Parop
| |
| Monday, September 25, 2006 - 10:35 am: |
| 
|
बी, माझ्यामते पक्षासाठी 'विहंग' असा शब्द आहे. त्यावरुनच 'विहंगम' आला असावा.
|
Parop
| |
| Monday, September 25, 2006 - 10:45 am: |
| 
|
विहंगम ची वरील उदाहरणे अर्थाशी सुसंगत आहेत. त्याचा इतर प्रकारे वापर वाचण्यात्/ ऐकण्यात नाही.
|
विहंग म्हणजे पक्षी. विहंगम म्हणजे Bird's eye view . म्हणजे असे की पक्ष्याला हे दृश्य वरून जसे दिसेल तसे. थोडक्यात ariel view . पण बहुतेक लोक विहंगम म्हणजे रमणीय दृश्य या अर्थाने चुकीने वापरतात....
|
Storvi
| |
| Monday, September 25, 2006 - 3:12 pm: |
| 
|
बोरकरांनी विहग असा शब्द वापरलाय मन्दाकिनी वरून धवल विहग वृंद डोले
|
Raina
| |
| Tuesday, September 26, 2006 - 2:45 am: |
| 
|
या विहगांनो माझ्या संगे, सुरावरी हा जीव तरंगे, तुमच्यापरि माझ्याहि स्वरातून उसळे प्रेम दिवाणे..... अभिषेकींनी गायलेल्या माझे जीवन गाणे- मधील ओळी....
|
Bee
| |
| Tuesday, September 26, 2006 - 2:55 am: |
| 
|
रॉबीन बरोबर, मी हा शब्द असाही वाचला आहे 'वरुन दिसणारे ते दृश्य मोठे विहंगम होते' हे वाचून ज्यानी कुणी ते वाक्य लिहिले त्यानी विहंगमचा अर्थ 'सुंदर' वा 'रमणीय' असा घेतला असे दिसते. शिल्पा, रैना उदा. छान दिले आहेत. म्हणजे मी वर लिहिलेले निळ्या पक्षाचे वाक्यही बरोबर आहे. सर्वांचे धन्यवाद....
|
Upas
| |
| Tuesday, September 26, 2006 - 3:19 am: |
| 
|
Bee same का pinch .. मी येताना वामन देशपांडे यांची दासबोधाची प्रत घेऊन आलोय.. ती सटीप आहे.. सार्थ आणायला जमले नाही.. सुरुवातीचे काही समास वाचताना सायुज्यता शब्द अडला म्हणून इथे विचारला.. जस जसा पुढे जातोय तस तसे सगळे अर्थ विशद होतच आहेत.. प्रफुल्ल धन्यवाद!
|
Shonoo
| |
| Tuesday, September 26, 2006 - 11:53 am: |
| 
|
उपास किती वर्षांनी same का pinch ऐकलं( वाचलं)! इतर कोणी आपल्यासारखीच वॉटरबॅग घेऊन आलंय याचा जेंव्हा आनंद होत असे ते निरागस दिवस आठवले. आता दुसयाकोणाची गाडी आपल्या सारखी आहे हे बघून कपाळाला सूक्ष्मशी का होईना, आठी चढायचे दिवस कसे आले? सकाळी सकाळी सुरेख आठवणींचा एक सिलसिलाच चालू झाला हे वाचून. धन्यवाद.
|
Upas
| |
| Tuesday, September 26, 2006 - 1:39 pm: |
| 
|
विषयांतराबद्दल क्षमस्व.. शोनू :-) अगं ही थोडीफार निरागसता टीकवण्यासाठी मदत केलेय तुझ्या माझ्यासारख्याच कैक मायबोलीकरांनी.. होय, हे जीवन सुंदर आहे! 
|
वा काय छान.. अशा गप्पा ऐकल्या की दिवस कसा छान जातो..!!!
|
Bee
| |
| Wednesday, September 27, 2006 - 2:09 am: |
| 
|
कालच मी त्या ' same का pinch ' चा अर्थ विचारणार होतो पण राहून गेले. सांगा बघू लवकर ह्याचा अर्थ.. शोनू, असे हे वाक्य निदान मी तरी पुर्वी कुठे ऐकले नाही. त्या 'आवडेश, खावेश' प्रमाणे राजेश खन्नाच्या काळातले तर नाही ना :-)
|
Shonoo
| |
| Wednesday, September 27, 2006 - 11:47 am: |
| 
|
अरे बी: तुला same का pinch माहित नाही? hmmm . आता याचा अर्थ सांगणे म्हणजे 'खरकटं' चा अर्थ सांगण्यासारखं आहे. मुम्बैमधे साधारण पहिली ते सातवीच्या वयातल्या मुला मुलींचा वाक्प्रचार होता हा. ( अजून असेल पण मला माहित नाही.) कोणी जर आपल्या सारखी वॉटरबॅग, कम्पासपेटी, वही, चप्पल, लविन्टोक्यो ( असंच म्हणायचं असतं ते) घेऊन आले तर लगेच same का pinch म्हणून त्या मुलाला किंवा मुलीला एक चिमटा काढायचा! आता लविन्टोक्यो म्हणजे काय ते तू विचारशीलच. पण त्याचे उत्तर इथे काय मिळतं ते पाहू
|
Raina
| |
| Wednesday, September 27, 2006 - 1:51 pm: |
| 
|
लविन्टोक्यो >>शोनू- म्हणजे ते विशिष्ट प्रकारचे केसांना लावायचे रबरबॅन्ड (काचेचे मणी बिणी लावलेले) ना?
