Farend
| |
| Thursday, October 26, 2006 - 7:25 pm: |
| 
|
लोकहो इतिहासाबद्दलच्या पुस्तकांमधे 'ब्रह्मावर्त' म्हणून कोणत्यातरी ठिकाणाचा उल्लेख आहे, ते कोणते शहर आहे?
|
Shonoo
| |
| Thursday, October 26, 2006 - 8:15 pm: |
| 
|
आर्च ह ह पु वा. अगं सुन्दरी धरी कोपा बी वरी रुष्टली कशी लोपा? वैतागाने सर्व मायबोलीकर का देती बी ला शापा? लवकर देवूनी उ:शापा सोडवा बीच्या तापा दिवाळीचे दिवे असतीलच!
|
Yogy
| |
| Thursday, October 26, 2006 - 8:28 pm: |
| 
|
ब्रह्मावर्त ची माहिती इथे वाचता येइल http://en.wikipedia.org/wiki/Bithur
|
Chafa
| |
| Friday, October 27, 2006 - 1:06 am: |
| 
|
ROFL!!! हे सगळं मी वाचलंच नव्हतं. लालू पार्ल्यात दिलेल्या लिंकबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा छाऽऽन करमणूक झाली. फरक इतकाच की 'तरुण आहे रात्र अजूनी हे आईने मृत मुलाला उद्देशून म्हटले आहे' च्या वेळेसारखा मनःस्ताप झाला नाही! आहे ना माझी प्रगती स्तुत्य?
|
Shonoo
| |
| Friday, October 27, 2006 - 2:22 am: |
| 
|
बी आता जेंव्हा मुम्बै किंवा पुण्याला जाशील तेंव्हा आपट्यांचा विस्तारित शब्द रत्नाकर नावाचा शब्दकोश घेऊन ये पाहू. पार्ल्याला जवाहर, दादर ला आयडियल किंवा पुण्यात अप्पा बळवंत चौकातल्या दुकानात नक्कीच मिळेल. कोप आणि कोपणे एकाच मूळ शब्दावरून आलेले शब्द आहेत. कोप नाम आहे आणि कोपणे क्रियापद. नच सुंदरी करू कोपा मधे कोपा चा अर्थ प्रणय धरला तर पुढच्या ओळीचा ( मज वरी धरी अनुकम्पा) अर्थ कसा लागेल मग? "हे सुन्दरी तुझा प्रणय आवरता घे, माझ्यावर दया कर? " आणि मग पुढची ओळ ' रागाने तव तनू ही पावतसे कम्पा' याचा या विनंतीशी काय संबन्ध? हितगुजवरच प्रियाने २००१ साली या गाण्याचे पूर्ण शब्द लिहिले आहेत. एकदा वाचून घे आणि मग त्यातले जे काही शब्द अडतील ते इथे विचार. अश्लील वगैरे पाहणार्यांच्या दृष्टीकोनावर जास्त अवलंबून आहे.
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 2:26 am: |
| 
|
मैत्रेयी, हे बघ, मी कुणालाच जोर जबरदस्ती केलेली नाही की मला सांगा. मी उगाच इथे काही विचारत नाही. मी इथे उगाच विचारतो आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी मी काहीच करु शकत नाही. हा तुमचा विश्वास मला जिंकता येणे अशक्य आहे. इथे होते असे आहे की एका व्यक्तीने विरोधी सुर लावला की सर्व त्याच नजरेतून मला बघतात. चाफ़ा, इथे येऊन उगाच पचकेपणा करू नकोस. हा बीबी शब्दार्थाचा आहे. तुझा नेहमीचा पांचट टीपी इतर कुठल्यातरी बीबीवर कर. असामी, जसे "खाली" ला "वर" हा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यानुसार जमीनीला आकाश हा नक्कीच विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो. बाकी इतरांना नम्र विनंती की कृपा करुन ह्या बीबीवर नको तो थैमान घालू नका.
|
Asami
| |
| Friday, October 27, 2006 - 2:46 am: |
| 
|
लेका खाली नि वर हे बरोबर आहे पण जमिन नि आकाश हे चुकीचे आहे. कारण त्या एकमेकांच्या विरुद्ध गुण , भाव , दोष दाखवणार्या गोष्टी नाहित. साधी गोष्ट बघ कि तुझ्यासारखे logic वापरले तर जमिनीच्या विरुद्ध पाणीही होउ शकेल ( एक हलते , दुसरे नाहि ) म्हणजेच आकाश नि पाणी एकच ठरतील. हे बरोबर आहे का ?
