|
Bee
| |
| Thursday, October 26, 2006 - 3:16 am: |
| 
|
'नच सुंदरी करु कोपा' इथे कोपा म्हणजे प्रणय असा अर्थ होतो. कोपणे आणि कोपा हे दोन स्वतंत्र शब्द आहेत. कोप किंवा कोपणेचा अर्थ काही कठिण नाही. राग क्रोध म्हणजे कोप. पुर्वीच्या आटपाट नगरातील कथेत कुणी कोपलं की ते श्राप देत असतं :-) अनवटचा अर्थ नक्की काय होतो. बर्याचदा शब्द कळतात पण अर्थ सांगण्याचा प्रयास केला की आपली शक्ती पणाला लागते. वर दिनेशच्या पोष्टमधे अनवट शब्द आला आहे त्यावरुनही असाच बोध होतो. माझ्या मते अनवट म्हणजे खूप वेगळा.. अति अपरिचयाचा असा.. विन्या धन्यवाद! सध्या लोपमुद्रा माझ्यावर कोपली आहे हे नक्की खरे आहे मिलिंदा :-)
|
Dineshvs
| |
| Thursday, October 26, 2006 - 6:34 am: |
| 
|
बी, पुर्वीच्या काळी मराठीत पॅसिव्ह व्हॉईस वापरत असत. कोपु नकोस च्या जागी करु कोपां वापरलय ते त्यामुळेच. मला माहित होता अर्थ पण तु हल्ली अक्षरांचा घोळ घालतो आहेस म्हणुन मुद्दाम लिहिले. श्राप कि शाप. विरुद्ध अर्थी शब्द, उःशाप ना ? अनवट म्हणजे सहसा वापरात नसलेले, गायला कठीण असणारे राग. लताचे, अभोगी कानडा रागातले, जिया नाही लागे, का करु सजना, ऐकले आहेस का ? नाहीतर रामदास कामतांचे, धन्य ते गायनी कळा, नाटकातले, संगीत रस सुरस, मम जीवनाधार, हे ऐकलेस का ? या दोन्ही चाली अनवट म्हणाव्या अश्या आहेत.
|
Ajjuka
| |
| Thursday, October 26, 2006 - 7:24 am: |
| 
|
'नच सुंदरी करु कोपा' इथे कोपा म्हणजे प्रणय असा अर्थ होतो. कोपणे आणि कोपा हे दोन स्वतंत्र शब्द आहेत. ए गपे.. काहीही तारे तोडू नकोस. हे सुंदरी रागावू नकोस - सुंदरी नच कोपा करू माझ्याकडे प्रेमाने बघ - मजवरी धरी अनुकंपा. गाण्याची पुढची ओळ... रागाने तव तनु ही पावत कशी कंपा म्हणजे रागाने तुझे शरीर कसे कंप पावत आहे.. तेव्हा कोपणे व कोपा ही एकाच धातूची रूपे आहेत. आणि त्याचा अर्थ रागावणे हाच च च च होतो.. कोपा म्हणजे प्रणय हा कुठून काढलास अर्थ? कुछ भी क्या.. लोपणे म्हणजे नष्ट होणे विलोपणे म्हणजे हरवून जाणे वि ने फक्त अर्थाची शेड बदलते. कुठला कधी वापरायचा हा तारतम्याचा भाग आहे आणि ते वाचनाने आणि भाषेच्या अभ्यासाने येते. सांगता येणार नाही.
|
Karadkar
| |
| Thursday, October 26, 2006 - 7:47 am: |
| 
|
बी, तुला खरेच हे साधे साधे अर्थ कळत नाहित का? की मी किती बालीश हे दाखवयचा एक बालीश प्रयत्न करतो आहेस? आणि जर तुल हे साधे अर्थ कळत नाहित तर मग ह्या कवितेत आशय काय, असल्या प्रतिक्रिया कशा टाकतोस? माझी एक मैत्रिण तिच्या मुलिला रडत असलि म्हाणते जर soul searching कर आपण इतक वेळ काय केले कशासाठी केले ह्यचे. तेच मी तुला पण सांगते आपण कसे वागतो ह्याचा जरा विचार कर. तुला एक प्रामाणीक सल्ला - आपण कुठे, काय, कसे बोलतो ते जर पहात जा. खुप बावळटपणा करुन बोलले तर लोक आपल्याला मदत करतील सहानुभुती दाखवतील असे वाटत असेल तर परत एकदा लोकानी तुला लिहिलेल्या पोस्ट वाच.
