Raina
| |
| Wednesday, October 18, 2006 - 10:00 am: |
| 
|
संकीर्ण- ह्या शब्दाचा अर्थ काय होतो?
|
Shonoo
| |
| Wednesday, October 18, 2006 - 12:26 pm: |
| 
|
सन्कीर्ण म्हणजे Abridged नैनं छिंदंती शस्त्राणि नैनं दहती पावक: नचैनं क्लेदयंत्यापो न शोषयति मारुत: याला ( आत्म्याला ) शस्त्रए छेदू शकत नाहीत अग्नी जाळू शकत नाही, न पाणी ओलं करू शकते आणि वाराही सुकवू शकत नाही. रॉबीनहूडच्या आणी त्याही आधी तुझं आहे तुजपाशी मधल्या ड्रायव्हरच्या शब्दात 'आत्मा अमर आहे'
|
बोवा sss जी आत्मा अमर आहे... मला वाटते तुझे आहे तुजपाशी मधले दोन घरगडी काकाजी आत्मा अमर आहे असे कोरसमध्ये कीर्तनासारखे मागेपुढे नाचत गांजा ओढून वारंवार म्हणत असतात... ड्रायव्हर नसावा बहुधा...
|
संकीर्ण म्हनजे miscellaneous ... ..
|
Shonoo
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:00 am: |
| 
|
विस्तारित शब्द रत्नाकर ( मूळ लेखक वा गो आपटे) मधे संकीर्ण म्हणजे संमिश्र, मिश्र जातीचा, दाटी झालेले किंवा संगीततातील एक ताल असा अर्थ दिला आहे. ते वाचून मला वाटतंय की संकर ( hybrid ) वरून संकीर्ण शब्द आला असावा. assorted अशा अर्थाने पण वापरता येईल कदाचित.
|
Shonoo
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:06 am: |
| 
|
भिकू माळी, वासू कारकून आणि जगन्नाथ ड्रायव्हर अशी तीन पात्र आहेत तुझे आहे तुजपाशी मधे. अ वि मं च्या बायका आलेल्या असताना वासू आणि भिकू घरात येतात तेंव्हा वासूच्या तोंडी हे वाक्य आहे 'आत्मा- शामभय्या सापडला आत्मा!( शामला मिठी मारून त्याच्या पायाला हात लावून नमस्कार करतो). घाबरू नका बाई आत्मा अमर आहे.' तिथून पुढे दोन तीन वेळा भिकू आणि वासू यांच्या तोंडी ते वाक्य आहे
|
Raina
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:26 am: |
| 
|
शोनू- आणि robeenhood- Thanks. खाली मी हे वाक्य वाचलं ते देत आहे. त्यात दोन्ही अर्थ बसत नाहित असे वाटतय.. पहा तुम्हाला काय वाटतय ते. संकीर्ण हा मृदंग वाजवणारे वापरतात तो एक तालप्रकार. खालचं वाक्य वाचून- I thought- that it means- all encompassive सर्वसमावेशक.. तसं पाहिलं तर बाबा आमटे यांच्यावरील ज्याला संकीर्ण म्हणता येईल असं हे पहिलंच पुस्तक नाही. त्यांच्या पत्नी साधना आमटे यांनी लिहिलेलं पुस्तकही बाबा आमटे यांचे सर्व पैलू दाखवणारे आहे व तरीही लेखकाला योग्य अशी तटस्थता राखून आहे. तरीही निशा मिरचंदानी यांचे "विज्डम सॉंग ः लाइफ ऑफ बाबा आमटे' हे पुस्तक स्वतःचा वेगळा ठसा उमटवते. ......
|
Bee
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:31 am: |
| 
|
भिकूमाळीचा अभिनय मी केला होता इथल्या स्थानिक "तुझ आहे तुजपाशी" नाटकात. त्यामुळे खूप चांगल आठवतं मला. शाम गीतेकडे बघत असतो आणि म्हणतो नैनम छिन्दन्ती शस्त्राणी नैनम.. आणि मग त्याला पुढले शब्द आठवत नाही. जेंव्हा अती विशाल महिला मंडळ शामच्या अवती भोवती जमतात तेंव्हा आचार्यचा प्रवेश होतो. मग भिकूमाळीचा आणि वासूअन्नाचा प्रवेश. ही दोघेही भांग प्यालेले असतात. तेंव्हा आत्मा अमर आहे असे ओरडतात. मला हा भांग पिऊन गोंधळ घालण्याचा अभिनय मुळीच जमला नव्हता. पण वासू अन्नांनी छान केला होता. कित्येकांनी मला नंतर भिकूमाळी म्हणूनच ओळखायला सुरवात केली. त्यानंतर प्रेमाच्या गावा जावेत मी गोट्याचा अभिनय केला त्यावेळी गोट्या म्हणून ओळखायला सुरवात केली :-)
|
Bee
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:34 am: |
| 
|
७ वी पर्यंत मराठी माध्यम होते म्हणून गणिताच्या प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संकीर्ण प्रश्न असायचेत. नंतर ८वी पासून partical english medium घेतले. तेंव्हा संकीर्ण ऐवजी Miscelleneous exercise म्हणून प्रकरणाच्या शेवटी असायचे. अर्थात संकीर्ण शब्दाचा एक अर्थ होतो Miscelleneous. मी 'संकीर्ण जी. ऐ.' म्हणून एक लेख देखील वाचला होता. त्यात जी. ऐन्च्या सर्व पुस्तकातील थोडे थोडे भाग होते.