|
Bee
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:02 am: |
| 
|
हीहीही.. शोने मला माहिती आहे की लविन्टोक्यो कशाला म्हणतात. तेच जे रैना म्हणते आहे. माझ्या बहिणी वापरत असतं हा लविन्टोक्यो त्यामुळे अगदी त्यांचीपण इथे आठवण झाली.. रक्षाबंधच्या राख्या एकदा हातातुन काढल्या की त्यांना लगडलेले मणीबिणी वापरुन त्या कधीकधी घरीच हा लविन्टोक्यो करतं.. हे नाव बहुतेक love in Tokeo ह्या चित्रपटामधुन आले असेल.. आता अर्थ कळला मला same का pinch चा पण ह्या उपाश्यानी मला चिमटा का काढला कळले नाही :-) खरकट म्हणजे पानातले सर्व अन्न संपून उष्ट पडलेल्या अन्नाचे कण...
|
Shonoo
| |
| Thursday, September 28, 2006 - 12:06 pm: |
| 
|
बी एकदा तू चिनी किंवा युरोपिअन माणसाला खरकटं याचे सर्व अर्थ connotations aaNi nuances सहित सांगून बघ! खरकटं या शब्दामागे शुद्धाशुध्दतेचा पवित्र अपवित्र याचा मोठा concept आहे. तो भारतीय संस्कृतीशी अपरिचित माणसाला समजणे, समजवणे अवघडच. नुसतं ताटात उरलेलं किंवा खाली सांडलेलं म्हणजे खरकटं का? मग हात खरकटा कसा होतो? ताटं वाट्या भांडी खरकटी कशी होतात मग? उपासाला न चालणार्या पदार्थांना पण 'खरकटे' पदार्थ म्हणतात काही ठिकाणी. त्याविषयावर प्रबंध होऊ शकतो. इथे टी व्हीवर अनेक कूकिंग कार्यक्रमात स्वैपाकाच्या मोठ्या भांड्यातून थेट चमच्याने पदार्थ काढून चाखताना दाखवतात. भारतात बरेच ठिकाणी स्वैपाक करताना नैवद्या दाखवण्या अगोदर चव पाहणे निषिद्ध मानले जाते. अजूनही, नैवेद्याची प्रथा रोज पाळली जात नसली तरी चव पाहताना एका छोट्या वाटीत किंवा ताटलीत पदार्थ काढून मग चव पाहिली जाते. नाहीतर तो पदार्थ खरकटा झाला असं मानतात. हे सर्व अशा सन्स्कृतीत वाढलेल्या व्यक्तीला आपसूक कळेल. पण ज्याला हे सर्व अपरिचित आहे त्याला समजाऊन सांगणे किती वेळखाऊ होइल! इथे येवढे टाइपतानाच किती वेळ गेला माझा?
|
Shonoo
| |
| Thursday, September 28, 2006 - 12:07 pm: |
| 
|
उपास ने तुला का same का pinch म्हटले यावर तूच विचार करून पहा :-)
|
थोडक्यात, 'खरकटं' हा शब्द 'उष्टं' या अर्थानेही वापरतात असं म्हणता येईल का? हे उष्टं म्हणजे काय हे समजावताना एकदा असेच माझ्या नाकी नऊ आले होते. तसेच 'दिवाळी अंक' ही संकल्पना अमराठी लोकांना समजावताना. एक वार्षिक पत्र एवढे म्हणून थांबता येते. (हे म्हणजे 'आई' म्हणजे कोण? तर एक स्त्री असे सांगण्यासारखे) पण मग तुम्हा महाराष्ट्रीयांना एवढे काय त्याचे 'कवतिक' असते? हे समजावताना दमछाक होते.
|
Chioo
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:16 pm: |
| 
|
खरकटं आणि उष्टं यात थोडा फ़रक आहे. आता हा कसा सांगायचा. उष्टं म्हनजे अर्धवट खाऊन ठेवलेले म्हणता येईल. जसे एकमेकांचे उष्टे खाणे इ. खरकटेला उष्ट्यापेक्षा जास्त व्यापक अर्थ आहे. परत या संकल्पना प्रदेशाप्रमाणे बदलणार्या.
|
Storvi
| |
| Thursday, September 28, 2006 - 2:49 pm: |
| 
|
उष्टं : अन्नाला तोन्ड लावल्यावर ते अन्न उष्टं होत. उष्टं टाकाऊ नसतं. खरकटं : हे एक वेळ उष्टं नसेलही, पण टाकाउ असतं. खरकटं कोणी खात नाहीत उष्टं खातात. म्हणजे, भाताच्या भांड्याला किंवा डावाला लागलेली शितं किंवा थोडसं अन्न खरकटं असतं. पण जर सगळे जेवायला बसलेले असलो तर जेवतांना उजव्या हाताने आपण अन्न वाढत नाही, नाहीतर ते उष्टं होतं
|
Anilbhai
| |
| Thursday, September 28, 2006 - 3:08 pm: |
| 
|
sinefield चे episode आठवतात का कोणाला?. जोर्ज एकदा पार्टीला कोर्न चीप डीप मधे बुडवुन अर्धी खातो व परत डीप मधे ती अर्धी चीप बुडवतो. तेव्हा एक माणुस त्याच्या वर जाम खवळ्तो. व म्हणतो 'Do not double dip the chip. It's like putting whole mouth inside the dip. Just dip once and finish it.' दुसर्या एका episode मधे एका पार्टीत एक बाई एक अख्खा डोनट भरलेल्या कचर्याच्या बिन मधे टाकते. जोर्जी बाॅय तिथे येतो आणी तो डोनट उचलुन खाताना, त्याच्या प्रेयसीची आई बघते. मग त्याने गार्बेज खाल्ले म्हणुन जी धमाल उडते.
|