गाइ पाण्यावर काय म्हणुनि आल्या का गं गंगा यमुनाहि या मिळाल्या उभय पितरान्च्या चित्तचोरटीला कोण माझ्या बोलले गोरटीला... ...मला ही एकच कविता येते कवी बी यान्ची, आणखी कोणी पोस्ट करेल काय?
|
ही कविता बी कवींची नाही असे मला वाटते.. बहुधा यशवन्तांची.. चू. भू. दे. घे.
|
ही कविता बी यांचीच आहे. आचार्य अत्रे संपादित फुलांची ओंजळ या काव्यसंग्रहात ही कविता आहे.
|
याच कवितेची काही कडवी क्रमश्: :- उष्ण वारे वाहती नासिकात गुलाबाला सुकविती काश्मिरात नंदनातिल हलविती वल्लरीला कोण माझ्या बोलले छबेलीला शुभ्र नक्षत्रे चन्द्र चान्दण्याची दूड रचलेली चिमुकल्या मण्यान्ची गडे भूईवर पडे गडबडून काय आला उत्पात हा घडून विभा विमला आपटे-प्रधानान्च्या अन्य कन्या श्रीमान कुलीनान्च्या गौर चैत्रीची तशा सजुन येती रेशमाची पोलकी छिटे लेती तुला लंकेच्या पार्वतीसमान पाहुनीया होवोनि साभिमान काय त्यातिल बोलली एक कोण अहा आली ही पहा भिकारीण...
|
मुली असती शाळेतल्या चटोर एकमेकीना बोलती कठोर काय बाई चित्तात धरायाचे शहाण्याने ते शब्द वेडप्याचे रत्न सोने मातीत जन्म घेते राजराजेश्वर निज शिरी धरीते कमळ होते पन्कात, तरी येते वसन्तश्री सत्कार करायाते पन्क सम्पर्के कमळ का भिकारी? धूलिसन्गे रत्न का भिकारी? सूत्रसन्गे सुमहार का भिकारी? कशी तू ही मग मजमुळे भिकारी?
|
बाल सरिता वधु वल्लरीसमान नशीबाची चढतीच तव कमान नारि रत्ने नरवीर असामान्य याच येती उदयास मुलान्तून भेट गंगा यमुनास होय जेथे सरस्वतिही असणार सहज तेथे रूप सद्गुण संगमी तुझ्या तैसे भाग्य निश्चित असणार ते अपेसे
|