|
Maudee
| |
| Thursday, October 19, 2006 - 5:55 am: |
| 
|
धन्यवाद रैना आणि बी
|
Bee
| |
| Monday, October 23, 2006 - 9:55 am: |
| 
|
ओशाळलेला किंवा ओशाळवाना असा एक शब्द आहे मराठीत. जसे 'इथे मृत्यू ओशाळला' हे मी कुठेतरी वाचलेले आहे पण आठवत नाही. मैत्रेयीच्या दिवाळी अंकातील ललितमधेही हा शब्द आला आहे. का कुणास ठावूक मला ह्या शब्दाचा अर्थ जरासा 'आपण काहीही करु शकत नाही किंवा पुर्णतः हतबल' अशी भावना व्यक्त करण्यासाठी वापरण्यात येणारा शब्द वाटला'. मैत्रेयी मी चुक की बरोबर?
|
ओशाळणेचा अर्थ खन्त वाटणे, शरमिन्दे होणे अशा प्रकारचा होतो. हतबल येवढा जुळत नाही... केलेल्या कृत्याची लाज वाटणे...
|
Maitreyee
| |
| Monday, October 23, 2006 - 7:19 pm: |
| 
|
हतबल चा काही संबन्ध नाही, बी
|
Bee
| |
| Wednesday, October 25, 2006 - 10:52 am: |
| 
|
मला लोपणे आणि विलोपणेचा अर्थ इथे सांगायचा आहे. बरोबर का चुक हे तुम्ही सांगा :-) लोपणे म्हणजे क्रोधित होणे, तीव्र राग उत्पन्न होणे. विलोपणे म्हणजे सर्व काही नष्ट होणे. एक नाट्यगीत आहे ना.. विलोपले मधुमीलनात ह्या.. म्हणजे ह्या मधुमीलनात मी माझी उरलीच नाही. असेच ना गड्यान्नो :-) मैत्रेयी, रॉबीनभाऊ धन्यवाद!
|
Milindaa
| |
| Wednesday, October 25, 2006 - 2:21 pm: |
| 
|
जपून रे बी, नाहीतर खोडी काढायला जाशील आणि ती रागावली तर तुझाच लोप होईल
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 25, 2006 - 5:01 pm: |
| 
|
बी, मला ईथे यायला वेळ मिळत नाही रे. म्हणुन ईथल्या आतिषबाजीला मुकतोय. लोपणे चा अर्थ तो असेल तर कोपणे चा अर्थ काय ? कोपलास का रडवितोस का रे तुझ्या मुला जगती ठाई ठाई असेहि गाणे आहे. अगदी अनवट चाल आहे. जयमाला शिलेदारनी गायलेय. चमकला ध्रुवाचा तारा, या नाटकातले आहे. ईथे ओशाळला मृत्यु, वसंत कानेटकरांचे नाटक आहे, त्यात प्रभाकर पणशीकर औरंगजेबाची आणि डॉ. काशिनाथ घाणेकर संभाजीची भुमिका करत असत. यातली पंतांची भुमिका खुपच गाजली होती. पण त्यानी ती आपल्यासाठी लिहुन घेतली असाहि आरोप झाला. यातले त्यांचे नमाज पढणे ईतके अस्सल असायचे कि काहि बुजुर्गानी त्याना आता तुम्ही मुस्लीम झालात, असा सल्ला दिला होता.
|
Shonoo
| |
| Wednesday, October 25, 2006 - 5:18 pm: |
| 
|
कोपणे म्हणजे रागावणे, भडकणे इत्यादी- उदाहरणार्थ नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा प्रभु अजी गमला मधे पण 'कोपे बहु माझा...' असे शब्द आहेत. लोपणे म्हणजे हरवणे- लोपामुद्रा मला वाटतं एका श्रेष्ठ बौद्ध भिक्षुणिचं नाव होतं CBDG माझी एक मैत्रीण ultra sound मधनं काढलेले पोटातल्या बाळाचे फोटो असतात त्यांना 'लोपामुद्रा' म्हणते :-) लोपणे, विलोपणे बर्यापैकी समानार्थी आहेत. लोभस आणि विलोभनीय जसे आहेत तसेच.
|
Vinya
| |
| Wednesday, October 25, 2006 - 5:18 pm: |
| 
|
बी, लोपणे, लोप पावणे म्हणजे मला वाटत की नष्ट होणे, संपून जाणे. विलोपणे चा पण तसाच अर्थ होतो फक्त तो चांगल्या अर्थाने वापरतात.
|
Zakki
| |
| Wednesday, October 25, 2006 - 8:50 pm: |
| 
|
लोपामुद्रा हे नाव एखाद्या बुद्धभिक्षुणीचे असेलहि. पण जेंव्हा अगस्ति ऋषी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेला गेले, तेंव्हा त्यांची पत्नि लोपामुद्रा हि त्यांच्याबरोबर होती. आता अगस्ति जर आधी होऊन गेले असतील, तर त्या बुद्ध भिक्षुणिने तिचे नाव घेतले, नाहीतर vice versa . आहे काय नि नाही काय?
|
Mpt
| |
| Thursday, October 26, 2006 - 12:50 am: |
| 
|
ही पहा link http://www.mythfolklore.net/india/encyclopedia/lopamudra.htm
|