Vinya
| |
| Wednesday, November 08, 2006 - 11:05 am: |
| 
|
काल परस्पर या शब्दा विषयी विचार करत होतो. मला वाटत की परस्पर या शब्दाचे दोन अर्थ होतात. की ते दोन्ही अर्थ एकमेकांशी निगडीत आहेत नक्की कळत नाही. हे वाक्य बघा. त्या दोघांचा परस्परांशी संबंध नसेल तर ते काम परस्पर करुन टाक.
|
Shonoo
| |
| Thursday, November 09, 2006 - 2:07 am: |
| 
|
हितगुजवर वारियाने कुंडल हाले या गाण्याचे शब्द आहेत ( व ने सुरू होणार्या गाण्यांमधे). कुणीतरी ते वाचून त्याचा अर्थ सांगेल का
|
शोनु ही एकनाथांची गवळण आहे.... डोळे मोडीत राधा चाले कुंडल म्हनजे कानातले. आणि अर्थ सरळ ही राधा चालातला लागल्यावर वार्याने तिची कर्णभुषणे [कानातले] हालतात
|
Shonoo
| |
| Thursday, November 09, 2006 - 1:03 pm: |
| 
|
हे त्या गाण्याचे शब्द, वारियाने कुन्डल हाले डोळे मोडित राधा चाले राधा पाहून भुलले हरी बैल दुभवी नंदाघरी वारियाने कुन्डल हाले पणतगन्भीर कर्दळी दाटा हाती घेऊन नारंगी भाता हरी पाहुन भुलली चित्ता राधा भुलली जनार्दना ऐसी आवडी भिनली दोघा एकरूप झाले अंगा मन मिळाले प्रेमभागा एक भुलला जनार्दना डोळे मोडित म्हणजे नक्की काय? ती डोळा मारत जातेय का लोकांचे डोळे चुकवत जातेय? वारा नसला तरी कुंडल म्हणजे जर लटकते डूल वगैरे असतील तर ते चालताना हलणारच. आणि नुस्त्या कुड्या असतील तर त्या काही वार्याने हलणार नाहीत! मग 'वारियाने कुंडल हाले' ही ओळ कशाला? त्या पणतगम्भीर या कडव्याचा अर्थ काय मला ऐकताना ती ओळ पणस गम्भीर अशी वाटली होती. तिथे नक्की काय शब्द आहे?
|
Shonoo
| |
| Friday, November 17, 2006 - 2:20 pm: |
| 
|
कोणालाच माहिती नाही का या गाण्याचा अर्थ? गेले कुठे इथले सगळे भाषाशास्त्री आणि वैय्याकरणी वेताळ?
|
डोळे मोडीत म्हणजे डोळे मारीत नव्हे तर नयनांचे विभ्रम करीत.. कुन्डल म्हणजे कुड्या नव्हेत. ते हल्लेच्या rings सारखे आभूषण असते. विठ्ठलाच्या कानात अस्ते. म्हणून तुकारामाने म्हटलेय मकर कुन्डले तळपती श्रवणी.. म्हणजे माशाच्या आकाराचे कर्णभूषण
|
वारियाने कुन्डल हाले राधा जनार्दनाच्या प्रेमात ईतकी मग्न झाली की ती हातवारे करत मानेला झटके देत स्व:तला बोलु लाग्ली. कदाचीत या अवस्थेला वर्णन करन्यासाठी वारियाने कुन्डल हाले म्हणले असावे. दुसरा अर्थ राधेला ईतकी अवखळ बघुन वारा देखील तिच्याशी खेळु लागला. दोन्ही अर्थ कदाचीत चुकीचे असतील.
|
शोनूच्या ओळीमध्ये शेवटची ओळ पुढीलप्रमाणे पाहिजे.... एक भुलली जनार्दना ऐवजी एका भुलली जनार्दना.. असे पाहिजे.... याचा सन्दर्भ असा, एकनाथांच्या रचनांत एका आणि जनार्दन असे उल्लेख शेवटी तुका म्हणे प्रमाणे येतात.एका म्हणजे एकनाथ आणि जनार्दन म्हणजे जनार्दन स्वामी एकनाथांचे गुरू.आपले आणि गुरुचे नाव ते शेवटी टाकतात. उदा 'एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण'... या गौळणीत राधा जशी कृष्णावर भुलली तसे एकनाथ गुरुंवर भुलले म्हणजे भक्तीला लागले असा सन्दर्भ आहे.. (गवळण हा काव्यप्रकार आहे जसे अभंग, ओवी, विराणी, आरती...)
|