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 3:06 am: |
| 
|
असामी, हिन्दी गाण्यात विरोध दर्शविण्यासाठी कितीतरी वेळा जमीन आणि आकाशाचा उल्लेख असतो. ते एक गाणे आहे ना इजाजत मधले ज्यात रेखा म्हणते.. तुम हो आकाश की (?) मेरे नंगे पैरो मे जमी हैन.. कतरा कतरा जिती हू कतरा कतरा मरने दो.. जमीन पाणी चा समबंध फ़क्त ती पंचमहाभुतं आहेत म्हणून येतो. विरुद्धार्थी शब्द म्हणून त्याचा विचार चुकीचा आहे. आर्च, कपाला कोप हे बहुतेक पुणेरी झालं असाव. मी खेडवळ लोकही कपाला कपच म्हणताना बघितली आहे. बाकी पांचट टीपी करण्याची संधी कुणीच सोडत नाही. जी लोक इथे येऊन कधी कुठली addition करत नाहीत ती लोक टीपी करायचा मिळाली की पचकन थुंकुन आपण किती सुज्ञ आहोत ह्याची पावती देऊन जातात.
|
Manya2804
| |
| Friday, October 27, 2006 - 5:02 am: |
| 
|
'कोपा' म्हणजे प्रेम, तर एकोपा म्हणजे एकावर किंवा एकीवर केलेलं प्रेम ???? आमची भाषा पण 'बी'-घडते आहे..... आम्ही 'बी'-घडलो, तुम्ही 'बी'-घडाना.....
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 5:35 am: |
| 
|
योग्य, ती ब्रम्हावर्ताची लिंक खूपच छान आहे रे.. इथल्या कटकटीत उशिरा वाचली. किती विश्वास ठेवायचा की ही सृSटी ब्रम्हदेवानी निर्माण केली. हे फ़क्त भारतीयच जाणतात इतर नाही. मात्र Grand Canyon च्या एका सर्वात उंच टोकाचे नाव Vinshnu point म्हणून दिले आहे आणि तिथे मी एखाला विचारले ह्याचा भारतीय संस्कृतीशी काही संबंध आहे का तर तो नाही म्हणाला. Ankor Watt ला शिवाचे सहस्त्रः लिंग आहेत. त्याला ते Valley of Thousand Lingam म्हणतात. म्हणजे भारतीय देवी देवता जगात कुठेकुठे नांदल्या आहेत एकेकाळी.. आज तिथली संस्कृती मात्र वेगळी आहे. Far End कुठल्या पुस्तकात.. नाव काय?
|
Himscool
| |
| Friday, October 27, 2006 - 7:24 am: |
| 
|
हिन्दी गाण्यात विरोध दर्शविण्यासाठी कितीतरी वेळा जमीन आणि आकाशाचा उल्लेख असतो विरोधाभास आणि विरुद्धार्थी शब्द ह्यातला फरक काय आहे ते आधी समजावून घे रे बी...
|
Bee
| |
| Friday, October 27, 2006 - 8:15 am: |
| 
|
विरोधाभास दर्शविण्यासाठी विरुद्धार्थी शब्दही लागतातच Himscool! विरोधी शब्द न वापरता सांग बघू विरोधाभास कसा काय दाखवता येईल?