|
Bee
| |
| Thursday, October 26, 2006 - 9:02 am: |
| 
|
दिनेश, श्राप आणि शाप दोन्ही बरोबर आहे असे वाटते कारण मी दोन्ही शब्द बोलताना लिहिताना बघितले आहे पण विरुद्धार्थी शब्द मात्र उःशाप हाच आहे. रॉबीन, तुला आठवत असेल मागे एकदा जुन्या गाण्यातील अश्लीलता म्हणून आपण 'नच सुंदरी करु कोपा' हे एक उदाहरण दिले होते. त्यात कोपाचा अर्थ प्रणय होतो असे सांगितले होते ना.. मला नक्की आठवत आहे की हा अर्थ कुणीतरी सांगितला होता म्हणुन मी इथे तो अर्थ लिहिला. तेवढा कोपाचा अर्थ प्रणय आहे असे समजल्यावरच मी हे गाणे अश्लील गटात मोडते असे गृहीत धरले. ते जुने पोष्ट मला सापडले की मी इथे लिंक देईन.
|
Giriraj
| |
| Thursday, October 26, 2006 - 9:39 am: |
| 
|
बी,तुला तुझ्या प्रेयसीचे अथवा बायकोचे उदंड 'कोपा' मिळो हीच मनोकामना! वेगळे दिवे द्यायची गरज तुला आणि मला नसतेच
|
Ajjuka
| |
| Thursday, October 26, 2006 - 10:53 am: |
| 
|
बरोबर आहे ते गाणे अश्लीलच आहे. शरीराच्या कंप पावण्याबद्दल लिहिलेले गाणे अश्लीलच आहे. रागाने असेल नाहीतर 'कोपाने' असेल.. आता एक नक्की कर आमच्यावर दया म्हणून तरी... आमच्यावर तुझ्या भाषेत 'कोपू' नकोस. उपकार होतील मायबाप... आणि शापाच्या विरूद्धर्थी उःशाप तर समानार्थी काय? वर? पाठ कर शापाच्या विरूद्धार्थी वर असा शब्द येतो. यामधे वर म्हणजे उंची दर्शक विशेषण नव्हे किंवा नवरा मुलगा असाही अर्थ नव्हे. इथे वर म्हणजे कैकेयीला दशरथाने दिले होते ते वर. आयला आता पुरे.. आता मी फुल्याफुल्यांचीच भाषा वापरू शकते.. तेव्हा मेरा मूंह मत खुलवाओं...
|
Bee
| |
| Thursday, October 26, 2006 - 11:16 am: |
| 
|
अज्जुका, मला तुझा पहिला पॅरा कळलाच नाही तुझा सुर नक्की कसा आहे. थोडा उपरोधिक वाटला. खरच ते गाणे अश्लील आहे का? शाप, वर आणि उःशाप हे तिन्ही शब्द एकमेकांशी संबंधित आहेत. मला 'वर' वेळेवर आठवला नाही. मी तसा विचारही केला नाही. असे शब्द खूप कमी असतात. जसे कुणी शाप दिला की त्याला उःशाप असतो. पण शापाला 'वर' हा देखील विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो. माझ्या मतानुसार 'उःशाप' हाच खरा विरुद्धार्थी शब्द झाला कारण मिळालेला वर जर शापातून मुक्त करत नसेल तर तो 'वर' काय कामाचा? आणि 'वर' मागणे हेही जर आपल्या हातात नसेल तर.. पण हे विरुद्धार्थी शब्दांचे कोडे इतर शब्दात पडत नाही. जसे चुक ला बरोबर, खरे ला खोटे, जमीनीला आकाश, कुरुप ला सुंदर.. ह्या शब्दांच्या जोड्यांना अन्य पर्याय बहुतेक नसावेत जसे शाप वर आणि उःशाप ह्यांना आहेत. आणि मी कुठे कोपतो वगैरे आहे. मी आपला छान आनंद लुटतो आहे वेगवेगळ्या मतांचा.. कुणी बोलत आहेत त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचे.. कुणी रागवून अर्थ सांगितला तेही मला आवडतं..
