घेतला होता कुठे मीच माझ्यावर भरोसा ठेवला होता कुठे थांगपत्ता माणसांचा लागला होता कुठे आपला जो वाटला तो आपला होता कुठे माणसे दिसतात चिंध्यांसारखी चिरफाळली चेहरा इतका जगाचा फाटला होता कुठे त्या भरोशाच्याच मेघाने दिला आहे दगा बरसुनी गेला कुठे अन दाटला होता कुठे मी जरी त्याला चलाखीने दिल्या हुलकावण्या तो तरी माझ्या गळाला लागला होता कुठे वेगळा असतो कुठे माणूस कपड्या आतला 'हा' जरी नव्हता खरा तर 'तो' भला होता कुठे सूर्यकिरणालाच आधी आग तो समजायचा देह त्याचा चांदण्याने पोळला होता कुठे फैसला गेला सुनावुन शेवटी मृत्यू जरी मूळ झगडा जीवनाशी संपला होता कुठे आपली हूरहूर वाटे आपल्यालाही नवी आपल्या प्राणात आधी गलबला होता कुठे शेवटी दिसली बघ्यांची लक्तरे घाणेरडी नागडा होऊन तोही नाचला होता कुठे काठ ओलांडून यमुनेचा निघे राधा पुढे श्याम यमुनेच्या तिरावर थांबला होता कुठे सारखा वाटा चुकत मी वाट माझी शोधली मी नकाशा जीवनाचा काढला होता कुठे
|
तू गेल्यावर तुझ्यावरी ते हक्क आपला सांगत होते तेच लोक हे जितेपणी जे तुला सारखे टाळत होते झुंजत झुंजत मेला त्याची फिकीर कोणालाही नाही ज्यांना नुसते खरचटले ते घाव आपले मोजत होते उन्ह कोणते... कुठली किरणे... तेच फैसला करती यचा सूर्याला बघताना डोळ्यांवर जे झापड लावत होते एके काळी काळ असेही व्यंगचित्र रेखाटत होता दु:खीतांनी कसे रडावे हे हसणारे ठरवत होते कळलो नाही परस्परांना हाच अर्थ या मतभेदांचा काय समजलो होतो त्यांना... काय मला ते समजत होते आज आपले काय बिनसले , प्रेमाचीही झिंग चढेना ? एके काळी म्हणे आपले भांडणसुद्धा रंगत होते त्यांची समजुत झाली की ते आभाळाला सावरती, जे वीतवीतभर घेऊन मांजा पतंग हौशी उडवत होते युद्ध सुरू केलेस जरी तू, निकाल अजूनी बाकी आहे तुझा अखेरी जय झाला पण सर्व मागचे झुंजत होते गरिबी, श्रीमंती, बेकारी, स्वप्ने, अश्रू, आशा, हासू एका शहराच्या खुंटीवर सारे काही लटकत होते ज्याच्या दारी गेलो त्याचे स्वागत चौकीदार निघाले ओठावरती 'या' होते पण डोळे मागे ढकलत होते दृश्य पाहिले जेव्हा मी हे अपघाताची शंका आली ज्यांचे पायच वाळूचे ते डोंगर घेउन चालत होते नंतर कळले ते तर अमुच्या चिंध्यांचे होते व्यापारी ज्यांचे ज्यांचे झेंडे अमुच्या खांद्यावरती फडकत होते कोण न जाणे वसंत कुठला फुलण्यासाठी उत्सुक होता काही वेडे वाळूवरती रक्त आपले शिंपत होते आत शिरत जे होते त्यांनी हाल उभ्यांचे फारच केले आणि उभे जे होते ते तर बसलेल्यांना चेपत होते तहानलेले दोन समीक्षक तळ्यात एका बुडून मेले रंग कोणता पाण्याचा ते या मुद्द्यावर भांडत होते
|
सोसण्यातच झुंजण्याचा त्वेष भिनला पाहिजे आसवातच रंग रक्ताचा मिसळला पाहिजे कोणताही क्षण असो तो क्षण समजला पाहिजे काळ तर निसटेल त्याचा सूर धरला पाहिजे मी मला दिसतो जसा त्याच्यात प्रतिबिंबापरी त्याप्रमाणे तोसुद्धा माझ्यात असला पाहिजे वाट पायाखालची देईल थारा शेवटी जन्मभर चालून आधी जीव थकला पाहिजे आसवांचे थेंब व्हावे पारदर्शक एवढे माणसाचा चेहराही त्यात दिसला पाहिजे राग नुसता देत नाही आग शब्दांना कधी काळजाचा जाळही त्यांच्यात असला पाहिजे ठीक आहे, त्या तिथे थिजला कुणी ज्वालामुखी बर्फ झालेला इथे डोंगर भडकला पाहिजे हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे एक मुंगी साकडे घाली तिच्या देवाकडे 'एक, माझ्या हातुनी, पर्वत सरकला पाहिजे' होत गेली निर्मिती तो तसतसा झला निळा या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे
|
|
|