|
Asami
| |
| Friday, October 27, 2006 - 11:52 am: |
| 
|
भाउ आभास ह्या शब्दाचा अर्थ बघ की पण. तू हिंदी गाणी व्याकरणाचा आधार म्हणून वापरणार असशील तर बोलणेच खुंटले. शेवटी ते एका प्रकारचे काव्य आहे आणी त्यात गीतकार थोडेफ़ार स्वातंत्र्य घेउ शकतो. पण त्याचा अर्थ असा नाही कि ते भाषाशास्त्राच्या नियमांप्रमाणेच असेल.
|
आयला. ईकडे आलोच न्हवतो. अरेरे. बी तु वाचन करतोस ना? ब्रम्हावर्त हे गाव पेशव्यांवरिल अनेक पुस्तकात सापडेल. उदा. पाणिपत Vinshnu point at Grand Canyon हं.
|
Farend
| |
| Friday, October 27, 2006 - 7:21 pm: |
| 
|
बी, केदार, हो मी ते बहुतेक १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धावरच्या एका पुस्तकात वाचले होते आणि तेव्हापासून सस्पेंस होता. तेव्हाच्या संदर्भावरून ते कानपूरच वाटत होते, पण नकी कळत नव्हते.
|
Zakki
| |
| Friday, October 27, 2006 - 11:23 pm: |
| 
|
'हळवा' याचा नक्की अर्थ काय? 'हळवे' स्यवंवर असते. ("हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा!") 'हळवा' रंग असतो. ("शपथेला रंगहि हळवा") भावना 'हळव्या' तर असतातच. कशालाही 'हळवा' म्हंटले म्हणजे त्याचा काय अर्थ होतो? की ते आपले 'अपि, हि, च' अश्या संस्कृत शब्दांप्रमाणे कविता गेय होण्यासाठी वापरलेले 'पदपूरक' आहे?
|
Giriraj
| |
| Saturday, October 28, 2006 - 5:43 am: |
| 
|
झक्कीकाका,तुम्हाला रॉबिनहूडकडून उत्तर अपेक्षित आहे की बी कडून? बी,तू पुण्यात,मुंबईत,नागपुरात किंवा भारतात केव्हा येणार आहेस ते सांग... तुझ्या सुरक्षाव्यवस्थेचे बघावे लागेल इकडे!
|
Dineshvs
| |
| Saturday, October 28, 2006 - 8:34 am: |
| 
|
झक्की, हळवी, अशी गव्हाची जात पण असते. तिच्या विरुद्ध गरवी असते.
|
Zakki
| |
| Saturday, October 28, 2006 - 12:25 pm: |
| 
|
थोडक्यात शब्द सुचला नाही की हळवा म्हणायचे. रॉबिनहूडकडूनच उत्तर अपेक्षित आहे. आपले सरळसोट, जगन्मान्य अर्थ असावा शब्दाचा. 'नवा' अर्थ आता कळणार नाही या वयात!
|
तब्येतीने नाजुक, जरा कशानही दुखावला / ली जावु शकणारी या अर्थाने जात / व्यक्ती / मन / वन्श / प्रजा / वस्तू वगैरे कशासही हळवा शब्द वापरला जातो! पण हळवा म्हन्जे शेळपट, घाबरट अशा अर्थाने नाही तर तोळामासा तब्येतीच्या बाबतीत किन्वा सुखदुःखाच्या अगदीच सीमारेषेवर दोलायमान स्थितीत असलेल्या कशासही हळवेपणा म्हणता येइल निबर किन्वा बनचुका याच्या विरुद्ध अर्थानेही हळवा शब्द वापरायला माझी काहीच हरकत नाही जो निर्लज्य, कोडगा नाही पण तो सलज्ज्य किन्वा तटस्थही नाही तो हळवा असेही म्हणायला माझी हरकत असणार नाही. कोणत्याही कृती किन्वा घटना यान्च्या सुरुवात होण्यास अत्यन्त क्षुल्लक कारण वा निमित्त जेव्हा पुरे पडते तेव्हा त्या त्या कृती घटनेमागची बाब त्या त्या क्षेत्रात हळवी हे अस म्हणता येइल. अजुन काही विश्लेषण हव हे? DDD
|