शुभेच्छा पत्रांच्या जगात 'शुभेच्छांचा सौदागर' म्हणून ज्यांच नाव कौतुकानं अन आदरानं घेतलं जातं, अशा कविच्या ह्या काही कविता..... इथे फुलांचा उत्सव चालू... इथे फुलांचा उत्सव चालू तुझ्या कळ्यांना दे आमंत्रण सांग तयांना देह आज मी या गंधाला दिलाय आंदण या वस्तीवर या घटकेला सर्व ऋतूंचे सहर्ष स्वागत रंग फुलांचे या रस्त्यावर मिरवत जाती वाजत गाजत संकेतांचे बंध तोडुनी कर रंगांचे सचैल शिंपण आनंदाला बहर असा की इंद्रधनूही उतरे खाली अंधाराचा पडघम वाजे वारा वाहे गंध पखाली काळोखाच्या दरवाजावर नक्षत्रांचे सुंदर तोरण इथे मनाचे मोर नाचती फुलवून अपुले स्वप्न पिसारे असा घडे आनंदसोहळा बेहोषीने गाती तारे श्वासासंगे श्वासांगणती आनंदाची करून उधळण
|
प्रेम म्हणजे काय रे प्रेम म्हणजे काय रे दुधावरची साय रे आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे... प्रेम म्हणजे गात रहाणं आनंदाचं गोड गाणं प्रेम म्हणजे पोर्णिमेच्या चांदण्यामध्ये बेभान होणं... प्रेम म्हणजे झुळझुळ झरा प्रेम म्हणजे अवखळ वारा प्रेम म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या श्रावणधारा... प्रेम म्हणजे हळवं गीत प्रेम म्हणजे व्याकुळ प्रीत प्रेम म्हणजे कुर्बानीची जगावेगळी न्यारी रीत... प्रेम म्हणजे असून नसणं प्रेम म्हणजे नसून असणं प्रेम म्हणजे स्वतःपासून स्वतःलाच हरवून बसणं.... प्रेम म्हणजे काय रे दुधावरची साय रे आपुलकीची ऊब मिळता सहज उतू जाय रे....
|
तू नसताना तू नसताना मनात येते असेच काही, असेच काही आठवणींचे फूलपाखरू शुभ्र धुक्यातुन विहरत जाई तू नसताना रोजचाच हा चंद्र भासतो कसा कळाहीन उदास दिसती सर्व चांदण्या रिते भासते पुरे नभांगण तू नसताना अवतीभवती तुझेच केवळ तुझेच भास अणुरेणुतुन फिरतो आहे तुझाच आणि तुझाच श्वास तू नसताना झोपही माझी वैरीण होऊन जागतसे रात्र लोटते मंदगतीने दिवस उसासे टाकतसे तू नसताना घासही माझ्या कंठाखाली उतरेना तू नसताना तुझी आठवण विसरू म्हणता विसरेना तू नसताना तुझ्यावाचुनि कुठवर आता तगायचे हृदय राहिले तुझ्याकडे, मी कसे त्याविना जगायचे तुझ्यावाचुनि माझी हालत कळली जर का तुला प्रिये रुढीरितींचे बंधन तोडुन माझ्यासाठी धावत ये.
|
तुला गंधवार्ता कशाचीच नाही तुझा सोनचाफा तरारून येई तुला गंधवार्ता कशाचीच नाही... इथे दीपमाळा लक्ष लक्ष वेळा तुझ्या चाहुलीने पेटतात देही तुला गंधवार्ता कशाचीच नाही... तुझ्या स्वागताला फुलांचा बिछाना तुझ्या पालखीला ऋतूंचेच भोई तुला गंधवार्ता कशाचीच नाही... कुबेरा नसावी तमा दौलतीची तुझी लक्षणे ही बर्याचीच नाही तुला गंधवार्ता कशाचीच नाही... नको, एवढेही बेफिकिर नसावे गडे ही दुनिया भल्याचीच नाही तुल गंधवार्ता कशाचीच नाही....
|
Jayavi
| |
| Saturday, November 25, 2006 - 6:32 am: |
|
|
वा, सुमती! सुरेख आहेत गं सगळ्याच कविता! ए, अजून टाक ना कविता.