|
Dineshvs
| |
| Thursday, October 26, 2006 - 11:21 am: |
| 
|
नच सुंदरी हे गाणे Per se अश्लील नाही. पण त्यात येणार्या, दंतव्रण करी गाला, आणि आजुबाजुच्या ओळी, त्या काळातल्या मानकाप्रमाणे शृंगारिक आहेत ईतकेच. माझ्या मते श्राप हा शब्द बोलीभाषेतले रुप आहे. तसाच एक शब्द जल्म. शीक, झंपर, डॅंबीस, डामरट, तारांबळ असे अनेक शब्द उदाहरण म्हणुन देता येतील. शापाला उतारा म्हणुन उःशाप. शापाला विरुद्धार्थी शब्द वरदान, असेल का ? सुमति टिकेकरांच्या गाण्यात असे शब्द आहेत अनामिक नाद उठे गगनी --- शाप येई कि, येई वरदान नाटक, संगीत वरदान, संगीत डॉ. वसंतराव देशपांडे
|
Maudee
| |
| Thursday, October 26, 2006 - 11:29 am: |
| 
|
डॅंबीस - ह्या शब्दाचा अर्थ काय. आणि आपण जो बोलीभाषेत वापरतो असा एक शब्द डोंबल त्याचाही अर्थ काय... माझ्या एका अमहाराष्ट्रियन मैत्रिणीने हाशब्द कुठेतरी ऐकला आणि मला विचारला होता.. याच नक्की काय उत्तर द्यायला हव होतं??
|
Vinya
| |
| Thursday, October 26, 2006 - 11:48 am: |
| 
|
डंबीस म्हणजे लबाड, चाप्टर. डोंबल हा शब्द खिजवण्यासाठी वापरतात. मला वाटत त्याचा मठ्ठ डोक असा अर्थ होत असावा.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 26, 2006 - 12:46 pm: |
| 
|
डॅंबीस म्हणजे Damn Beast आणि डामरट म्हणजे Damn Rat तारांबळ आलाय मंगलाष्टकातल्या तारा बलं वरुन.
|
Pooh
| |
| Thursday, October 26, 2006 - 1:13 pm: |
| 
|
अनुकंपा म्हणजे दया लोकहो, झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे काय उठवता येईल? दुर्लक्ष करा.
|
Maitreyee
| |
| Thursday, October 26, 2006 - 1:23 pm: |
| 
|
बी तू हे सर्व मुद्दाम करत आहेस का? असशील तर, का? की तुला खरच समजत नाहियेत हे साधे साधे अर्थ?? * यालाच (बे)सुमार शब्दसंपदा म्हणतात का?? या बी ला जरा आता अभ्यास करू देत बरं!! कुणी 'कोपाने' पण कसले अर्थ नका सांगू आता त्याला 
|
Asami
| |
| Thursday, October 26, 2006 - 3:38 pm: |
| 
|
जमीनीला आकाश, बस काय भाउ ? कमाल करतोस तू पण
|
Yogy
| |
| Thursday, October 26, 2006 - 3:47 pm: |
| 
|
डोंबल म्हणजे विंग्रजीत nothing तुला काय डोंबल मिळणार आहे का? वगैरे
|
Vinya
| |
| Thursday, October 26, 2006 - 4:16 pm: |
| 
|
yogy डोंबल्यात शिरल का काही, अस पण म्हणतात की. काही समजल की नाही अस विचारायसाठी. बी, तुम्ही नुसतेच सुंदर असु शकतात, नुसतेच खरे असु शकतात पण तुम्हाला नुसताच उ:शाप नाही मिळू शकत. त्यासाठी आधी शाप मिळावा लागतो. पण नुसताच वर मिळू शकतो. बघ विचार करुन.
|
Seema_
| |
| Thursday, October 26, 2006 - 4:23 pm: |
| 
|
मी आपला छान आनंद लुटतो आहे वेगवेगळ्या मतांचा.. कुणी बोलत आहेत त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचे.. कुणी रागवून अर्थ सांगितला तेही मला आवडतं.. >> बी खरतर आता तुझ्याकडेच दुर्लक्ष करायची वेळ आली आहे . तु फ़क्त स्वताच्याच आनंदाचा विचार करण्यापेक्षा लोकांना होणार्या त्रासाचा पण विचार कर .
|
Yogy
| |
| Thursday, October 26, 2006 - 4:26 pm: |
| 
|
yogy डोंबल्यात शिरल का काही, अस पण म्हणतात की. काही समजल की नाही अस विचारायसाठी. इथे पण त्या व्यक्तिच डोकं हे nothing आहे हाच अर्थ अभिप्रेत असावा
|
Arch
| |
| Thursday, October 26, 2006 - 7:18 pm: |
| 
|
काही लोक कपाला कोप म्हणतात. म्हणजे मला एक कोपभर चहा मिळेल का? अस. ते जर धरल तर " नच सुंदरी धरू कोपा " चा अर्थ. " हे सुंदरी कप धरू नकोस " असापण होत असावा. ह्याबद्दल काय म्हणणं आहे? 
|
|
|