|
'गारवा' नंतरचा 'सांजगारवा'ही सगळ्यांना भुरळ घालणारा... ह्या काही त्यातल्याच तरल.. हळुवार कविता... 'स्वप्न उद्याचे घेऊन ये' ह्या कवितासंग्रहा मधल्या... अशीच यावी वेळ एकदा अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना असे घडावे अवचित काही, तुझ्या समिप मी असताना उशीर व्हावा आणि मिळावी एकांताची वेळ अचानक जवळ नसावे चीट्ट्पाखरू केवळ तुझी नि माझी जवळिक मी लज्जित, अवगुंठित आणि संकोचाचा अंमल मनावर विश्वामधले मार्दव सारे दाटून यावे तुझ्या मुखावर मनात माझ्या 'तू बोलावे' तुझ्या मनीही तीच भावना तूच पुसावे कुशल शेवटी, करून कसला वृथा बहाणा संकोचाचे रेशीमपडदे हां हां म्हणता विरून जावे समय सरावा मंदगतीने अन प्रीतीचे सूर जुळावे तू मागावे माझ्यापाशी असे काहीसे निघताना उगीच करावे नको नको मी हवेहवेसे असताना हुशार तू पण, तुला कळावा अर्थ त्यातुनी लपलेला आपुलकीच्या दिठीत भिजवुन मिठीत घ्यावे तू मजला सचैल न्हावे चिंब भिजावे तुझ्या प्रितीच्या जलामध्ये युगायुगांची आग विझावी त्या बेसावध क्षणांमध्ये शब्दांवाचुन तुला कळावे गूज मनी या लपलेले मुक्तपणे मी उधळून द्यावे जन्मभरी जे जपलेले.
|
आठवतंय, आपण खूप भांडायचो झालं गेलं विसरून पुन्हा नवा डाव मांडायचो आठवतंय, तू फुलं माळायचीस मी गंध घेतल्यावर फुलासारखी फुलायचीस आठवतंय, तुला गाणं आवडायचं तुला गाणं आवडतं म्हणून मला गाणं सुचायचं आठवतंय, तू एकदा रुसली होतीस तुझा राग ओसरल्यावर कुशीत येऊन बसली होतीस आठवतंय, तुला गजरा दिला होता तू मात्र मीच तुला माळावा असा हट्ट धरला होतास आठवतंय, एकदा मला लागलं होतं तुझ्या डोळ्यात अख्खं आभाळ रात्रभर जागलं होतं आठवतंय, दिलं होतंस एक वचन विसरणार नाहीस कधी जपशील माझी आठवण.
|
आणि ही माझी अतिशय आवडती कविता... तू विसरू शकणार नाहीस तू विसरू शकणार नाहीस... नदीचा काठ चमचमतं पात्र उतरता घाट मोहरती गात्रं तू विसरू शकणार नाहीस... कलंडता सूर्य लवंडती सांज पक्ष्यांच्या माळा किणकिणती झांज तू विसरू शकणार नाहीस... सोनेरी उन्हं वार्याची धून पावलांची चाहूल ओळखीची खूण तू विसरू शकणार नाहीस... दिलेला शब्द ओझरता स्पर्श दडलेलं प्रेम ओसंडता हर्ष तू विसरू शकणार नाहीस.... हातात हात अन तुझं माझं हितगुज आंब्याच्या झाडावर पाखरांची कुजबुज तू विसरू शकणार नाहीस... भिजलेले डोळे विरलेली स्वप्नं थिजलेली वाट उरलेले प्रश्न तू विसरू शकणार नाहीस ... अन मीही विसरू शकणार नाही.
|
Sakhi_b
| |
| Tuesday, January 02, 2007 - 11:02 am: |
|
|
sumai sahich ga.... khupach sunder ahe. ajun vachaicha moh ho ahe.
|
Dnyanu137
| |
| Tuesday, January 16, 2007 - 5:34 pm: |
|
|
khupach chhan aahet ajun kavita tak na..
|
Maalvika
| |
| Wednesday, March 14, 2007 - 7:50 am: |
|
|
phar sunder. prasad kulkarninchya baryach kavita mazya sangrahi aahet. tya ethe kasha takaychya mala kuni sangel ka. maza email - happy_people@indiatimes.com
|
Maalvika
| |
| Saturday, July 14, 2007 - 2:43 pm: |
|
|
श्वासाना तू विचार अपूल्या आपुले नाते काय ? याचे उत्तर शब्दांनी कधी कोणी देते काय ? -प्रसाद कुलकर्णी
|